जागतिक मराठी दिनाच्या निमित्ताने विविध विषयावरील साहित्य इथे प्रकाशित करण्याचा मानस श्री.ध.मु. आणि त्यांच्या सहकारी मित्रांनी व्यक्त केला आहे त्याला अनुलक्षून कोणत्या विषयावर लिहावे हा विचार डोक्यात असताना गेले तीन दिवस आकाशवाणीवरून शासनानेच राज्यातील शाळा-महाविद्यालयांना या निमित्ताने केलेले आवाहन ऐकण्यास मिळाले. शासनाने निबंध, वक्तृत्व, वादविवाद, चर्चा, माहिती आदींचे आयोजन तर करावे अशा सूचना संस्थांना दिलेल्या आहेत. हे 'मराठी दिना' निमित्त होईलच. पण या संदर्भात मी काही भाषातज्ज्ञांनी दिलेली व्याख्याने ऐकली आहेत. त्या व्याख्यानामध्ये या ज्येष्ठांनी आग्रहाने आवाहन केले आहे की, 'स्वच्छ आणि व्याकरणदृष्ट्या अचूक' मराठी लिहिण्यासाठी शिक्षक, प्राध्यापकांनी मराठी महामंडळाचे लेखनविषयक नियमही सर्वांनी पाळावे. तसेच ते नियम वेळोवेळी केवळ विद्यार्थीच नव्हे तर कार्यालय आणि अन्यत्र ठिकाणी होत असलेल्या लिखाणातदेखील अंमलात येतील हे पाहावे. भाषेचे सौंदर्य (जे वाढत्या इंग्रजी मिश्रणाने भ्रष्ट होत चालले आहे) कसे खुलवावे हे सोदाहरण सांगून त्याद्वारे 'मराठी' चे मूळचेच देखणे रूप कसे कायम राहील यावर सातत्याने भर द्यावा.
(ठाणे येथील श्री.अरुण फडके "मराठी शुद्धलेखनाची कार्यशाळा" या मोहिमेंतर्गत हे कार्य फार प्रभावीपणे चालवितात हे इथे आवर्जून सांगणे आवश्यक आहे. त्यानी कोल्हापुरात आयोजित केलेल्या सत्राला मी हजर होतो)
'मराठी दिन' आनंदाने साजरा करीत असताना इथे साहित्य महामंडळाचे लेखनविषयक नियम सांगण्याचा माझा हेतू नाही (पण मि.पा. च्या संपादक मंडळाला त्याची आवश्यकता वाटत असेल तर पुढे कधीतरी ते नियम स्वतंत्र धाग्याच्या रूपाने इथे देता येतील) पण एक गंमत म्हणून मी वरील व्याख्यानातून नोंदविलेली काही उदाहरणे या लेखात देत आहे. ती आपल्या सदस्य वाचकांनी प्रथम वाचन म्हणून पाहावीत.....आणि ही सगळी वाक्ये 'भाषा मांडणीच्या दृष्टीने चुकीची वा अयोग्य असल्याने "योग्य" वाक्यरचना काय असू शकेल हे स्वतःही आणि घरातील सर्व लहानथोर यांच्यासमवेत चर्चा करून परत लिहावीत. इथे ती परत प्रतिसाद म्हणून देण्याची आवश्यकता नाही. मी स्वतःच सर्व वाक्ये दुरुस्त करून नंतर प्रकाशित करतो, म्हणजे त्यानुसार आपण 'भाषा किती अचूक लिहितो [की लिहित नाही] याचा लेखाजोखा सर्वासमवेत करता येईल.
अयोग्य वाक्यरचनेची काही उदाहरणे....
१. मालेगाव येथील पोलिस नियंत्रण कक्षाला पहिल्यांदा जातीय दंगल भडकल्याची माहिती मिळाली.
२. महाराष्ट्रानेही कांद्याचे वाढीव उत्पादन आणि निर्यातीला प्रोत्साहन देणारे धोरण स्वीकारले आहे.
३. अखेरीस २० ऑगस्ट १८९५ रोजी तिरके बसणारे व धारदार सोंड असणारे तपकिरी डास न्याहाळताना त्यांच्या रक्तात रॉसला हिवतापाच्या जंतूशी साधर्म्य असणारे जंतू सापडले.
४. पृथ्वीचा भूभाग २/३ पाण्याने व्यापला असला तरी त्यापैकी जवळजवळ ९०% पाणी हे पिण्यायोग्य नाही.
५. गणपती विसर्जनासाठी वापरले जाणारे तलाव आणि जलाशयांवर पालिकेने विसर्जनाची चोख व्यवस्था केली आहे.
६. डेक्कन एक्स्प्रेसमध्ये तिकीट तपासणी करताना चेकरने कमी दराचे तिकीट काढून प्रवास करणार्या प्रवाशाकडून दंडवसुली केली.
७. या पुलाची वाहनाचे वजन पेलण्याची क्षमता सुमारे १० वर्षापूर्वीच संपली असल्याचे एका पाहणीत स्पष्ट झाले होते.
८. शतकभराहून अधिक इतिहास असलेल्या या संस्थेला सरकारने वांद्रे येथे दिलेल्या जागेवर बांधले जाणार असलेल्या नियोजित कलासंकुलाचा आराखडा गेली सुमारे १० वर्षे तयार आहे.
९. बा.सी.मर्ढेकर या वाङ्मयसेवकाचे उद्यापासून जन्मशताब्दी वर्ष सुरू होत आहे.
१०. गणेशोत्सवाने सामान्य माणसाचे मन आणि मत परिवर्तन करण्याचे यशस्वी कार्य केले.
११. राघोजींना डाव हुकला हे पाहून फार वाईट वाटले.
१२. गुपचूप ही कामगिरी उरकली पाहिजे असं मोरोपंतांनी ठरवलं.
१३. बहुतेक पंपचालक हे राजकारणी नेत्यांच्या नातेवाईकांचे आहेत.
१४. एवढे करूनही आत प्लास्टिकच्या वस्तू कोणी नेल्या तर त्यांच्याकडून दंड आकारण्यात येणार आहे.
१५. कंपनीतील प्रत्येकाने कंपनी ज्या उत्पादनाची जाहिरात करीत असेल, तेच उत्पादन वापरायचे.
१६. एका कोपर्यात डझनभर चालताना वापरावयाच्या काठ्या होत्या.
१७. त्यानंतर घराच्या जमिनीवर, भिंतीवर आणि दरवाजांवरील माझ्या रेखाटनांचे प्रमाण वाढू लागले.
१८. यानंतर संतप्त सदस्यांनी सभापती मीराकुमार यांच्या निषेधाच्या घोषणा देत त्यांची भेट न घेताच निघून गेले.
१९. फेब्रुवारीत अवकाश भरारी मारणारी कल्पना चावला अचानक अंतर्धान पावली.
२०. शेवटच्या क्षणी तो दुखापतग्रस्त असल्याने त्याचे नाव संघातून वगळण्यात आले.
--oo0oo--
विशेष
वाचने
22688
प्रतिक्रिया
29
मिसळपाव
प्रतिक्रिया
हं............. आपण लिहीले
चांगला गृहपाठ दिला आहेस!
कुतूहल आहे
योग्य आणि अयोग्य वाक्यरचनांची
In reply to कुतूहल आहे by धनंजय
+ २
In reply to योग्य आणि अयोग्य वाक्यरचनांची by पुष्करिणी
देवनागरी आणि विरामचिन्हे....!!
In reply to योग्य आणि अयोग्य वाक्यरचनांची by पुष्करिणी
देवनागरीवर मोडीचा प्रभाव नाही
In reply to देवनागरी आणि विरामचिन्हे....!! by इन्द्र्राज पवार
अमुक एकच वाक्य योग्य आणि
योग्य आणि अयोग्य....!!
In reply to अमुक एकच वाक्य योग्य आणि by अवलिया
"...अमुक एकच वाक्य योग्य वा
In reply to योग्य आणि अयोग्य....!! by इन्द्र्राज पवार
~ हे ठरविण्यासाठी काही मापदंड
In reply to योग्य आणि अयोग्य....!! by इन्द्र्राज पवार
भाषेतल्या शब्दांवर कोणी शुद्ध
In reply to ~ हे ठरविण्यासाठी काही मापदंड by अवलिया
भाषेचे सौंदर्य आणि व्याकरण...!
In reply to ~ हे ठरविण्यासाठी काही मापदंड by अवलिया
तुमची आमची सहमती होणार नाही
In reply to भाषेचे सौंदर्य आणि व्याकरण...! by इन्द्र्राज पवार
मत आणि मतांतर...!
In reply to तुमची आमची सहमती होणार नाही by अवलिया
एक्षुज्मि प्लिज
In reply to भाषेचे सौंदर्य आणि व्याकरण...! by इन्द्र्राज पवार
समाधान....!!
In reply to एक्षुज्मि प्लिज by टारझन
मस्तच..
तार्किक बुद्धीचा वापर ....!
In reply to मस्तच.. by गवि
भाषेचे सौंदर्य
विरोधकाची भूमिका...!!
In reply to भाषेचे सौंदर्य by चिंतातुर जंतू
~ मी प्रतिसादात याचा
In reply to विरोधकाची भूमिका...!! by इन्द्र्राज पवार
सिद्धांत....!!
In reply to ~ मी प्रतिसादात याचा by अवलिया
माझी चूक काढताना तुम्हीही
In reply to सिद्धांत....!! by इन्द्र्राज पवार
आयला!!!!
इंन्द्रा च्या कोणत्याही
वरील साधक बाधक चर्चेने बरच
अ अ शी सहमत.....! गेल्या
In reply to वरील साधक बाधक चर्चेने बरच by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
!