Skip to main content

'आंतराष्ट्रीय महिला दिना' सोबत, 'आंतराष्ट्रीय पुरुष दिन' देखील असावा का? आपले मत सकारण स्पष्ट करा.

लेखक इंटरनेटस्नेही यांनी मंगळवार, 08/03/2011 17:28 या दिवशी प्रकाशित केले.

वाचने 1002
प्रतिक्रिया 23

प्रतिक्रिया

गरज वाटत नाही. खरे तर महिला दिन असा वेगळा दिवस ठेवावा लागतो ही दुर्देवाची बाब आहे. लवकरात लवकर महिला सबलीकरण होऊन महिला दिन असा वेगळा दिन अनेकांना त्यांच्या कर्तव्यांची जाणीव करुन देण्यासाठी असणे बंद व्हावे अशी अपेक्षा आहे. असो

In reply to by अवलिया

हो...पण आम्ही सबला व्हायला लागलो तर लोकांनी लगेच पुरुषमुक्तीच जाहीर केली कि!! पुरुष दिन काय , पुरुषमुक्ती काय अन काय काय....लोक लेखसुद्धा लिहितात म्हणे त्याच्यावर....अशा वातावरणात महिला सबलीकरण मागेच पडायचे ..

In reply to by शिल्पा ब

नाही ला मत दिले आहे. महिलादिनही असू नये असे वाटते कारण एकच दिवस त्यांना महत्व द्यायचे ही कल्पनाच मुळात चुकीची आहे. बालकदिन असतो, पालकदिन असतो, कामगार दिन असतो मग ' मालक' दिन का नसतो?

In reply to by तिमा

बालकदिन असतो, पालकदिन असतो, कामगार दिन असतो मग ' मालक' दिन का नसतो?
आंतरजालावर सहसा बुधवारी रात्री 'मालक' दिन पाळला जातो.

In reply to by परिकथेतील राजकुमार

आंतरजालावर सहसा बुधवारी रात्री 'मालक' दिन पाळला जातो.
"आंतरजालावर सहसा बुधवारी रात्री 'मालक' दिन पाळल्या जातो." असा बदल सुचवु इच्छितो !

In reply to by टारझन

खरं आहे. आम्ही तर करतो बॉ साजरा मालक दिन. :) आणि त्यावर दुसर्‍या दिवशी अशा कविता पण करतो.

In reply to by परिकथेतील राजकुमार

धन्यवाद राजकुमार साहेब! हे अतिशय इंटरेस्ट्रींग फॅक्ट आहे, माझ्या माहितीत मोलाची भर पडली. :) या दिवसाला देखील योग्य ती प्रसिद्धी मिळायला हवी असे वाटते. :)

In reply to by इंटरनेटस्नेही

परासाहेब, इंट्या 'आंत'राष्ट्रीय पुरुष दिना बद्दल विचारतोय. त्यो साजरा हुतो काय??????

सगळे दिवस पुरुषान्चे राज्यच असते की !! वेगळ्या दिवसाची गरजच काय?

सगळे दिवस पुरुषान्चे राज्यच असते की !! वेगळ्या दिवसाची गरजच काय?

आंतरराष्ट्रीय पुरुष दिन नसावा. अन्यथा, युयुत्सुंचे दुकान चालणार नाही. :(

In reply to by शाहरुख

ह्यावरुन मला त्या "पेड (payed) ऑडियन्स मेंबर' " असाव्यात असा संशयाचा डोमकावळा टोच मारुन गेल्या.

आजच्या बायकांसारखे मेजोरीटी पुरुष जेव्हा घर सांभाळणे (स्वयंपाक बनवणे, भाज्या आणणे, दळण आणणे, साफ-सफाई, कपडे-भांडे धुणे, वाळवण तयार करणे, पुरण घालून सण साजरे करणे, इ ), नोकरी करणे, मुल सांभाळणे, सासर आणि माहेर दोघांची काळजी घेणे, अशी बरीच काम करतील तेवा पुरुष दिन असावा... (तरी बाईच्या जीवनातले पाळी, बाळंतपण आणि मेनोपोझ हे महत्वाचे टप्पे कधीच पुरुषाला सहन करावे लागणार नाहीत... एवढ्या साठी तरी महिला दिन असणा worth आहे.)

In reply to by पिलीयन रायडर

बै... तुम्ही एक निबंध लिहा... बाकी प्रतिक्रियेला ओढुन लिहिलात तर ब्येष्ट...

In reply to by पिलीयन रायडर

सब टिव्ही वर मिसेस तेंडुलकर असे करताना दिसतात म्हणे :) सर्व पुरुषांनी त्यांच्या कडुन धडे आणि कविता घेतल्या पाहिजेत. बाकी पिलियन रायडर शी सहमत :) - एलियन स्पायडर कोणी कितीही बोंबललं तरी मी नेटवरच असतो .......

In reply to by पिलीयन रायडर

वाचून ड्वाळे पाणावले. तुम्ही म्हणता ते बरोबर आहे. पुरुषदिन नको. उलट एक वेगळा आंतरराष्ट्रीय (कामवाली) बाई दिन चालू करावा असे वाटते.