सध्या घर घर चालु आहे...प्रत्येक विकांत असाच पायपिट करण्यात व्यर्थ ...१ BHK घ्याव कि २ BHK.ह्या एरीयात घ्याव की त्या तिथे पलीकडे...दिनोदीन जमिनीचे रेट वाढतच आहे..ग्रुहकर्जाचे व्याजदर पण..काही दिवस आणखी थांबलो तर घर घ्यायची लायकी राहणार नाही आपली पुण्यात.
आणि नाही हो करता करता ..शेवटी एकदाचा बुक केला ... आता नविन तयारी ...कशाची काय विचारता ...लोन ची..
कालच SBI मधे गेलो होतो..वा काय अनुभव होता.
आपल्याकडे एवढा मोठा पोट्यांशीयल कस्टमर आला आहे..जो येत्या काही वर्षात किमान घेतलेल्या रकमेची दिडपट रक्कम देण्याची हमी देत आहे ..याची कोठेही काहीही दखल नाही..
साधारण दुपारी १२-१२.३० ची वेळ ..स्थळ : टिळक रोड वरील SBI चे कार्यलय
आत प्रवेश केला ..Customer service ची पाटी लागली होती त्या विभागाकडे वळलो..वा एक मस्त सुंदर २०-२२ ची ललना एका हातात फोन घेउन फोनवर बोलत दुसर्या हाताने keyboard वर काही टाईप करीत होती.वा वा ..multitasking. मि विचार केला..कामात असेल..१० मिनीट झाली तिच्यासमोर उभा होतो..२० मिनीट झाली ..साध वर सुद्धा बघत नाही ..ईतकी कामात मग्न ..आय टी मधे घ्यायला पाहीजे हीला असा विचार मनात आल्याशिवाय राहीला नाही..आता मी थोडा चलबिचल ..म्हटल असच चालु राहील तर आपली India vs Netherland जाणार बहुतेक्..मग मि थोडा वळुन तीला माहीत होणार नाही अश्या रीतीने तिच्या संगणकाच्या पडद्याकडे बघुन घेतले ..तर ह्या फेसबुक वर चॅटिंग करत होत्या .तिच्यापासुन ग्रुहकर्ज विभागाचा पत्ता घेऊन आम्ही त्या विभागाकडे वळलो तर तिथे एक चाळीशीचे अधीकारी एका चाळीशीच्या ग्राहकाचे नविन आलेले debit card त्याच्या पाकीटातुन काढुन ..चिकटवलेल्या कागदापासुन वेगळे करण्यात व्यस्त होते.प्यारेलली त्यांची गहण विषयावर चर्चा चालु होती..जसे की हे कार्ड अशे कागदाला चिकटवुन का पाठवतात?? मग कार्डाच्या मागे सही काळ्या पेनाने करावी कि निळ्या पेनाने??पेन्सील ने केली तर चालेल काय?? मि खुर्चीवर बसुन घेतले..१५ मिनीटात यांचे कार्ड काढुन झाले..म्हट्ल चला आता आपल्या कामाकडे वळु म्हणुन बोलायला सुरवात करणार तोच मघाचे कार्ड वाले ग्रुहस्थ पुन्हा परत..
साहेब ते तुम्ही कार्ड काढतांना मघाशी त्याला थोडा मागच्या बाजुन दुसरा बारीक कागद चिकटला आहे तो जरा काढुन देता का??
मग साहेब पुढची १५ मिनीट ते कार्ड साफ करण्यात मग्न्..चला झाले कार्ड एकदाचे साफ..
मग मि पुन्हा थोडी खुर्ची समोर घेऊन बोलणार तोच ..साहेब म्हणतात लंच टाईम झाला आहे थोडा वेळ वाट बघा..
४० मिनीट वाट बघीतल्यानंतर पुन्हा साहेबाकडे गेलो..
सर मला ग्रुहकर्जाबाबत बोलायचे होते..मि xxx चा फ्लॅट घेतला आहे मला xxx चे कर्ज काढायचे आहे..व्याजदर,emi बाबत माहीती हवी होती.
बर तुमची salary slip बघु.
ही घ्या..
हे special allowance काय आहे??
तो monthly component आहे.
offer letter बघु
हे घ्या..
company कधी join केली??
xxx आधी..
ठीक आहे पलीकडे त्या मॅडम xx x बसल्या आहे तिथे जा..
मि अवाक.म्हणजे तुम्ही माहीती देणार नाही का??
नाही.मि डोक्यावर हात मारुन घेतला.
मॅडम xx x कडे गेलो तर मॅडम लंच ला गेल्या आहे अशे कळ्ले.
meanwhile, ppf पाटी दिसली म्हटल चला बघु काय प्लान आहे ,असेल ठिक तर ऊघडुन टाकु एखाद खातं..
तिथे पण एक मॅडम बसल्या होत्या. मॅडम PPF बद्द्ल माहीती हवी होती..म्हणजे व्याजदर आणी minimum per year balance etc.
तुमचे savings account कोणत्या ब्यंकेत आहे.
xxx
तिथे पण PPF ची सुविधा आहे तुम्ही तिथेच काढा..
मि चाट..
मि ऊठलो आणि पुन्हा मॅडम xx x कडे गेलो म्हटल ३० मिनिट झाले ..लंच झाले असेल.. तर मॅडमचा लंच अजुन व्हायचा आहे अशे कळले...
मि मग शांतपणे ऊठ्लो, माझा लंच करायला आणि SBI ची दुसरी शाखा बघायला बाहेर पडलो.
--नि३
माझा ब्लॉग : http://db2guide.blogspot.com/
वाचने
10895
प्रतिक्रिया
52
मिसळपाव
प्रतिक्रिया
कठिण आहे... मी हि इकडे
वा
अवघड आहे
सहजराव सल्ल्यासाठी
In reply to अवघड आहे by सहज
उपेग नाय हो!
In reply to अवघड आहे by सहज
+१
In reply to उपेग नाय हो! by धमाल मुलगा
काहिहि =))
In reply to +१ by सहज
बरोबर है की. आजकाल
In reply to +१ by सहज
अगदी बरोबर... कधिकधी व्याजदर
In reply to उपेग नाय हो! by धमाल मुलगा
सहज काका, श्री. परा चा नंबर
In reply to अवघड आहे by सहज
नको
In reply to सहज काका, श्री. परा चा नंबर by सविता
उपसूचना
In reply to नको by सहज
-१
In reply to उपसूचना by रमताराम
लोकं पराकडून काय काय मागतील
In reply to -१ by सहज
हा..हा.. नाही आपल्याला
In reply to सहज काका, श्री. परा चा नंबर by सविता
अनुभव वाईट आला तुम्हाला. आता
मनस्ताप
मनस्तापापेक्षा चार पैसे जास्त गेलेले परवडतात
In reply to मनस्ताप by विशाखा राऊत
आजकाल खासगी ब्यांकाही त्रास
In reply to मनस्तापापेक्षा चार पैसे जास्त गेलेले परवडतात by सागर
+१११
In reply to आजकाल खासगी ब्यांकाही त्रास by रेवती
हे हे हे! फारच वाईट अनुभव
In reply to +१११ by वपाडाव
हो ना
In reply to मनस्तापापेक्षा चार पैसे जास्त गेलेले परवडतात by सागर
माझा
४० मिनीट वाट बघीतल्यानंतर
म्हणुन....
>>आम्हाला आयसीआयसीआय बँक
In reply to म्हणुन.... by कुंदन
+१ असेच म्हणतो
In reply to म्हणुन.... by कुंदन
व्याजदर किती? ३% का? मी
लहानपणी आमचे नातेवाईक सरकारी
शेवट्च्या परिच्छेदाचं प्रयोजन
In reply to लहानपणी आमचे नातेवाईक सरकारी by निनाद मुक्काम …
अरे एकीकडे सरकार गृह कर्ज
In reply to शेवट्च्या परिच्छेदाचं प्रयोजन by गणपा
<<लेखाच्या मालकांनी मिठाईचा
In reply to लहानपणी आमचे नातेवाईक सरकारी by निनाद मुक्काम …
तुम्हाला सोन्याच्या
In reply to <<लेखाच्या मालकांनी मिठाईचा by नि३
श्या! कसला वैतागवाणा अनुभव
LIC Home Finance
छान
In reply to LIC Home Finance by आदिजोशी
नाही
In reply to छान by सहज
धन्यवाद
In reply to नाही by आदिजोशी
@ सहज, अशा कर्ज सिक्युअर
In reply to धन्यवाद by सहज
त्यापेक्षा टर्म पॉलिसी काढा
In reply to @ सहज, अशा कर्ज सिक्युअर by ५० फक्त
माझा अनुभव..
आयसीआयसीआय सारख्या बँका
In reply to माझा अनुभव.. by मस्त कलंदर
धन्यवाद!
In reply to माझा अनुभव.. by मस्त कलंदर
आता या पॉलिसीपेक्षा वेगळे आणि
In reply to माझा अनुभव.. by मस्त कलंदर
कलंदर बाई, अगदी व्यवस्थित
In reply to माझा अनुभव.. by मस्त कलंदर
एच डी एफ सी
गृहकर्जासाठी नाही तरी एच डी
In reply to एच डी एफ सी by मैत्र
तुम्हाला एच डी एफ सी बँक
In reply to गृहकर्जासाठी नाही तरी एच डी by रेवती
अरे कोणी अनिवासी भारतीयांसाठी
म्हणुनच मी घर घेतलेलं नाही..
मी घराजवळच्य स्टेट बँकेत गेलो
भारी अनुभव , शेवटी घर पाहाव
In reply to मी घराजवळच्य स्टेट बँकेत गेलो by विलासराव