मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

मिपा क्रिकेट जल्लोष!!! भारत विरुद्ध बांग्लादेश.

निखिल देशपांडे · · क्रिडा जगत
विश्वचषकाचे बिगुल अखेर वाजले. अहो सुरुवात तर पहिल्याच बॉल वर चौकार मारुन जोरदार झाली. त्याच उत्साहात मिपावर क्रिकेट चा जल्लोष साजरा करण्यासाठी आम्ही घेउन आलो आहोत विश्वचषकाचे एक वेगळे पान. आज ह्या वेगळ्या पानाला सुरुवात केली आहेच पण त्यात आम्ही वेळोवेळी सुधारणा करतच राहू... मग देताय ना भेट या पानाला??? या पानावर तुम्हाला लाईव्ह स्कोअर सुद्धा पहाता येणार आहे. या पानाला भेट देण्यासाठी तुम्ही टॉप बार मधल्या क्रिकेट विश्वचषक २०११ हा दुवा ही वापरु शकता चला मंडळी आता आजच्या सामन्याचा आनंद घेऊयात... काय वाटतय तुम्हाला भारताच्या किती धावा होणार आज???

वाचने 28746 वाचनखूण प्रतिक्रिया 37

मस्त कलंदर 19/02/2011 - 14:59
त्या वेड्या सेहवागमुळे आमचा सचिन आऊट झाला.... :-(

In reply to by सहज

चतुरंग 19/02/2011 - 16:30
सचिनने थोडी घाई केली. बॉल मिडॉनच्या जवळच होता फिल्डरपासून पुढे गेला नसल्यामुळे सेहवाग त्याच्याकडे बघून अंदाज घेत होता आणि नेमका डाईव मारुन बॉल फील्ड झाला....सचिनने एखादा क्षण थांबायला हवे होते पण ह्या शेवटी जर तर च्या गोष्टी झाल्या. सच्या अशा रीतीने रनआउट झाल्यावरही वीरु ज्या स्थिरतेने खेळला ते मला कौतुकास्पद वाटले.

In reply to by चतुरंग

मेघवेडा 19/02/2011 - 17:27
बॉल सेहवागच्या पाठी गेला होता तेव्हा टेकनिकली त्यानं सचिनचा कॉल फॉलो करायला हवा.. आणि त्यात सचिन डेंजर एण्डला पळत असल्याने सचिनचाच कॉल महत्त्वाचा होता. पार्टनर सोडून बॉलकडे/फिल्डरकडे बघणं म्हणजे तद्दन मूर्खपणा आहे. पण हे सगळं घडल्यावरही सेहवागचा थंडपणा कौतुकास्पदच, त्याबद्दल त्याला फुल्ल मार्क्स! :)

In reply to by मेघवेडा

निखिल देशपांडे 19/02/2011 - 17:58
पण हे सगळं घडल्यावरही सेहवागचा थंडपणा कौतुकास्पदच, त्याबद्दल त्याला फुल्ल मार्क्स!
+१ सहमत रे.. सेहवाग भारीच खेळला, पण कोहलीचे क्रेडिटही कमी नाही. बॉलर्स काय करतात आता पहायचे....

In reply to by निखिल देशपांडे

भडकमकर मास्तर 19/02/2011 - 18:19
ते तसं नाहीये, सेहवाग लवकर आत गेला असता ना, तर सचिनने त्याला तुडवला असता.. म्हणून तो घाबरून खेळत राहिलाअआणि चक्क १७५ मारला....

In reply to by भडकमकर मास्तर

रमताराम 19/02/2011 - 23:25
कारणमीमांसा पटली ब्वॉ.

In reply to by भडकमकर मास्तर

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे 20/02/2011 - 11:37
मास्तरांशी सहमत. -दिलीप बिरुटे

स्पा 19/02/2011 - 15:12
सेहवाग धु धु धुतय... वा.. २००७ चा सगळा बदला घेणार असा दिसतंय

In reply to by स्पा

अमोल खरे 19/02/2011 - 15:16
२००७ चा सॉल्लिड बदला घ्यायला हवा. आत्त्ताच मागील वर्ल्डकप च्या मॅच मध्ये बांगलादेश जिंकल्यावरचा जल्लोष दाखवला. सचिनचा पडलेला चेहरा बघवत नव्हता. आज तर जिंकलच पाहिजे आणि ते पण दणदणीत.

मस्त कलंदर 19/02/2011 - 15:38
आहे हा रनरेट कायम राहिला तर ३५० धावा व्हायला हरकत नाही

चतुरंग 19/02/2011 - 16:26
असाच खेळत राहिला तर ३५०+ नक्की.
त्या येड** मांजरेकला सांगारे कुणी तरी की भारत खेळत आहे. सारखा देल्ही बॉईज....देल्ही बॉईज ची टेप लावुन बसला आहे मुर्ख.

मस्त कलंदर 19/02/2011 - 17:25
पण हरकत नाही.. ३५५+ झालेयत... माझा आणि रंगाकाकांचा अंदाज खरा ठरला!!!!

मस्त कलंदर 19/02/2011 - 17:35
विराट कोहलीचं शतक होतं की नाही वाटत होतं.. झालं एकदाचं...

निनाद मुक्काम … 19/02/2011 - 18:15
शेवटच्या षटकात माती खाल्ली ( जेवढ्या जास्त धावा तेवढ्या तगडा रन रेट) विराट ने ठरवले होते शतक पूर्ण करायचे म्हणजे कराचे . मग एकेरी धाव हा सर्वोत्तम आणि सुरक्षित पर्याय . शेवटचे षटक म्हणून काय हल्लाबोल करायचा ? (स्वताच्या विकेटची पर्वा न करता ) आता प्रतीस्पर्ध्धी संघ २५० च्यात गुंडाळला पाहिजे . बाकी सामना वीर म्हणून विरू नक्की (पहिला बॉल ते शेवटचा कोणत्याही बॉलवर ह्याला जरा संधी दिसली कि तिचे सोने करणार .)

गणपा 19/02/2011 - 19:57
अजुन एक गेला.. माताय बांगलादेशी फलंदाज आउट झाल्यावर असा आनंद होईल अस वाटल नव्हत =))

इन्द्र्राज पवार 19/02/2011 - 22:04
जरी अपेक्षेप्रमाणे सामना जिंकला असला तरी बांगला देश सारख्या तुलनेने दुबळ्या समजल्या जाणार्‍या संघाने झहीर आणि को. यांच्या गोलंदाजीसमोर ३०० च्या घरापर्यंत पोचण्याइतपत धावा काढल्या म्हणजे आमच्या गोलंदाजांचाही त्यानी फेस काढला असे कबूल करावे लागेलच....शिवाय संघ पूरता बादही करता आलेला नाही. असो....पुढील सामन्यासाठी आपल्या संघाला शुभेच्छा देऊ या. इन्द्रा