Skip to main content

(कसं काय टार्‍या बरं हाय का?)

लेखक अवलिया यांनी शनिवार, 05/03/2011 15:12 या दिवशी प्रकाशित केले.
प्रेरणा - ओळखा की वाईच... कसं काय टार्‍या बरं हाय का, अहो बरं हाय का ? काल काय ऐकलं, ते खरं हाय का ? अहो राव तुम्ही, ते नाही तुम्ही, बाईकवाले तुम्ही न्हाय, न्हाय, न्हाय, न्हाय, बॉडीवाले तुम्ही सांगा काय ऐकलं ते खरं हाय का ? काल म्हनं तुम्ही सायटीवर गेला, कामेंट इडंबन करुन आला खरं काय हो पाटील ? कुनाची खेचली, कळलं का न्हाई, आज तरि परतिसाद देनार का ? काल म्हनं तुम्ही रागावुन गेला, खरडीचा दरवाजा बंदच केला आरंरं केली साठमारी, चावडीच्या दारी, आज काय करायचं ऱ्हायलंय का ? काल म्हनं तुम्ही जाब इचारला, अन्‌ फुकाट शो देऊन बसला आगं बया बया काय झालं पुढं, सांगा तरि थोडं, पालिशीप्रमाने समदं चाललंय का ?
काव्यरस
लेखनविषय:

वाचने 4676
प्रतिक्रिया 17

प्रतिक्रिया

हा हा हा! =)) =)) चालू द्या.

काय नाना ? आज सकाळीच का ? असो ... खुप छान कवीता (मुद्दयाला सोडुन लिहीत येत नाही म्हणुन ;) )

तसं आम्हालाही कळलं तर बरं, नेमका वांदा काय झालाय...... बरेच रीप्लाय डिलिटलेत, बोंबाबोंबही झालीय पण टारझनरावांची नेमकी कोणती प्रतिक्रिया झोंबली ते कळलं असतं तर आणखी भारी मजा आली असती..... अवलियांना कुर्निसात.....

इथे प्रतिक्रिया दिल्यावर कुणाला माझा राग तर येणार नाही ना? प्रतिक्रिया उडवल्या जाण्याच्या प्रतीक्षेत -- गगनात उडाली

टा~या व परा या दोघांना एकदा चिवास रिगल मधे आंघोळ घालण्याचा आमचा विचार आहे..साथीला चिंतामणी भाऊ अस्तिलच..