सकाळी सकाळी ऑफीस आलो.लॉग ईन करुन आउटलुक ऊघडले ...३५० अनरीड मेल ??? आमचा नवा नवा प्रोजेक्ट सुरु झाला रोज जास्तीत जास्त १०-१२ मेल आलेले असतात...३५० म्हणजे काही तरी मोठा प्रॉब्लेम झाला असावा हा विचार करुन थोडे सरसावुन मेल वाचायला बसलो..
हाय रे देवा..मुर्खतेचा कळस..
कंपनीत कुणाला तरी..एका सर्टीफीकेशन बद्द्ल माहीती हवी होती म्हणुन त्याने ईन्-जनरल एक मेल टाकला ..पण टु लिस्ट मधे गलतीच्या मिस्टेकने दुसरीच distribution list टाकली.
झाले त्यानंतर त्या DL मधले एक्-एक करुन सगळे जन replay to all करत मेल पाठवीत राहीले की, I am not the intended recipient आणि असे करता करता ३५० झाले आणी नंबर वाढतच होता.आणी ज्याने कोणी ह्या च्यु*पणा करुन मेल टाकला होता तो काय माहीती कुठे कडमडला तर त्याचा एक पण रीप्लाय नाही.
म्हणजे कोणाला पण थोडा सुद्धा कॉमन सेन्स युज करावासा वाटला नाही.अरे ईतकी एज्युकेटेड ,नेट सेव्ही प्रोफेशनल तुम्ही काय गोंधळ पणा चालु केला आहे...मिनीटागणीक ३०-४० मेल पडत होती ..ही चेन रीयाक्शन सुरु झाली होती ..काही जण त्यातल्या त्यात reply to all मेल ला reply to all करुन reply to all करु नका अशी विनंती करत होती.
आता याला कसे थांबवायचे विचार करीत होतो..मग ईमिडीयटली reply to all करुन एक मेल लिहायला सुरवात केली.
आणी नंतरही काही वेळ मेल येतच राहीले ..पण थोड्या वेळाने मेल चा फ्लो कमी झाला आणी सरते शेवटी एकदाचे मेल थांबले
हुश्श......
तर सांगायचे तात्पर्य असे की तुम्ही जरी intended recipient नसले तरी ते सांगायची काय गरज (मेल चा असा विषय असा नव्हता की नाही सांगीतले तर काही फरक पडणार होता.) आणी सांगायचे असेल तरी एवढे सगळे मेल बघीतल्यावर तरी नव्हते पाठ्वायला आणी नाही कमीत कमी तर reply to all न करता ज्याने कोणी मेल केला त्याला पाठ्वायचे ना कमीत कमी त्याच्या चुकीची सजा तरी त्याला मिळाली असती आणी पुढच्या वेळेपासुन मेल पाठवितांना काळजी घेतली असती.
असाच एक मुर्खपणा चालु असतो..ते microsoft paying you not fake किंवा तसलेच काही मेल.. कुणी कॉलेज मधल्या मुलाने किंवा जो नविन नविन कंप्युटर हाताळायचे शिकला त्याने असले मेल एकदाचे फॉरवर्ड केले ते समजु शकतो पण तुम्ही एवढे एवढे वर्ष काम करुन सुद्धा...
तुम्हाला जरी वाटत असेल की मला काय एकदाच फॉरवर्ड करायचे आहे ना मग काय दाबली बटण्..अरे पण ती चेन रीयाक्शन चालु राहते ना ...आणी मला तरी कोणी अजुनपर्यंत असा भेट्ला नाही की ज्याला असले धंदे करुन काही मिळाले असेल..
फ्रस्टेटेड
----नि३
माझा ब्लॉग : http://www.db2guide.blogspot.com/
वाचने
2762
प्रतिक्रिया
18
मिसळपाव
प्रतिक्रिया
=))
छोतेछोते ऑफिसमे ऐसी बडीबडी
हा हा हा
+१
In reply to हा हा हा by चिरोटा
श्री चिरोटा, तिकडे त्या
In reply to हा हा हा by चिरोटा
च्यायला असल्या मेल म्हणजे
दादा शांत व्हा...शांतिस राखा
हो ना , प्रॉब्लेमंच झालाय नै
आत्ता वो काय कराचं?
In reply to हो ना , प्रॉब्लेमंच झालाय नै by टारझन
काही शंका
reply to all म्हणायचे आहे का
In reply to काही शंका by उमराणी सरकार
असेच
यु हॅव गॉट मेल असे गोंडस नाव
अगदी अगदी. तिचे 'यू हॅव गॉट
In reply to यु हॅव गॉट मेल असे गोंडस नाव by Nile
अहो, कळलं आम्हाला, तुम्हाला
In reply to अगदी अगदी. तिचे 'यू हॅव गॉट by नगरीनिरंजन
कळ्ळं ना? मग बघत चला
In reply to अहो, कळलं आम्हाला, तुम्हाला by शिल्पा ब
कोणता प्रश्न पडलाय म्हणता
In reply to कळ्ळं ना? मग बघत चला by Nile
हॅ हॅ हॅ, गैरसमज होतोय.
In reply to अहो, कळलं आम्हाला, तुम्हाला by शिल्पा ब