Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by गवि on Fri, 03/04/2011 - 15:46
मी आज इथे एक सर्वसाधारण काथ्याकुटाचा मजकूर लिहीतोय. पण त्या मजकुराचा उद्देश आज वेगळा आहे. म्हणजे पुरेसे काथ्याकूट करता येईल इतपत तो विषय चिवडण्याजोगा आहे. पण... इथे काही वेगळं करता आलं तर बघू म्हणून एक आचरट विनंती करु इच्छितो. माझा निम्ननिर्दिष्ट मजकूर वाचून झाल्यानंतर आपण स्वतःची कॉमेंट न देता इतर कोणा सदस्यमित्राची कॉमेंट (अर्थात कल्पून) लिहावी. म्हणजे, "क्ष"च्या शंकायुक्त पण मुद्द्याचे धागे बरोब्बर उचकटणार्‍या पांढुरक्या प्रतिक्रिया.. एखाद्याच्या अभ्यासपूर्ण संयत.. ...काहींच्या थट्टेखोर आणि शालजोडीतल्या.. कोणाच्या वळणदार पण काय ते नेमके धुक्यात ठेवणार्‍या.. कोणाच्या तडकावणार्‍या.. उदाहरणे पुरेत.. :) ह.घ्या. गै.क.घे. न. हे वे सां. न.ल. .... .. .. तर मूळ काथ्याकूट विसरलोच.. ...अनावश्यक गोष्टींची आवश्यकता... कोणीतरी श्रीमंत नट किंवा उद्योगपती पोरीचं भपकायुक्त लग्न काढून त्यात कित्येक कोटींचा चुराडा करतो. खूप विचारवंत पेपरमधे वगैरे मनापासून शिव्या घालतात अशा "उधळपट्टी"ला. देशात अर्धपोटी गरीब आहेत. नव्हे तेच जास्त आहेत. आणि उघडे नागडेसुद्धा खूप खूप. आणि त्याचवेळी कोणाच्या तरी लग्नात कोटींचा चुराडा. हजारांची पत्रिका. लाखांची फुलं. कोटींचा वेडिंग ड्रेस. पण शांतपणे विचार केला तर लक्षात यायला काही हरकत नाही की या शेठजीकडचा माल एरव्ही खालच्या थरात वाटला गेला नसता. केवळ या "अनावश्यक" लग्नानं (आय मीन लग्नातल्या अनावश्यक भपक्यानं..!!) मांडववाले, फुलवाले, आचारी, वाढपी, मजूर, सराफ, दागिन्यांचे कारागीर, भांडी घासणार्‍या बायका, हजाराची पत्रिका छापणारा प्रिंटर, हातकागद बनवणारा कोणी लघुउद्योजक, कुरियरवाला या सर्वांना शेठ्जीचा पैसा झिरपून झिरपून मिळाला. हो प्रत्येक भुकेल्या गरीबाला, प्रत्येक आदिवासी कुपोषित मुलाला थेट घास नाही मिळाला. वाईट झालं. लग्नात अन्न वाया गेलं असेल. वाईट झालं. पण काही थरांपर्यंत तरी पैसा उतरून खाली आला. याहून जास्त चांगलं काही झालं नसतं. शेठजींनी साधेपणानं पोरीचं लग्न करून बाकी सारं दान करावं हा भाबडा आदर्शवाद झाला. ते होणे नाही. ..............................
  • Log in or register to post comments
  • 20211 views

प्रतिक्रिया

Submitted by अरुण मनोहर on Sat, 03/05/2011 - 09:58

Permalink

गवि किती महिने मिपावर आहात?

गवि किती महिने मिपावर आहात? सुद्दलेखनाला इथे फाट्यावर मारल्या जाते हे अजून माहीत नाय? इतके शुध्ध लिहीणे मिरवायचे असेल तर तिकडे नमो करा आणि इकडे गत व्हा. - बात्या मेजर
  • Log in or register to post comments

Submitted by नितिन थत्ते on Sat, 03/05/2011 - 07:40

Permalink

काहीतरी चुकतंय

सदर धाग्यावर काल रात्री (४ मार्च) ७० च्या आसपास प्रतिसाद होते. त्यातले जवळजवळ ५० आज सकाळला उडाले आहेत. ते सर्व काही मिपा + संपादकीय धोरणांची खिल्ली उडवणारे नव्हते. माझेही दोन प्रतिसाद होते ते उडाले आहेत. त्यातला एक विजुभाऊंची मस्करी करणारा होता आणि तो हलके घेतल्याचे + आवडला असल्याचे विजुभाऊ यांनी त्यावर दिलेल्या प्रतिसादात दिसले होते. माझा दुसरा प्रतिसाद श्रामोंची नक्कल करणारा होता. तो हलके न घेता जड घेतला असल्यास माहिती नाही. सदर प्रतिसाद इथे न लिहिता संमं किंवा सरपंचांना व्य नि करायला हवा होता असे वाटत नाही.
  • Log in or register to post comments

Submitted by चित्रा on Sat, 03/05/2011 - 09:14

In reply to काहीतरी चुकतंय by नितिन थत्ते

Permalink

जेव्हा

संपादकांविरूद्ध इथे काय लिहीले गेले हे मला माहिती नाही, पण नीलकांत यांनी ते काढलेले आहे याचा अर्थ ते काहीबाही असावे. असे सर्व लिहीले गेले तेव्हा आपल्याला असे विचारावेसे वाटले का, की असे का लिहीले जावे? का त्यांच्याबाबतीत मस्करीची कुस्करी चालते? उत्तर खरडवहीतून दिले तरी चालेल. संपादकीय धोरणांची खिल्ली उडवणे हा एकच निकष असू शकत नाही. एकदा नावांची विडंबने मान्य केली तर नावांची बेबंद विडंबनेही येतात. मग तेवढीच काढली तर संपादकांच्या नावाने पुन्हा गजर केला जातो. तेव्हा हे होणे पन्नास प्रतिक्रिया एकदम गेल्याने टळलेले आहे अशा भ्रमात होते. पण तो गजर झालाच, आणि जाग आली.
  • Log in or register to post comments

Submitted by चित्रा on Sat, 03/05/2011 - 09:19

In reply to जेव्हा by चित्रा

Permalink

अजून एक

असे की, मूळ काथ्याकुटाशी संबंधित म्हणून आणि कोणाची तरी नक्कल करून जे प्रतिसाद आले आहेत, ते ठेवलेले दिसत आहेत.
  • Log in or register to post comments

Submitted by स्पा on Sat, 03/05/2011 - 09:17

Permalink

माझेही दोन प्रतिसाद, मिपाच्या

माझेही दोन प्रतिसाद, मिपाच्या संपादकीय कामात ढवळाढवळ न करणारे असून सुद्धा उडवले गेले आहेत, जाहीर निषेध
  • Log in or register to post comments

Submitted by प्रीत-मोहर on Sat, 03/05/2011 - 10:10

In reply to माझेही दोन प्रतिसाद, मिपाच्या by स्पा

Permalink

माझेही असेच ३-४ पप्रतिसाद

माझेही असेच ३-४ पप्रतिसाद उडवलेत ..जे फक्त मस्करीसाठी लिहिले होते ..
  • Log in or register to post comments

Submitted by वपाडाव on Sat, 03/05/2011 - 10:27

In reply to माझेही दोन प्रतिसाद, मिपाच्या by स्पा

Permalink

माझेही दोन प्रतिसाद, मिपाच्या

माझेही दोन प्रतिसाद, मिपाच्या संपादकीय कामात ढवळाढवळ न करणारे असून सुद्धा उडवले गेले आहेत. असेच म्हणतो. डॉ. कुलदीप ऊठसुटे
  • Log in or register to post comments

Submitted by वपाडाव on Sat, 03/05/2011 - 10:29

In reply to माझेही दोन प्रतिसाद, मिपाच्या by स्पा

Permalink

प्र.का.टा.आ.

प्र.का.टा.आ.
  • Log in or register to post comments

Submitted by मुलूखावेगळी on Sat, 03/05/2011 - 09:55

Permalink

मी लग्नाला आलो आनि जेवयला

मी लग्नाला आलो आनि जेवयला ब्सलो तर काय १ आदीमानव १०१वा गुलाबजाम खात आणि वाढत आला आणि बोल्ला "तुम्हीच का ते मठात लिहिता.?" तेवढ्यात १ पनीरबटरमसाला विथाउट पनीर घेउन १ राजकुमार आला आनि हेच बोल्ला. मी सुखावलो, तरंगलो, बुडालो . कुठेही गेले कि होते -विचारणा न पाठलाग - मैदा
  • Log in or register to post comments

Submitted by परिकथेतील राजकुमार on Sat, 03/05/2011 - 12:14

Permalink

संपादकीय कार्याचा पुर्ण आदर

संपादकीय कार्याचा पुर्ण आदर बाळगुन एक प्रश्न विचारायचा आहे. मुळ धाग्यातच जर :-
इथे काही वेगळं करता आलं तर बघू म्हणून एक आचरट विनंती करु इच्छितो. माझा निम्ननिर्दिष्ट मजकूर वाचून झाल्यानंतर आपण स्वतःची कॉमेंट न देता इतर कोणा सदस्यमित्राची कॉमेंट (अर्थात कल्पून) लिहावी. म्हणजे, "क्ष"च्या शंकायुक्त पण मुद्द्याचे धागे बरोब्बर उचकटणार्‍या पांढुरक्या प्रतिक्रिया.. एखाद्याच्या अभ्यासपूर्ण संयत.. ...काहींच्या थट्टेखोर आणि शालजोडीतल्या.. कोणाच्या वळणदार पण काय ते नेमके धुक्यात ठेवणार्‍या.. कोणाच्या तडकावणार्‍या..
असे आवाहन असेल, तर प्रतिक्रीया त्याला अनुसरुनच लिहिल्या जाणार ना ? मग सरळ गवि ह्यांना हा प्रकार त्यांना वाटला तशा गमतीच्या मार्गाने न जाता भलतीकडे निघाला आहे किंवा जुने स्कोर सेटल करण्याचे प्रयत्न होत आहेत असे निदर्शनास आणून त्यांच्या संमतीने धागाच अप्रकाशीत करता आला असता. मला नाही वाटत सदर प्रकार बघता गविंनी सहकार्य नाकारले असते. हे सर्व लिहायचे कारण येवढ्यासाठीच की मी व इतर काही लोकांच्या प्रतिक्रीया ह्या एकमेकांची खिल्ली उडवणार्‍या होत्या, ज्यांचा प्रशासनाशी अथवा जुने स्कोर सेटल करण्याशी काही संबंध नव्हता. (असे ज नजरचुकीने झाले असल्यास क्षमस्व) त्यादेखील उडाल्याने वाईट वाटले. आमचे लिखाण हे व्यास किंवा वाल्मिकींचे लिखाण नाही हे मनापासून मान्य आहे, पण नियमात बसणारे लिखाण उडाल्याने वाईट वाटले. शेवटी प्रश्न असा उरतो की अशा लेखावर प्रतिक्रीया द्याव्या तरी कशा ?
  • Log in or register to post comments

Submitted by गवि on Sat, 03/05/2011 - 13:20

Permalink

हे भलते काही वळण लागेल असं

हे भलते काही वळण लागेल असं वाटलं नव्हतं.गमतीचा भाग अपेक्षित होता. सुरुवातीचे काही तास काहीच आक्षेपार्ह झालं नव्हतं.नंतर उशीरा काहीतरी झालं असावं. विडंबनात्मक धागे काढण्यापूर्वी विचार करावा लागेल. हो,असं काही लक्षात आलं असतं तर मी कोण धागा उडवण्यास हरकत घेणारा..? अचानक सकाळी उठून मोबाईलवर रिफ़्रेश केलं तर प्रतिक्रिया संपादन दिसलं.माझ्या धाग्याने जे झालं त्याबद्दल दिलगिरी.
  • Log in or register to post comments

Submitted by विश्वनाथ मेहेंदळे on Sun, 03/06/2011 - 16:19

In reply to हे भलते काही वळण लागेल असं by गवि

Permalink

>>माझ्या धाग्याने जे झालं

>>माझ्या धाग्याने जे झालं त्याबद्दल दिलगिरी कुठल्याही आणि कितीही चांगल्या धाग्याचे रुपांतर अशा धाग्यात करणे हा येथील काहीजणांच्या हातचा मळ आहे. तुम्ही दिलगीर व्हायची काहीही गरज नाही असे माझे मत आहे. सो चिल माडी.
  • Log in or register to post comments

Submitted by नरेशकुमार on Sat, 03/05/2011 - 15:24

Permalink

चला, या निमित्ताने पुना येकदा

चला, या निमित्ताने पुना येकदा आढावा मिळाला. येक लेसन लर्नट् झाला.
  • Log in or register to post comments

Submitted by प्रास on Sat, 03/05/2011 - 15:40

Permalink

माझं मत....

गविजी, मला वैयक्तिकरीत्या तुमचं वरील लिखाण खूप आवडलं. त्यातही सदस्याने दुसर्‍या कुणाच्या स्टाईलने प्रतिक्रिया द्यायची हे ही 'जबरा' होतं. तशा आलेल्या प्रतिक्रिया वाचायला मजाही येत होती. मध्ये कुठे माशी शिंकली कळायला मार्ग नाही. सं.मं नि टारझन भौ यांची झकाझकी आताही मराठीच्या भाषिक संपन्नतेची ग्वाही देतेय म्हणण्यास प्रत्यवाय वाटत नाही. असो. जे झालंय त्याला तुमचा धागा कारणीभूत होता असं वाटत तरी नाही..... बाकी सर्व "कृष्णार्पणमस्तु।"
  • Log in or register to post comments

Submitted by भडकमकर मास्तर on Sun, 03/06/2011 - 02:25

In reply to माझं मत.... by प्रास

Permalink

सहमत.. धाग्याची आयडिआ भारी

सहमत.. धाग्याची आयडिआ भारी होती....
  • Log in or register to post comments

Submitted by निनाद मुक्काम … on Sun, 03/06/2011 - 03:17

In reply to सहमत.. धाग्याची आयडिआ भारी by भडकमकर मास्तर

Permalink

धाग्याची कल्पना १

धाग्याची कल्पना १ नंबर ह्यावरून एक लग्न आठवले माझ्या बायकोची आजी नी तिच्या आजोबांच्या लग्नाचा किस्सा (खराखुरा ) दुसऱ्या महायुद्धाचा काळ तो .पहिल्या प्रहरात आम्ही जेते होतो . विजयी वीर गावोगावी आले .त्याचे भरपूर कोड कौतुक झाले .त्यात आमचे आजोबा (म्हणजे बायकोचे / एकूण एकच) रजा थोडी होती .अजून अर्धा युरोप टाचेखाली येणे बाकी होते .म्हणून एका रविवारी अचानक ह्यांनी लग्न करायचा निर्णय घेतला . ह्यांच्या सारख्या अनेक सैनिकांना लग्न करायचे होते .म्हणून गावचा चर्च हाउस फुल तालुक्याच्या गावाला भव्य चर्च (जगातील पहिल्या ५ येणारे ) तेथे जाऊन लग्न करायची टूम निघाली .प्रचंड भरलेल्या बस मध्ये ( आपली एसटी ची गर्दी कल्पावी ) त्यावेळी जर्मनीत बसेस कमी आणी रणगाडे /फायटर प्लेन्स जास्त होते . त्यांनी धावत पळत स्वताला बस मध्ये ढकलले . ह्या गडबडीत लग्नाचे साक्षीदार मात्र खालीच राहिले . मग आयत्या वेळी बस मधील दोन अनामिक व्यक्ती साक्षीदार म्हणून आयत्यावेळी तयार झाल्या ( सैनिक हे त्यावेळी राष्ट्राचे आवडते हिरोज होते ) सदर किस्सा आमच्या ओमाने (जर्मनीत ओमाला आजी म्हणतात ) तिच्या वाढदिवसाला सांगितला .मीच खर तर खोदून खोदून तिला विचारले तेव्हा हि हकीगत कळाली. ( माझ्या सासूने एकदा ह्या चर्च मध्ये गेल्यावर ''माझ्या आईचे आणि वडिलांचे एकच वेळी एकच दिवशी एकच ठिकाणी येथे लग्न झाले असे सांगितले होते'' ) मला प्रश्न पाडला . ''ह्यांच्या घरापासून एवढ्या लांब आणि भव्य दिव्यं चर्च मध्ये का बरे लग्न केले'' .कदाचित हेर फ्युरर ने ह्यांच्या पराक्रमाची विशेष दखल घेऊन ...... दुर्दैवाने ह्या घटनेचा फोटो नाहीं म्हणून तो टाकू शकत नाहीं . आख्यानात ओमाच्या वाढ दिवस ह्या भागात टाकणार होतो .पण येथे संधी मिळाली (म्हणजे संधी मी निर्माण केली ) लेख काय / प्रतिक्रिया काय शेटजी /अवाढव्य खर्च ह्यांचा ह्या प्रतिक्रियेशी काही तरी संबंध आहे का ? स्वताची लाल करणारा मुक्काम पोस्ट जर्मनी
  • Log in or register to post comments

Submitted by प्रास on Sun, 03/06/2011 - 11:47

In reply to धाग्याची कल्पना १ by निनाद मुक्काम …

Permalink

जर्मनीत ओमाला आजी

जर्मनीत ओमाला आजी म्हणतात कस्काय जम्तं बुवा? माझ्या सासूने एकदा ह्या चर्च मध्ये गेल्यावर ''माझ्या आईचे आणि वडिलांचे एकच वेळी एकच दिवशी एकच ठिकाणी येथे लग्न झाले असे सांगितले होते'' एकमेकांशी असाही उल्लेख केलेला ना? लेख काय / प्रतिक्रिया काय शेटजी /अवाढव्य खर्च ह्यांचा ह्या प्रतिक्रियेशी काही तरी संबंध आहे का ? स्वताची लाल करणारा ह्यॅ ह्यॅ ह्यॅ ह्यॅ ह्यॅ ह्यॅ ह्यॅ ह्यॅ ह्यॅ तेव्हढं सोडून सोडा हो आता..... :-D
  • Log in or register to post comments

Submitted by मराठी_माणूस on Sun, 03/06/2011 - 23:10

In reply to जर्मनीत ओमाला आजी by प्रास

Permalink

हेच म्हणतो

हेच म्हणतो
  • Log in or register to post comments

Submitted by शिल्पा ब on Sun, 03/06/2011 - 23:32

In reply to जर्मनीत ओमाला आजी by प्रास

Permalink

आमच्याकडे सगळं जमतं...लोक खूप

आमच्याकडे सगळं जमतं...लोक खूप खूप हुशार आहे... थंडी खूप असल्याने सगळीकडे कोट घालून फिरावे लागते....इथे लग्न सुद्धा एकमेकांशीच होतात... तुमच्यासारख्या टीनपाट माणसाला समजणार नाही...इलेक्ट्रोनिक्स मध्ये कॉम्पुटर असतं आमच्याकडे लग्नात कमी लोक बोलावून भरपूर खाणे, गाणे, पिणे, नाचणे असते... सगळीकडे भरीचे फर्निचर असते..त्यावर टेबल क्लोथ ठेऊन मध्यभागी एक बुके ठेवतात त्याला सेंटर पीस म्हणतात.. मला चिकन खूप आवडते...त्याबरोबर छानशी वाईन असेल तर मग काय विचारता... आंतरराष्ट्रीय समूहात आम्हाला बरेच महत्त्व आहे... इथे राजकारणी लोकांची चिंता करतात आणि त्यांच्या सुखासाठी काय वाट्टेल ते करतात...आता त्यातही काही काही असे तसे लोक असतातच... पण मग लोक त्यांना पुढच्या निवडणुकीत निवडून देत नाहीत... तुमच्यासारख्या कंपूबाजाला उत्तर द्यायची नव्हते पण सवय अशी जाते का? - मुक्काम पोस्ट बोंबीलवाडी, बुद्रुक
  • Log in or register to post comments

Submitted by प्रास on Mon, 03/07/2011 - 19:29

In reply to आमच्याकडे सगळं जमतं...लोक खूप by शिल्पा ब

Permalink

अरेच्चा...!

साद काय प्रतिसाद काय......? तुमचं आपलं काहीतरीच..... :-)
  • Log in or register to post comments

Submitted by चिंतामणी on Sun, 03/06/2011 - 16:29

In reply to मजेशीर धागा. उशीरा उघडला by कानडाऊ योगेशु

Permalink

मी सुद्धा उशीरा उघडला.

पण आता येथे काहिही पोस्ट करायला धीर होत नाही.
  • Log in or register to post comments

Submitted by कानडाऊ योगेशु on Sun, 03/06/2011 - 23:15

In reply to मी सुद्धा उशीरा उघडला. by चिंतामणी

Permalink

सहमत

+ १ - छगनबिहारी
  • Log in or register to post comments

Submitted by श्री गावसेना प्रमुख on Mon, 03/07/2011 - 09:06

Permalink

बी जे पी

बी जे पी कड पन ध्यान द्या हो आमचे वरुण
  • Log in or register to post comments

Submitted by कवितानागेश on Tue, 03/08/2011 - 19:27

Permalink

कोण

कोण श्रीमंत? धन्यवाद. अवांतरः जर्मनीत ओमाला आजी म्हणतात' तसेच ओबामाला आजोबा म्हणतात काय? कृपया राग मानू नये,..किंवा कसेही... रोकडिया -- प्रत्येक कंपूद्वेष्टा हा .............,... नसतो पण प्रत्येक .............,... हा कंपूद्वेष्टा असतो..
  • Log in or register to post comments

Submitted by स्पा on Mon, 03/07/2011 - 14:09

Permalink

.

. प्रतिक्रिया संपादित केलेली आहे
  • Log in or register to post comments

Submitted by परिकथेतील राजकुमार on Mon, 03/07/2011 - 13:51

Permalink

अनावश्यक अवांतर टाळल्यास कृपा

अनावश्यक अवांतर टाळल्यास कृपा होईल -- रजनीलकांत
श्री. स्पा वरती नीलकांत ह्यांची सूचना वाचली नसल्यास खाली पुन्हा देत आहे, ती अजुन एकदा निट वाचावी. ह्या धाग्यावर काय गोंधळ झाला हे माहिती असताना पुन्हा अशी प्रतिक्रीया कशासाठी ? तुम्ही ह्या असल्या प्रतिक्रीया देता आणि मग विनाकारण टार्‍याचे बघुन इतर पण प्रतिसाद देतात असे उगा त्या टार्‍याचे नाव खराब होते. आपण समंजस असल्याने आपली प्रतिक्रीया बदलाल हि अपेक्षा. त्यामुळे बुच मारलेले नाही. धन्यवाद.
अनावश्यक प्रतिक्रिया प्रेषक नीलकांत दिनांक Sat, 05/03/2011 - 00:18. नमस्कार, या धाग्यावर टारझनने अनावश्यक प्रतिक्रिया देत. मिसळपावच्या व्यवस्थापकीय धाग्याची चेष्टा केली आहे. सदर बाबीची मिपा व्यवस्थापन अत्यंत गंभीर दखल घेत आहे. आणि ती प्रतिक्रिया व त्यासोबतच अन्य उपप्रतिसाद उडवण्यात येत आहेत. याच सोबत टारझन यांना सक्त ताकीद देण्यात येत आहे की त्यांनी व्यवस्थापकीय लेखांची व सूचनांची अशी टर उडवल्यास यापुढे त्यांचे खाते कुठलीही पुर्वसूचना न देता निलंबीत करण्यात येईल. चेष्टा मस्करी एका मर्यादेपुढे जाऊ नये हेच उत्तम होईल.
  • Log in or register to post comments
Profile picture for user सुहास..

Submitted by सुहास.. on Mon, 03/07/2011 - 15:45

In reply to अनावश्यक अवांतर टाळल्यास कृपा by परिकथेतील राजकुमार

Permalink

.

. पांखडीस झोडपांडे
  • Log in or register to post comments

Submitted by स्वैर परी on Mon, 03/07/2011 - 16:02

Permalink

हे मेले असेच!

पैसा आहे .. उडवा कसाही. ह्याना कोण आहे विचारायला. जनता उपाशी मेली तरी ह्यांचे काय जातेय. नशीब निदान केटरर , कुरीअर, मंडप वल्यांची तरी कमाई होतेय. सगळे मेले सारखेच! - मिपा ग
  • Log in or register to post comments

Submitted by निनाद मुक्काम … on Tue, 03/08/2011 - 00:22

Permalink

हा प्रतिसादावर स्वानुभवाने

हा प्रतिसादावर स्वानुभवाने सांगतो . आंधळा नी पांगळा अनुयय करून अंकाचा पाऊस पाडून आपण एखाद्या व्यक्तीच्या मित्र मंडळीत शिरू असा गैरसमज टाळावा. मला उमजेलेल शांतता कोर्ट सांगतो . आपण आभासी जगतात जेव्हा एखाद्याला काल्पनिक लक्ष्य समजून टार्गेट करतो. तेव्हा आजूबाजूचे त्याला पाठिंबा देतात (अंकाचा पाऊस किंवा वाक्यास अनुमोदन मग तिसरा त्या टार्गेट विषयी बोलतो .त्याला ही पूरक प्रतिसाद मिळतो . मग नाटकातील काल्पनिक न्यायाधीश म्हणतात तसे '' खेळ थांबवू नका चालू राहू दे , मजा येत आहे . हळू हळू टार्गेट वर बोलणारे वाढत जातात त्याच वेळी ह्या आभासी खेळत टार्गेट च्या मनस्थितीची कोणी कल्पना करत नाही . त्याने उत्तर दिले कि नव्या दमाचा इसम नव्या मुद्यांसह येतो .( कारण आता आपण काहीही लिहिले तरी त्याचा खरे खोटे पणा सिद्ध करण्याची गरज नसते ) त्याच लिहिण्याच्या अनुषंगाने कथा पुढे चालत जाते . थोडक्यात टार्गेट चा बेणारे बाई होण्याशी शक्यता असते .( माझी येथे बेणारे बाई झाली असे मी विधान करत नाही आहे .पण एखाद्याचा होण्याचा शक्यता असते .) येथे काल्पनिक खेळात कैफ चढल्याने तो थांबवणे कुणाच्याही हाती रहात नाही . झुंडीचे मानसशास्त्र हेच सांगते ह्यात झुंडीला विशेष फरक पडत नाही त्यांना फक्त एक बोलणारा लागतो .पण बोलणारा मात्र चटकन लोकप्रिय होतो व मात्र त्याच्या पडत्या काळात हेच पाठीराखे गायब होतात . येथे नाट्याला थोडे वेगळे वळण लागले . आपण लिहितो त्याला भरपूर प्रतिसाद मिळत आहे हे .पाहून मग मस्करी ची कुस्करी कधी झाली हे लक्षात येत नाही . हा संधर्भ आपल्यात इतके दिवस चाललेल्या सुसंवादावर आहे . .( आपण केलेली साधी मस्करी हि एखाद्या व्यक्तीला ह्या बाबतीत मला साधी वाटत नाही . .ह्यात दोन शक्यता असतात १) तुमचा दृष्टीकोन हा त्या व्यक्तीपेक्षा वेगळा असतो .२) दुसर्यावर जेव्हा मस्करी केली तेव्हा ती साधी वाटते पण स्वतावर अशी कोणी केली तर ती साधी वाटत नाही उदा .( कंपूबाजी व (अनावश्यक शेरे ) हे मिपावर आढळतात तेव्हा का एवढा त्रास करून घेता / फिरून या असा सल्ला देणे ही एक गोष्ट .व स्वतावर कोणी खरड केली ( व ती त्या व्यक्तीस अनावश्यक वाटली .कि केवढा मनस्ताप होतो . हे माझी खरडवही पाहिल्यास कळून येईन .) तात्पर्य - ज्याचे जळते त्यालाच कळते ) स्पा आणी इतर काही सदस्यांनी आमच्या खेळात सांमत ह्यांची भूमिका वठवावी लागली .. जेव्हा आपण आंधळा अनुयय करून एखाद्याच्या विधानांवर अंकाचा पाऊस पडतो तेव्हा आपण त्या व्यक्तीस नुकसान पोहचवू शकतो. .त्याचा राजेश खन्ना करू शकतो .( ही उपमा खिल्ली उडवण्यासाठी नसून एका मासिकाच्या संपादकाने माझ्याकडून फुकटात ३ पिग रिचवून झाल्यावर अवांतर गप्पा खूप वर्षापूर्वी केल्या होत्या ( सदर पेग हे हॉटेल मधून दिले होते .माझ्या खिशातून नव्हे) .त्याने राजेश खन्ना ह्याला त्याच्या भवतालच्या चमच्यांनी कसा संपवला हे सांगितले होते .) ह्या लेखात टारझन ह्यांना मित्र व आंधळे अनुयायी दोन्ही दिसून आले असतील . मला नेहमीच उस्फुर्त पणे सल्ला किंवा प्रतिक्रिया देणाऱ्या मित्र परवडतील. ( आमचा आंधळा अनुयय कोण करणार म्हणा ?) हा सल्ला किंवा विनंती उपदेश अजिबात नसून मला उस्फुर्त पणे जे लिहावेसे वाटले ते लिहिले .
  • Log in or register to post comments

Submitted by विश्वनाथ मेहेंदळे on Tue, 03/08/2011 - 20:57

In reply to हा प्रतिसादावर स्वानुभवाने by निनाद मुक्काम …

Permalink

हे सगळे ठीक आहे. बरेच मुद्दे

हे सगळे ठीक आहे. बरेच मुद्दे पटले. शांतता... मधील परिस्थितीशी केलेली तुलना पण छान आहे, पण इथे प्रतिसाद दुसऱ्याच्या शैलीत लिहिणे अपेक्षित होते ना रे. वरून हे मुद्दे पण इथल्या चर्चेला गैरलागू आहेत (लग्न किंवा धोरणात बसतील अशा प्रतिक्रिया देणे). पण तुला काय म्हणायचे आहे याचा अंदाज आला.
  • Log in or register to post comments

Submitted by निनाद मुक्काम … on Tue, 03/08/2011 - 22:40

In reply to हे सगळे ठीक आहे. बरेच मुद्दे by विश्वनाथ मेहेंदळे

Permalink

मेहंदळे साहेब आपला मुद्दा

मेहंदळे साहेब आपला मुद्दा मान्य .तरी मी अवांतर केले .कारण परा ह्यांच्या प्रतिसादात पूरक असा प्रतिसाद देऊन माझी बाजू /भूमिका मांडली .माझ्या अनेक मित्र /मैत्रिणी माझ्या पासून दुरावतील तेही शुल्लक गैरसमजामुळे .हे मला मान्य नव्हते ( आधीच मी मायभूमीला दुरावलो आहे .तेच ...)म्हणून आपणास खव केली . ती जर संबंधित मान्यवर पाहतील तर माझी भूमिका अजून स्पष्ट होईन व इतर कोणाच्या लेखावर मी फक्त विषयाला अनुरूप लिहीन
  • Log in or register to post comments

Submitted by स्पा on Tue, 03/08/2011 - 19:38

Permalink

?????????????????????????????

??????????????????????????????????????????????????????????????????????
  • Log in or register to post comments

Submitted by विश्वनाथ मेहेंदळे on Tue, 03/08/2011 - 20:57

In reply to ????????????????????????????? by स्पा

Permalink

शांतता... बघ. मग कळेल तो काय

शांतता... बघ. मग कळेल तो काय म्हणतो आहे ते.
  • Log in or register to post comments

Submitted by नगरीनिरंजन on Fri, 03/25/2011 - 12:04

Permalink

आताच्च मटा वर ही. लिंक मिळाली

आताच्च मटा वर ही. लिंक मिळाली आता या खर्चाने. . बर्‍याच लोकाना पैसा मिळाला असेल हे खर पण पइश्याची एवढी उधळपट्टी पाहून ज्या लोकना मिळाला नाही त्यांची.......... . मी परदेशात असताना फाईव स्तार होटेलात मोठमोठे लग्न सोहळे पाहिले पण ते शक्यतो. खाजगी . स्वरूपाचे असतात आणि सामान्य माणसाला ते जळवत नाहीत. या भडक प्रदर्शनाने खर्चाच्या उपयोगा पेक्षा त्यातून होऊ घातलेला सामाजिक भडका जास्त उपदरवकारक आहे .
  • Log in or register to post comments

Pagination

  • First page « First
  • Previous page ‹ Previous
  • पान 1
  • पान 2

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com