Skip to main content

यु हॅव गॉट अ मेल..

लेखक नि३ यांनी सोमवार, 14/03/2011 या दिवशी प्रकाशित केले.
सकाळी सकाळी ऑफीस आलो.लॉग ईन करुन आउटलुक ऊघडले ...३५० अनरीड मेल ??? आमचा नवा नवा प्रोजेक्ट सुरु झाला रोज जास्तीत जास्त १०-१२ मेल आलेले असतात...३५० म्हणजे काही तरी मोठा प्रॉब्लेम झाला असावा हा विचार करुन थोडे सरसावुन मेल वाचायला बसलो.. हाय रे देवा..मुर्खतेचा कळस.. कंपनीत कुणाला तरी..एका सर्टीफीकेशन बद्द्ल माहीती हवी होती म्हणुन त्याने ईन्-जनरल एक मेल टाकला ..पण टु लिस्ट मधे गलतीच्या मिस्टेकने दुसरीच distribution list टाकली. झाले त्यानंतर त्या DL मधले एक्-एक करुन सगळे जन replay to all करत मेल पाठवीत राहीले की, I am not the intended recipient आणि असे करता करता ३५० झाले आणी नंबर वाढतच होता.आणी ज्याने कोणी ह्या च्यु*पणा करुन मेल टाकला होता तो काय माहीती कुठे कडमडला तर त्याचा एक पण रीप्लाय नाही. म्हणजे कोणाला पण थोडा सुद्धा कॉमन सेन्स युज करावासा वाटला नाही.अरे ईतकी एज्युकेटेड ,नेट सेव्ही प्रोफेशनल तुम्ही काय गोंधळ पणा चालु केला आहे...मिनीटागणीक ३०-४० मेल पडत होती ..ही चेन रीयाक्शन सुरु झाली होती ..काही जण त्यातल्या त्यात reply to all मेल ला reply to all करुन reply to all करु नका अशी विनंती करत होती. आता याला कसे थांबवायचे विचार करीत होतो..मग ईमिडीयटली reply to all करुन एक मेल लिहायला सुरवात केली. आणी नंतरही काही वेळ मेल येतच राहीले ..पण थोड्या वेळाने मेल चा फ्लो कमी झाला आणी सरते शेवटी एकदाचे मेल थांबले हुश्श...... तर सांगायचे तात्पर्य असे की तुम्ही जरी intended recipient नसले तरी ते सांगायची काय गरज (मेल चा असा विषय असा नव्हता की नाही सांगीतले तर काही फरक पडणार होता.) आणी सांगायचे असेल तरी एवढे सगळे मेल बघीतल्यावर तरी नव्हते पाठ्वायला आणी नाही कमीत कमी तर reply to all न करता ज्याने कोणी मेल केला त्याला पाठ्वायचे ना कमीत कमी त्याच्या चुकीची सजा तरी त्याला मिळाली असती आणी पुढच्या वेळेपासुन मेल पाठवितांना काळजी घेतली असती. असाच एक मुर्खपणा चालु असतो..ते microsoft paying you not fake किंवा तसलेच काही मेल.. कुणी कॉलेज मधल्या मुलाने किंवा जो नविन नविन कंप्युटर हाताळायचे शिकला त्याने असले मेल एकदाचे फॉरवर्ड केले ते समजु शकतो पण तुम्ही एवढे एवढे वर्ष काम करुन सुद्धा... तुम्हाला जरी वाटत असेल की मला काय एकदाच फॉरवर्ड करायचे आहे ना मग काय दाबली बटण्..अरे पण ती चेन रीयाक्शन चालु राहते ना ...आणी मला तरी कोणी अजुनपर्यंत असा भेट्ला नाही की ज्याला असले धंदे करुन काही मिळाले असेल.. फ्रस्टेटेड ----नि३ माझा ब्लॉग : http://www.db2guide.blogspot.com/
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 2762
प्रतिक्रिया 18

प्रतिक्रिया

=))

अशा मेल्सवरून कंपनीत बेंचवर किती लोक आहेत ते काढता येते. No.of people on bench = 0.8 * Number of Managers * number of freshers * total mails. empirical formula आहे हा.derivation विचारु नका.!

काही जण त्यातल्या त्यात replay to all मेल ला replay to all करुन replay to all करु नका अशी विनंती करत होती
reply to all म्हणायचे आहे का तुम्हास्नी?
आता याला कसे थांबवायचे विचार करीत होतो..मग ईमिडीयटली replay to all करुन एक मेल लिहायला सुरवात केली. आणी नंतरही काही वेळ मेल येतच राहीले ..पण थोड्या वेळाने मेल चा फ्लो कमी झाला आणी सरते शेवटी एकदाचे मेल थांबले हुश्श......
अशी काय आयडीया केली तुम्ही की, मेल यायचे थांबले? "ईमिडीयटली replay to all " मेल मध्ये काय लिहीले?

In reply to by उमराणी सरकार

reply to all म्हणायचे आहे का तुम्हास्नी? होय reply to all म्हणायचे होते मला :-) .दुरुस्त करतो. अशी काय आयडीया केली तुम्ही की, मेल यायचे थांबले? "ईमिडीयटली replay to all " मेल मध्ये काय लिहीले? व्यनी करतो.

अगदी अगदी. मागे एकदा माझ्या एका ईमेल-ग्रूपवर "हे ईमेल फार झाले, यादीतून मला काढून टाका" संदेशांनी धुमाकूळ घातला होता. (तो ग्रूप वारला बिचारा.)

यु हॅव गॉट मेल असे गोंडस नाव दिल्याने आम्हाला आमची मेग रायन आठवली अन आम्ही अंमळ हळवे झालो (म्हणुनच धागा उघडला) आता दोन तिन दिवस चैन पडायची नाही...

In reply to by Nile

अगदी अगदी. तिचे 'यू हॅव गॉट मेल', 'फ्रेंच किस' आणि 'अ‍ॅडिक्टेड टू लव्ह' हे आमचे अत्यंत आवडते चित्रपट आणि त्यातले तिचे रूपही.

In reply to by नगरीनिरंजन

अहो, कळलं आम्हाला, तुम्हाला इंग्रजी समजतं आणि तुम्ही इंग्रजी पिच्चर बघता ते!!! किती ती जाहीरातबाजी!!

In reply to by शिल्पा ब

हॅ हॅ हॅ, गैरसमज होतोय. आम्हाला इंग्रजी समजतं असं वरती कोणत्याही वाक्यात सुचित होत नाहीय. चित्रपटात आम्हाला काय समजलं आणि काय आवडलं ते वरती स्पष्ट लिहीले आहे.