Skip to main content

केळे-बेदाणे केक

लेखक सानिकास्वप्निल यांनी सोमवार, 14/03/2011 या दिवशी प्रकाशित केले.
..साहित्य: दीड कप मैदा १ कप साखर ३ पिकलेली केळी १/४ कप मऊ बटर किंवा तुप १ टीस्पून बेकिंग सोडा १/२ टीस्पून बेकिंग पावडर १ अंडे १/२ कप बेदाणे १ टीस्पून व्हॅनिला ईसेन्स पा़कृ: १८० डिग्री वर ओव्हन तापवायला ठेवावे. केळी कुसकरून त्यात साखर घालणे. मैदा, बेकिंग सोडा आणी बेकिंग पावडर चाळून घेणे. बटर आणी अंडे एकत्र हलके फेटून घेणे. केळ्याचे आणी अंड्याचे मिश्रण मैद्यात घालणे व नीट सगळे एकत्र करणे. त्यात बेदाणे घालून तुप लावलेल्या केक्च्य भांड्यात मिश्रण ओतणे. १८० डिग्री वर ४०-५० मिनिटे बेक करणे. केक तयार झाला की कुलिंग रॅकवर काढणे. थंड झाला की वरून पिठीसाखर भुरभुरणे.

वाचने 10222
प्रतिक्रिया 23

प्रतिक्रिया

करून पहायला (सांगायला) हवं. एक प्रश्नः बेकिंग सोडा आणि बेकिंग पावडर दोन्ही का वापरायचे? बेकिंगच्या पाककृतींमध्ये दोनापैकी एकच वापरलं जातात (केक साठी बेकिंग पावडर वापरतात असं या दुव्यावरून दिसतं). बेकिंग पावडर = बेकिंग सोडा (सोडियम हाय्ड्रॉक्साईड) + क्रीम ऑफ टार्टार + कॉर्न स्टार्च यातलं acidic क्रीम ऑफ टार्टार alkaline बेकिंग सोड्याला neutralize करतं तर दोन्ही वापरल्याने बेकींग सोड्याचं प्रमाण आधिक होऊन मिश्रण (आणि केक) तुरट/कडवट नाही का लागणार? की आधिकच्या बेकिंग सोड्याला बाकीच्या साहित्यातले काही पदार्थ neutralize करतात?

In reply to by बहुगुणी

तुम्ही 'बहु'गुणी कि 'अव'गुणी हो??? किती तो केमिस्ट्रीचा कीस पाडाल? करुन बघा अन मग ठरवा ना कोणता ऐवज घालायचा आणि किती प्रमाणात घालायचा ते!

In reply to by बहुगुणी

बेकिंग सोडा म्हणजे सोडीयम बायकार्बोनेट, हाय्ड्रॉक्साईड नव्हे! घाईत चुकीचं टंकलं, चाणाक्ष धनंजयांचे आभार! अन्या दातार साहेबः अहो खरंच प्रामाणिक प्रश्न पडला म्हणून विचारतोय, त्यात अवगुणी काय झालं ते कळलं नाही. मी चुका करून शिकण्यापेक्षा इथे पाककला-निपूण मंडळी आहेत त्यांना विचारून समजावून घेतलं, आणि चुका करायचंच टाळलं, तर आधिक बरं असं वाटलं म्हणून विचारलं, इतकंच.

In reply to by दिपाली पाटिल

अंड न घालता ही बनवू शकता वरील साहित्य तेच राहील फक्त (अंडे आणी बेकिंग पावडर ऐवजी) १ टीस्पून बेकिंग सोडा आणी २ टेस्पून दूध घालणे.

In reply to by बहुगुणी

अतिशय सोपि आहे रेसिपि, पण केक करण्यातला मला सगळ्यात कंटाळ्वाणा वाटणारा भाग म्हणजे फेटणे. त्याला काही पर्याय आहे का ते सांगा कोणितरी. @ बहुगुणि, आपल्या प्रतिसादावरुन काही दिवसापुर्वी ' स्वयंपाकघरातील विज्ञान ' असे पुस्तक की लेखमाला वाचण्यात आले होते त्याची आठवण झाली. तसेच लोकसत्ताच्या शनिवारच्या पुरवणित सुद्धा अशा प्रकारचे लेख येत असतात. या प्रकारची एखादि लेखमाला लिहु शकलात तर मजा येईल.

In reply to by बहुगुणी

तुमचे म्हण्णे बरोबर आहे ( बेकिंगच्या पाककृतींमध्ये दोनापैकी एकच वापरलं जातात) मी त्याच्याशि १००% सहमत आहे. इतका गहन अभ्यास मी नाही केला हो ही पाककृती बनवताना, मी ती पाककृती कुठेतरी वाचली होती, त्याप्रमाणे बनवली :) केलेला केक चवीला खुपच स्वादिष्ट होता, अजिबात तुरट/कडवट नव्हता, म्हणून मी पाककृती इथे दिली. :) @ ५० फक्त केक करताना फेटणे हे कंटाळवाणे वाटले तर इलेक्ट्रिक बीटर चा वापर करू शकता, त्याने वेळ ही वाचेल आणी कंटाळा ही येणार नाही :)

In reply to by बहुगुणी

सर आपण दुस-या पदार्थांचे आम्ल्/आम्लारी गुणधर्म ही लक्षात घ्यायला हवे. Source : chemistry.about.com Some recipes call for baking soda, while others call for baking powder. Which ingredient is used depends on the other ingredients in the recipe. The ultimate goal is to produce a tasty product with a pleasing texture. Baking soda is basic and will yield a bitter taste unless countered by the acidity of another ingredient, such as buttermilk. You'll find baking soda in cookie recipes. Baking powder contains both an acid and a base and has an overall neutral effect in terms of taste. Recipes that call for baking powder often call for other neutral-tasting ingredients, such as milk.

आज इतक्या महिन्यांनी या पाकृसाठी योग आला. एकाचवेळी तीन जास्त पिकलेली केळी घरात असणे यासाठी वाट पहावी लागली. ;) बेदाण्यांऐवजी आक्रोड वापरलेत हाच फरक. केक चांगला झालाय. 002

In reply to by सानिकास्वप्निल

:)

अरे देवा..... ढिश्श्श्श्श्श्श्श्श्श्श्श्.....................इथे बेशुद्ध पडलेली स्मायली कल्पावी. अवांतर : (नशीब कोणी हे नाही विचारले की बिना केळे आणी बेदाणे यातुन केक कसा बनवावा.)

In reply to by प्रास

@मराठे>>>अंड तर शाकाहारीच असतं. प्रश्न आपण (म्हणजे तुम्ही) शाकाहारी का असतो असा आहे!>>> आपण (म्हणजे तुम्ही),,,मिश्राहारी असता,मी (अजुनही) शाकाहारीच आहे. http://www.freesmileys.org/smileys/smiley-taunt009.gif @प्रासदादा>>>अंड निराहारी असतं ना हो गुर्जी...... http://www.freesmileys.org/smileys/smiley-laughing004.gif ते कुठं काही खातंय?>>> --^--^--^--