रेशमाच्या गाठी
लेखनविषय:
नजर वळे पुन्हा-पुन्हा, यमुनेच्या काठी
कशा तोडू सांग कान्हा, रेशमाच्या गाठी
साद दिली वेणूने, धावत मी आले
तोडून पाश सारे, तुझीच मी झाले
थरारली काया सारी, घालता तू मिठी!!
निळावल्या सांजेला, करून सोळा साज
उंबर्याशी सोडून आले, मी सारी लाज
प्रीत अबोली आहे, राधेच्या ओठी!!
द्वारकेला गेला राणा, राहिली विराणी
संपला रास आता, संपली कहाणी
राधेची प्रीत आज, ठरली रे खोटी!!
वाचने
1326
वाचनखूण
प्रतिक्रिया
4
मी मिपा वर नवीन आहे आपल्या प्रतिसादानेच पुढच्या लेखनास प्रेरणा मिळणार आहे :)
लिहा हो ताई बिंधास्त लिहा.
लोक थट्टा करतील ती फाराशी मनावर घेऊ नका. लिहीत रहा
मौका सभी को मिलता है
पूनम -
नजर वळे पुन्हा-पुन्हा, यमुनेच्या काठी
कशा तोडू सांग कान्हा, रेशमाच्या गाठी
छान लिहिता. लिहित रहा. खूप शुभेच्छा
कविता सुंदर आहे एकदम ..
येवुद्या आनखिन अश्याच कविता..
विशेषता :
"निळावलेली सांज" हा शब्द आवडला, पहिल्यांदाच वाचणात आला आहे माझ्या. मस्त.
-----------
राणा हा शब्द कृष्णा बद्दल मी पहिल्यांदाच ऐकला आहे , मला माहित नव्हता हा शब्द कृष्णा प्रती आहे तो .
-------
लिहित रहा ... वाचत आहे
मी मिपा वर नवीन आहे आपल्या