उकडपिंडी :-
साहित्य:- तांदूळ पिठी एक वाटी, हि.मिरच्या दोन-तीन,
मिठ-साखर चवीनुसार,कढीपत्ता पाने सात-आठ,कोथींबीर,आंबट ताक अर्धी वाटी,
पाणी दीड वाटी, फ़ोडणीचे साहित्य- मोहरी जिरे- हिंग , तेल एक डाव.
कॄती :- तांदूळ पिठी ताक व पाणी घालून कालवुन घ्यावी, त्यातच मिठ-साखर चवीनुसार घालावे,
तेलाची खमंग फ़ोडणी करुन त्यात कढीपत्ता पाने,मिरच्या तुकडे टाकावेत व त्यात कालवलेली तांदूळ पिठी घालावी व
चांगले ढ्वळावे, गुठळी होउ देवु नये, चांगल्या दोन - तिन वाफ़ा आणाव्यात,
ही उकडपिंडी तय्यार.
गरम गरम खाण्यास द्यावी.
हा झटपट होणारा पदार्थ आहे. व पौष्टीकही आहे.
वाचने
5131
वाचनखूण
प्रतिक्रिया
16
माझ्यामते हि उकड
In reply to माझ्यामते हि उकड by पर्नल नेने मराठे
आमच्या घरी या प्रकाराला उकडच
In reply to आमच्या घरी या प्रकाराला उकडच by ३_१४ विक्षिप्त अदिती
हो...
In reply to माझ्यामते हि उकड by पर्नल नेने मराठे
खानदेशी उकडपेन्ढी हि नाही
उकड पिंडी
हा पदार्थ गव्हाच्या पिठाचा
अमच्याकडे...
एकदम शोलिड पदार्थ आहे हा !
आठवणीबद्दल आभार
नाव
मस्त रेसीपी .. करून बघणार. "
In reply to मस्त रेसीपी .. करून बघणार. " by कौशी
ओक्के...करुन बघते उद्याच.
ताई.....वाफा कश्या
तांदळाची असते त्याला
हो आम्हीसुद्धा ह्याला उकडच म्हण्तो
मस्त