लय-
टपटप टपो~~~रे
चमचम चंदे~~~रे
टपटप टपोरे
चमचम चंदेरे
पडपड पावसारे
पोरे नाचतात
सळसळ वारा
थडथड गारा
सटसट मारापळाली घरात
सरासरा जाऊन
गारागारा वेचून
भराभरा चावूनफेकल्या मस्तीत
भिरभिर भिंगोर्या
फिरफिर सार्या
भिजभीज पोर्यारमल्या खेळात
पळपळ हुंदाडले
पळभर विसावले
वासरू उनाडलेकानशिरल्या वार्यात
गडगड थंडावली
झडझड मंदावली
पोरेसोरे परतलीभुकेल्या जोमात
दरवळ भाताचा
कळवळ मायेचा
उबेत आयेच्यालाडल्या पोरांस
Taxonomy upgrade extras
| लेखनविषय: |
|---|
वाचने
3112
प्रतिक्रिया
6
मिसळपाव
प्रतिक्रिया
नको तो पाऊस
अरूण काका...
In reply to नको तो पाऊस by अरुण मनोहर
मस्त आहे कविता
मस्त!
मस्त
मस्त...