Skip to main content

सराईत

लेखक अर्धवट यांनी बुधवार, 02/03/2011 16:30 या दिवशी प्रकाशित केले.
आताशा सुंदर लागलाय स्वर वगैरे.. सगळं कसं छान चालू आहे हसतमुखानं यशाच्या छटा मोजत मस्त सरकतोय दिवस. माझ्याकडे यांव आहे आणि मी त्याला त्यांव दिलं. हिशोबाच्या कागदाचा मनात लागलाय ढीग. थुंकी झेलणारे झेलतायत.. असुयेच्या आठ्या सुखावून जातायत . मित्रांचाही आहेच की घोळका... सगळं कसं छान चालू आहे . मारायला शिकतोय की नकोसे विचार, हव्याशा प्रलोभनांच्या बदल्यात. खूप ताकद आहे अजून.. लांब धाव घ्यायची.. जवळच्या नात्याची मिठी फक्त सोडवायची सुखाच्या व्याख्या बदलतायत, नजर अजून रुंद होतेय.. घाव अजून खोल. जल्लोष होतोय धुंद.. दरडावून विचारणारा आवाज क्षीण होत जातोय. प्रशस्त होतायत रस्ते... तडजोडी अप्रशस्त.. बुद्धी तल्लख आणि जाणीवा सुस्त नव्या लालसांचे अंकुर फुटताहेत.. वठलेल्या संवेदनांवर एक क्षीण आवाज येतो कधीकधी.. पण.. सराईत हाताला आता कंपही नाही सुटत.. अचूक दाब देताना
काव्यरस
लेखनविषय:

वाचने 1758
प्रतिक्रिया 10

प्रतिक्रिया

नजर अजून रुंद होतेय.. घाव अजून खोल. जल्लोष होतोय धुंद.. दरडावून विचारणारा आवाज क्षीण होत जातोय. प्रशस्त होतायत रस्ते... तडजोडी अप्रशस्त.. बुद्धी तल्लख आणि जाणीवा सुस्त नव्या लालसांचे अंकुर फुटताहेत.. वठलेल्या संवेदनांवर खुपच सुंदर...... आवडली.

अर्धवटरावांनी कविता मात्र पूर्ण केलीये हं !मस्त !

एक क्षीण आवाज येतो कधीकधी.. पण.. सराईत हाताला आता कंपही नाही सुटत.. अचूक दाब देताना हम्म!! आवडली कविता.

खूप आवडली. शेवट तर अगदी अचूक, परिणामकारक. (सराईत)बेसनलाडू मिसळापाव वर प्रदीर्घ कालानंतर चांगल्या, वाचनीय कविता येताहेत, हे पाहून बरे वाटते आहे. अशाच उत्तमोत्तम कविता आणखी वाचायला मिळोत, ही सदिच्छा! (सदिच्छुक)बेसनलाडू

मी गाता गीत तुझे वाहवा मला मिळाली आपुल्याच दु:खाला जणू दवा मिळाली जे सूर उमटले त्यास मनस्थिती मिळाली होता कैफ भावनांचा त्यात वाहवा मिळाली