जर्मन आख्यान भाग भाग ९
http://www.misalpav.com/node/15714 भाग १
http://www.misalpav.com/node/15729 भाग २
http://www.misalpav.com/node/15766 भाग ३
http://www.misalpav.com/node/15893 भाग ४
http://www.misalpav.com/node/15996 भाग ५
http://www.misalpav.com/node/16085 भाग ६
http://www.misalpav.com/node/16534 भाग ७
http://www.misalpav.com/node/16661 भाग ८
right;">जर्मनीत येऊन कलोन मध्ये आता ३ एक महीने झाले असतील .तोच ह्या अप्रतिम शहराचा विरह आम्हा दांपत्यांना झाला.
कारण फ्रांक फ्रुर्त मध्ये आम्हाला मिळालेली जॉब ऑफर तीही मंदीच्या काळात (''खरच मी किती शुभ शकुनी नि चांगल्या पायाचा आहे'' अशी स्वताची समजूत करून घेतली.)
.नि आपला बाड. बिस्तरा घेऊन स्वत एक मोठा ट्रक दिवस भर भाड्याने म्हणजे ( तीनशे युरो भाडे व दोनशे युरो ) जमानत भरून आणला. त्यात सर्व घरातील सामान मी केट व सासूबाई व सासरे ह्यांनी त्यात चढवले .नी मुक्कामी साडे तीन तासाचा प्रवास करून परत नव्या शहरात नव्या जागेत ते उतरवून ठेवले . पुढे त्यांची बांधणी करण्यात दोन दिवस गेले .
.''खरच भारतात अत्यंत कमी पैशात मजूर चुटकी सरशी ही काम करतातत.''
''येथे तुम्ही स्वत मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही'' . हेच खरे . त्यात सर्व फर्निचर म्हणजे पलंग/ टेबल हे एकीया ह्या जगप्रसिद्ध स्वीडिश कंपनीचे असल्याने ते तुकड्या तुकड्यात सुटते करत येते .
जर्मनीत प्रत्येक घरात किमान एकतरी एकीयाची वस्तू नक्कीच वापरत असते .त्यांचे दुकानच ३ मजली मोठे व शिवाजी पार्क एवढे अवाढव्य असते .
दुबईत फेस्टिवल सिटी मध्ये आशियातील सर्वात मोठे एकीया असून त्याची साखळी आता भारतात येत आहे असे वाचून होतो .
मुळात जेव्हा आमचे कुटुंब जर्मनीत प्रथम आले तेव्हा मी मुंबईत जर्मन भाषेची मुळाक्षर गिरवत होतो. .(तिथे स्थलांतरित होण्यापूर्वी किंवा दीर्ध काळ वास्तव्य करायचे असल्यास तेथील भाषा प्राथमिक स्वरुपात आली पाहिजे.
.(मुंबईत किंवा पुण्यात गुटे (मेक्स म्युलर भवन ) ही जर्मन भाषा शिकण्याचे राजमान्य ठिकाण .
मग पुढे आ २ /मग बे १ /अश्या काही लेवल पार झाल्यावर भारतीय विद्यार्थी हे जर्मनीतील युनिवार्सितील शिष्यवृत्ती मिळवू शकतात ( मला ही ह्यांचा पासपोर्ट मिळण्यासाठी ह्या लेवल पार करणे आवश्यक आहे )
.माझ्या वर्गात अभियांत्रिकी /वैद्यकीय / हॉटेल व्यवस्थापनाचे काही विद्यार्थी सुध्धा भाषा शिकत होती
.त्यातील काही विद्यार्थी दोन ते तीन महिन्यात जर्मनीत दाखल झाले .
त्यांना येथे सहजरीत्या आलेले पाहून सहा एक वर्षापूर्वी युके पेक्षा जर्मनीत का नाही आलो ? असा मला प्रश्न पडला .
निदान विसा व इतर गोष्टींची जीव धेणी स्पर्धा टाळली असती .असे वाटून गेले ..(सध्या जर्मन सरकार अमेरिका/ युके ह्या प्रगत देशांचा कित्ता गिरवत म्हणजे उच्च शिक्षित मजूर आपल्या देशात येण्यासाठी शिक्षण व नोकरी करता व स्थायिक होण्याकरिता विविध योजनेद्वारे विशेष प्रयत्न करत आहे.. विसाचे नियम शिथिल केलेले आहेत . इच्छुक व्यक्तींनी ह्याची विशेष नोंद ध्यावी ,)
फ्रांक फ्रुट युरोपची व्यापारिक राजधानी. सर्वात जास्त परकीय लोक ह्या शहरात राहतात .तर अनेक लोक व्यापारानिम्मित ये जा करतात. .त्यामुळे इंग्लिश बोलणे नित्याचे असल्याने माझ्या बाळबोध जर्मन भाषेला ह्या स्थानिकांनी आपलेसे केले. नि मी येथे आता बर्यापैकी रुळलो
.
अर्थात हे जर्मनीतील प्रमुख व्यापारीकेंद्र आहे . महत्वाचे म्हणजे अनेक निर्वासित रेफ्युजी ज्यांना संयुक्त राष्ट्रांच्या कृपेमुळे ह्या देशात आसरा मिळाला.म्हणजे निर्वासितांचा खास पासपोर्ट मिळतो. (ह्यामुळे सर्व जगात कुठेही अगदी अमेरीकेत सुध्धा ही मंडळी जाऊन आरामात स्थाईक होऊ शकतात अपवाद .स्वताचा देश सोडून जगाच्या पाठीवर कोठेही .
. ह्यामुळे अफगाण व ट्रायबल पाकिस्तान म्हणजे बलुच व वझिरीस्तान /इराण //इराक/.सोमालिया /श्रीलंकन तमिळ घाना /नायजेरिया / सुदान /लिबिया /मोरेको /येमेन व अश्या अनेक धोकादायक देशातील मंडळी जीवाच्या भीतीने येथे येऊन स्थायिक झाले आहेत ..त्याच्या प्रत्येकाच्या कथा नि व्यथा ह्या अंगावर काटा आणणाऱ्या आहेत. .पण त्याबद्दल नंतर कधी तरी ..
.तर अश्या शहरात आमचा मुक्काम पडला . .४ तासावर म्युनिक ला तिची धाकटी बहिण तर ३ तासावर माझी सासुरवाडी .त्यामुळे बाईसाहेब खुश होत्या .पण जर्मनीचा इतर शहरांच्या तुलनेत हे शहर इतिहास .कला /शिल्पे /जुन्या इमारती ह्या सर्व बाबतीत जरासे कुमकुवत असून व्यापारापुरते पक्के धंदेवाईक आहे . आहे ..पंजाबी/गुजराती नि पाकिस्तानी लोक जमेल तसे येथे काही दशकांपूर्वी स्थायिक झालेले आहेत .तर दक्षिणात्य संगणक तज्ञ काही वर्षांपूर्वी आलेले आहेत .मी मात्र मराठी माणसे नि मराठमोळ्या वातावरण परका झालो. होतो . (लंडन व आबू धाबीचे दिवस म्हणजे काय बहार होती. आम्हा मराठमोळ्या परप्रांतीयांनी तेथे काय आपलेच संस्थान उभारली आहे. .आता तर लंडन मधील हौन्स्लो मध्ये नवे मराठी मंडळ झाले असून माझे अनेक मित्र कार्यरत आहेत .
.भारतातील कोणतीही वस्तू अगदी टिपिकल भारतीय मानसिकता असलेले /प्रांतवाद जपणारे अनिवासी भारतीय तेथे मुबलक प्रमाणात मिळतात येथे मी पार उपरा होतो .( '' एक अकेला इस शहर मे'') .
जर्मनीत कुठल्याही शहरात आल्यावर सर्वप्रथम सरकारी कार्यालयात तुम्हाला रजिस्टर व्हावे लागते .अर्थात लाल फितीचा फटका येथे आम्हाला बसला .त्यामुळे अनेकदा चकरा मारून शेवटी एकदाचे आम्ही रजिस्टर झालो. .मी वैतागुन म्हणालो पण. .''साला आमच्या कडे निदान दोन गांधी सरकवले कि किती तरी सरकारी कामे कशी चुटकीसरशी होतात'' .येथे तोही प्रकार नाही .बाकी अगदी आरामात /सावकाश म्हणजे आपल्या पद्धतीचे वातावरण येथील सरकारी कार्यालयात असते. पण सब्र का फल मिठा म्हणून ह्या नवीन शहरात आमचे स्वागत म्हणून भली मोठी वौचर देण्यात आली .त्यात सवलतीच्या दरात संग्रालय /उपहारगृहे /डिस्को /नि खरेदीच्या दुकानानात आम्ही भाबड्या जीवांनी जर्मनीतील रिसेशन हि राष्ट्रीय आपत्ती समजून आपल्या परीने अर्थव्यवस्थेला उर्जित अवस्था आणणे असा संदेश कम आदेश होता .हा . भांद्वालादारांचा एक सापळा आहे असा पक्का कोम्रेद्वादी विचार मनात आला
.फ्रांक फ्रुट मध्ये सर्वप्रथम आम्ही नेचालर हिस्ट्री म्युझियम मध्ये जायचे ठरवले .तोंडातून शब्द ऐवजी वाफ बाहेर पडण्या इतका हवेत गारठा होता .पण थंडी सुरु झाली असे म्हणण्याचे धाडस मला नव्हते.
उणे १० ते २० सेल्सिअस तापमान हिमावार्षावत गारठलेला निसर्ग व त्यासंबंधित प्रत्येक व्यक्ती हे थंडीचे खरे रूप .अर्थात आमच्या कारगिल /द्रास मध्ये तर उणे ३२ सेल्सिअस तापमान असते असे सांगून मी स्वताची लाल करून घेतली .
व आमच्या शूर जवानांमुळे अजून हा प्रदेश आम्ही आमचा म्हणू शकतो हे सांगण्यात मी चुकलो नाही. .( सर्व प्रकारे सज्ज नाटो फौजा व अमेरिकन व युकेच्या फौजा ज्यांमध्ये पाशात्या युरोपियन राष्ट्रांचे जांबाज सैनिक असून अजून अफगाण मोहीम का फत्ते झाली नाही?
अशी चर्चा नुकतीच माझ्या सासर्यांच्या मित्रांसमवेत झाली असल्याने माझ्या वक्तव्याला सूचक महत्व आपसूकच प्राप्त झाले. .
नाश्ता करून काळी कॉफीची कडवट चव जिभेवर रेंगाळत आम्ही प्रथम उ बान घेतली .मग एस बान घेऊन मग स्ट्रास बान घेऊन आम्ही म्युझियमच्या समोर येऊन ठाकलो..
बान पुराण
बान म्हणजे रेल्वे.
जर्मनीत कोणत्याही शहरात सार्वजनिक वाहतुकीचे चार पर्याय असतात.
पहिला
उ बान : U फॉर (अंडर ग्राउंड ) जर्मनीत U चा उच्चार उ असा करतात . थोडक्या भूमिगत रेल्वे दिल्ली मेट्रो
एस बान : लोकल सदृश रेल्वे लांबच्या प्रवासाला म्हणजे सी एसटी ते कर्जत / विरार एवढ्या लांबचे भले मोठे अंतर जायला सर्वोत्तम पर्याय
स्त्रास बान : कधीकाळी मुंबईचा प्राण असलेली ट्राम म्हणजे येथे स्त्रास बान (रस्त्यावरून जाते म्हणून स्त्रास )
आणि बस : हि मुंबई पुण्यासारखी गल्लीबोळातून शहर दर्शन घडवत आणते (गावाला वळसा घालून इच्छित स्थळी जायचे असल्यास हा पर्याय चांगला आहे .)पण कधी कधी हिचे थांबे मोक्याच्या जागेवर असतात .
मुंबईत जशी हार्बर/ वेस्टर्न/ व सेन्ट्रल अश्या ३ लायनी आहेत .तश्या येथे एस बान च्या S १/२/३/३/४ अश्या लायनी असतात . .
व शहराच्या मध्यभागी कोळ्याच्या जाळ्या सारखे भूमिगत रेल्वेचे चौतर्फा जाळे विणले असते .
. व स्ट्रास बान मुख्यत्वे जमिनीवरून लघु पल्याची ठिकाणे गाठण्यासाठी असतो ..
बस हि इतर शहरांप्रमाणे शहराच्या गल्ली बोलातून जाते .. पण बस आणि स्ट्रास बान चे थांबे कितीतरी वेळा उ आणि एस बान च्या जवळ असतात ..मध्यवर्ती स्टेशन अर्थात आपल्या सी एस ती सारखे भव्य फ्रांक फ्रुट आम म्हणून प्रसिद्ध आहे
दळणवळणाच्या एवढ्या सोयी असल्या तरी येथे अनेक सायकलस्वार रस्तावर दिसतात .
फिटनेस ची हौस व जुनी संस्कुती व सगळ्यात महत्वाचे म्हणजे प्रदूषणविरहित स्वस्त नी मस्त पर्याय
Book traversal links for जर्मन आख्यान भाग भाग ९
वर्गीकरण
प्रतिक्रिया
अरे, निनाद,फोटो राहिले की रे,
....
+१
+२
+३
... .- .... .- -- .- -
Points to Ponder ...
- ..- -- .... .. / .-.. ---
.- .- - .- .- -..-. -.- .- .-.. .- .-.. .-
@#$@#$#%#$%$%$^%^%&^%&*^*&*(&
आम्ही पाकृ आणि निनादपुराणात
आवडले पण फोटो टाका.
निनाद थोडा त्रास झाला
हे आमचे एकीयाचे फर्निचर
ए बाबा
-... .... .- .. -.- .- -.- .-
गणपा भाउ मोहर्या तेलात
आजकाल राजकीय सभेत टाळ्या
गोगल भाऊ अगदी हाच प्रश्न
>>अपर्णा अक्षय म्हणतात तसे
सहमत ये फेविकोल का जोड
छान लेख ..आवडला. जर्मन आख्यान
छान.
जर्मन आख्यान आवडले.
नाही काका तुमचे बरोबर आहे
छान
मित्र परिवार पाहिल्यावर
-१
+१
=)) =)) =)) =)) =))
एकीकडे काश्मीराची आग शान्त
अरे प्रत्येक धाग्यावर हातभर
आवडले
पाठभेद
बाब्बो !
.- - -.-- .- -. -
सहज तुमचे मुद्दे सडेतोड आहेत
धन्यवाद.
तुमचे लिखाण हे मिपावर
>>>तुमचे लिखाण हे मिपावर
?
+३.१४
आर्र्र हे आधी पाहिलं असतं तर
निळू भाऊ रादिया बाई
ये मस्तानीच्या, च्यायला
निर्वासितांचा "खास" पासपोर्ट
अहो माहीत नाही तर कशाला अक्कल