सांग सखे कसा आवरू मी बुडण्याचा मोह
खुणावत आहेत मजला तुझ्या नयनीचे डोह
नको लवून पहाटे अशी वेचू ... सखे... फुले
मन उगाच बांधती मग... तुझ्या झाडी ... माझे झुले
केली सगळी तयारी मनी एकच हा ध्यास
कधी करायचा सांग... सात पावलांचा प्रवास
सांग कधी पडतील हव्याहव्याश्या त्या गाठी ...
अन माझ्या नावाभोवती तुझ्या नावाची ग मिठी
आता नको नाही म्हणू, आता नको मागे फिरू, आलो तुला मी शरण
माझ्याशिवाय तुझ्या जगण्यात, आपसूक माझे मरण ... माझे मरण
| लेखनविषय: |
|---|
वाचने
907
प्रतिक्रिया
2
मिसळपाव
प्रतिक्रिया
सुंदर कविता ... अप्रतिम फक्त
सुंदर कविता ... अप्रतिम फक्त ..
नयनीचे डोह .. मस्त कल्पना .. पहिल्याम्दा वाचताना मजेशीर वाटले पण .. आवडले
सांग कधी पडतील हव्याहव्याश्या त्या गाठी ...
अन माझ्या नावाभोवती तुझ्या नावाची ग मिठी
आवडले ..
लिहित रहा .. वाचत आहे
छान रचना. केली सगळी तयारी
छान रचना.
केली सगळी तयारी मनी एकच हा ध्यास
कधी करायचा सांग... सात पावलांचा प्रवास
हे छान सुचले आहे.. पुलेशु.