आज सकाळी नेहमीप्रमाणे घाई घाई ने आवरले आणि निघालो तेव्हा बायकोने विचारले ...
तुला कसली रे एवढी घाई ?
निघण्याची घाई, मला जगण्याची घाई ...
आयुष्याची पाने मला उलटायची घाई
हसायची घाई, मला रडायची घाई ...
चार पावले चालताच मला पडायची घाई
खायची घाई, मला पिण्याची घाई ...
कोणी काही देवो, मला घेण्याची घाई
जिंकायची घाई, मला हरायची घाई ...
कुठे जातो माहित नाही, पण धावायची घाई
भेटीची घाई, मला गाठीची घाई ...
ऐन तारुण्यातच मला साठीची घाई
सवयीची घाई, मला सवयीची घाई ...
मरणाची घाई ... मला सरणाची घाई ... मला सरणाची घाई ...
| लेखनविषय: |
|---|
वाचन संख्या
1368
प्रतिक्रिया
5
मिसळपाव
प्रतिक्रिया
घाई घाईत एक प्रतिक्रिया देउनच
निघण्याची घाई, मला जगण्याची
कवीता फार घाइ घाईत लीहलेली
घाई
मस्त