Skip to main content

श्रीशिवरायाचा जयकार

लेखक जातीवंत भटका यांनी सोमवार, 07/03/2011 16:37 या दिवशी प्रकाशित केले.
श्रीशिवरायाचा जयकार सह्याद्रीवर घुमतो अजून तुझ्या शौर्याचा हुंकार ... श्वासाश्वासातून निघतो श्रीशिवरायाचा जयकार ... म्लेंच्छांनी घातले घाव घाव मातृभूमी वरी .. परदास्याच्या अंधःकारातून पेटला स्वातंत्र्याचा रवी ... घेऊनी रामदासी मंत्र गर्जला हा नृसिंह असा ... दुमदूमला आसमंत सारा थरथरल्या दाही दिशा ... मावळे मराठे मर्द झुंजले अर्पुनी प्राण ... रोवले छातीत मोघलांच्या तेजस्वी भगवे निशाण ... तासिले कडे अभेद्य घडविले दुर्ग बेलाग ... सळसळती मनगटे मराठी अन् समशेर ओकते आग ... हिंदवी स्वराज्याचा ज्यानी थाटला संसार साजरा ... त्या जाणत्या राजांस करितो मानाचा त्रिवार मुजरा ... --- वेडा कवी - अमोल
काव्यरस
लेखनविषय:

वाचने 2163
प्रतिक्रिया 6

प्रतिक्रिया

अप्रतिम कविता .. मावळे मराठे मर्द झुंजले अर्पुनी प्राण ... रोवले छातीत मोघलांच्या तेजस्वी भगवे निशाण ... तासिले कडे अभेद्य घडविले दुर्ग बेलाग ... सळसळती मनगटे मराठी अन् समशेर ओकते आग ... जबरदस्त आहे हे...