आता मागणे एकची
माझे मागणे एकची, ठेव ताठ उभा सूखी
खोल रुतवले पाय, जरी माती रुखी सुखी
अंगाखांद्यावर खेळे, पिलावळ चिमण्यांची
धरी पानांचा पखवाज, धून अंगाई गीताची
राघू पोपटी, मी तृप्त, बाकदार लाल चोची
श्वास रोखूनी साहतो, पक्व फ़ळावर टोची
कधी ढगही धरती, वेड्या कंजुषीचा हट्ट
तहानला व्याकूळ मी, बंद खजिने ते घट्ट
ओल्या वाऱ्यातून बाहू, शोषी अपुऱ्या जलाते
दवबिंदू चार घेऊन, रस भरतो फ़ळाते
येता मागणी कुठूनी, दांडे कुऱ्हाडींचे काळ
भुंडे करूनीया अंगा, कुणी पेटविती जाळ
आता मागणे एकची, राहो अंतरंगी श्वास
जरी तोडले बाहुंना, वाढो कबंधी विश्वास
जरी तोडले बाहुंना, वाढो कबंधी विश्वास
__/\__
अप्रतिम ...
पुर्वी धातु बराच पातळ होता
पर्यावरण
वावा!! अप्रतिम कविता!! ओल्या
सुंदर कविता!
छान कविता!
मस्त !!!
अप्रतीम
अप्रतिम काव्य .. मनापासुन