Skip to main content

नेहमीसारखेच - ४

लेखक मिसळलेला काव्यप्रेमी यांनी शुक्रवार, 11/03/2011 12:51 या दिवशी प्रकाशित केले.
नेहमीसारखेच - १ नेहमीसारखेच - २ नेहमीसारखेच - ३ नेहमीसारखेच - ४ आजही पावसात भिजतांना तिला छेडले... अगदी नेहमीसारखेच.... आजही लटक्या रागाने तिने पहिले... अगदी नेहमीसारखेच... कसे खुळावतेस मला गं.... इतकी नाजूक रेखीव काया... इतक्या लोभस नजरेत इतका मोहक तोरा... सावळ्याश्या डोळ्यात सावळासा नखरा... पापण्यांची उगाच चाललेली उघडझाप... कसे हे जुलूम सहावे गं.... मग उगाच लुडबुड चालू झाली माझी... आणि शेवटी घडवूनच आणला मी... एक गोड अपघात... नेहमीसारखेच... ............ तेव्हा तू मात्र विरघळत होतीस... माझ्या साखरमिठीत.... नेहमीसारखेच..... अगदी नेहमीसारखेच...... |- मिसळलेला काव्यप्रेमी -| (११/०३/२०११)
काव्यरस
लेखनविषय:

वाचने 1948
प्रतिक्रिया 5

प्रतिक्रिया

मिसळलेला काव्यप्रेमी - एकदम फ्रेश लिहिले आहेस . आजही पावसात भिजतांना तिला छेडले... अगदी नेहमीसारखेच.... आजही लटक्या रागाने तिने पहिले... अगदी नेहमीसारखेच.. खरेच छान .आवडले.!!

गणेश ह्यांना अनुमोदन. खरंच आहे. मस्तच होत चालले आहे. इतकी नाजूक रेखीव काया... इतक्या लोभस नजरेत इतका मोहक तोरा... सावळ्याश्या डोळ्यात सावळासा नखरा... पापण्यांची उगाच चाललेली उघडझाप... खूपच छान..वाह. - पुढिल भाग कधी वाचायला मिळेल? - :) - शुभेछा. निनाव.

प्रतिसाद दिलेल्या (आणि नुसतेच वाचुन प्रतिसाद न दिलेल्या ;)!) सर्वांचे धन्स..