Skip to main content

खाटिक

लेखक अवलिया यांनी गुरुवार, 10/03/2011 18:51 या दिवशी प्रकाशित केले.
खट खट खट आवाज करत खाटिक समोरचं गिर्‍हाईक पाहून तोडून देत होता आणि मिळालेले पैसे गल्ल्यात जमा करत होता. त्याला पाहून मला "तो" आठवला. फरक असलाच तर एवढाच ... तो रंगवलेल्या स्वप्नांचे तुकडे करत होता आणि आक्रंदित प्रार्थना ऐकत होता.
लेखनविषय:

वाचने 4472
प्रतिक्रिया 25

प्रतिक्रिया

>> त्याला पाहून मला "तो" आठवला. फरक असलाच तर एवढाच ... तो रंगवलेल्या स्वप्नांचे तुकडे करत होता आणि आक्रंदित प्रार्थना ऐकत होता. नाना अगदी माझ्या मनातलं बोललात ... तुलना आवडली ....

मस्त रे नाना. -दिलीप बिरुटे

फरक असलाच तर एवढाच ... तो रंगवलेल्या स्वप्नांचे तुकडे करत होता आणि आक्रंदित प्रार्थना ऐकत होता.
कोणाची स्वप्ने? की त्याचीच? अन् प्रार्थना कोणाच्या?

भारी!

काय पण विरोधाभास आहे ना अवलियाजी? ज्यान तुकडे पाडले त्याचीच प्रार्थना करत रहातो आपण. क्षणभर का असेना पण विश्वास उडला साहेब. __/\__ आम्हाला साष्टांग नमना ची एक स्मायली तयार करुन मिळेल का?

In reply to by स्पंदना

>>ज्यान तुकडे पाडले त्याचीच प्रार्थना करत रहातो आपण. ह्यावरूनच ती म्हण प्रचलित झाली असावी: कसायाला गाय धार्जिणी ...

हं...