चरित्र-मंथन चरित्र-मंथन
लग्नाचे ते अरुंद भोजन
भेसळ सगळे ते रक्तचंदन
डालडा तुपात तुपकट निरांजन
चरित्र-मंथन||
विरुद्ध दिशेला क्रोधीत जीवन
विचित्र संध्या प्रेमळ अंजन
व्यर्थ सारे मृत्तिका पूजन
घनांच्या कडेला शेणसारवण
निषेध सारा प्रति-वाक्ताडन
जगण्याचे ते सहा सोपान
प्रबोधनाचे मौलिक प्रकटन
क्रियाहीन तो भेकड सैतान
निरुंद पत्तन सुख-संमार्जन
कुचेष्ट निद्रा मधु-संगोपन
समबुद्धी सुरा-प्राशन
निर्वात घरटे दीन भजन
तुडुंब अश्रू प्रचंड विघटन
क्रंदन नव्हे गुटिका मंजन
लोभस टेंभा निखील वर्तन
अचाट मेंदू निकृष्ट संजीवन
निर्जीव प्रक्रिया पालनपोषण
दु:सह जीवन उघडे दुकान
फेकाड तंतू अरि-वृंदावन
विदीर्ण रेशीम सुधीर भलामण
विलापशोचन हे कीटक-रोदन
प्रसिद्ध-सुमंत असत्य निरुपण
नको सांद्र महतीचे गोडवे गायन
प्रतिभा-गुंफन हे नवयुग गर्जन
विचारमंथन चरित्रमंथन........
-अन्यत्र पूर्वप्रकाशित
| लेखनविषय: |
|---|
वाचन संख्या
1094
प्रतिक्रिया
5
मिसळपाव
प्रतिक्रिया
मला वाटतय शरदिनी ताईंच्या
दैत्या -अरे कमाल बाप.
आत्ता समजली
कविता शरदिनीवृत्तात जमून आलीये
खूपच सुरेख लिहिले आहे! आवडले.