कोसळत्या सरींचा राजमाची
शनिवार रविवार राजमाची !!! म्हणताच ब-याच मंडळींची नावे आली होती पण त्यातले १३ मावळेच शब्दाला जागले होते त्यात मी, लकी प्रशांत, राहूल-वसुधा(दांपत्य), शितल जाधव, श्रीकांत, अभिजीत अशा जुन्या मंडळींसोबत विजया, अश्विनी, प्रसाद, महेश आणि शितल ( नावावर जाऊ नका हा मुलगा आहे ) अशी नवी मंडळीही होती. पहाटे ६.३० ची लोकल पकडून लोणावळा गाठायचे असे ठरविले होते. पण कुंभकर्ण लकी आणि दरवेळी उशीर करण्यात पटाईत असलेला प्रशांत यांच्यामुळे ६.३० आणि ८.०५ या दोन्ही लोकल गमावून आम्ही लाल डब्याला शरण गेलो. ८.४० ची फ़लटण-मुंबई गाडी पकडून १०.३० ला लोणावळ्यात पोहोचलो. एस.टी. स्टॅंडवरच नाश्ता उरकून तुंगार्ली धरणाची वाट धरली.
पुण्यातूनच पावसाला सुरुवात झाली होती आणि त्याचा जोर वाढतच चालला होता. कंटाळवाणा डांबरी रस्ता संपून एकदाची तुंगार्लीची भिंत लागली. सुट्टीचा दिवस असल्याने धरणावर बरेच पर्यटक दिसत होते. आमच्या सोबत राजमाचीकडे जाणारेही बरेच लोक होते. धरणाच्या आसपासची रिसॉर्ट्स सोडून आम्ही पुढे निघालो आणि मला आमच्याच लोकांचा आरडाओरडा ऐकू आला. मागे बघतो तर मिस. शितल आणि प्रशांत अक्षरशा: लहान मुलांसारखे रस्त्यांवरच्या डबक्यातलं चिखलपाणी एकमेकांच्या आणि इतरांच्याही अंगावर उडवत होते. उगीच त्यांना खोटाखोटा रागावून मी आपली दादागिरी सिध्द करायचा प्रयत्न करताच त्या दोघांनी माझ्या अंगावरही यथेच्छ चिखल उडवला.थोड्या वेळाने अश्विनीही त्यांना सामील झाली.
राजमाचीकडे जाणारी ती ओली पायवाट धुक्याची दुलई पांघरून बसली होती. पाऊस मन मानेल तसा कोसळत होता. एखाद्या वा-याच्या झोताबरोबर धुके बाजूला होताच खंडाळ्याच्या बाजूच्या दरीचे विहंगम दृश्य मनाला भुरळ घालत होतं. याच ठिकाणी कायमचे वास्तव्यास यावे असे राहून राहून वाटत होते. गो.नि.दां.च्या प्रसिध्द झालेल्या "माचीवरला बुधा" कादंबरीतील संदर्भ डोळ्यासमोरून सरकत होते. त्या कादंबरीचा नायक बुधा अचानक समोर आला तर ??? असा पुसटसा विचार मनाला चाटून गेला आणि कथेचा शेवट आठवताच अंगावर शहारे आले. कादंबरीतून परत वास्तवात आलो आणि मुकाट पायाखालची वाट तुडवू लागलो.
जाताना लागणारा छोटासा घाट उतरल्यावर डाव्या हाताला एक सुंदर धबधबा लागला. लगेचच सगळे त्या दिशेने धावात निघाले. ब-याच प्रयत्नांने मी त्यांना, पुढे अजून सुंदर जागा आहेत !! असे सांगून पुढे दामटले. थोडी नाराजी व्यक्त करून जनता पुढे निघाली. त्यानंतर येणा-या प्रत्येक धबधब्याला आणि ओढ्याला त्यांनी "अमोल ~!! अमोल ~!!" अशा आरोळ्या देत माझाविरूध्द निषेध नोंदवला. राहूल आणि वसुधा हे दांपत्य आपल्याच नादात मागे मागे रेंगाळत होतं. त्यामुळे सगळ्यांना क्षणभर का होईना पण विश्रांती मिळत होती. राजमाचीहून दिसणारा प्रसिध्द कातळधार धबधबा जिथून सुरु होतो त्याजागी आम्ही पोहोचलो. तिथल्याच एकुल्या टपरीत चहा घेऊन पुढे निघालो.
पावसाने सगळ्यांना झोडपून काढायच ठरवलं होतं बहुदा, त्याचा जोर वाढतच चालला होता. त्या धुकट आसमंतात हिरव्या रंगाची झालेली मुक्त उधळण डोळ्यांचे पारणे फ़ेडत होती.वाटेत एक मोठ्ठा ओढा आडवा आला. यावेळेस मात्र मी कोणाला थांबवायचे धाडस केले नाही, नाहीतर या जनतेने मला हाणून काढले असते. लकी, प्रशांत, श्रीकांत, मिस. शितल, शितल्या आणि दांपत्य खांद्यावरच्या सॅक टाकून पाण्यात पळाले. एकमेकांच्या अंगावर यथेच्छ पाणी उडवून झाल्यावर मंडळी पुढचं मार्गक्रमण करु लागली
.
वाटेत लागणारे अगणित ओढे आणि धबधबे एखाद्या मोहजालाप्रमाणे आम्हाला खुणावत होते पण उधेवाडीत वेळेत पोहोचायचे होते त्यामुळे आम्ही त्यास बळी न पडता आम्ही उधेवाडीकडे सरकत होतो. विजया आणि वसुधा दर पंधरा मिनिटांनी "अजून किती राहीलं आहे ??" असा प्रश्न विचारीत होत्या आणि मी त्यांना "आता आलंच .... पंधरा मिनिटात ...." हे माझं ठरलेलं उत्तर देत होतो. अखेरीस साडेचार तासांनी उधेवाडीची वेस आली आणि महिला मंडळाचा जीव भांड्यात पडला. आता मात्र पावसाने चांगलाच जोर धरला होता. तोंडावर तर अक्षरशा: असंख्य सुया टोचल्याचा भास होत होता. शेवटच्या टप्प्यात असलेला चिखलाचा डोह पार करून आम्ही जिथून कातळधार धबधबा दिसतो त्या ठिकाणी आलो. थोडं पुढं जाताच तो मनोहारी धबधबा आपले रौद्ररुप दाखवत होता. तिथल्याच टपरीवरच्या उंबरेंकडुन कळालं की आम्ही किती भाग्यवान आहोत ते !!! सकाळ्पासून सुमारे १५०-२०० लोकं इथून गेली होती पण दरीत साठलेल्या धुक्यामुळे कोणालाच त्या धबधब्याचे दर्शन झाले नव्हते.
याच कातळधार धबधब्याचा मागल्या वर्षी काढलेला फोटॉ.
तिथे थोडे फोटो काढून आम्ही तुकाराम उंबरेच्या घराचा मार्ग धरला. अरे हो सांगायचे राहीले .... या उधेवाडीत उंबरे कुटुंबीयांची संख्या लक्षणीय आहे. दरवेळेस मी ज्या तुकाराम उंबरेकडे उतरतो त्याला मी पुण्यातूनच फ़ोनकरून आगाऊ कल्पना दिली होती त्यामुळे आमचा राहण्याचा अणि जेवणाचा प्रश्न मिटला होता. मुक्कामी पोहोचण्यास नियोजित वेळेपेक्षा उशिर झाला होता म्हणून मनरंजन बालेकिल्ला पहायचा बेत आम्ही रद्द केला.
उधेवाडीतून दिसणारा धुक्याची गोधडी पांघरलेला मनरंजन बालेकिल्ला.
सलग ५ तास चालून मंडळी भलतीच दमली होती. अंगावरचे ओले कपडे बदलून आम्ही जेवण उरकले आणि फ़ावला वेळ सत्कारणी लावण्यासाठी "डम्ब शेराज" चा खेळ सुरु झाला. जनतेची दोन टिम मधे विभागणी झाली. आणि एकेकाची एक्टींग पहाता पहाता सगळे हसून हसून गडाबडा लोळत होते. प्रशांतने तर उच्छाद मांडला होता. त्याच्या मते तो एक्टींगचा बादशहा होता !! त्याच्या या वाक्यावर परत लोक पोट धरधरून हसले. तेवढ्यात तुकारामच्या भावाने आमची जेवणाची ताटं लावायला घेतली. गरम गरम तांदळाच्या भाकरी, भाजी, आमटी-भात आणि पापड असा भन्नाट मेनू होता. यथेच्छ हादडी झाल्या मंडळी पेंगू लागली होती. तरी अंताक्षरीचा मोह काही जणांना आवरता आला नाही आणि मग रात्री २ पर्यंत गाण्यांची मैफ़िल रंगली होती.शेवटी मी थोडा दम भरल्यावर सगळी शांत झाली.
सकाळी सात वाजता पोटोबाला चहा पोह्यांचा नैवेद्य देऊन आम्ही श्रीवर्धनकडे निघालो. वाटेतल्या गुहा पाहून भैरोबाच्या मंदीरापाशी आलो. दर्शन घेउन श्रीवर्धनच्या पाय-यांकडे सरकलो.
महादरवाज्यातून आत शिरताच समोरच्या पायवाटेवर चांगलं ३ फ़ुट खोल आणि जवळ्पास २० फ़ुट लांब पाण्याचा चर तयार झाला होता. तो पार करुन आम्ही किल्ल्याच्या सर्वोच्च भागावर गेलो पण दुर्दैव !!
सगळीकडे दाट धुकं आणि मुसळधार पाऊस असल्यामुळे आम्हाला काहीच दिसत नव्हते. वरुणराजाला साकडं घातल्यावर आमच्या मनाची होणारी तगमग त्याला कळाली असावी. पावसाचा जोर थोडा ओसरला आणि समोरच्या दरीवर दाटलेली धुक्याची दाट साय हलकेच बाजूला गेली. क्षणार्धात कॅमे-यांचा क्लिकक्लिकाट झाला आणि परत ती दरी धुक्याने माखली. मिळालेल्या एक दोन फोटोवर समाधान आणि त्याबद्दल वरूणराजाचे आभार मानत उधेवाडीकडे उतरू लागलो.
श्रीवर्धनहून दिसणारे भैरवाचे राऊळ..
श्रीवर्धनहून दिसणारा कातळधार धबधबा आणि टेहाळणी बुरुज..
गेला दिड दिवस आम्ही राजमाचीच्या कुशीत होतो. वेळ कसा गेला कळालेसुध्दा नाही. परतायची इच्छा नसतानाही चाकरमानी पावले सिमेंटच्या जंगलाकडे चालू लागली. लोकलमधून परत येताना डोळ्यासमोर पुन्हा पुन्हा राजमाचीच्या आठवणी नाचत होत्या. दरवर्षी प्रमाणे यंदाच्याही राजमाची ट्रेकने धम्माल आणली होती आणि यावेळेसही माचीवरला बुधा भेटेल ही माझी वेडी इच्छा अपुर्णच राहीली ....
---
जातीवंत भटका

वाचने
15569
प्रतिक्रिया
72
मिसळपाव
प्रतिक्रिया
एक नंबर !! - जांबुवंत चिकणा
जबरा......एकदम कडक फोटू रे
अफलातून
खरं आहे !!
In reply to अफलातून by प्रचेतस
ख ल्ला स ! अवर्णनीय फटू आहेत
बास का राव !!!
In reply to ख ल्ला स ! अवर्णनीय फटू आहेत by परिकथेतील राजकुमार
बेडी पण तुमच्या सारखीच
In reply to बास का राव !!! by जातीवंत भटका
बेडी आधीच पडली आहे ...
In reply to बेडी पण तुमच्या सारखीच by विनायक बेलापुरे
आनंद आहे
In reply to बेडी आधीच पडली आहे ... by जातीवंत भटका
वाह!
क्लाआआआआआआअस
वा ह वा हा
छान फोटो आणि सुंदर वर्णन, आणि
स्वागत आहे तुमचं !!
In reply to छान फोटो आणि सुंदर वर्णन, आणि by ५० फक्त
खुप्प मस्त हो तुमची ट्रेक
.
अतिशय सुरेख .. मनापासुन आवडले
नक्कीच
In reply to अतिशय सुरेख .. मनापासुन आवडले by गणेशा
जाउ या की
नक्कीच .. उलट तुम्ही ठरवा ..
In reply to जाउ या की by प्रचेतस
सांदण ला जाउयात का?
In reply to जाउ या की by प्रचेतस
खासच रे मित्रा!!! लई जीव जळतो
झकास!
असेच म्हणतो
In reply to झकास! by मैत्र
सुंदर. भेटले पाहिजे तुम्हाला
नुसते भटकलात , ठिक! नुसते
झ का स
जानलेवा...!!
एक शंका....
निरसन
In reply to एक शंका.... by सूर्यपुत्र
फार छान वर्णन केले आहे. मी ही
सह्हिइइइ
नाहीच्च!
धम्याशी कट टु कट शमत
In reply to नाहीच्च! by धमाल मुलगा
वा वा....
मस्त
कहर
अर्धांगिनी....!!
In reply to कहर by सखी
काही खरडवह्या
In reply to अर्धांगिनी....!! by इन्द्र्राज पवार
सुरेख
आमचं बाकी काही करा पण आमच्या
फोटो खासच.
धुंद वातावरण, अगदी हेवा वाटला
कर्जत मार्गे राजमाची, कोन्डाणे लेणी आणि शिव मन्दीर
होय
In reply to कर्जत मार्गे राजमाची, कोन्डाणे लेणी आणि शिव मन्दीर by ऐक शुन्य शुन्य
आम्ही मित्र मित्र पण त्याच
In reply to होय by जातीवंत भटका
मस्तच रे !!
In reply to आम्ही मित्र मित्र पण त्याच by स्वानन्द
वाट हरवण्यावरुन सांगतो. आम्ही
In reply to मस्तच रे !! by जातीवंत भटका
उत्तम फोटो, उत्तम
असेच म्हणतो. रात्रीचा दीर्घ
In reply to उत्तम फोटो, उत्तम by भडकमकर मास्तर
अशक्य फोटो आणि वर्णन!!! असेच
फोटो बघितले
अग्ग्ग्ग्ग! काय ते सुंदर फोटू
त्या गावांची जमीन कोणता
In reply to अग्ग्ग्ग्ग! काय ते सुंदर फोटू by रेवती
सहमत
In reply to त्या गावांची जमीन कोणता by वपाडाव
तुंग, तिकोना अन कोराईगड
In reply to सहमत by जातीवंत भटका
मस्त
केवळ अवर्णनीय!
अत्यंत सुंदर! डोळ्याचे पारणे
झक्कास !!
छान, फारच छान
अतिशय अप्रतिम फोटू एकदम
येक लंबर...
मस्त फोटो..मस्त लेख.. मस्त
अप्रतिम !! वर्णन आणि फोटोज...
खल्लास......
खल्लास......
मस्त!
कोसळत्या सरींचा राजमाची
अप्रतिम फोटो गारेगार वाटलं