मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

उकडपिंडी :-

निवेदिता-ताई · · पाककृती
साहित्य:- तांदूळ पिठी एक वाटी, हि.मिरच्या दोन-तीन, मिठ-साखर चवीनुसार,कढीपत्ता पाने सात-आठ,कोथींबीर,आंबट ताक अर्धी वाटी, पाणी दीड वाटी, फ़ोडणीचे साहित्य- मोहरी जिरे- हिंग , तेल एक डाव. कॄती :- तांदूळ पिठी ताक व पाणी घालून कालवुन घ्यावी, त्यातच मिठ-साखर चवीनुसार घालावे, तेलाची खमंग फ़ोडणी करुन त्यात कढीपत्ता पाने,मिरच्या तुकडे टाकावेत व त्यात कालवलेली तांदूळ पिठी घालावी व चांगले ढ्वळावे, गुठळी होउ देवु नये, चांगल्या दोन - तिन वाफ़ा आणाव्यात, ही उकडपिंडी तय्यार. गरम गरम खाण्यास द्यावी. हा झटपट होणारा पदार्थ आहे. व पौष्टीकही आहे.

वाचने 5131 वाचनखूण प्रतिक्रिया 16

In reply to by पर्नल नेने मराठे

आमच्या घरी या प्रकाराला उकडच म्हणतात. उकडपिंडी प्रकार खानदेशी आहे का नाही माहित नाही पण आमच्या विदर्भातल्या नातेवाईकांच्या हातचा खाल्ला आहे.

In reply to by पर्नल नेने मराठे

वेदनयन Mon, 03/14/2011 - 02:27
खानदेशी उकडपेन्ढीत तांदूळ पिठी आणी ताक वापरत नाही. गव्हाचे पिठ वापरतात. बाकी पाकृ छानच - फोटो हवा होता.

अरुण वडुलेकर Sun, 03/13/2011 - 15:48
सोलापूरकडे याला उकड पिंडी (किंवा खरं तर उकड पेंडी )असेच म्हणतात. माझा अगदी आवडीचा पदार्थ. हल्ली फारसा प्रचलित नाही. माझी आजी खूप छान करायची. पण पाकृ वाचून पुन्हा बालपणात गेलो. पुन्हा एकदा आजोळी गेल्या सारखे वाटले. आजीची आठवण करून दिलीत. धन्यवाद.

शिल्पा ब Sun, 03/13/2011 - 23:13
हा पदार्थ गव्हाच्या पिठाचा खाल्लेला आहे. मी बनवायचा प्रयत्न केला तर ओलसर आणि अर्धा तास शिजवला तरी कच्चाच राहील्यासारखा वाटला. :( तुमची तांदळाच्या पिठाची पाकृ करुन बघते.

पैसा Sun, 03/13/2011 - 23:29
कोकणात या पदार्थाला उकड म्हणतात. आणि करताना लसणीची फोडणी देतात. तसंच खाताना वर शेंगदाण्याचं कच्चं तेल घालून खातात. आठवणीनेच तोंडाला पाणी सुटलंय..

चित्रा Mon, 03/14/2011 - 01:11
उकड मी तरी तांदळाच्याच पिठाची केलेली पाहिली आहे. उकडीसाठी फोडणीत हळद आणि आलेही घालतात. उकड शिजल्यानंतर चांगली चमकदार, मऊ, पूर्ण शिजलेली अशी झाली पाहिजे.

निनाद Mon, 03/14/2011 - 03:31
उकड पेंडी असेच ऐकले आहे. उत्तम खाद्य! लहानपणी खूप खाल्ला आहे. आता परत करून पाहतो.

कौशी Mon, 03/14/2011 - 05:27
मस्त रेसीपी .. करून बघणार. " शिल्पा ब " उकड पेंडी करताना गव्हाचे पिठ खुप भाजावे लागते. पण मन्द आचेवर भाजावे जो पर्यत खमन्ग सुगन्ध सुटत नाही तोपर्यत भाजावे. मग कच्चा राहणार नाही. परत एकदा करून बघा. विदर्भातला स्पेशल पदार्थ आहे हा.

स्पंदना Mon, 03/14/2011 - 08:30
ताई.....वाफा कश्या मोजायच्या? मनापासुन विचारते आहे. तुम्ही वर म्हणालात ना? चांगल्या दोन तीन वाफा आणा म्हणुन ?

रेवती Mon, 03/14/2011 - 18:32
तांदळाची असते त्याला आमच्याकडे उकड म्हणतात. खवलेला नारळ, ताक, आलं, लसूण , मिरचीचा ठेचा पीठ कालवतानाच घालायचा. मग फोडणी. उकडपेंडी ही गव्हाची करतात. एकदा कोणाकडे तरी खाल्ली होती ती भन्नाट चवीची झाली होती. नंतर काही खाल्ली नाही. मला जमेल असे वाटत नाही पण करून बघते.:)