खुलासा
नमस्कार मिपा करांनो,
माझ्या आय. डी. वरून बराच गोंधळ होण्याची शक्यता आहे. म्हणून हा खुलासा.
माझा आणि "परीकथेतिल राजकुमार" यांचा दुरयान्वहेही काही संबंध नाही.
मी हा आय.डी. निव्वळ माझ्या आवडी नुसार निवडलेला आहे. यात "परीकथेतिल राजकुमार" यांना चिडवण्याचा, कुठलीही स्पर्धा करण्याचा अथवा खोडसाळपणा करण्याचा हेतु नाही.
गेले १ वर्ष मि मिपा वरिल लिखाण वाचत आहे.
मला हे संस्थळ प्रचंड आवडते. म्हणुन मि इथे येउन दाखल झालो.
मिपा चा उद्देश आणि एकुणच वाटचाल पाहुन थक्क व्हायला होते.
आणि म्हणुनच मला या परीवाराचा सदस्य व्हावेसे वाटले.
आय.डी. काय घ्यावा या विचारात असतांना "परीकथेतिल राजकुमार" हा आय.डी. नजरेस पडला आणि खुप आवडला, म्हणुन मग मि तोच आय.डी. जरासा बदलुन निवडायचे ठरवले. आणि""परीकथेतील राजा" हा आय.डी. निवडला, इतकेच!!
त्यातुनही, कुणाला या आय.डी. चा त्रास होणार असेल तर मि तो बदलण्यास तयार आहे.
अशी सुविधा उपलब्ध नसावि. असल्यास संरपंचानी जरुर सांगावे.
अथवा नवीन आय.डी. मंजुर करुन देणार असल्यास तसेही खवमधे कळवावे.
आपलाच
परीकथेतिल राजा.
वाचने
4759
वाचनखूण
प्रतिक्रिया
29
वेलकम टू परीकथा फॅमिली.
....परीकथेतील टॅक्स भरणारा प्रजाजन.
विजुभाऊ शाह
In reply to वेलकम टू परीकथा by विजुभाऊ
विजुशाँचे जुने परीप्रेम आठवुन ड्वाले पान्वाले! :)
In reply to वेलकम टू परीकथा by विजुभाऊ
हा हा हा.....
सहसा राजा आधी येतो मग राजकुमार येतो.पण इथे उलटे झाले.असो.परिकथेत चालायचेच.
In reply to सहसा by चिरोटा
अहो परिकथेतील राजा,
तुमच्या पाठोपाठ परिकथेतील राणी पण येणार आहे का ??? :-?
असेल तर पर्र्या साठी (म्हणजे परिकथेतील राजकुमारासाठी ) काही गोड बित्तम बातमी येणार आहे का ?
राजा आला, राणी ही येईल अन बरोबर एक साजेशी सून (लेडी डायना सारखी) ही आणेल
काय भरवसा ??
बाब्बो ! आमच्या पर्र्याचे काय होईल ... (डोळे गरगरणारी स्माईली समजावी)
पर्र्रा सांभाळ रे बाबा ;-)
भयंकर गोंधळ उडालाय!! परा = परिकथेतील राजकुमार हेच समीकरण झेपत नसताना आता अजूनेक परा कसा काय ना म्हणजे?? आमच्याही सहनशक्तीला मर्यादा आहेतच की! ;-)
येलकम टू द क्लब! आता जरा आमच्या पराला कायतरी समजावा तुमीच वडिलकीच्या नात्याने!! बरा होईल की वो!!! =))
--असुर
In reply to भयंकर गोंधळ उडालाय.. by असुर
परीकथेतील राजकुमार : परा
परीकथेतील राजा : पराजा
असे संबोधल्यास गोंधळ कमी होउ शकेल!
In reply to पराजा! by स्वैर परी
पराजा.... ए. राजा च्या जवळ जाते आहे....
त्यापेक्षा""परीजा" बरे आहे....
In reply to :) by मिसळलेला काव्यप्रेमी
मग "परीराजा" घ्या की.... ;
|-परीराज्यातील राजा -|
नवा (घर)गडी नवा बाजा......
(ह.घ्या.)
-सूर्यपुत्र.
In reply to भयंकर गोंधळ उडालाय.. by असुर
मि इतका मोठा नाही हो मालक!!
जर मला माहीत असते की इतका गहजब होईल तर दुसरा कुठलातरी आय. डी. निवडला असता !!
परीकथेतील राजकुमार साधारणपणे दोन एक वर्ष जुने आहेत मिपावर (माझ्या अंदाजे).... मि तर गेले सहा - आठ महिन्यांन पासुन मिपा वाचतोय. त्या आधि मला माहीतही नव्हते कि असे कुठले संस्थळ आहे म्हणून......
In reply to वडिलकीच्या नात्याने?? by मिसळलेला काव्यप्रेमी
जर मला माहीत असते की इतका गहजब होईल तर दुसरा कुठलातरी आय. डी. निवडला असता !!'भातुकलीच्या खेळातील राजा' कसे वाटते? मग कुठलाच प्रश्न येणार नाही.
बार उडवुन टाकु की हो तुमच्या नामकरणाचा....
मी काय म्हंतो मिपाकर यांना आपण "प्रजा" म्हटले तर कसे?
शेवटी काहीतरी फायनल करा अन कळवा.
-कळकळीने आवाहन करणारा एक मिपाकर (कुणाला कळ नसेल तर)
आम्ही तुम्हाला महाराज म्हणणार बुवा. अर्थात महाराज असा आयडी येई पर्यंत तरी.
नमस्कार मिपा करांनो, >>>
मनस्कार ,चमत्कार
माझ्या आय. डी. वरून बराच गोंधळ होण्याची शक्यता आहे. म्हणून हा खुलासा.
माझा आणि "परीकथेतिल राजकुमार" यांचा दुरयान्वहेही काही संबंध नाही. >>
हे परीकथेतील राजकुमार कोण ? आम्हाला आमचे प'रम' मित्र परिकथेतील राजकुमार माहीत आहेत. ;)
मी हा आय.डी. निव्वळ माझ्या आवडी नुसार निवडलेला आहे. यात "परीकथेतिल राजकुमार" यांना चिडवण्याचा, कुठलीही स्पर्धा करण्याचा अथवा खोडसाळपणा करण्याचा हेतु नाही. >>>
अहो जे संपुर्ण आंतरजाल करू शकत नाही ते आपण काय करणार ? ;)
गेले १ वर्ष मि मिपा वरिल लिखाण वाचत आहे. >>>
ठीक आहे . आता एक काम करा. त्या आधीचे लेखन वाचुन काढा, फक्त जुने धागे उकरून काढु नका, आमच्या विजुभाऊंना राग येतो.;)
मला हे संस्थळ प्रचंड आवडते. म्हणुन मि इथे येउन दाखल झालो.>>>
या या साहेब ! आपले स्वागत ..
मिपा चा उद्देश आणि एकुणच वाटचाल पाहुन थक्क व्हायला होते.
आणि म्हणुनच मला या परीवाराचा सदस्य व्हावेसे वाटले. >>>>
पुन्हा धन्यवाद ;)
आय.डी. काय घ्यावा या विचारात असतांना "परीकथेतिल राजकुमार" हा आय.डी. नजरेस पडला आणि खुप आवडला, म्हणुन मग मि तोच आय.डी. जरासा बदलुन निवडायचे ठरवले. आणि""परीकथेतील राजा" हा आय.डी. निवडला, इतकेच!! >>>
आपल्याला ईतर काही आयडी उदा. अशोक पातिल, प्र्दीप प्त्की असे आयडी आवडले नाहीत ..अरेरे ;)
त्यातुनही, कुणाला या आय.डी. चा त्रास होणार असेल तर मि तो बदलण्यास तयार आहे.
अशी सुविधा उपलब्ध नसावि. असल्यास संरपंचानी जरुर सांगावे.
अथवा नवीन आय.डी. मंजुर करुन देणार असल्यास तसेही खवमधे कळवावे. >>>
हे सर्व आपण खव मध्ये सांगीतले असते तरी चालले असते ;)
आपलाच
परीकथेतिल राजा. >>>
आपलाच
मामाकथेतील भाचा
आता घेतलात ना आयडी मग गपा ना.. पराने काही विचारले तर त्याला द्यायचा ना हा खुलासा, आधिच आगावुपणा कशाला केलात?
वोक्के,
आता लिहिते व्हा !
>>माझ्या आय. डी. वरून बराच गोंधळ होण्याची शक्यता आहे. म्हणून हा खुलासा.
अजिबात गोंधळ झाला नाही, उद्देश नीट समजला.
>>माझा आणि "परीकथेतिल राजकुमार" यांचा दुरयान्वहेही काही संबंध नाही.
अर्थात!
>>मी हा आय.डी. निव्वळ माझ्या आवडी नुसार निवडलेला आहे.
आवड भलतीच म्हणायची.
>>यात "परीकथेतिल राजकुमार" यांना चिडवण्याचा, कुठलीही स्पर्धा करण्याचा अथवा खोडसाळपणा करण्याचा हेतु नाही.
का?
>>गेले १ वर्ष मि मिपा वरिल लिखाण वाचत आहे.
गोंधळ न होण्याचे एक सबळ कारण.
>>मला हे संस्थळ प्रचंड आवडते. म्हणुन मि इथे येउन दाखल झालो.
एक वर्ष मुहुर्त शोधत होतात काय? (
>>मिपा चा उद्देश आणि एकुणच वाटचाल पाहुन थक्क व्हायला होते.
व्हा मग!
>>आणि म्हणुनच मला या परीवाराचा सदस्य व्हावेसे वाटले.
मगाशी म्हणालात संस्थळ आवडते म्हनुन सदस्य झालात. लगेच थापा मारायला सुरुवात का?
>>आय.डी. काय घ्यावा या विचारात असतांना "परीकथेतिल राजकुमार" हा आय.डी. नजरेस पडला
एका वर्षात नक्की कधी नजरेस पडला? तो तर इथे सारखाच पडिक असतो, म्हणजे पहिल्याच दिवशी नजरेस पडायला हवा.
>>आणि खुप आवडला, म्हणुन मग मि तोच आय.डी. जरासा बदलुन निवडायचे ठरवले. आणि""परीकथेतील राजा" हा आय.डी. निवडला, इतकेच!!
पण मग हे आवडायला एक वर्ष का लागलं? का आयडी बरोबर परा पण आवडला? नाही माणसं आवडायला वेळ लागतो म्हणुन विचारतोय.
>>त्यातुनही, कुणाला या आय.डी. चा त्रास होणार असेल तर मि तो बदलण्यास तयार आहे.
अशी सुविधा उपलब्ध नसावि. असल्यास संरपंचानी जरुर सांगावे.
मी सांगु का?
In reply to >>माझ्या आय. डी. वरून बराच by Nile
आज काय हापीसला सुट्टी का?
In reply to >>माझ्या आय. डी. वरून बराच by Nile
दिसला नवखा....कर रॅगिंग.....
बाकी खरेच शिल्पातै शी सहमत
In reply to दिसला नवखा....कर by सविता
>>दिसला नवखा....कर रॅगिंग.....
काय करणार आम्हाला "दिसला नवखा.... कर चॅटिंग..... " जमत नाय ना.
>>बाकी खरेच शिल्पातै शी सहमत
आम्ही मात्र खोटेच शिल्पातै शी सहमत. संडेला सुट्टी कधी असते का लोकांना?
In reply to >>दिसला नवखा....कर by Nile
काय करणार आम्हाला "दिसला नवखा.... कर चॅटिंग..... " जमत नाय ना.णिल्या ... तुम्हाला "दिसला " म्हणावयाचे आहे की "दिसली " ? "दिसल्या" बरोबर चॅटिंग करायला तुम्ही रिडिफ बोल वाले आहात काय ? =)) - (दिसली की कर .. दिसली की कर चॅटिंग वाला) बडसम याहु
In reply to शंका by टारझन
=)) =))
मेल्या, ते वृत्तात मार खातं होतं म्हणुन तसंच लिहलं रे. ;-)
(बाकी दिसला नवखा की कर चॅटिंग जमत नाही म्हणजे नवखी दिसली की जमत नाही असं थोडीचं आहे)
-ग(पचुप)बोल चॅटर.
In reply to शंका by टारझन
णिल्या ... तुम्हाला "दिसला " म्हणावयाचे आहे की "दिसली " ? "दिसल्या" बरोबर चॅटिंग करायला तुम्ही रिडिफ बोल वाले आहात काय ?च्यायला ह्या धाग्यापासून लांब राहायचे ठरवले होते पण ह्या णिच टार्याने 'रेडिफ बॉल' चा विषय काढल्याने काही जुन्या आठवणी* जाग्या झाल्या
बर्याच हितचिंतकानी ह्या धाग्यावर काही लिहावे असे सुचवले आहे म्हणुन लिहित आहे. हे आम्ही आधीपण एका सदस्याला दुसर्या एका ठिकाणी सांगीतले होते, ते पुन्हा सांगायची वेळ आली आहे.
एकतर संध्याकाळी नटुन थटुन खिडकीत बसु नये आणि बसल्यावर जर कोणी शुक शुक केले तर मग 'मी नाही त्यातली' अशा प्रकारचे खुलासे देत बसु नये.
बाकी चालु द्या...
* इच्छुकांनी टार्या व माझ्या २/३ दिवसांपुर्वीच्या खरडी चाळाव्यात.In reply to णिल्या ... तुम्हाला "दिसला " by परिकथेतील राजकुमार
एकतर संध्याकाळी नटुन थटुन खिडकीत बसु नये आणि बसल्यावर जर कोणी शुक शुक केले तर मग 'मी नाही त्यातली' अशा प्रकारचे खुलासे देत बसु नये.
हे आपले वाक्य एक "वचन" बनले असून माझ्या एका धाग्यावर प्रतिक्रियेत कोणीसे ते इतके चपखल वापरले आहे की यंव रे यंव.. :)
धन्यवाद.
"परीकथेतिल राजकुमार" हा आय.डी. नजरेस पडला आणि खुप आवडला,मग तो आयडी हवाय का? हाकानाका मग तोच तुम्हाला देउ या कि.
तुम्हाला मचाककथेतील खाजकुमार हा आयडी हवाय का? ;)
हाकानाका
मग तोच तुम्हाला देउ या कि.
In reply to तुम्हाला मचाककथेतील खाजकुमार by स्पा
तुम्हाला मचाककथेतील खाजकुमार हा आयडी हवाय का?हे बघा एफसी कॉलेज रोडवर चे लाईनमारु :)
अय्या...बदलून घेतलात वाटतं आयडी....
म्हंजे आयडी अजून ही बदलता येतो तर!
का बदललेत नाव कित्ती छान नाव होते? :(
मी तुमच्याशी मयत्री करणार होते पण आता तुम्ही नावच बदलले
वेलकम टू परीकथा