फेब्रुवारीचा शेवटचा आठवडा हा बजेटचा आठवडा. त्यातही रेल्वे बजेट आधी सादर केले जाते ( जे उद्या सादर होणार आहे)
सामान्य मुंबईकर याची अगदी आतुरतेने वाट पहात असतो. आजपर्यंतच्या अनुभवानुसार बिहारी / बंगाली रेल्वे मंत्र्यांनी नेहमीच महारष्ट्राच्या तोंडाला पाने पुसली आहेत. आपापल्या राज्यातील जनतेची सोय व्हावी म्हणून मुंबईला जाणार्या गाड्यांची संख्या वाढवण्यात धन्यना मानली आहे. बाकी फारसा फायदा मुंबई आणि महाराष्ट्राला मिळत नाही. आपले खासदार ही याबाबत निष्क्रीय ( अपवादः आनंद परांजपे) आहेत. यंदाच्या बजेटमधे खालील काही मुद्दे रेल्वेमंत्री विचारात घेतील ही अपेक्षा
१) सर्व लोकल गाड्या १२ डब्यांच्या , पनवेल -कर्जत, पनवेल - कल्याण, पनवेल - वसई , कल्याण-वाशी या मार्गावर लोकल्स चालू करणे तसेच उरण - नेरुळ मार्गासाठी निधी देणे
२) सर्व एक्सप्रेस गाड्याना ठाणे येथे थांबा, पनवेल टर्मिनल्सची निर्मिती
३) बिहार/ उ.प्र/ प.बंगाल येथे मुंबईहून एकही नवीन गाडी न सोडता , जमले तर गाड्यांची संख्या कमी करणे.
४) कोकणात जाणा-यांसाठी मुंबई- सावंतवाडी कायमची रेल्वे
५) आरक्षणातील काळा बाजार रोखण्यासाठी ठोस उपाययोजना
यात जनतेला खुश करण्यासाथी प्रवासी भाडेवाड न करणे, लांब पल्याच्या गाड्यांचे भाडे १-२ रुपये वाढवणे हे होऊ शकते.
आपली या रेल्वे बजेट मधून काय अपेक्षा आहे ?
अमोल केळकर
वाचने
3362
प्रतिक्रिया
16
मिसळपाव
प्रतिक्रिया
आजकाल
चांगले
-
In reply to चांगले by अभिज्ञ
४. पश्चिम महाराष्ट्र-
In reply to चांगले by अभिज्ञ
प्लॅटफॉर्म सुधारा!
परळी-बीड-नगर
+१
In reply to परळी-बीड-नगर by ramjya
घोषणा व कामे
रेल फलाट
पुण्यात मेट्रो ...
डानराव... एकदम मनातलं
In reply to पुण्यात मेट्रो ... by छोटा डॉन
अमोल सहेब आपन फक्त आपल्य शहरा
हिंदुस्थानातील पहिली रेल्वे
कामे
In reply to हिंदुस्थानातील पहिली रेल्वे by मदनबाण
अगदि खरे
पुर्णपणे निराशाजनक बजेट .