Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by गवि on Fri, 03/04/2011 - 15:46
मी आज इथे एक सर्वसाधारण काथ्याकुटाचा मजकूर लिहीतोय. पण त्या मजकुराचा उद्देश आज वेगळा आहे. म्हणजे पुरेसे काथ्याकूट करता येईल इतपत तो विषय चिवडण्याजोगा आहे. पण... इथे काही वेगळं करता आलं तर बघू म्हणून एक आचरट विनंती करु इच्छितो. माझा निम्ननिर्दिष्ट मजकूर वाचून झाल्यानंतर आपण स्वतःची कॉमेंट न देता इतर कोणा सदस्यमित्राची कॉमेंट (अर्थात कल्पून) लिहावी. म्हणजे, "क्ष"च्या शंकायुक्त पण मुद्द्याचे धागे बरोब्बर उचकटणार्‍या पांढुरक्या प्रतिक्रिया.. एखाद्याच्या अभ्यासपूर्ण संयत.. ...काहींच्या थट्टेखोर आणि शालजोडीतल्या.. कोणाच्या वळणदार पण काय ते नेमके धुक्यात ठेवणार्‍या.. कोणाच्या तडकावणार्‍या.. उदाहरणे पुरेत.. :) ह.घ्या. गै.क.घे. न. हे वे सां. न.ल. .... .. .. तर मूळ काथ्याकूट विसरलोच.. ...अनावश्यक गोष्टींची आवश्यकता... कोणीतरी श्रीमंत नट किंवा उद्योगपती पोरीचं भपकायुक्त लग्न काढून त्यात कित्येक कोटींचा चुराडा करतो. खूप विचारवंत पेपरमधे वगैरे मनापासून शिव्या घालतात अशा "उधळपट्टी"ला. देशात अर्धपोटी गरीब आहेत. नव्हे तेच जास्त आहेत. आणि उघडे नागडेसुद्धा खूप खूप. आणि त्याचवेळी कोणाच्या तरी लग्नात कोटींचा चुराडा. हजारांची पत्रिका. लाखांची फुलं. कोटींचा वेडिंग ड्रेस. पण शांतपणे विचार केला तर लक्षात यायला काही हरकत नाही की या शेठजीकडचा माल एरव्ही खालच्या थरात वाटला गेला नसता. केवळ या "अनावश्यक" लग्नानं (आय मीन लग्नातल्या अनावश्यक भपक्यानं..!!) मांडववाले, फुलवाले, आचारी, वाढपी, मजूर, सराफ, दागिन्यांचे कारागीर, भांडी घासणार्‍या बायका, हजाराची पत्रिका छापणारा प्रिंटर, हातकागद बनवणारा कोणी लघुउद्योजक, कुरियरवाला या सर्वांना शेठ्जीचा पैसा झिरपून झिरपून मिळाला. हो प्रत्येक भुकेल्या गरीबाला, प्रत्येक आदिवासी कुपोषित मुलाला थेट घास नाही मिळाला. वाईट झालं. लग्नात अन्न वाया गेलं असेल. वाईट झालं. पण काही थरांपर्यंत तरी पैसा उतरून खाली आला. याहून जास्त चांगलं काही झालं नसतं. शेठजींनी साधेपणानं पोरीचं लग्न करून बाकी सारं दान करावं हा भाबडा आदर्शवाद झाला. ते होणे नाही. ..............................
  • Log in or register to post comments
  • 20211 views

प्रतिक्रिया

Submitted by इंटरनेटस्नेही on Fri, 03/04/2011 - 15:53

Permalink

सविस्तर प्रतिसादासाठी जागा

सविस्तर प्रतिसादासाठी जागा राखुन ठेवत आहे. - (वायदेआझम) इंट्या डॉन.
  • Log in or register to post comments

Submitted by असुर on Fri, 03/04/2011 - 16:28

Permalink

हे आले श्रीमंतद्वेष्टे!

हे आले श्रीमंतद्वेष्टे! प्रत्येकाने कमावलेले पैसे आहेत. ते कुठे, कसे केव्हा वापरावेत की मुळामुठेत सोडून द्यावेत हा ज्याचा-त्याचा प्रश्न आहे. उगाच पैसे वाटायच्या आणि दानधर्माच्या भंपक कल्पनांच्या मागे लागून नस्ते काकू काढण्यात काहीही हाशील नाही! त्यासाठी एखादी डायरी ठेवून त्यात लिहावे असा निरिक्षणात्मक सल्ला द्यावासा वाटतो आहे, घ्यायचा असेल तर घ्या, सक्ती नाही! -- राक्षसकथेतील असुरकुमार
  • Log in or register to post comments

Submitted by विश्वनाथ मेहेंदळे on Sat, 03/05/2011 - 12:58

In reply to हे आले श्रीमंतद्वेष्टे! by असुर

Permalink

याच्या जोडीला मी दिलेली

याच्या जोडीने, नाही नाही.... याच्या जोडीला मी दिलेली प्रतिक्रिया उडवली गेली आहे. त्याच्या कारणाचा खुलासा संपादक मंडळ करेल काय? टवलिया तळटीप :- वरील प्रतिसाद हा काल केवळ गम्मत म्हणून दिला होता. आज सकाळी घडलेल्या घटनांमुळे खुलासा करू इच्छितो की माझा कुठलाही प्रतिसाद उडवला गेला नाही. वरील प्रतिसाद हे एक विडंबन आहे. वि.मे.
  • Log in or register to post comments

Submitted by विजुभाऊ on Fri, 03/04/2011 - 16:29

Permalink

अच्र्त ब्व्ल्त. हे क्स्ल

अच्र्त ब्व्ल्त. हे क्स्ल ल्ग्न. दुबैत य्पेक्ष चान ल्ग्न अस्त्त. म्ला इक्दे स्ग्ले चिद्वय्ला ल्ग्लेत. अब ह्म बारात लेके आयेंगे म्ह्नून. .....चूचू
  • Log in or register to post comments

Submitted by चिरोटा on Fri, 03/04/2011 - 16:29

Permalink

पोरगी

पोरगी शेठजीची.पैसा शेठजीचा.काय का करेना.
  • Log in or register to post comments

Submitted by पियुशा on Fri, 03/04/2011 - 16:32

Permalink

छान ग वि बाकि जानकार यावर

छान ग वि ;) बाकि जानकार यावर टोर्च मारतिल...... ©º°¨¨°º© पियुशा©º°¨¨°º© आमचे राज्य Only Fairytales Have Happy Endings ...
  • Log in or register to post comments

Submitted by अरुण मनोहर on Sat, 03/05/2011 - 02:36

In reply to छान ग वि बाकि जानकार यावर by पियुशा

Permalink

शक्यता नाकारता येत नाही!- शक

शक्यता नाकारता येत नाही! - शक लिया
  • Log in or register to post comments

Submitted by स्पा on Fri, 03/04/2011 - 16:58

Permalink

माझं या विषयावरचं विस्तृत

माझं या विषयावरचं विस्तृत ५३२५ पानांचं, ३५ खंडांच आणि १७६० भागांचं पत्र मी होनोलुलू च्या सरकार ला पाठवलं होत माझ्या ब्लोग वर तुम्हाला ते वाचता येईल , (आहे हिमंत ? ;)) जो पर्यंत काश्मीर मधून आपण काढता पाय घेणार नाही तो पर्यंत हि समस्या अशीच चालू राहील असा मला वाटत -- अधीर गोरे
  • Log in or register to post comments

Submitted by नितिन थत्ते on Fri, 03/04/2011 - 18:10

Permalink

मोठे व्हा !!!!! भाषण झोडक

मोठे व्हा !!!!! भाषण झोडक
  • Log in or register to post comments

Submitted by रमताराम on Fri, 03/04/2011 - 20:01

In reply to मोठे व्हा !!!!! भाषण झोडक by नितिन थत्ते

Permalink

टाळ्या

'भाषण झोडक' या आयडीनामविडंबनाबद्दल जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. (रटाळ) रमताराम
  • Log in or register to post comments

Submitted by परिकथेतील राजकुमार on Fri, 03/04/2011 - 18:15

Permalink

आपली करामत पाहिली, अपेक्षित

आपली करामत पाहिली, अपेक्षित कृती. आता मात्र आमचे डोळे पाणावले. अर्थात कोणी कसे लिहावे हे सांगण्याचा हक्क मला नाही. मी आपले एक निरिक्षण नोंदवले. गडबडनाथ गोंधळे
  • Log in or register to post comments

Submitted by निखिल देशपांडे on Fri, 03/04/2011 - 18:25

Permalink

.

.
  • Log in or register to post comments

Submitted by नरेशकुमार on Fri, 03/04/2011 - 18:42

Permalink

काय एकेक शोधुन काढाल राव ,

काय एकेक शोधुन काढाल राव , धण्स. मी तर म्हनतो कि लग्न हे ईमानात केलं पायजे, हवेत, तेवढाच आनखिन पैशाचा चुराडा... आपलं.. वरुन खाली प्रवास. आनि त्या ईमानाला मात्र कोनताही इंजिन अपघात न होता, त्याचा डायवर येडा न होता ते ईमान झॅकपैकी जमिनिवर लॅण्ड होउद्या.... गवि तुमचि नाडी बघितली एकदा तपासुन घ्या आनी ग्रह तारे पन जागेवर आहे का नाही ते पन रात्री दुर्बिन लावुन निट पाहून घ्या. बाकी, शिस्त बद्ध पद्धतिने आकडेवारी मांडून, ग्राफ वगेरे काढुन तरि हा लेख पाडायचा व्हता. चावायला अजुन मज्जा आलि असती. पन मिस्र देशात जे काही घडलं ते पाहता हे घडुन येइल असे स्वप्नात सुद्धा वाटनार नाय. गवि लेख लिहिनार , सगळे पागल होनार. निश्चीत ! मिले तो कुत्ता कांट खाऊंगा ! नही मिले तो डॉली/रॅम्बो कांट खाऊंगा. © © ब्लॅकहोल मधील वॉर्डबॉय. © ©
  • Log in or register to post comments

Submitted by अभिजीत वाघ on Fri, 03/04/2011 - 18:57

Permalink

ब-याच वेळेला माणसाची आगतिकता

ब-याच वेळेला माणसाची आगतिकता त्याच्या सद्सद्विवेकबुध्दीवर मात करताना दिसते, अन माणूस लग्न,संसार,...अनावश्यक खर्च ह्यांच्या जाळ्यात अडकतो. ह्या आगतिकतेवर मात करायची कशी? हाच खरा मुद्दा आहे. लेख आवडला हे.वे.सा. न. :) अभिजीतज्ञ
  • Log in or register to post comments

Submitted by धमाल मुलगा on Fri, 03/04/2011 - 19:00

Permalink

आहे हे असं आहे, पटलं तर पहा,

आहे हे असं आहे, पटलं तर पहा, नाहीतर चपला घालू चालू पडा. जास्त गमज्या नाय पायजेल. - धम्या भयंकर.
  • Log in or register to post comments

Submitted by परिकथेतील राजकुमार on Fri, 03/04/2011 - 19:11

In reply to आहे हे असं आहे, पटलं तर पहा, by धमाल मुलगा

Permalink

आहे हे असं आहे, पटलं तर पहा,

आहे हे असं आहे, पटलं तर पहा, नाहीतर चपला घालू चालू पडा. जास्त गमज्या नाय पायजेल.
आपल्या सारख्या थोर विचारवंतांशी कुठलाही वाद घालण्याची माझी इच्छा या आधी देखिल कधी नव्हती आणि यापुढे देखिल कधी असणार नाही.....आपण माझ्या प्रतिसादावर प्रतिक्रिया दिलीत म्हणुन केवळ टंकतोय......तेंव्हा माझ्याकडुन मी याला इथेच पुर्णविराम देतो आहे....उगीच कुणाच्या भावना दुखवायला नकोत्.....कसे! "परामिका"
  • Log in or register to post comments

Submitted by धमाल मुलगा on Fri, 03/04/2011 - 19:14

In reply to आहे हे असं आहे, पटलं तर पहा, by परिकथेतील राजकुमार

Permalink

ओक्के.

विषय संपला. :) धन्यवाद -(थोर विचारवंत) धम्या.
  • Log in or register to post comments

Submitted by परिकथेतील राजकुमार on Fri, 03/04/2011 - 19:20

In reply to ओक्के. by धमाल मुलगा

Permalink

तुम्ही काय लिहीलय "विषय

तुम्ही काय लिहीलय "विषय संपला" वगैरे मला कळलं नाही. माझ्या प्रतिसादावर अशी ऑफेन्सिव्ह प्रतिक्रिया का हे तर अजिबातच कळलं नाहीये. ढुशि
  • Log in or register to post comments

Submitted by नितिन थत्ते on Fri, 03/04/2011 - 19:06

Permalink

संघाचे

याबाबत संघाचे नक्की काय मत आहे हे सांगा. भाजपचे मत संघासारखेच आहे का तेही सांगा. गुज्जुभाऊ
  • Log in or register to post comments
Profile picture for user आत्मशून्य

Submitted by आत्मशून्य on Fri, 03/04/2011 - 19:14

Permalink

गगनविहारी

आपलं म्हणन पटतय. कम्यूनीझम घ्या, जोजे वांचील तो ते लाभो प्राणीजात असे आशीर्वाद द्या, अथवा संपत्ती दान करा अशा प्रश्नाना कायस्वरूपी तोडगा हा नसतोच. ऊदा. एखाद्या अलकेमिस्टने लोखंडाचे सोने बनवायचे तंत्र जगजाहीर केले तर लोकांना त्याचा काय फायदा ? सर्वत्र सोने ऊदंड होइलच पण तसेच लोखंडाचा भाव २१,००० रू तोळे नाही का चढणार ? अवांतरः आणी अशाच काही कारणांनी ते तंत्र जगजाहीर केले नाही की पून्हा हे कधी होतच नसते, ही शास्त्र न्हवे तर भाँदूगीरी आहे, मेंदूची कवाडे बंद झालेल्यांच्या शब्दांने तयार केलेले हे तर फक्त ऊदाहरणांचे बूड्बूडे आहेत वगैरे वगैरे स्तूतीसूमने ऊधळणे तर लोकं आद्य कर्तव्यच समजतात....
  • Log in or register to post comments

Submitted by टारझन on Fri, 03/04/2011 - 19:35

Permalink

काय रे काय गोंधळ चालु आहे

काय रे काय गोंधळ चालु आहे ह्या टार्‍या चा ? जरा म्हणुन शांतता मिळु देत नाही हे कार्टं .. ऑनलाईन आलं की सगळा वेळ ह्याच्या तक्रारी निवारण्यातंच जातो. - भोवती
  • Log in or register to post comments

Submitted by रेवती on Fri, 03/04/2011 - 20:05

In reply to काय रे काय गोंधळ चालु आहे by टारझन

Permalink

अस्सं काय.... बघून घेईन

अस्सं काय.... बघून घेईन मेल्या...
  • Log in or register to post comments

Submitted by पैसा on Fri, 03/04/2011 - 20:56

In reply to अस्सं काय.... बघून घेईन by रेवती

Permalink

स्त्रिया या पाशवी असतातच.

स्त्रिया या पाशवी असतातच. तेव्हा तुम्ही असे लिहावे यात काय नवल? कृपया या विधानाला शास्त्रीय आधार द्यावा कंपुत्सु ------------------------------------- यस्य कस्य तरोर्मूलं येन केनापि मर्दितम् | यस्मै कस्मै प्रदातव्यं यद्वा तद्वा भविष्यति || - कोणत्यातरी झाडाची मुळे घ्यावीत, ती कशाने तरी ठेचावित, कुणालाही द्यावित, काहीतरी नक्की होईल.
  • Log in or register to post comments
Profile picture for user सुहास..

Submitted by सुहास.. on Fri, 03/04/2011 - 20:59

In reply to स्त्रिया या पाशवी असतातच. by पैसा

Permalink

पाशवी

पाशवी ला पाशवी ला अश्या प्रकारचा प्रतिसाद द्यावा हे पाहुन अति-आश्चर्य वाटले. प्रहार खेळीन पत्ते ;)
  • Log in or register to post comments

Submitted by नगरीनिरंजन on Fri, 03/04/2011 - 21:06

In reply to पाशवी by सुहास..

Permalink

खी खी खी. =))

खी खी खी. =)) =)) हिंसा-अहिंसेचा बादरायण संबंध लावुन उदाहरणं देउन फोलपणाला "उच्च"सिद्ध करण्याचा प्रयत्न काही नविन नाही. -Pile
  • Log in or register to post comments

Submitted by धमाल मुलगा on Fri, 03/04/2011 - 21:10

In reply to खी खी खी. =)) by नगरीनिरंजन

Permalink

सहमत आहे.

अर्थात ह्यात नविन काहीच नाही. कारणमिमांसा देण्याची वेळ आली की तोंड लपवून फिरणंदेखील जुनंच. बाकी चालु द्या. - धमालूकर्ण. ------------------------------------------------------------------------- माझा हा प्रतिसाद अश्लिल तर वाटत नाही ना?
  • Log in or register to post comments

Submitted by प्रीत-मोहर on Fri, 03/04/2011 - 22:49

In reply to सहमत आहे. by धमाल मुलगा

Permalink

//स'॑/द्व्ल्द्[प्व्र -कमाल

//स'॑/द्व्ल्द्[प्व्र -कमाल करुया
  • Log in or register to post comments

Submitted by नगरीनिरंजन on Fri, 03/04/2011 - 21:25

In reply to स्त्रिया या पाशवी असतातच. by पैसा

Permalink

मी मनातून मांसाहारी झाले आहे

मी मनातून मांसाहारी झाले आहे अशी शंका घ्यायला वाव आहे. जेवती
  • Log in or register to post comments

Submitted by रेवती on Fri, 03/04/2011 - 21:37

In reply to मी मनातून मांसाहारी झाले आहे by नगरीनिरंजन

Permalink

खी खी खी.

खी खी खी.
  • Log in or register to post comments

Submitted by इंटरनेटस्नेही on Sat, 03/05/2011 - 00:27

In reply to मी मनातून मांसाहारी झाले आहे by नगरीनिरंजन

Permalink

प्रत्येक जण मणातुन नॉनव्हेजच

प्रत्येक जण मणातुन नॉनव्हेजच असतो असे आमचे मित्र काजु केळकर म्हणतात! - दीडडझन.
  • Log in or register to post comments

Submitted by रेवती on Fri, 03/04/2011 - 21:44

In reply to स्त्रिया या पाशवी असतातच. by पैसा

Permalink

"व्हॉट द हेल इज गोइंग ऑन?"

"व्हॉट द हेल इज गोइंग ऑन?" अर्थात हा प्रश्न मी विचारलेला नसून थोर पाशवीशक्ती कैसाताईंनी कंपुत्सुंच्या न्यायव्यवस्थेला केलेला सवाल आहे.;) झकास.
  • Log in or register to post comments

Submitted by प्रीत-मोहर on Fri, 03/04/2011 - 22:49

In reply to "व्हॉट द हेल इज गोइंग ऑन?" by रेवती

Permalink

शक्यता नाकारता येत नाही -

शक्यता नाकारता येत नाही - ताना
  • Log in or register to post comments

Submitted by रेवती on Fri, 03/04/2011 - 20:16

Permalink

अवो गविभौ, कोनी कसं का लगीन

अवो गविभौ, कोनी कसं का लगीन करना, आपन आपल्या परस्थितीपर्मानं र्‍हावं....कसं? त्यास्नी पैका खरच कराया कारन पन हुवं. काम्हून त्ये तरी दान अन् धरम करत्याल? शिरिमंत म्हनलं कि त्यांचा पैका समद्यास्नी दिसतुया, त्यांच्या काळज्या न्हायी दिसत? आता आपल्याकडं लगीन म्हटलं की दाराला आंब्याची पानं आन् झेंडूची चार फुलं लावली की काम हुतय पन यांच्याकडं आर्कीड कि कायसं नाव त्येचं......तीच फुलं लागत्यात म्हनं......जावूद्या, असत्यात येकेकाचे इचार तशे. दोनच लुगडी इकत घेवून त्यानी तरी लगीन का म्हून करावं? आवो माज्या भावाचे रेशमी लुगड्याचे माग हायेत्......त्याचा धंदा तरी कवा चालावा मी म्हनत्ये!;) सुपर्णा लक्षय.
  • Log in or register to post comments

Submitted by स्पंदना on Sun, 03/06/2011 - 15:54

In reply to अवो गविभौ, कोनी कसं का लगीन by रेवती

Permalink

खॉ! खॉ ! खॉ! खर आहे ग. वी.

खॉ! खॉ ! खॉ! खर आहे ग. वी. तुमच म्हणन. आजकाल गरिबांसाठी दान कराव अस लोक म्हणतात म्हणुन श्रीमंतांनी थोडेफार खर्च कमी केल्याने , बर्‍याच लोकांच्या व्यवसायावर परिणाम झालेला आहे. ~आता परवाचीच गोष्ट घ्या. आमच्या येथील एका प्रतिष्ठीतांच्या येथे एक 'तुला' समारंभ होता. आता अश्या वेळी त्या लोकांनी येउन आमच्या मामांकडुन बरेच काही विकत नेउन आमचा व्यवसाय वाढवीला असता. आता आम्ही कायमच आमचा माल ज्या लोकांकडुन विकत घेतो , त्यांचा सुद्धा खप झाला असता. त्या लोकांकडे काम करणारे गरिब मजुर त्यांच्या ही मजुरीला आणखी वाव मिळाला असता. पण नाही यांनी अश्याच समजा पायी,~ जावुन सरळ झोपडपट्टीमध्ये जेवण दिले. त्यामुळे कधी नाही ते पोट भरुन झोपडपट्टीतील लोक दुसर्‍या दिवशी कामाला नाही आले. नेमके दुसर्‍या दिवशी आणखी एका कार्यक्रमाचे नियोजन आमच्या मामांकडे होते, तेथे हाताखाली काम करणारे लोक या झोपडपट्टीतील असल्याने ती आले नाहित व आमचा फार खोळम्बा झाला. माझे मामा पेढीवर येउन रागारागाने आमचा घरोबा असलेल्या कम्युनिस्ट ग्रंथालयातील पुस्तके वाचत राहिले अन तो कार्यक्रम शेवटी मला व आमच्या दिवाणजींना पार पाडावा लागला! आता यामध्ये किती जणांचे नुकसान झाले ते पहा. मुख्य म्हणजे आयते खायला मिळाल्याने मजुर लोकांची श्रम करण्याची भावना कमी झाली. त्यामुळे आजची मजुरी रहित होउन उद्या काय खायचे हा ~ प्रश्न त्यांच्या अन त्यांच्या कुटुंबा पुढे उभा राहिला ~ कार्यक्रम करणार्‍यांचा हिरमोड झाला. 'तुला' आणायलाच कोणी नसल्याने त्या गृहस्थाने बसायचे कश्यात अन मापायचे कशात हा प्रश्न उभा राहील्याने तुला केली गेली नाही. अन तुला करुन जे शेवटी गोरगरीबात वाटले जायचे होते ~परिणामी ते ही वाटले गेले नाही. ~परिणामी एव्हढी वर्षे केलेले पाप पुण्यात बदलुन घ्यायची त्यांची ईच्छा ही अपुरी राहुन ते काम करणारा 'चित्रगुप्त' ही एका कामास मुकला. त्या मुळे तु झोपा काढतोस असा शेरा त्याला त्याच्या वरिष्ठांकडुन ऐकुन घ्यावा लागला. फिन्द्राज सवार (झाल का भरपुर (पुरेस) लिखाण? नाही त्याची ष्टाईल मारायला गेल्यावर काय व्हायच म्हणा? दमले आता . आता एक आठवडाभर एकही प्रतिसाद माझ्या कडुन लिहिला जाणार नाही)
  • Log in or register to post comments

Submitted by इन्द्र्राज पवार on Sun, 03/06/2011 - 16:52

In reply to खॉ! खॉ ! खॉ! खर आहे ग. वी. by स्पंदना

Permalink

दमली बिचारी....!!

ऑफुली वंडरगर्ल धिस अपर्णा इज....रीअली...!! फिन्द्राज सवाराचा मामा बारामतीच्या पवारांचा पक्का फॉलोअर असल्याने ते कम्युनिस्टाचा लायब्ररीत जावून वाचत बसण्याची सुतराम शक्यता नाही....पण ते चित्र नजरेसमोर आल्यामुळे अंमळ बरे वाटले, कारण फिन्द्राजचा वावर तिथे जरा ज्यादाच असतो. वेल...आणि तू दमण्यासारखे पर्वतपाय लिखाण काय तुझ्याकडून झालेले नाही....त्यामुळे आठवडाभर प्रतिसाद देणार नाही असा काही ब्याड डिसिजन घेऊ नको.....अगदीच दमली असशील तर "तिळी' भाजून खा....सकाळपर्यंत टुमटुमीत !! इन्द्रा
  • Log in or register to post comments

Submitted by स्पंदना on Sun, 03/06/2011 - 20:59

In reply to दमली बिचारी....!! by इन्द्र्राज पवार

Permalink

माहेरच माणुस असल्यान थोडी

माहेरच माणुस असल्यान थोडी हक्कान मजा केली. पण उगा आव आणन फार अवघड आहे बाबा! कस एव्हढ लिहितोस देव जाणे. बाकि ते 'फिन्द्राज' च 'पेनावर सवार ' कराव की काय अस वाटायला लागलय. फिन्द्राज काय जमल नाही.
  • Log in or register to post comments

Submitted by नगरीनिरंजन on Fri, 03/04/2011 - 20:41

Permalink

आधी शोषण आणि फसवणूक करून नंतर

आधी शोषण आणि फसवणूक करून नंतर त्यातला काही भाग खर्च केला म्हणजे चांगले झाले असे काही तरी आपल्याला म्हणायचे आहे असे वाटले. सार्वजनिक धनसंपत्तीची राजरोस बेसुमार लूट चालू आहे आणि हे भव्य समारंभ हे त्याचं दृश्य स्वरूप. मुळात हा प्रश्न फक्त अनावश्यक खर्चाबद्दल आहे असे वाटत नाही तर हा खर्च करणार्‍यांची तेवढी ऐपत कशी झाली त्याबद्दल आहे आणि मुळात हा पैसा जनतेच्या विकासासाठीचा आणि जनतेच्या कमाईतूनच आलेला आहे. अशा समारंभांनी अर्थव्यवस्थेला चालना मिळते, लोकांना काम मिळते असे म्हणणे म्हणजे चोराने आमचे पैसे चोरले पण त्याने केलेल्या खर्चावर आमचे घर चालते असे म्हटल्यासारखे होणार नाही काय? शिवाय अशा खर्चातून किती लोकांचे घर चालते यावर काही संख्याशास्त्रीय विदा आहे काय? ही काळी खर्चव्यवस्था फार माजलीय साली. - माजेश फासचढवी
  • Log in or register to post comments
Profile picture for user सुहास..

Submitted by सुहास.. on Fri, 03/04/2011 - 20:50

Permalink

अ )

१ ) व्वोके ! किडीश टोणग्या अंगात 'बनियन' असणं चांगलं.....पण तिच-तिच सारखी घालणं वाईट! २ ) व्वा काय पण धागा आहे ? कोण पर्वा करतो ..चला चंची काढा रं ! --बेसुर --------------------------------- तो धागा मंद माणसाचा, डोकेश फिरवुन गेला!
  • Log in or register to post comments

Submitted by स्वैर परी on Mon, 03/07/2011 - 15:59

In reply to अ ) by सुहास..

Permalink

टाळ्या !!!

आवडलेला प्रतिसाद!
  • Log in or register to post comments

Submitted by धमाल मुलगा on Fri, 03/04/2011 - 21:06

Permalink

अरे काय रे बाबांनो,

काय गडबड आहे? मला जरा सुखानं जगू द्याल की नाही? :) -धम्या.
  • Log in or register to post comments

Submitted by चतुरंग on Fri, 03/04/2011 - 21:19

Permalink

प्रतिसाद

रोचक विषय. समाजात कोणी किती पैसा कमवावा आणि कसा खर्च करावा हा ज्याचात्याचा वैयक्तिक प्रश्न असला तरी गोष्टी जेव्हा सर्रास डोळ्यांवर येऊ पहातात त्यावेळी समाजमनाला अंधारी आल्याखेरीज राहत नाही. देजा वू! काय गमतीशीर योगायोग आहे पाहा गेल्याच वीकांताला गर्जेश बोळंकी ह्या आशयसंपृक्त लिहिणार्‍या नवकवीची अशाच आशयाची एक कविता वाचनात आली त्यातल्या काही ओळी इथे दिल्याखेरीज गत्यंतर नाही हमरस्त्यावरुन जाताना करपट वास आला म्हणून बाजूच्या बोळात पाहिलं तर दोन भिकारी बसले होते चिवडत शिळ्या अन्नाचे ढीग आधाशी डोळ्यांनी पुढच्याच चौकात लागली होती दहा हजाराची लड कुठल्याशा थुलथुलीत शेठच्या मुलीच्या लग्नाची तुपकट, ओघळलेली शरीरं सावरत, हातात बुफेच्या प्लेटा घेऊन जाणारी ती हावरी रांग बघितली आणि समजलं की देश प्रगतीपथावर आहे! आठ ओळीत केवढं समग्र आणि समर्थ चित्र उभं केलंय! वा! -चुक्तसुनीत
  • Log in or register to post comments

Submitted by विजुभाऊ on Sat, 03/05/2011 - 00:27

In reply to प्रतिसाद by चतुरंग

Permalink

या कवितेवरून आठवली

या कवितेवरून आठवली नवद्दीउत्तरीतल्या महान कवी कर्जेश दहांकी ची एक कविता शेंबडाच्या पहिल्या थेंबा पासून तीचे मूल ओरडत होते रडत रडत अंगावर पिणारे पहीले बाजूला केल्यावर दुसरे लुचू लागले म्हणून कावरीबावरी ती.... शेठला आता काय सांगायचे की काम कमी का झाले म्हणुन... रोजंदारी कमी रोजचीच झालीय. भिंतीवरच्या किंगफिशरच्या कॅलेंडरच्या चित्राशी बरोबरी साधणार्‍या फटक्या पातळात शेठची नजर चुकवीत उभी ओशाळवाणी ती.... किती समर्थ चित्र उभे करतो कर्जेश... .....जाउन झोप राव
  • Log in or register to post comments

Submitted by धमाल मुलगा on Fri, 03/04/2011 - 21:28

Permalink

झकास हां.. वाचून खूप बरें

झकास हां.. वाचून खूप बरें दिसलें. -वेगवेडा. ***************************************************************************************** @~^~ स्तोत्रांत इंद्रिये अवघी गुणगुणती दु:ख कुणाचे, हे सरता संपत नाही चांदणे तुझ्या स्मरणाचे ~^~@
  • Log in or register to post comments

Submitted by आनंदयात्री on Fri, 03/04/2011 - 21:43

Permalink

तुन्ना तुन्ना

तुन्ना तुन्ना तक तक तुन्ना - aadsule_1172
  • Log in or register to post comments

Submitted by विश्वनाथ मेहेंदळे on Sat, 03/05/2011 - 00:04

Permalink

फोडा तोडा मारा कापा हाणा

एकाने पैसा उधळला तर दुसऱ्याच्या बापाचे काय जाते? हरकत घेणाऱ्यांचा अपमान केला पाहिजे. घालून पाडून बोलले पाहिजे. डोक्यात दगड घालायची इच्छा होते अशा माणसांच्या. आणि लग्न झाल्यावर त्या मुलीचे सासू सासऱ्यांबरोबर पटणार नाहीच. त्यांना घराबाहेर काढणे शक्य नसते, त्यामुळे तिने नवऱ्याबरोबर तडक घराबाहेर पडावे. विश्वा ढ
  • Log in or register to post comments

Submitted by शिल्पा ब on Sat, 03/05/2011 - 00:45

In reply to फोडा तोडा मारा कापा हाणा by विश्वनाथ मेहेंदळे

Permalink

एकवेळ भिकार्याला रुपया देणार

एकवेळ भिकार्याला रुपया देणार नाही का गाडी पुसू देणार नाही पण १० हजाराची माळ जरूर लावेन...हरकत घेणार्यांना काय बुद्धी असते का? स्वतःजवळ नाही कवडी पण जीभ कशी चुरूचुरू चालते !! कामं करा.. तुम्हाला बहिण आहे का? असल्यास तिला त्रास झाल्यावरसुद्धा तुम्ही तिला सहनच करत एकत्रच राहायला सांगणार का? तिचे काही बरेवाईट झाले तर जबाबदारी घेणार का? कदाचित घ्याल पण तुमच्या बायकोची त्याला हरकत नसेलच कशावरून? जगन्नाथ चुगंदळे
  • Log in or register to post comments

Submitted by नीलकांत on Sat, 03/05/2011 - 00:18

Permalink

अनावश्यक प्रतिक्रिया

नमस्कार, या धाग्यावर टारझनने अनावश्यक प्रतिक्रिया देत. मिसळपावच्या व्यवस्थापकीय धाग्याची चेष्टा केली आहे. सदर बाबीची मिपा व्यवस्थापन अत्यंत गंभीर दखल घेत आहे. आणि ती प्रतिक्रिया व त्यासोबतच अन्य उपप्रतिसाद उडवण्यात येत आहेत. याच सोबत टारझन यांना सक्त ताकीद देण्यात येत आहे की त्यांनी व्यवस्थापकीय लेखांची व सूचनांची अशी टर उडवल्यास यापुढे त्यांचे खाते कुठलीही पुर्वसूचना न देता निलंबीत करण्यात येईल. चेष्टा मस्करी एका मर्यादेपुढे जाऊ नये हेच उत्तम होईल. - नीलकांत
  • Log in or register to post comments

Submitted by टारझन on Sat, 03/05/2011 - 02:41

In reply to अनावश्यक प्रतिक्रिया by नीलकांत

Permalink

आनंद वाटला.. :)

त्यांनी व्यवस्थापकीय लेखांची व सूचनांची अशी टर उडवल्यास यापुढे त्यांचे खाते कुठलीही पुर्वसूचना न देता निलंबीत करण्यात येईल.
टर उडवण्याचा कोणता ही हेतु नव्हता . पण बहुतेक व्यवस्थापणाच्या भावना दुखावल्या(दुखावन्याचा कोणताही हेतु नव्हता तरी ) असतील तर माफी मागतो. जाता जाता, मागे माझा लेख उडाल्याबद्दल जाब विचारला होता ,त्याचं समाधान अजुन झालेलं नाही ( वारंवार विचारणा करुन ) बाकी "आमच्या कडुन" नेहमीच सहकार्य होते / राहिल. धन्यवाद -( ब्र म्हणता ... ) टारझन
  • Log in or register to post comments

Submitted by नीलकांत on Sat, 03/05/2011 - 08:40

In reply to आनंद वाटला.. :) by टारझन

Permalink

जाब?

जाता जाता, मागे माझा लेख उडाल्याबद्दल जाब विचारला होता ,त्याचं समाधान अजुन झालेलं नाही ( वारंवार विचारणा करुन )
आपला लेख उडल्यास त्याला काही कारणे असतात. त्याची माहिती धोरणात मिळू शकते. अन्यथा सदस्यं संपादन मंडळ किंवा निलकांतकडे चौकशी करू शकतात. ही चौकशी म्हणजे जाब विचारणे असते अश्या भ्रमात कुणीही राहू नये ही विनंती. तसेच केलेल्या चौकशीला बर्‍यापैकी उत्तर देण्याचा प्रयत्न झाला आहे. कुणाचेही समाधान होई पर्यंत प्रयत्न करत राहणे शक्य नाही.
बाकी "आमच्या कडुन" नेहमीच सहकार्य होते / राहिल.
हे अपेक्षीत आ॑हेच. - नीलकांत
  • Log in or register to post comments

Submitted by टारझन on Sat, 03/05/2011 - 11:26

In reply to जाब? by नीलकांत

Permalink

आपला लेख उडल्यास त्याला काही

आपला लेख उडल्यास त्याला काही कारणे असतात. त्याची माहिती धोरणात मिळू शकते. अन्यथा सदस्यं संपादन मंडळ किंवा निलकांतकडे चौकशी करू शकतात
साहेब , आता बोललाच आहात तर इथेच नम्रपणे विचारतो. माझी " प्रार्थना किटक" ही पाककृती उडाली, त्याची कारणे आपण सांगितलेल्या खुलाश्या नुसार दोन होती. १. ती पाककृती ह्या विभागात टाकली होती. २. त्यातील फोटो ज्यांचे आहेत त्यांनी आक्षेप घेतला होता. ह्यावर उत्तरा दाखल मी लिहीले होते , की पाककृती चे विडंबण पाककॄती मधे येणार नाही काय ? आणि जरी समजा चुकुन ते पाकृ मधे पडले , तर केवळ सेक्शन चुकला म्हणुन धागा उडवला जाऊ शकतो काय ? फोटो वर ज्यांचा आक्षेप होता , त्यांचे फोटो काढुन टाकणे सहज शक्य नव्हते काय ? ह्या मुळे १००+ प्रतिसाद देणार्‍या लोकांच्या प्रतिक्रीया देखील उडाल्या होत्या . वरिल मजकुर मी आपणास मला डिफेंड करण्या साठी विचारला होता. धोरणे आहेत मान्य आहेत , त्याचे पालन करणे हे ही मान्य. पण एखाद्याने जेन्युअनली एखादा लेख लिहावा , आणि तो असा उडवला जावा , ज्याचा धोरणांशी संबंध आहे असे वाटत नाही , हे कितपत योग्य आहे ? हे मला जाहिर लिहीण्याची मुळीच इच्छा नव्हती , परंतु जेंव्हा सहकार्य करतो तेंव्हा थोडे सहकार्य तुमच्याकडुनही अपेक्षित असावे असे वाटते . ह्या मध्ये मिपा प्रशासनाला दोष देण्याचा कुठलाही हेतु नाहीये हे आधीच स्पष्ट करतो ( नाही तर ब्र म्हणता पुन्हा .. .)
ही चौकशी म्हणजे जाब विचारणे असते अश्या भ्रमात कुणीही राहू नये ही विनंती.
"जाब विचारणे " हा शब्दप्रयोग अ‍ॅग्रेसिव्ह वाटला असल्यास क्षमस्व. बाकी भ्रम वगैरे नाही.
सेच केलेल्या चौकशीला बर्‍यापैकी उत्तर देण्याचा प्रयत्न झाला आहे. कुणाचेही समाधान होई पर्यंत प्रयत्न करत राहणे शक्य नाही.
हा बर्‍यापैकी प्रयत्न नसुन एक हस्यास्पद प्रकार आहे. एखाद्याची टिंगल उडवल्याचा किंवा खिजवल्याचा हा प्रकार वाटला. इतर सभासदांनी आणि संपादकांनी जरुर ह्यावर मते कळवावीत . पुनरागमना नंतर संपादकिय कामात ढवळाढवळ केल्याचे / संपादकांविरुद्ध गरळ ओकल्याचे किंवा मिपा प्रशासनाची प्रतिसादांतुन / व्यनितुन / खरडींतुन खिल्ली उडवल्याचे दाखवुन द्यावे , मी स्वतः लॉगिन करणे बंद करीन . सहकार्य दोन्ही बाजुंनी अपेक्षित. वरिल प्रतिसादात जर कुठे शब्द कमी जास्त झाला असल्यास पुन्हा एकदा क्षमस्व. - (भिकारी) टारझन
  • Log in or register to post comments

Pagination

  • पान 1
  • पान 2
  • Next page Next ›
  • Last page Last »

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com