Skip to main content

तुला कसली रे एवढी घाई ?

लेखक विश्वेश
Published on बुधवार, 23/02/2011
आज सकाळी नेहमीप्रमाणे घाई घाई ने आवरले आणि निघालो तेव्हा बायकोने विचारले ... तुला कसली रे एवढी घाई ? निघण्याची घाई, मला जगण्याची घाई ... आयुष्याची पाने मला उलटायची घाई हसायची घाई, मला रडायची घाई ... चार पावले चालताच मला पडायची घाई खायची घाई, मला पिण्याची घाई ... कोणी काही देवो, मला घेण्याची घाई जिंकायची घाई, मला हरायची घाई ... कुठे जातो माहित नाही, पण धावायची घाई भेटीची घाई, मला गाठीची घाई ... ऐन तारुण्यातच मला साठीची घाई सवयीची घाई, मला सवयीची घाई ... मरणाची घाई ... मला सरणाची घाई ... मला सरणाची घाई ...
लेखनविषय:

वाचन संख्या 1368
प्रतिक्रिया 5

प्रतिक्रिया

निघण्याची घाई, मला जगण्याची घाई ... आयुष्याची पाने मला उलटायची घाई जिंकायची घाई, मला हरायची घाई ... कुठे जातो माहित नाही, पण धावायची घाई ह्या दोन कडव्यातुन जीवनाप्रतीची माणसांची स्थीती एकदम जबरदस्त सांगितली आहे.. एकदम आवडले .. --- हसायची घाई, मला रडायची घाई ... चार पावले चालताच मला पडायची घाई खायची घाई, मला पिण्याची घाई ... कोणी काही देवो, मला घेण्याची घाई या ओळी छान असल्या तरी वरील दोन कडव्याचा , अर्थाच्या प्रवाहात वेगळ्या वाटल्या...

घाई घाईत कविता वाचली काय प्रतिसाद द्यावा सुचत नव्हते पण मलाही प्रतिसाद देण्याची घाई तेव्हा घाई घाईत देऊनच टाकला .

.... अजिबात घाई न करता वाचले... मुक्तक आवडले.