साहित्यः
१७५ ग्राम साखर
२ अंडी फ्रिजमधुन बाहेर काढुन ठेवणे
१५० ग्राम मारगरीन किंवा तूप
एका लिंबाचे किसलेले साल
१७५ ग्राम मैदा
१२५ मिलि दूध
लेमन सिरप चे साहित्यः
१४० ग्राम पिठीसाखर
५० मिली लिंबाचा रस
पाकृ:
१८० डिग्री वर ओव्हन गरम करायला ठेवणे. एका भांड्यात अंडी, साखर आणी मारगरीन किंवा तूप एकत्र करणे.
एकत्र चांगले हलके होईस्तोवर फेटणे.
मग त्यात किसलेले लिंबाचे साल घालणे व नीट एकत्र करणे.
मैदा हळूहळू घालणे व लाकडाच्या चमच्याने किंवा रबराच्या चमच्याने एकत्र करणे.
त्यात मग दूध घालून नीट सगळे एकत्र करणे.
तुपाचा हात लावलेल्या केक टीनमध्ये मिश्रण ओतणे व गरम केलेल्या ओव्हनमध्ये ३५-४० मिनिटे बेक करणे.
तयार केक ला टीनमध्येच ठेवुन त्यावर काट्याने टोचे मारणे.
लेमन सिरपसाठी पिठीसाखर आणी लिंबाचा रस एकत्र करुन गॅसवर गरम करणे. उकळायचे अजिबान नाही, हलकेच गरम करणे व ते केकवर थोडे थोडे ओतणे. केक आपोआपच सिरप सोषून घेईल. ( हे सिरप आंबट -गोड असे असते ,ज्यांना आंबट चालत नाही त्यांनी सिरप आपल्या चवीप्रमाणे घालणे)
थंड झाले कि त्यावर पिठीसाखर भुरभुरणे आणी लगेच खायला सुरुवात करणे :)
वाचने
5470
प्रतिक्रिया
17
मिसळपाव
प्रतिक्रिया
यम्मी!
तोंपासु!!!
मस्तच
बाकी माणसं कमी होती काय
धासू
+१
अतिशय सुंदर..... पण हा अंडी न
अतिशय सुंदर..... पण हा अंडी न
कुणी....???
In reply to अतिशय सुंदर..... पण हा अंडी न by निवेदिता-ताई
वा!
पण
प्राजक्ता शी सहमत
In reply to पण by प्राजक्ता पवार
हा केक इनसाईड आउट केल्यास
मस्त!
आभार!!
आभार सानिका, मी काल करून
फोटो नाही येत..! क बर?