Skip to main content

लेमन ड्रिझल केक

लेखक सानिकास्वप्निल यांनी रविवार, 27/02/2011 या दिवशी प्रकाशित केले.
साहित्यः १७५ ग्राम साखर २ अंडी फ्रिजमधुन बाहेर काढुन ठेवणे १५० ग्राम मारगरीन किंवा तूप एका लिंबाचे किसलेले साल १७५ ग्राम मैदा १२५ मिलि दूध लेमन सिरप चे साहित्यः १४० ग्राम पिठीसाखर ५० मिली लिंबाचा रस पाकृ: १८० डिग्री वर ओव्हन गरम करायला ठेवणे. एका भांड्यात अंडी, साखर आणी मारगरीन किंवा तूप एकत्र करणे. . एकत्र चांगले हलके होईस्तोवर फेटणे. . मग त्यात किसलेले लिंबाचे साल घालणे व नीट एकत्र करणे. . मैदा हळूहळू घालणे व लाकडाच्या चमच्याने किंवा रबराच्या चमच्याने एकत्र करणे. . त्यात मग दूध घालून नीट सगळे एकत्र करणे. . तुपाचा हात लावलेल्या केक टीनमध्ये मिश्रण ओतणे व गरम केलेल्या ओव्हनमध्ये ३५-४० मिनिटे बेक करणे. . तयार केक ला टीनमध्येच ठेवुन त्यावर काट्याने टोचे मारणे. . लेमन सिरपसाठी पिठीसाखर आणी लिंबाचा रस एकत्र करुन गॅसवर गरम करणे. उकळायचे अजिबान नाही, हलकेच गरम करणे व ते केकवर थोडे थोडे ओतणे. केक आपोआपच सिरप सोषून घेईल. ( हे सिरप आंबट -गोड असे असते ,ज्यांना आंबट चालत नाही त्यांनी सिरप आपल्या चवीप्रमाणे घालणे) . थंड झाले कि त्यावर पिठीसाखर भुरभुरणे आणी लगेच खायला सुरुवात करणे :) .

वाचने 5470
प्रतिक्रिया 17

प्रतिक्रिया

नक्की करुन पाहिन

बाकी माणसं कमी होती काय मिपावर म्हणुन तुम्ही एक, असो या स्वागत आहे रोगोखाकॅवा कल्बात. करताय केवढं छान, फोटो काय काढलेत, आयला हापिसात आल्या आल्या हे असले धागे आणि फोटो देवा बरं आहे तु अंडि खात नाहिस ते. असो, एकदा प्रयत्न करुन बघेन.

+१ :)

एकदम टेम्प्टींग दिसतोय केक :)

यात बेकींग पावडरची आवश्यकता नाही का ?

In reply to by प्राजक्ता पवार

बेकिंग पावडर घातली तर तो अजून छान फुलेल आणि लेमन ग्लेझ पण आणि नित मुरेल. छान पाक्रु.

आभार!! बेकिंग पावडर न घालता ही हा केक छान फुलतो अंडी नीट फेटली गेली पाहीजेत. जे अंडे खात नाही त्यांनी १ टीस्पून बेकिंग सोडा + १/२ टीस्पून बेकिंग पावडर, १/२ कप स्प्राईट सारखे कुठले ही शितपेय घालून मिश्रण एकत्र करणे.