हरवली पोर माझी कविता नावाची !
विशेष
प्रस्तावना : ही कविता काव्य विभागात दिलेली होती(http://www.misalpav.com/node/1708). पण कविता टाकल्यानंतर आणि पैसा जीं शी बोलण्या नंतर असे वाटले की या कवितेला अजुनही बोली भाषेत उत्तरे देता येतील, असेच काव्य पुढे लिहिता येइल .. ज्यांना ज्यांना त्यांच्या बोली भाषेत उत्तरे देता येतील त्यांनी तसे प्रयत्न केल्यास छान वाटेल .. थिम : कवी आनि कविता यांच्यामधील संवाद .. सोबतीला खरे खुरे बाप्-मुलगी यांचे मन ही त्यामध्ये दिसले पाहिजे ... ---कविता १ : काय सांगु कहानी या वेड्या बापाची हरवली पोर माझी कविता नावाची ! कामाच्या ओझ्यामंधी भान हुतं गेल सरुन डोळ्यात टिपुस ना परि ओढ पोरी तुझीच तिथुन कारभारनीच तुकडं काही ग्वॉड लागना शेतांमधी पाटाच काही पाणी वाहिना वाटच्या धुळीसंग कोणी चालना चिमण्यांही आज कुठं दाणं टिपना सांगतो मी कहानी या वेड्या बापाची हरवली पोर माझी कविता नावाची ! दारातल्या अंगणात काही रात निजना पारिजाताचा सडा आज काही सांगना चंद्राची कोर बी कुठ दिसना आभाळाची माया आज काही बोलना उसवल मन आज इचार करवाना हरवली पोर माझी कुठ सापडना.. - शब्दमेघ ( ३ मार्च २०११) भाषेचे स्थान : बारामती
वाचने
3392
वाचनखूण
प्रतिक्रिया
5
नको बोलु बाबा काही
काय सांगू कसं सांगू सुरुवात
In reply to काय सांगू कसं सांगू सुरुवात by नगरीनिरंजन
हे पण छान!
हाण्ण तिच्यायला...
गणेशा - अप्रतिम कविता