माझी १ मैत्रिण गेली ३/४ वर्षे SFO ला रहात आहे. तिला थोडे दिवसांपूर्वि मुलगा झाला.(C-section) It is her first baby. तिची आई भारतातून गेली आहे महिन्याभरापूर्वि तिला मदत म्हणून.
New Born Mother साठी हा सगळा अनुभव खूप वेगळा असतो आणि आयुष्यात खूप उलथापालथ घडवून आणणारा असतो. त्या प्रसंगी अनुभवी लोकांच्या सल्ल्याची खूप गरज असते. अनुभवाचा खूप फायदा होतो.
भारतातले अनुभव आणि US मधले अनुभव खूप वेगळे असणार. (कारण तिथे स्वयंपाक, घरकाम, बाळाची आंघोळ यासाठी कामाची बाई मिळणे अवघड आणि महाग आहे. ) भारतापेक्षा खूप वेगळे वातावरण, जीवनमान, culture तिथे असल्याने माझ्या या मैत्रिणिला मी hardly काही मदत करू शकते.
म्हणून US स्थित मैत्रिणींना मी विनंती करते की शक्य असल्यास त्यांनी खालील बाबतीत त्यांचे अनुभव शेअर करावे किंवा काही सल्ला/टीप्स द्यावा.
१) मैत्रिणीला पोषक असा काय आहार तिने घ्यावा. या गोष्टी कुठे मिळतील.
२) रोजच्या कामातील वेळ वाचवण्याच्या काही टीप्स. (कारण तिच्या आईवर घरकाम आणि तिची काळजी घेणे याचा बराच लोड येत असेल.)
३) तुमच्या अनुभवावरून काही टीप्स/सल्ले.
वाचने
6235
प्रतिक्रिया
17
मिसळपाव
प्रतिक्रिया
महत्वाच्या टिप्स आहे. : * जर
ह्या आहेत
सहमत
In reply to ह्या आहेत by कच्ची कैरी
पालेभाज्या जास्त खाव्यात,
In reply to ह्या आहेत by कच्ची कैरी
व्हॉट टू एक्स्पेक्ट
सहमत!
In reply to व्हॉट टू एक्स्पेक्ट by गवि
गवि विंग्रजी न येणाऱ्या
तीन चार
In reply to गवि विंग्रजी न येणाऱ्या by स्पा
तीन चार वर्षे SFO नामक ठिकाणी
इतर भारतीय माता, ज्यांना
In reply to तीन चार वर्षे SFO नामक ठिकाणी by स्पा
बाप रे
In reply to इतर भारतीय माता, ज्यांना by वपाडाव
मेल्या....
In reply to तीन चार वर्षे SFO नामक ठिकाणी by स्पा
वरती कच्ची कैरी, निवेदिता
- मेथीची भाजी - आमच्या इथे तरी ही ब-याचदा ठराविक दुकानात, ठराविक दिवशी मिळते. तसेच तुमच्या मैत्रिणीकडे असेल तर दुकानदाराकडे चौकशी करुन ठेवावी. या पालेभाजीप्रमाणे कच्च्या मेथीचा रोजच्या जेवणात वापर असावा, जसा भाजी आमटीमध्ये रोज थोडे थोडे दाणे घालावे. त्यातल्या त्यात मुगाची आमटी पचायला जास्त हलकी असते.
- तसेच इथे काही दुकानात खायचा डिंक मि़ळतो, मी इंग्रजी-गुजराथीत काय म्हणतात हे विचारुन सांगते. जरी भारतातल्या सारखे डिंकाचे लाडु तयार करता येत नसले किंवा रेडिमेड मिळत नसले तरी जे काही पदार्थ मि़ळतात (डिंक, गुळ, बदाम, बेदाणे, वेलची पुड - यात मेथीची पावडर घालु शकतो.) ते नुसते कोरडे मिसळुन खाल्ले तरी बरेच पौष्टीक आहे - असे माझ्या सासुबाईंनी सांगितले होते - अर्थात योग्य प्रमाणात खावे.
- दलियाची खीर, उपमा बराच पौष्टीक असतो, शेवयाची खीर पचायला हलकी असावी. मला वाटते शेपुची लसुन घातलेली भाजी - भाकरी चांगली. भाकरीचे पीठ इथे ब-याचदा जुने मिळते व भाक-या नीट पडत नाहीत, तुटतात तर त्यात अर्धी-एक वाटी भात मिक्सरमधुन काढल्यास उत्तम भाक-या होतात.
- वेळ वाचवण्याच्या टिप्स सुरवातीला जरा कठीणच वाटतात, कारण सगळे घर बाळाभोवतीच फिरत असते, त्यात त्याची झोप कमी असल्याने आणि तीनएक तासात भूक लागल्याने, १-२ कामे उरकेपर्यंतच पुढच्या भरवण्याची, डायपर बदलायची वेळ येते. तरीही हळुहळु सगळ्यांचे रुटीन बसेल व सवय होईल असा विश्वास मैत्रिणिला द्यावा. माझ्या ओळखीतल्या काही मैत्रिणींचे भारतातुन कोणी येणे शक्य नव्हते, तेव्हा नवरा-बायकोलाच सगळे निभावुन न्यायला लागले. त्यातुनही समजा रोजची पोळीची कणिक आठवड्यातुन दोनदाच मळली आणि फ्रिजमध्ये ठेवली तर आयत्या वेळेस पटकन पोळ्या करता येतात, व रोजचा मळण्याचा वेळ वाचतो. घरातल्या बाकी लोकांसाठी दिवसातुन एकदाच भाजी-आमटी केली तर दोन्ही वेळेस वेगळे करायचा, भांडी धुवायचा वेळ वाचु शकतो. बाळंतिणीला शकत्यो शिळे आपण देत नाही हे माहीती असलेच.
अजुन काही ठरविक माहीती हवी असेल तर खरड किंवा संदेश पाठवा. आता माझ्याही दोन शंका. बाळंतिणीला कडधान्ये देणे चांगले का? माझ्या जवळच्या नातेवाईकांमध्ये ते रोज फक्त दुध-पो़ळी/भाकरी, दुध-भात, असेच तिला द्यायचे. याउलट माझ्या सा.सु. रोज एकतरी पालेभाजी, उसळ, कोशिंबीर जेवणात येइल असे बघायच्या. मला वाटते तसा सर्वांगीन आहार कधीही चांगला, पण खात्री नाही. तसेच कांदा पूर्ण व्यर्ज करावा का?>>तसेच इथे काही दुकानात खायचा
In reply to वरती कच्ची कैरी, निवेदिता by सखी
प्रयत्न करते
तब्येत सांभाळण्याच्या टिप्स
In reply to प्रयत्न करते by चित्रा
सर्वांना प्रतिसादांबद्दल मनापासून धन्यवाद :-)