मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

रानमेवा

योगेश२४ · · कलादालन
१० ११ १२ १३ १४ १५
लेखनविषय:

वाचने 13731 वाचनखूण प्रतिक्रिया 36

प्रचेतस 11/03/2011 - 11:15
आता रानमेव्याचे दिवस सुरु होतीलच. ताम्हिणी, मुळशीत फिरले तर भरपूर रानमेवा चाखता येईल. ते वरून ५व्या फोटोतले काळं पांढरंआणि ७ व्या फोटूतलं लालभडक फळ कोणते ब्वा? ते लालेलाल रातांबा (कोकम) तर नव्हं?

In reply to by नन्दादीप

प्रचेतस 11/03/2011 - 12:07
व्हय व्हय, त्ये कंदमूळ माहीत व्हतंच. मला ते ८ व्या फोटूतलं हवं व्हतं चुकूनश्यान ७ व्या ट्याइप झालं पघा.

In reply to by प्रचेतस

विनायक बेलापुरे 13/03/2011 - 01:34
५ व्या फोटोत असणारे काळे पांढरे कापुन ठेवलेले शिंगाडे आहे तर ७ व्या फोटो मध्ये जो भला मोठा कंद आहे त्याला रामकंद म्हणतात.

मुलूखावेगळी 11/03/2011 - 11:17
वा मस्तच सकाळीच रानमेवा!!!! १,५,७,८,१५ अजुन नाही खाल्ले. १,७,८,१५ काय आहे? त्यांची नावे द्या ना.सगळ्याचीच नावे द्या

टारझन 11/03/2011 - 11:23
चिनिमीनी बोरं शाळेत असताना खुप खाल्ल्या गेली होती.. त्याच्या आठवणी ताज्या झाल्या. .. आणि नॉस्टॅल्जिक झालो. धन्यवाद .!!

छोटा डॉन 11/03/2011 - 11:26
साफ खपलो !!! जबरदस्त एकदम ... - छोटा डॉन

योगेश२४ 11/03/2011 - 11:31
१. बडिशेप २. चन्यामन्या (चिनीमिनी) बोरं :-) आणि करमळ ३. बोर (आंबटगोड) ४. बोरं (गोड) ५. शिंगाडा ६. तिखटमीठ लावलेली कैरी ७. कंदमूळ ८. आंबटगोड चिंच (बिया काढलेली) ९. पेरू, काकडी १०. चिंच ११. बेदाणा (हा सुकामेवा :-)) १२. मणुका (हा सुकामेवा :-)) १३. करवंद (डोंगरची काळी मैना :-)) १४. तिखटमीठ लावलेला आवळा १५. ताडगोळा

स्वैर परी 11/03/2011 - 11:40
तोंडाला पाणी सुटुन गळायला लागले , राव! क्या बात है! सुरेख फोटो! आणि या रानमेव्याची चाहुल लागायला लागली आहे! :)

ढब्बू पैसा 11/03/2011 - 12:35
आजपर्यंतचा यम्मी आणि टेस्टी धागा!!

स्पंदना 11/03/2011 - 12:44
एऽ ऽ ऽ (आवाज खर्जातला अन व्हिलनी समजावा) ते फोटो नंबर ४ आणी फोटो नम्बर १३ मधल ताबडतोब पाठवुन दे नाही तर बघ! एऽऽऽ (आवाज लाडिक समजावा) अय्या मल्ल्ला पण देना थोडी बोर अन करवंद, दे ना दे ना च्च च्च एऽऽ दे ना! वरच्यातल जे काही लागु होत असेल ते हत्यार वापरुन या दोन गोष्टी ताबडतोब पाठवुन देणे. नाही तर तुमच काय माहिती नाही पण माझ काय खर नाही...

In reply to by पप्पू

गणेशा 11/03/2011 - 17:51
रामफल खुप वेगळे असते .. पिवळसर असते .. पण शिताफळापेक्षा थोडेशेच मोठे असते. हे जे कंदमुळ आहे त्याचे नाव मी शिखर सिंगणापुर ला गुप्तलिंग आहे तेथे गेलो होतो तेंव्हा विचारले होते .. नेमके विसर्लो. पण हे कंदमुळ खायला खुप गोड आणि शक्तीवर्धक असते .. मजा येते खायला .. मिळाल्यास नक्की खा. -- बाकी रानमेवा आवडला

In reply to by पप्पू

विनायक बेलापुरे 13/03/2011 - 01:44
रामकंद आहे तो. रामफळ सीताफळापेक्षा मोठे लालसर तपकिरी रंगाचे फळ असते. सीताफळाला जसे खड्बडित डोळे असतात तसे रामफळाला जरासे आतल्या गराच्या बाजूला दबलेले असतात. मिळाले तर फोटो टाकेन. पण रामफळ म्हणून सोअरसोप चा जो फोटो दाखवतात ते मात्र चुकिचे आहे.

Mrunalini 11/03/2011 - 17:16
अरे काय हे...... बापरे... नुसती लाळ गळतीये... पाणी सुटलं तोंडाला.. त्यातले चिंचा, काळी मेना, बोरे आणि ताडगोळे माझे अगदी प्रिय आहेत...

दिपाली पाटिल 12/03/2011 - 03:17
तो ७ वा फोटो रामाचा कंद आहे, अतिशय मस्त लागतो... क्रंची आणि गोड्सर आणि खुपच पाणीदार असतो... माझ्या शाळेच्या बाहेर एक माणूस त्याच्या सायकलच्या कॅरिअरला लावून आणाय्चा हा कंद आणि खुप पातळ काप विकायचा... बहुतेक चाराण्याला १ की २ काप मिळायचे... पण हा कंद आहे मी खोड आणि ते कुठे उगवतं? मस्त सगळ्या जुन्या आठवणी परत आल्या....

पिवळा डांबिस 12/03/2011 - 03:24
शाळकरी दिवसांची आठवण आली! आनंद वाटला असे म्हणावेसे वाटते पण खाल्लेले धपाटेही आठवताहेत!!!!

पिंगू 12/03/2011 - 11:58
योगेश पापे फेडण्याचा उपाय सांगतो. फक्त एकदा तो मोठा कंद आणून सर्वांना तुकडे करुन खायला दे आणि सगळी पापे माफ... - (शाळकरी) पिंगू

योगेश२४ 12/03/2011 - 12:21
प्रतिक्रियांबद्दल सगळ्यांचे आभार :-) तो ७ वा फोटो रामाचा कंद आहे, येस्स्स तो रामकंदच आहे. योगेश पापे फेडण्याचा उपाय सांगतो. फक्त एकदा तो मोठा कंद आणून सर्वांना तुकडे करुन खायला दे आणि सगळी पापे माफ :-) :-)

प्राजक्ता पवार 12/03/2011 - 14:37
एकदम टेस्टी धागा :)

पियुशा 04/12/2013 - 10:51
चिंच पाहुन स्ल्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्प्प्प्प्प्प्प्प्प्प्प्प्प्प्प्प्प्प