Skip to main content

पालक खिचडी

पालक खिचडी

Published on बुधवार, 09/03/2011 प्रकाशित मुखपृष्ठ
साहित्यः तांदुळ - २ वाट्या तुरीची डाळ - १ वाटी पालक - ४ वाट्या बारीक चिरुन कांदा - १ कप बारीक चिरुन टोमॅटो - १/२ कप बारीक चिरुन आले-लसुण-मिरची पेस्ट - १ चमचा हळद - १ चमचा काळी मिरी - २-३ लवंग - २-३ जिरे - १ चमचा गरम मसाला पावडर - १ चमचा लसुण - ४-५ पाकळ्या बारीक चिरुन सुक्या लाल मिरच्या - ४-५ तुप - २-३ चमचे मिठ चवीनुसार कृती: १. तांदुळ व तुरीची डाळ निट धुवुन पाण्यात १/२ तास भिजत ठेवावी. २. कढई मधे १ चमचा तुप गरम करावे. तुप गरम झाल्यावर त्यात काळी मिरी, लवंग व जिरे टाकुन परतावे. ३. जिरे परतल्यावर त्यात हळद व बारीक चिरलेला कांदा टाकुन परतावे. ४. कांदा लाल होत आल्यावर त्यात १ चमचा आले-लसुण-मिरची पेस्ट टाकुन परतावे. ५. ह्यात टोमॅटो टाकुन तेल सुटे पर्यंत परतावे. ६. कांदा टोमॅटोला तेल सुटल्यावर त्यात पालक टाकुन मिक्स करावे. ७. ह्यात भिजवलेले तांदुळ व तुरीची डाळ टाकुन ५ मिनिटे परतुन घ्यावे. त्यात १ चमचा गरम मसाला पावडर टाकुन मिक्स करावे. ८. भाताच्या अंदाजा प्रमाणे मिठ व पाणी टाकुन भात शिजुन घ्यावा. ९. हि खिचडी असल्यामुळे पाण्याचे प्रमाण थोडे जास्त ठेवावे. १०. दुसर्‍या छोट्या कढईत २ चमचे तुप गरम करावे. त्यात बारीक चिरलेला लसुण व लाल मिरच्या टाकुन फोडणी तयार करुन घ्यावी. ११. भात शिजल्यावर तो serving plate मध्य काढुन, वरुन लसुण व लाल मिरच्यांची फोडणी टाकुन गरम serve करावा. टिपः १. तुरीच्या डाळी एवजी तुम्ही मुगाची डाळ वापरु शकता. २. पालक आवडत नसल्यास मेथी टाकु शकतो. palak khichdee

याद्या 7669
प्रतिक्रिया 13

मस्त पाकृ मृणाल :)

उद्याच करेन. आत्ताच जेवण झालं.. आणि खरं म्हणजे रात्री जेवायला काय करावं हा प्रश्न पडलाच होता..! उद्याच रात्री करेन.. :)

अगदी रीसोत्तो सारखं दिसतंय. मस्त!

ज ह ब र्‍या !! आमचा एक मित्र असले काय काय खायचा पूनम मध्ये ;) त्याच्या नादानी एकदा खाल्ले होते आणि आवडले देखील होते.

छान फोटू. आज आमच्याकडे रात्रीच्या जेवणात मुगाची खिचडी (पालक, मका, मटार बरेचदा घालतेच) आणि कढी आहे. उडदाचा भाजलेला पापड आणि लिंबाचे गोडे लोणचे असतेच.;) मृणालिनीबाई मध्यंतरी बरेच दिवस गायब होत्या......उपास घडला ना आम्हाला!;)

छानचं... कालचं बनवण्यात आली... शेवटची लाल मिरची ची स्टेप तेवढी राहुन गेली... पोटातले कावळे शांत बसत नसल्याने :-) नेक्स्ट टाईम लाल मिरची पक्की...