उठवू नका मज आता, मी उरलो जिवंत नाही
करू नका चर्चा माझी, कुणाच ज्याची खंत नाही
उकरा न शोधा राख माझी, मी अजुन थंड नाही
सोबत माझ्या जळले ह्रदय आता ते शिल्लक नाही
कैदेतुन वेदनांच्या सुटले आजवर कुणीच नाही
नाहीच मी मज आठवण्यात काही एक अर्थ नाही
भेटु असे पुन्हा कधी तरी वेगळे आपले मार्ग नाही
तुझ्या वरी निष्ठेचे परिणाम कुणासही वेगळे नाही
रस्त्यावर उडलो धूर होऊनी आता सावली नाही
दिसलो कुठे भासच असावे मी उरलो जिवंत नाही
| लेखनविषय: |
|---|
वाचने
1188
प्रतिक्रिया
4
मिसळपाव
प्रतिक्रिया
कविता आवडली ... लिहित रहा ..
क्या बात!!
In reply to कविता आवडली ... लिहित रहा .. by गणेशा
वाह गणेश राव, मस्तच. क्या
In reply to कविता आवडली ... लिहित रहा .. by गणेशा
सुंदर