महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.
मी गीत मी प्रीत
मी साद मी हाक
मी शब्द मी व्यक्त
अखंडीत !!
मी राधा मी मीरा
मी शक्ती मी भक्ती
मी अणु मी रेणू
समाजात!!
मी सल मी बळ
मी खोल मी पंख
मी धरा मी नभ
संभ्रमात !!
मी धुंद मी गंध
मी नशा मी फ़ुल
मी सुध मी शेज
जन्मजात !!
--- शब्दमेघ (स्त्री...भावनांचा प्रवास मधुन)
| लेखनविषय: |
|---|
वाचने
2649
प्रतिक्रिया
4
मिसळपाव
प्रतिक्रिया
सुंदर..
आणखी एक ओळ माझ्या कडून
सुंदर...
In reply to आणखी एक ओळ माझ्या कडून by ज्ञानराम
गणेशा - छान नि सुंदर. मस्त