Skip to main content

मी घर बदललंय ...

लेखक विश्वेश यांनी सोमवार, 07/03/2011 09:43 या दिवशी प्रकाशित केले.
दर आठवड्याला ठरल्याप्रमाणे देवळात गेलो .... अन ह्या २ ओळी सुचल्या ..... देवभोळा नसण्याची permission मी देवाकडूनच घेतली आहे ... अन आमच एकमेकाला status reporting weekly आहे ... पुढे त्याचा विस्तार एका वेगळ्याच कवितेत झाला .... कुठे गेली माझ्या घरावरची तुझी सावली... कुठे गेला तो मेघ, कुठे गेली ती कृपावृष्टी ... आता सगळच सरलंय .. मला काळात नाही देवा ... कि तू जागा बदललीस कि मी घर बदललंय महागाई नुसार वाढवलाय मी तुझ्या दक्षिणेचा भत्ता ... अन त्याच पेटीत टाकला आहे मी माझा नवीन पत्ता बघ जमले तर काढ मज पामरासाठी थोडा वेळ अन संपवून टाक एकदाचा हा उन सावलीचा खेळ लढताना रोजची लुटुपुटूची लढाई नाही आली कधी कपाळावर आठी अरे कारण विश्वास होता माझा कि कितीही झाले तरी तू आहेस पाठी तुला असे वाटले का कि ह्याला आता आपली गरज नाय .... चेहऱ्यावरचे हसू पाहून .... घेतलास कि तू काढता पाय आता सवय होऊ लागली आहे तुझ्याशिवाय जगायची ... आता सवय होऊ लागली आहे तुझ्याशिवाय लढायची ... तरीही नित्य नेमाने घालतो प्रदक्षिणा ... तुझ्या गाभार्याभोवती तुझ्याशिवाय माझा मी लढतो आहे ... ह्याची खरतर हि पावती ... ज्या दिवशी माझा नित्यक्रम चुकेल त्या दिवशी ... तू ये घरी तेव्हा तुझी खरी गरज असेल.... सध्या सगळ बर चाललंय मला काळात नाही देवा ... कि तू जागा बदललीस कि मी घर बदललंय
लेखनविषय:

वाचने 1288
प्रतिक्रिया 6

प्रतिक्रिया

अरे वा! डायरेक्ट फेस टु फेस संवाद? मी ही बर्‍याच वेळा देवाला अशी मोकळीक देउन टाकते, सांगते, हे बघ , तुला माझ्या साठी काय बर वाटतय ते तु कर. मी मला काय बर वाटतय ते करायचा प्रयत्न करेन. शेवटी तु योग्य तो टर्न देशीलच नाही का? हा असा सरळ सरळ वळसे न घेता केलेला तुमचा देवाशी संवाद आवडला हे वे. सा. न.

छान..

अप्रतिम कविता ... पुन्हा पुन्हा वाचावी असावी .. विशेष करुन आता सवय होऊ लागली आहे तुझ्याशिवाय जगायची ... आता सवय होऊ लागली आहे तुझ्याशिवाय लढायची ... तरीही नित्य नेमाने घालतो प्रदक्षिणा ... तुझ्या गाभार्याभोवती तुझ्याशिवाय माझा मी लढतो आहे ... ह्याची खरतर हि पावती ... ज्या दिवशी माझा नित्यक्रम चुकेल त्या दिवशी ... तू ये घरी तेव्हा तुझी खरी गरज असेल.... सध्या सगळ बर चाललंय मला काळात नाही देवा ... कि तू जागा बदललीस कि मी घर बदललंय हे खरेच मस्त वाटले