✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

असा अनुभव फक्त पुण्यातच येऊ शकतो.

३
३_१४ विक्षिप्त अदिती यांनी
Mon, 03/14/2011 - 12:45  ·  लेख
लेख
शनिवार-रविवारी काय करायचं हा एक मोठ्ठा प्रश्न पुण्यातच चुटकीसरशी सुटतो. The King's Speech बघायचं ठरलं आणि आश्चर्य म्हणजे घराजवळच्या ई-स्क्वेअरमधे सोयीच्या वेळेत तो दाखवतही होते. पिक्चरच्या वेळेच्या वीस मिनीटं आधी जाऊन तिकीटही मिळाली. सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून स्कूटर पार्किंगमधे नेण्याआधी त्यांनी पिलियन रायडरला उतरवला, मला हेल्मेट काढायला लावलं, अ‍ॅक्टीव्हाच्या सीटखालची डिकी उघडून पाहिली (हँडलमधली महत्त्वाची नसावी), आणि मगच पार्किंगमधे सोडलं. दीडचा शो वेळेतच, बरोब्बर एक वाजून सदतीस मिनीटांनी सुरू झाला. सगळं कसं, आलबेल! पिक्चर संपला आणि मी खुर्चीतून उठताना स्वतःच्याच खिशात हात घातला, किल्ली नाही. झोळीत टाकली असेल म्हणून झोळीत हात घातला, तिथेही नाही. अंधारात दिसणार नाही, चालता चालता चाचपडताना मी धडपडेन म्हणून खाली उतरल्यावर पाहिलं किल्ली नाही. "आता स्कूटर गेली असणार, इथून घरी जायचं तर रिक्षा कुठे मिळेल, बस मिळेल का, पुढचे दोन-तीन महिने सायकल चालवावी" वगैरे विचार आधीच करून झाला. तरी एकदा खात्री करण्यासाठी पार्किंगमधे आले. नक्की कुठे स्कूटर ठेवली होती हे आठवेना, तर तिथल्या माणसाने "हो, इथेच होती तुमची स्कूटर. नंबरप्लेट पहा," असा सूज्ञ सल्लाही न मागताच दिला. चालण्याचा थोडा व्यायाम केल्यावर स्कूटर दिसली आणि स्कूटरलाच ठेवलेली किल्लीही! जिथे जशी लावली होत्या तिथेच स्कूटर आणि किल्ल्या, दोन्ही तशाच होत्या! असं काही घडलं की आनंदाने मन अगदी भरून जातं. आणि निव्वळ, पुढचे दोन महिने सायकल चालवावी लागणार नाही, पोलिस चौक्यांचं पुन्हा पुन्हा दर्शन घ्यावं लागणार नाही, विसरभोळे म्हणून आपल्यावर व्यक्तीगत टीका होणार नाही इतका स्वार्थी विचारच त्यामागे नसतो. त्याही पलिकडे काहीतरी जाणवतं. हे जग सुंदर आहे असं वाटायला लागतं. माणसाच्या माणूसकीवर पुन्हा एकदा विश्वास ठेवावासा वाटतो. 'आज फिर जीने की तमन्ना है' सारखी गाणी खरोखर मनाला भिडतात. हे फक्त पुण्यातच घडू शकतं. तुम्हालाही पुण्यात मला आलेत तसे चांगले अनुभव आले असतील. o. तर कृपया ते चांगले अनुभवच लिहीणे. o. आपसातल्या भांडणांसाठी कृपया या धाग्याचा वापर करू नये, हा मुंबईच्या चाळीतला नळ नव्हे. o. पुण्याबद्दलचा धागा असला तरी पुणेरी रिक्षावाल्यांचा माजोरीपणा हा या धाग्याचा विषय आहे असं समजू नये. o. पुणेरी पाट्याही प्रेमळ असू शकतात याची कृपया जाणीव ठेवावी. o. 'आयपीएल'च्या पुणेरी पाट्या, आमचे रा.को. छोटा डॉन यांनीच लिहीलेल्या आहेत तेव्हा त्यांचा संदर्भ वापरताना निदान डान्रावांचा ॠणनिर्देश असावा.
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
समाज
लेखनप्रकार (Writing Type)
अनुभव

प्रतिक्रिया द्या
24075 वाचन

💬 प्रतिसाद (148)

प्रतिक्रिया

आणि ती एवढी भंगार हवी की

टारझन
Mon, 03/14/2011 - 14:07 नवीन
आणि ती एवढी भंगार हवी की कुत्र बी मुतायला यायला नको तुझ्या बाईक वर ... होक्की नै ? :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: इंटरनेटस्नेही

(No subject)

स्पा
Mon, 03/14/2011 - 14:12 नवीन
:D
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टारझन

मी पण एक बाईक ठेवावी

परिकथेतील राजकुमार
Mon, 03/14/2011 - 14:08 नवीन
मी पण एक बाईक ठेवावी म्हणतो!
गाढव ठेवा :) जास्ती उपयोगी पडेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: इंटरनेटस्नेही

गाढव ठेवा , जास्ती उपयोगी

स्पा
Mon, 03/14/2011 - 14:13 नवीन
गाढव ठेवा , जास्ती उपयोगी पडेल. कहर.... :D आवरा Image removed.Image removed.Image removed.Image removed.Image removed.Image removed.Image removed.Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार

@ टारु.. कोण आहे तर सांग..

इंटरनेटस्नेही
Mon, 03/14/2011 - 14:15 नवीन
@ टारु.. कोण आहे तर सांग.. ट्रायल मारुन बघु.. आपल्याला काय काम झाल्याशी मतलब! @ परा.. :ड
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार

सर्कारी पेट्रोल असतं भौ,

Nile
Mon, 03/14/2011 - 13:11 नवीन
सर्कारी पेट्रोल असतं भौ, त्याची काळजी देवाक पण नाही!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नन्दादीप

एकंच नंबर ..

टारझन
Mon, 03/14/2011 - 13:12 नवीन
थरारक आणि रोमहर्षक अनुभव . हसा अनुभव मला जपाण मधल्या सुनामीचा विडिओ टिव्ही वर पहाताना आल्या होता :) छाण लिहील्या गेले आहे. @ णाण्स : =))
  • Log in or register to post comments

पुण्यात फारसे चांगले अनुभव न

सूड
Mon, 03/14/2011 - 13:38 नवीन
पुण्यात फारसे चांगले अनुभव न आल्याने पास !!
  • Log in or register to post comments

पुण्यात फारसे चांगले अनुभव न

Dhananjay Borgaonkar
Mon, 03/14/2011 - 19:42 नवीन
पुण्यात फारसे चांगले अनुभव न आल्याने पास !! पुणेकरांना बरोब्बर कळत हो कोणाशी कस वागायच ते.. नंतर लोक उगाच मग बोंबाबोंब करतात की आम्हाला चांगले अनुभव नाही आले. म्हणुनच म्हणतो उगाच पुणेकरांच्या नादी लागु नका. (बिन)बुड
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड

काहीतरी गडबड आहे

चिंतातुर जंतू
Mon, 03/14/2011 - 13:46 नवीन
असा अनुभव पुण्यात यायला कथेमध्ये एखादा छुपा दुवा असला पाहिजे. उदाहरणार्थ: तुमच्या गाडीवर यांच्यासारखा कुणी बोका नुकताच बसला होता का? मग समस्यापूर्ती तो एक राम(दासकाका)च जाणे. || नुपेक्षी कदा रामदासाभिमानी || टीप १: माझं मराठी फार अभिमानास्पद नाही. त्यामुळे 'उगा काहितरीच' बोका आहेत का असे काहीतरीच पुणेरी प्रश्न उगा उपस्थित करू नयेत. टीप २: मला रामाचा किंवा 'मनाचे श्लोक'कर्ते रामदास यांचा अभिमान नाही. फक्त आमच्या रामदासकाकांचा आहे. टीप ३: टीप २ हा कंपूबाजीचा क्षीण प्रयत्न नाही. (कारण तो ठळक प्रकार आहे!).
  • Log in or register to post comments

Exclusive!

उगा काहितरीच
Mon, 03/14/2011 - 17:27 नवीन
अहो आमच्या शेजार्‍यांचा बोका Exclusive आम्हाला त्रास द्यायलाच जन्माला आलेला आहे ! :) लेखाबद्दल : छान लेख ! पण शिर्षक असे असायला हवे होते : असा अनुभव पुण्यातही येउ शकतो! :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चिंतातुर जंतू

उगा काहीतरीच! अहो, सगळे बोके

३_१४ विक्षिप्त अदिती
Mon, 03/14/2011 - 17:42 नवीन
उगा काहीतरीच! अहो, सगळे बोके हे फक्त त्रास देण्यासाठीच जन्माला आलेले असतात. (सांपल साईझ < ४.)
पण शिर्षक असे असायला हवे होते : असा अनुभव पुण्यातही येउ शकतो!
उगा काहीतरीच! मी पुण्यात रहाते, माझी स्कूटर पुण्यात रहाते म्हटल्यानंतर हा अनुभव पुण्यातच येणार ना!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: उगा काहितरीच

धन्यवाद !

उगा काहितरीच
Mon, 03/14/2011 - 18:49 नवीन
मला माही तच नव्हते जगातले सर्व सज्जन , सोज्वळ मानसे पुण्यात राहतात ते ! आता म्हणे पुण्यात शनी शींगनापुरसारखे विना दरवाज्याचे घर बांधनारेत! . . उगा काहीतरीच! अहो, सगळे बोके हे फक्त त्रास देण्यासाठीच जन्माला आलेले असतात. (सांपल साईझ < ४.) तुमच्या अ‍ॅक्टीव्हाचं सिट कधी फाडलं का हो आमच्या शेजारच्या बोक्यानं ?विश्वास ठेवा हो "तो" बोका फक्त मलाच त्रास देतोय! खरंच!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती

५ कलमी कायद्याने मुस्कट्दाबी

गणपा
Mon, 03/14/2011 - 13:49 नवीन
५ कलमी कायद्याने मुस्कट्दाबी झाली असल्याने हा गोग्गोड प्रतिसाद. ;) अभिनंदन अदिति लगोपाठ दुसरी शेंचुरी मारणार तु. मनीच्या बाता : ह्या अदितीला सच्याच्या जोडीला टीम मध्ये पाठवावी का? आंतरमनीच्या बाता : ती शेवटची ५ कलमे जोडली नसतीस तर त्रिशतक झळकवुन सेहेवागला पण मागे टाकलं असतर तु.
  • Log in or register to post comments

अतिशय चांगला अनुभव. बहुतेक

इंटरनेटस्नेही
Mon, 03/14/2011 - 14:21 नवीन
अतिशय चांगला अनुभव. बहुतेक लेखिका-ताई ने पुर्वजन्मी काहीतरी पुण्य केले असावे! आमच्या सारख्या पापी मंडळींना पुण्यात http://www.misalpav.com/node/13771 असे अनुभव येतात.
  • Log in or register to post comments

कुशंका

कवितानागेश
Mon, 03/14/2011 - 14:22 नवीन
किल्ली विसरणारी व्यक्ती नंबर मात्र लक्षात ठेवेल याबद्दल माझ्या मनात शंका आहे. ;) खरं सांग अदिती, कुणाची अ‍ॅक्टिव्हा आणलीस? ( डोळे वटारुन बोट नाचवणारी स्मायली)
  • Log in or register to post comments

बरोबर आहे तुझं!

३_१४ विक्षिप्त अदिती
Mon, 03/14/2011 - 14:33 नवीन
दुसरी किल्ली तेव्हा माझ्याकडे नसल्यामुळे नक्की कोणाची अ‍ॅक्टीव्हा आणली ते सांगता येणार नाही. पण एकूण स्कूटरवरची धूळ आणि आतलं हेल्मेट पाहून ती स्कूटर माझीच असावी असा दाट संशय मला आला. ;-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कवितानागेश

-१

सहज
Mon, 03/14/2011 - 14:58 नवीन
शिवसेना-भाजप यांच्या शासनकालात जातीय दंगली झाल्या नाही असे म्हणल्यावर तत्कालीन विरोधी पक्ष म्हणाले की दंगल करणारेच आता शासनकर्ते झाले म्हणुन दंगली झाल्या नाहीत. त्याच चालीवर म्हणतो , खुद्द स्कूटरचोरच सिनेमे बघण्यात व्यस्त असल्याने त्यावेळात इतर कोणाच्याच गाड्यांना काही इजा झाली नाही. तुम्हीच सांगा दाउद इब्राहीम वगैरेंची गाडी चोरीला गेल्याचे ऐकले आहे का कोणी? म्हणूनच म्हणतो असा अनुभव फक्त पुण्यातच नाही तर कुठेही येउ शकतो फक्त चोरांनी कामावरुन सुटी / निदान थोडावेळ ब्रेक घेणे गरजेचे.
  • Log in or register to post comments

+१

नितिन थत्ते
Mon, 03/14/2011 - 15:13 नवीन
चोरांचेही काही उसूल असणारच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सहज

चोरंचे उसूल पैकी काही: १.

नन्दादीप
Mon, 03/14/2011 - 15:57 नवीन
चोरंचे उसूल पैकी काही: १. कधीच दुसर्‍या चोराच्या घरी चोरी करु नये..... ह. घ्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नितिन थत्ते

दोन आनंददायी अनुभव...

योगप्रभू
Mon, 03/14/2011 - 15:01 नवीन
अध्यक्ष महोदय, गुरुजनवर्ग आणि माझ्या मित्र-मैत्रिणींनो! पुण्यनगरीचा रहिवासी या नात्याने आज मी तुम्हाला अलिकडचेच २ रंजक अनुभव सांगणार आहे. कृपया तुम्ही ते शांतचित्ताने ऐकून घ्यावेत, अशी नम्र विनंती... १) काही काळापूर्वी कांदा किलोला ७०-८० रुपयांपर्यंत भडकला होता तेव्हाची ही गोष्ट. तुम्हाला माहीत असेलच, की पुण्यात काही पाट्या कायमस्वरुपी लागलेल्या असतात (उदा : ही गप्पा मारायची जागा नव्हे. गेटसमोर गाडी लावल्यास हवा सोडली जाईल. बेसिनवर खाकरे, गुळण्या काढू नयेत, फक्त हात धुवावा. सुटे पैसे देणे, आमची टांकसाळ नाही. वगैरे वगैरे) काही पाट्या हंगामी असतात. त्यातील एक म्हणजे 'जादा कांदा मिळणार नाही. ग्राहकांनी मागू नये.' तर अशीच पाटी झळकणार्‍या पुण्यातील एका नामवंत मिसळ केंद्रात मी गेलो. मिसळीवर चमचाभर चिरलेला कांदा होता. मी मालकांना सांगितले, 'साहेब तुमची पाटी बघितली, पण चमचाभर कांदा आमच्या घशाखाली उतरत नाही. मी फुकट मागणार नाही. तुम्ही कितीही पैसे लावा, पण मला आणखी कांदा द्या.' त्यावर मालकही नम्रपणे म्हणाले, ' माझा नाईलाज आहे. मी कांदा देणार नाही. मी हात जोडतो तुम्हाला. कांदा मागूच नका.' मी नम्रपणे म्हणालो, 'साहेब. कांद्याचे रेशनिंग सुरु झालेले नाही. ८० रुपयात किलोभर कांदा मिळतोच आहे. त्यातला एक कांदा मला चिरुन हवा आहे. पुढच्या वेळेस मी घरुनच डब्यात चिरलेला कांदा घेऊन येईन. पण आता वाटीभर कांद्याचे अगदी दहा रुपये द्यायला मी तयार आहे. माझा मिसळीचा आनंद हिरावू नका.' त्यावर मालक म्हणाले, 'एक काम करा. मिसळ पार्सल घेऊन जा आणि घरी बसून त्यावर घरचा किलोभर कांदा चिरुन घाला आणि खा. तत्त्व म्हणजे तत्त्व. कांदा देणार नाही.' कांद्यापेक्षाही त्या महापुरुषाच्या तत्त्वनिष्ठेमुळे माझ्या डोळ्यात पाणी आले. २) बागेत दहा राऊंड फिरल्यानंतर मी दमून बेंचवर शांतपणे विसावलो होतो. समोर चिमणी पाखरे खेळत होती. ते बघण्यात तल्लीन झालो होतो. तेवढ्यात माझ्या खांद्याला कुणी तरी स्पर्श केला. एक काटकुळे काका शेजारी बसले होते. त्यांनी विचारले, 'काय निवांत बसलाय?' मी म्हणालो, 'हो. छान वाटतंय.' मग काकांनी माझी चौकशी करणारे प्रश्न विचारायला सुरवात केली. मीही त्यांना सगळी उत्तरे दिली कारण त्या रिलॅक्सिंग स्टेटमध्ये मला चिडायचे नव्हतेच. काकांनी अर्धा तास खूप पिळले. मग आश्चर्यकारकरीत्या एक प्रश्न विचारला, 'काय हो! मी अर्ध्या तासापासून तुम्हाला भंडावतो आहे. तुमचे मन अस्वस्थ नाही का झाले?' त्यावर मी म्हटलो, 'नाही. मला शांततेचा आनंद घ्यायचा आहे.' त्यावर काका म्हणाले, 'इथेच चुकते तुमचे. मन शांत म्हणजे शरीर शांत. अशा शांत शरीरातच चरबी साठते आणि माणूस सुटत जातो. मी पहा कायम अस्वस्थ मनाने वावरतो. दिसेल त्याला पीडतो. कुणी अपमान केला तरी अंगाला लाऊन घेत नाही. म्हणूनच माझ्या अंगावर चरबी नाही. तुमचे शरीर सुटायला लागले आहे. म्हणून वाटले मुद्दाम तुम्हाला सांगावे.' त्या काकांच्या या परोपकारी वृत्तीबद्दल मी त्यांचे आभार मानले. उठताना काका पुन्हा म्हणाले, 'नुसते बेंचवर बसण्यापेक्षा चांगले पाच राऊंड फिरा. त्याचा फायदा होईल.' मी 'बरं' म्हणालो आणि सहज विचारले, 'तुम्ही जनगणना करण्याचे काम करता का? इतके सगळे तपशीलवार प्रश्न विचारलेत म्हणून?' त्यावर काका म्हणाले, 'नाही. प्रश्न तितके महत्त्वाचे नसतात. काल मी तुमच्यासारख्याच एकाशी (म्हणजे स्थूल) राजकारणावर वाद घातला.' त्या महात्म्याला मी नम्रपणे वंदन केले. पु. ल. किंवा व. पुं. ना ही व्यक्तीरेखा भेटायला पाहिजे होती, असे आवर्जून वाटले.
  • Log in or register to post comments

तत्त्व म्हणजे तत्त्व

sagarparadkar
Mon, 03/14/2011 - 15:59 नवीन
>> कांद्यापेक्षाही त्या महापुरुषाच्या तत्त्वनिष्ठेमुळे माझ्या डोळ्यात पाणी आले माफ करा पण आपल्याला तत्व (तत्त्व नव्हे) नीटसे समजलेले दिसत नाही. आपल्याला जादा दर आकारून थोडा जादा कांदा दिलाही असता. पण मग ते पाहून इतरांना पण द्यावा लागला असता. आणि मग कांदा लवकर संपून गेल्यावर नंतर येणार्‍या ग्राहकाला बिना कांद्याची मिसळ द्यावी लागली असती, आणि ते ग्राहक दुखावले गेले असते. जे जगात कोणत्याच व्ययसायाच्या तत्वात बसत नाही ते आम्हा पुणेकरांकडून अपेक्षिताच कसे? एखाद्या 'स्टार बक्स' मधे जावून एकाच टॉल लॅटेमध्ये तेथे ठेवलेले मधाचे सगळेच 'सॅशे' रिकामे करता का? नसाल करत तर आता करून बघा. म्हणजे उपरोल्लेखित जागतिक तत्वाचा पुनर्परिचय कसा करून दिला जाईल ते अनुभवाला येईल :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: योगप्रभू

पोराला

चिरोटा
Mon, 03/14/2011 - 16:04 नवीन
आणि मग कांदा लवकर संपून गेल्यावर...
प्लानिंग का काय म्हणतात ते हवे की नको? कितीही चटणी मागा,उडपी देतो ना?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: sagarparadkar

प्लानिंग ...

sagarparadkar
Mon, 03/14/2011 - 16:32 नवीन
अहो सर, त्यांनी उपलब्ध पदार्थाचे आपत्कालीन परिस्थितीत, सर्वांसाठीच मर्यादित प्रमाणात वाटप करायचे ठरवले हे उत्तम नियोजनच (पक्षी प्लानिंग) नव्हे तर काय आहे? पण आपण तर त्या उत्तम नियोजनालाच नावे ठेवत नाही आहोत का? नारळ कोणत्याही कारणानी अत्यंत कमी प्रमाणात उपलब्ध असेल तरी उडपी जादा चटणी (ओल्या खोब्र्याची, इतर कुठली देउ शकेल.) देतो का? मला स्वतःला तरी तसा अनुभव नाही. उलट जादा चटणी किंवा सांबाराचे 'अ‍ॅडिशनल चार्जेस' पडतील म्हणून आधीच सांगतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चिरोटा

हे असले

चिरोटा
Mon, 03/14/2011 - 16:40 नवीन
हे असले आपत्कालीन विचार सर्वांसाठी करत बसला तो तर तो कधीच मोठा होणार नाही.उडपी असता तर त्याने १० ऐवजी १५ रुपये लावले असते योगप्रभूंना , मिसळीत जरा जास्त तिखट घातले असते आणि वर २५ रुपयांची मस्तानी घशात उतरवली असती . योगप्रभू, मिसळ खाल्ल्यावर पियुष,मस्तानी पिता ना तुम्ही?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: sagarparadkar

सागरजी चिरफाड करायचीच तर..

योगप्रभू
Mon, 03/14/2011 - 17:07 नवीन
सागरजी, गंमतीशीर अनुभवाची गंभीर चिरफाड करायचीच झाली तर.. मी पुण्यातीलच रहिवासी आणि व्यावसायिक आहे. व्यवसायाची तत्त्वे मलाही थोडीबहुत कळतात, असा माझा गैरसमज आहे. त्यानुसार कोणताही हुशार व्यावसायिक नंतरच्या चार ग्राहकांचा विचार करण्यापेक्षा सध्या समोर असलेला ग्राहक दुखावून जाऊ नये याचा जास्त विचार करेल (उडत्या ससाण्यापेक्षा हातातले कबूतर केव्हाही चांगले, असे चाणक्य म्हणतो.) त्यातून माझ्या ऑफरमध्ये त्याला फायदाच होता. कांदा बाजारात ८० रुपये किलोने असला तरी जेथे मोठ्या प्रमाणात कन्झ्युम होतो ते लोक घाऊक दराने मार्केटयार्डमधून पोते आणतात. इफेक्टिव्ह रेट किलोला ३५ ते ४० रुपये पडतो. एक किलो कांद्याच्या किती वाट्या होतात? (मिसळीबरोबर जी वाटी दिली जाते तिचा आकार लक्षात घ्या) त्यापैकी एका वाटीसाठी मी १० रुपये द्यायला तयार होतो. बरं कांदा बाजारात शिल्लक नाहीच, अशा स्थितीत त्याचा हेका समजू शकतो. असो. त्याचे तत्त्व मला खरोखर समजले नसावे, हे तुमचे म्हणणे बरोबर आहे. धंदा हा फायदा मिळवण्यासाठीच करायचा असतो, हे आपले आमचे जुने तत्त्व आहे. (बरं झालं. यावरुन एक जुनी आठवण झाली. मागे एकदा मी हैदराबादला गेलो होतो. तेथे एका मारवाड्याच्या खानावळीत गेलो. मेनू कार्डवरच मूळ जेवणाची किंमत आणि जादा पदार्थांची किंमत लिहिली होती. एक चमचा साखर - ५० पैसे, एक वाटी दही -पाच रुपये असा तपशील होता. त्यामुळे फायदा असा झाला, की मला कुणाशी हुज्जत न घालता शांतपणे जेवता आले आणि जादा पदार्थांची किंमत चुकती करुन मी बाहेर पडलो.)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: sagarparadkar

योगप्रभू ...

sagarparadkar
Mon, 03/14/2011 - 17:24 नवीन
>> मी पुण्यातीलच रहिवासी आणि व्यावसायिक आहे. बास , बास यातच सर्व काही आले :) :) :) अहो साहेब हे आधीच सांगितले असतेत तर मी पण तुमचे किस्से ऐकून 'एन्जॉय' केले असते . पुण्यातील रहिवासी आहात हे वाचले होते, पण मूळ रहिवासी की काही काळापूर्वीच स्थलांतरीत ह्याबद्दल थोडा संभ्रम वाटत होता :) :) पण कोणी परनगरी (परदेशी प्रमाणे) स्थित नागरीक ह्या पुण्यनगरीच्या पुण्यप्रद नागरीकांची टवाळी करू लागले की मग आम्हा सामान्य पुणेकरांची 'अस्मिता' उफाळून येते ... असो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: योगप्रभू

थोडक्यात म्हणजे, मुद्दा काय

विश्वनाथ मेहेंदळे
Mon, 03/14/2011 - 17:37 नवीन
थोडक्यात म्हणजे, मुद्दा काय आहे या पेक्षा कुणी मांडला हे महत्त्वाचे. सदर प्रतिसादक पुणेकर आहे हे कळल्यावर "उत्तम नियोजन", "सर्वांसाठीच मर्यादित प्रमाणात वाटप करण्याची निरपेक्ष वृत्ती" वगैरे वगैरे गेले का तेल लावत ??
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: sagarparadkar

त्याचं काय आहे ...

sagarparadkar
Mon, 03/14/2011 - 17:50 नवीन
जे नवस्थलांतरीत पुणेकर असतात ते बहुतेक वेळेस 'अभिजननिवासक्षेत्रवंचित' असतात (म्हणजे काय ते आपल्या लक्षात नक्कीच आले असणार, म्हणून अधिक स्पष्टीकरण देणे न लगे :) ). म्हणून मग ते पण आम्हा भूमिपुत्र पुणेकरांवर खार खात, जमेल तिथे जमेल तेव्हा वार करायची संधी शोधत असतात. सदरहू प्रतिसादक त्यांपैकी असावा अशी शंका आल्याने तसा प्रतिसाद टाकावा लागला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विश्वनाथ मेहेंदळे

जे नवस्थलांतरीत पुणेकर असतात

परिकथेतील राजकुमार
Mon, 03/14/2011 - 17:53 नवीन
जे नवस्थलांतरीत पुणेकर असतात ते बहुतेक वेळेस 'अभिजननिवासक्षेत्रवंचित' असतात (म्हणजे काय ते आपल्या लक्षात नक्कीच आले असणार, म्हणून अधिक स्पष्टीकरण देणे न लगे ). म्हणून मग ते पण आम्हा भूमिपुत्र पुणेकरांवर खार खात, जमेल तिथे जमेल तेव्हा वार करायची संधी शोधत असतात.
अगदी अगदी. मात्र प्रभु पुण्याचे आहेत हे माहित असल्याने गप्प होतो ;) बादवे तसेही नदीच्या पलिकडे आपल्यासाठी पुण्याची हद्द संपते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: sagarparadkar

बादवे तसेही नदीच्या पलिकडे

३_१४ विक्षिप्त अदिती
Mon, 03/14/2011 - 17:58 नवीन
बादवे तसेही नदीच्या पलिकडे आपल्यासाठी पुण्याची हद्द संपते.
हो, आणि आपणच कसे अलिकडच्या बाजूचे हे सांगण्यासाठी पुण्यात जागतिक महायुद्ध घडतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार

भांडू नका...

योगप्रभू
Mon, 03/14/2011 - 18:36 नवीन
मणिरत्नमच्या 'बॉम्बे' चित्रपटात एक दृश्य आहे. एक जमाव बेफाम होऊन मारायला धावत असतो. एक हातगाडीवाला गाडा ओढत चाललेला असतो. त्याला विचारतात, 'बोल तू हिंदू है या मुसलमान' त्यावर तो म्हणतो, 'अगर आप हिंदू हो तो मुसलमान समझकर मुझे काट डालो और अगर मुसलमान हो तो हिंदू समझकर मारो.' त्याप्रमाणे पुण्यावर चवताळून असणार्‍यांसाठी मी पुणेकर आहे आणि पुण्याचा अभिमान मिरवणार्‍यांसाठी मी 'नदीपल्याड'चा मानूस हाय. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार

येक क्रमांकाचे कंपुबाज

वपाडाव
Mon, 03/14/2011 - 18:21 नवीन
येक क्रमांकाचे कंपुबाज उत्तर... झाकीर णिषेद....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: sagarparadkar

कृपया तुम्ही ते शांतचित्ताने

३_१४ विक्षिप्त अदिती
Mon, 03/14/2011 - 16:34 नवीन
कृपया तुम्ही ते शांतचित्ताने ऐकून घ्यावेत, अशी नम्र विनंती...
मी खूप प्रयत्न केला हे अनुभव शांतचित्ताने ऐकून घेण्याचा, पण दुर्दैवाने हे जमलं नाही याची आधीच कबुली देते. तुमचे हे दोन अनुभव वाचून साक्षात पराब्रह्म मिळण्याचा आनंद झाला. माझ्या अनुभवामुळे मला 'आज फिर जीने की तमन्ना है' गाणं आठवलं तर तुमच्या अनुभव वाचनामुळे मला 'कभी कभी अदिती जिंदगी मे..' हे गाणं आठवलं. अशी महान सांस्कृतिक, शैक्षणिक, सामाजिक आणि अनुभविक परंपरा असणार्‍या शहरात मला काही काळासाठी का होईना नोकरी मिळाली, नोकरीच्या निमित्ताने मला स्कूटरवर प्रवास करण्याची संधी मिळाली, प्रवास करताना अनेक ठिकाणी गर्दी झाल्यामुळे मानवी भावनांचे कंगोरे अनुभवता आले आणि माझं अनुभवविश्व फारच समृद्ध आणि प्रगल्भ झालं याचा विचार करून, माझ्या अंतःकरणात विविध कृतज्ञ भावनांचा कल्लोळ उठून अतिशय हृद्य वाटलं हे मी मुद्दाम नमूद करू इच्छिते. योगप्रभू, तुमच्या प्रतिसादाबद्दल तुमचे विशेष आभार.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: योगप्रभू

पुण्याची काही गुणवैशिष्ठ्ये

विजुभाऊ
Mon, 03/14/2011 - 15:24 नवीन
पुण्याची काही गुणवैशिष्ठ्ये १) तुमच्या अंगातला माजोरीपणा घालवून तुमच्या अंगी नम्रपणा आणण्यात मदत करणे. (कोण रे तो म्हणाला की पुण्यात कमीत कमे शब्दात अपमान करून मिळतो म्हणून...) २) अगदी अपवादात्मक पहायला मिळणार्‍या छोट्याशा का होईना पण पुण्यात अनुभवलेल्या चांगल्या प्रसंगाचे कौतूक करण्याची संधी मिळते. ३) पौड रस्त्यावर एकाच वेळेस आगबोट ,सायकल ,विमान चालवण्याचा अनुभव मिळ॑तो. ( औंध च्या रहिवाशाना हे सूख मिळत नाही) ४) तुम्ही गाडी चालवताना अत्यंत चौकस रहायची प्रॅक्टीस घेतली जाते. ५) गाडी चालवताना / पीएम टीत बसताना "एक ना एक दिवस सर्वानाच जायचे आहे" हा अनुभ्व प्रत्यक्षात मिळून घाऊक प्रमाणात विरक्तता अंगी बानवली जाते.
  • Log in or register to post comments

हा हा हा

किशोरअहिरे
Tue, 03/15/2011 - 23:59 नवीन
गाडी चालवताना / पीएम टीत बसताना "एक ना एक दिवस सर्वानाच जायचे आहे" हा अनुभ्व प्रत्यक्षात मिळून घाऊक प्रमाणात विरक्तता अंगी बानवली जाते >>> ही पंचलाईन तर सगळ्यात बेस्ट.. लैच भारी ऊत्तर आहे विजुभाऊ :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विजुभाऊ

या धाग्यानिमित्याने - काल

अमोल केळकर
Mon, 03/14/2011 - 16:25 नवीन
या धाग्यानिमित्याने - काल स्टार प्रवाह वरचा - मुंबई-पुणे सिनेमा आठवला :) अमोल
  • Log in or register to post comments

बाकी कायबी म्हणा... पन

वपाडाव
Mon, 03/14/2011 - 16:40 नवीन
बाकी कायबी म्हणा... पन फुडच्या येळी सिनेमाला कदी अन कुटं जाणार हा त्ये मातर सांगा. ह्या टैमाला झाली गल्ती परिक आता न्हाइ व्हउ देणार...
  • Log in or register to post comments

हे प्रकरण पुणेरी पुण्यात,

इरसाल
Mon, 03/14/2011 - 17:33 नवीन
हे प्रकरण पुणेरी पुण्यात, मुंबेरी पुण्यात कि नागपुरी पुण्यात घडले? एक धडक धडक भाबडा प्रश्न ?????????????
  • Log in or register to post comments

५९ प्रतिक्रिया पण...

राजेश घासकडवी
Mon, 03/14/2011 - 18:01 नवीन
एकही चांगला अनुभव कोणी सांगितला नाही हे पाहून वाईट वाटलं. 'तुमची गाडी चोरीला गेली नाही म्हणजे ती भंगार असणार' वगैरेसारखे प्रतिसाद बघून तर फारच वाईट वाटलं. पुण्यातल्या लोकांच्या चांगुलपणाविषयी इतकी खात्री? मिपावर सगळे पुणेद्वेष्टेच भरलेले आहेत का? मी मला आलेला एक चांगला अनुभव सांगतो. तोही पुण्यातल्या रिक्षावाल्याकडून. एकदा मी रिक्षा पकडली तेव्हा तो रिक्षावाला त्याच्या मीटरशी काहीतरी खाटखूट करत होता. ते पाहून मला संशय आला. वाकडेवाडीहून आयडीयल कॉलनीमध्ये जाण्यासाठी रिक्षाचे ५२ - ५६ रुपये होत असत. दर वेळी रिक्षावाले आपल्याला मीटर कळतच नाही अशा थाटात ६०, ६५ असे काहीही आकडे सांगत. मग त्यांच्यासमोर गणित करून दाखवायचं आणि मोजके पैसे द्यायचे अशी माझी पद्धत होती. आता या माणसाशी काय वाद घालायचा हेच मी पोचेपर्यंत मनाशी ठरवत होतो. उतरण्याची वेळ आली तेव्हा त्याने मीटरकडे बघून सांगितलं. '३२ रुपये झाले'. ते ऐकून मी उडालोच. त्याच्या मीटरमध्ये खरोखरच खूपच कमी आकडा होता. मग मी त्याला म्हटलं 'अहो, तुमचं मीटर स्लो आहे, नेहेमी पन्नासपेक्षा थोडे जास्त होतात' असं म्हणून मी त्याला खिशात मोजून ठेवलेले ५४ रुपये दिले. पण आपलं मीटर बिघडलेलं असलं तरी प्रामाणिकपणे मीटरबरहुकुम इतके कमी पैसे मागितले याचं मला बरं वाटलं. आत्तापर्यंत मला दुसऱ्या कुठच्या शहरात इतका चांगला अनुभव आलेला नाही.
  • Log in or register to post comments

ऑसेच म्हण्तॉ

आत्मशून्य
Mon, 03/14/2011 - 18:21 नवीन
.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राजेश घासकडवी

उतारा

नितिन थत्ते
Mon, 03/14/2011 - 18:48 नवीन
हा त्या पुस्तक खरेदीवरचा उतारा दिसतोय.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राजेश घासकडवी

अगदी हेच टंकायला आले होते.

रेवती
Mon, 03/14/2011 - 19:51 नवीन
अगदी हेच टंकायला आले होते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नितिन थत्ते

अरेरे...

राजेश घासकडवी
Tue, 03/15/2011 - 18:08 नवीन
थत्तेकाका व रेवतीकाकूंसारख्या मान्यवर आयडींकडून अशी विधानं आल्याने काळजाला घरं पडली. एक वाईट अनुभव सांगितला तर लोक पुणेद्वेष्टा म्हणतात. दुसरा चांगला अनुभव सांगितला तर त्याला 'उतारा' म्हणतात... पण मूळ प्रश्न शिल्लक रहातोच. मिपावरच्या पुणेप्रेमी मंडळींना एकही चांगला अनुभव असू नये, किंवा असला तरी 'आम्ही लिहिणारच नाही, जा!' असा हटवादीपणा करावा, किंवा तो लिहायला वेळ मिळून नये असं का? कुठे गेला पुण्याचा जाज्वल्य अभिमान वगैरे?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रेवती

माज

चिंतातुर जंतू
Tue, 03/15/2011 - 18:53 नवीन
मिपावरच्या पुणेप्रेमी मंडळींना एकही चांगला अनुभव असू नये, किंवा असला तरी 'आम्ही लिहिणारच नाही, जा!' असा हटवादीपणा करावा, किंवा तो लिहायला वेळ मिळून नये असं का? कुठे गेला पुण्याचा जाज्वल्य अभिमान वगैरे?
तो 'आमची कोठेंही शाखा नाही (अगदी मिपावरही)' छाप माज असेल. थोडक्यात, पुण्यात या मग दाखवतो ;-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राजेश घासकडवी

एक शंका आहे

३_१४ विक्षिप्त अदिती
Tue, 03/15/2011 - 21:41 नवीन
अरेरे, हा अभिमान मिपावर का मग एवढा ओसंडून वहातो?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चिंतातुर जंतू

>>पण मूळ प्रश्न शिल्लक

विश्वनाथ मेहेंदळे
Tue, 03/15/2011 - 20:01 नवीन
>>पण मूळ प्रश्न शिल्लक रहातोच. उत्तर सोपे आहे. १) पुण्याबाहेरील लोकांना पुण्यात चांगले अनुभव येत नाहीत (असेत ते म्हणतात). खरे तर ते चांगल्या अनुभवांकडे लक्ष देत नाहीत. पुण्याला चांगले म्हणायचे म्हणून पोटशूळ उठल्याने लिहित नाही लेकाचे. एक तर त्यांना कुठे जाऊन काय मागायचे याची अक्कल नसते, मग अपमान होतो, मग उठतात आणि गळे काढतात. असो, नॉन-पुणेकर ही एक अत्यंत हलकट जमत आहे. त्यांना फाट्यावर मारलेले बरे. २) पुण्यातील लोकांना पुण्यात सर्व अनुभव चांगलेच येतात, नेहमी, १००% वेळा. तुमची ती probability का काय म्हणता न तुम्ही, ती १ असते. उगीच अपूर्णांकात जात नाही ती. तुम्हाला "मांजरीची नखे/दात..." सिद्धांत माहित दिसत नाही. माहित करून घ्यायचा असेल तर कुठे विचारायचे आहे ते माहित असेलच. नसेल तर सांगा, लगेच त्या आयडी चा मोबाईल क्रमांक व्यनिने पाठवतो ;-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राजेश घासकडवी

काही नॉन-पुणेकर हलकट असतात

परिकथेतील राजकुमार
Wed, 03/16/2011 - 16:59 नवीन
काही नॉन-पुणेकर हलकट असतात ह्याच्याशी सहमत आहे. पण बर्‍याचदा त्यांना हलकटपणा करणे देखील जमत नाही, आव आणण्यात देखील अयशस्वी. अर्थात कोणी कसे वागावे हे सांगण्याचा हक्क मला नाही. मी आपले एक निरिक्षण नोंदवले.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विश्वनाथ मेहेंदळे

राजेशजी, प्रथम मला काकू

रेवती
Wed, 03/16/2011 - 03:17 नवीन
राजेशजी, प्रथम मला काकू म्हटल्याबद्दल तुमचा निशेध! तुमची पावाची रेशिपी वाचनखुणेतून काढून टाकणार आता. थत्ते साहेब मान्यवर असतील, मी अजून त्या पदाला पोहोचले नाहिये.;) माझ्यासारखे क्षुद्र लोक 'लेख' म्हणता येइल असे पुण्यासारख्या (अपुणेकरांनी भरलेल्या) शहराबद्दल काय लिहिणार?;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राजेश घासकडवी

हे हे हे...आपले लेखन हे एका

रेवती
Mon, 03/14/2011 - 18:53 नवीन
हे हे हे... आपले लेखन हे एका जुन्या लेखाची आठवण करून देते.;) आपण आत्ता आत्तापर्यंत हिरव्या देशात होता आणि एकदम मातृभुमीला पोहोचलात हे सांगण्यासाठी लेखन केल्याचे बघून ड्वले पाणावले.;) एकाच शहरावर इतक्या विविध प्रकारे लेखन होऊ शकते आणि त्यावर आमचे ड्वले ढवळे होतील इतुके प्रतिसादही मिळू शकतात हे पाहून निर्मळ आनंदाची अनुभूती मिळाली. तरीही शंका आहे कि नक्की पुण्यातच होता काय आपण?
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा