Skip to main content

विनिल आणि...

लेखक श्रावण मोडक यांनी शुक्रवार, 18/02/2011 12:24 या दिवशी प्रकाशित केले.
मुद्दाम शीर्षक अर्धवट ठेवले. विषय आहे विनिल कृष्णाचा. ओरिसातील मलकनगिरीचा जिल्हाधिकारी. लोकप्रिय, प्रामाणिक, कर्तृत्त्ववान... खरे तर या विशेषणांचा क्रम उलटा लिहायला हवा. कारण पुढच्या दोन गुणांमुळे तो लोकप्रिय झाला आहे. माओवाद्यांनी (म्हणजे काय हा प्रश्न आहेच) त्याचे अपहरण करून आता अठ्ठेचाळीस तास होत आले आहेत. त्याच्या सुटकेचे नेहमीचे प्रयत्न वगैरे सुरू आहेत. पण एक प्रश्न मला पडला आहे. बिनायक सेन यांच्यासंदर्भात उठणारे आवाज गेल्या अठ्ठेचाळीस तासांत पुन्हा उठलेले दिसले नाहीत. स्वामी अग्निवेश यांचा अपवाद. त्यांनी विनिलच्या सुटकेसाठी प्रयत्न सुरू केले. पण बाकीचे? खुद्द सरकारी स्तरावरही एरवी जशी धावपळ दिसते तशी आत्ता दिसत नाही. दिसत नाही म्हणजे अगदी विनिलच्या सुटकेसाठी विशेष मोहीम वगैरे हाती घेतलेली नाही, असेही सरकार म्हणते आहे. विनिल हा मानवतावाद्यांचा शत्रू निश्चित नाही. विनिल हा अधिकाऱ्यांमधलाही बोटावर मोजण्याजोग्यांमधला एक आहे, असे म्हणतात. दुर्गम भागांत मोटरसायकलवरून जाणारा हा कलेक्टर. लोकांशी संपर्क वाढवणारा कलेकचुकले? विनिलचे काय चुकले? तुमचे काय मत? हा धागा म्हणजे मानवतावाद्यांना धरून झोडण्याची संधी आहे, पण त्याचा तितकाच उपयोग नको. थोडी तपशीलातली मांडणीही होऊ द्या.

वाचने 33762
प्रतिक्रिया 116

प्रतिक्रिया

विनिल ह्यांच्याप्रमाणेच एक अभियंता श्री. पवित्र मझी (Mr. Pabitra Majhi- नक्की उच्चार ठाऊक नाही) हेही नक्षलवाद्यांच्या ताब्यात आहेत ना? इथे धाग्यावर त्यांचा उल्लेख आढळला नाही.

In reply to by यशोधरा

हो तेही आहेत. त्यांचा उल्लेख धाग्यात राहिला. कारण घाई आणि नंतर स्वसंपादनाची सोय नसण्याने झालेली पंचाईत. अर्थातच, माझ्यालेखी विनिल प्रातिनिधीक आहे. त्याच्याऐवजी माझीचा उल्लेखही मला चालेल. पण, ही गोष्ट पुढे आणल्याबद्दल धन्यवाद. तपशील दुरूस्त होणे आवश्यकच आहे.

In reply to by श्रावण मोडक

विनिल जिल्हाधिकारी आहेत. एकूणच उतरंडीवर वरच्या पायरीवर आहेत आणि पवित्र साधेसुधे अभियंता. त्यांच्याकडे लक्ष न जाणे स्वाभाविक आहे. तुमचेच असे नाही, एकूणातच. ह्याचा उल्लेख किंवा त्याचा उल्लेख वा कोणाला कोणाचा उल्लेख चालेल, हा प्रश्न नाही, त्याला महत्व नाही. मानवतावाद्यांवर टीका करताना मूळ लेखात अनवधानाने का होईना, राहिलेला उल्लेख पुढेही धागाकर्त्यासकट कोणालाही करावासा वाटत नाही ह्याचे आश्चर्य वाटले. असो. आ.रा ह्यांच्या प्रतिसादात श्री माझी ह्यांचा उल्लेख दिसतो. चालूदेत.

In reply to by श्रावण मोडक

तुमच्या ह्या प्रतिसादाची खरोखर गंम्मत वाटते एवढेच म्हणते. ह्याची गरज खरे तर नव्हती. विनील काय वा पर्वत काय वा कोणीच व्यक्ती ह्या केवळ सो कॉल्ड इंटलेक्च्युअल चर्चेचा विषय आहेत का - अमुक एका ऐवजी दुसर्‍याचा उल्लेख चालेल म्हणायला? प्रत्यक्ष हाडामांसाच्या जिवंत व्यक्तींचे आयुष्य पणाला लागलेले आहे. (ह्याचा अर्थ सगळ्यांनी तिथे जाऊन ह्या व्यक्तींच्या सुटकेत सक्रीय योगदान द्यावे असेही म्हणत नाही, ते शक्यही नाही ) जनमानसामध्ये चर्चा ही होणारच, त्यातही काही गैर नाही, पण चर्चा करतानाही आपण दोन वेगवेगळ्या जिवांबद्दल बोलतो आहोत ही जाणीव जोपासल्यास गैर असेल का? म्हणूनच, माझ्यालेखी विनिल प्रातिनिधीक आहे. त्याच्याऐवजी माझीचा उल्लेखही मला चालेल हे वाक्य खटकले,बाकी काही नाही. नपेक्षा, हा नाही तर तो - चर्चा होत असल्याशी मतलब आणि 'मला' आणि 'माझी मते' इतकेच मांडायचे असल्यास योग्यच आहे. असो. ह्यापुढे तुमच्या वा तुम्ही लिहिलेल्या विषयाच्या जराही विरोधात वा तत्सम काही लिहायचे नाही हे पथ्य पाळेन. हे ह्या धाग्यावर शेवटचे पोस्ट. धन्यवाद.

In reply to by यशोधरा

आश्चर्य आहे. क्षमा असावी असा प्रतिसाद दिल्यावर आधीच्या प्रतिसादालाच चिकटून मत व्यक्त करण्याचा आग्रह पटला नाही. मा़झी यांचे नाव लेखात आले नाही म्हणजे त्यांची सोडवणूक करणे मोडक यांना अपेक्षित नाही असा निष्कर्ष काढणे आततायी (किंवा खोडसाळ) वाटते.

In reply to by यशोधरा

माझ्याकडून उणीव राहिली होती. ती फक्त उणीव नसून, चूक असल्याचे तुम्ही दाखवलेत. म्हणून क्षमा असावी असं लिहिलं. आत्ताचा तुमचा प्रतिसाद वाचता, ही चर्चा सुरू करताना मी थोडा संकुचितच विचार केला होता. मला फक्त मानवतावाद्यांची भूमिका चर्चेत अपेक्षीत होती. हाडामासाची माणसं, सरकारी यंत्रणेतील उतरंड वगैरे व्यापक मुद्देही त्यात आहेत, हे माझ्या ध्यानी नव्हते. ते आत्ता तुमच्या प्रतिसादामुळे लक्षात आले. त्यामुळे तुम्ही लिहिणं थांबवू नका. विरोधात, किंवा कसेही, लिहित रहा. माझ्या ज्ञानात भर पडते, आकलनही वाढते. :) दंडवत!

In reply to by श्रावण मोडक

छे, छे! आपल्यासारखे मिपावरले महान व्यक्तीमत्व कधी अधिक उणे लिहू शकते वा तशी शक्यताही असू शकते हे मनातही आणल्याचे आणि ते असे मांडल्याचे पाप केले, माझीच चूक :) आपणाइतके कोणाला कळत नाही हे आता अगदीच समजले. थत्तेकाकाकाही हिरीरीने बाजू मांडतात म्हणजे काय? :) धन्यवाद. अवांतरः आपल्या लिखाणाला संमंतीदर्शक लिहिले नाही की आपल्याला उपरोधी प्रतिसाद का द्यावेसे वाटतात?

In reply to by यशोधरा

शेवटचे पोस्ट असे मघा म्हणाला होता. त्यापासून थोडे बदलत आता हा प्रतिसाद लिहिल्याबद्दल धन्यवाद. उपरोधाचे वावडे नाही ना? नसावेच. म्हणून मला महान वगैरे म्हणून घेतलंत. उगा थत्ते यांच्याबाबतही खोडसाळपणा करून घेतलात. म्हणजे त्याचेही वावडे नसेलच. धाग्यावर अवांतर अधिक नको, म्हणून मी इथंच थांबतो. एक वरकड टाकण्याची संधी तुम्हाला आहे. ती घ्या.

आत्ताच बातमी बघितली... माओवाद्यांनी मलकानगिरीला जाणारा मुख्य हायवे ब्लॉक केला आहे. रेस्क्यु ऑपरेशन्स रोखणे हा हेतू आहे म्हणे. तसेच तिथे अजूनही नागरिकांची विनिलच्या समर्थनार्थ आंदोलनं चालू आहेत.

त्यांचे म्हणणे असते की सरकारने कायद्याने जावे, पण आम्हाला पटले नाही तर आम्ही कायदा हातात घेऊ शकतो कारण आम्ही सरकार नाही!
यात अजून थोडी भर टाकावी म्हणतो. हा त्यांच्या स्टेटमेंटमधला भाग -
In Orissa, there have been continuous reports of lawlessness and repressive action by the State security agencies resulting in large-scale arrests and incarceration of innocent ordinary people. Fake encounters are on the increase and even children are not being spared. We are constrained to point out that the Government of Orissa, apart from routinely denying any abuse of law by its forces, has only stepped up security operations. Ironically, the Governments seem to respond only when government officials, that too senior officers, are abducted or kidnapped.
म्हणजे यांना असं म्हणायचं आहे, की या अपहरणाला तर पर्यायच नव्हता! अरे, मग तुम्ही निषेध कशाचा करताय? आणि पुन्हा विनीलला सोडा असंही त्याच एकाच दमात कसं काय म्हणताय? मान गये बाप!
Recently in Chattisgarh when on 25th January, 2011, 5 police constables were kidnapped, there was lukewarm response by the Government and senior officials to secure their release. It was only on the demand of the human rights groups that the Maoists unconditionally released the constables.
इथे बघा अजून एक गम्मत. यांनी डिमांड केली म्हणून माओवाद्यांनी सोडलं. सरकारने माओवाद्यांच्या मागण्या मान्य करायला नकार दिला ही त्यांची लाडिक तक्रार आहे. म्हणजे अपहरण झाले पाहिजे, आणि सरकारने अपहृतांना सोडवण्यासाठी अपहरणकर्त्यांच्या मागण्या मानल्या पाहिजेत असे हे विधान आहे. सरकारने कारवाई अर्थातच करायची नाही. "has only stepped up security operations" यात कशी तक्रार आहे ते नीट बघा.
PUCL calls upon the Government of Orissa, as also the Government of India and other States where the conflict with Maoists exists, to immediately call a halt to Operation Green Hunt and other combing and paramilitary operations being conducted in the name of curbing the Maoists. Increased militarization and resort to repressive use of laws has created a climate of fear, insecurity and alienation among the local people. People’s legitimate democratic protests are also being brutally suppressed.
इथे आवाहन सरकारला आहे. माओवाद्यांना नाही.
PUCL therefore demands that the State Government does not do anything to precipitate the issue. PUCL also demands the unconditional release of the abducted officials by the Maoists.
माओवाद्यांकडे "अनकंडिशनल रिलिज" ची डिमांड करत असताना त्यांनीच माओवाद्यांची डिमांड सरकारला सांगून टाकलीय! क्या बात है! अविवेकाचा इतका नागडा नाच आजपर्यंत बघायला मिळाला नव्हता.

In reply to by आळश्यांचा राजा

विश्लेषण (का "विच्छेदन"?) एकदम आवडले आणि "दुर्दैवाने" खरे आहे. याला (त्यांच्या प्रेस रिलीजला) माध्यमांनी प्रसिद्धी दिलेली नाही, पण जर दिली असती तर, "...बिनशर्त सोडून द्या अशी मागणी केली" वगैरे, नुसत्या मथळ्यात जनतेची मते जिंकली असती. सामान्य माणूस सगळे वाचत बसत नाही त्यामुळे चालून जाते. क्या बात है! अविवेकाचा इतका नागडा नाच आजपर्यंत बघायला मिळाला नव्हता. मी कधिही न विसरू शकणारी जी काही उदाहरणे आहेत त्यात असेच एक उदाहरण हे बॉस्टन/केंब्रिजच्या एम आय टी मधे आपल्याच लोकांनी बोलावलेल्या एका व्यक्तीचे होते. ती स्वतःला कम्युनिस्ट आणि फेमिनिस्ट म्हणत होती. सरकारी पैशावर/आधारावर युनोमधे कुठल्यातरी कॉन्फरन्सला आली होती. नंतर येथे लेक्चर देत असताना, काश्मिरी जनतेवर सरकार/लष्कर कसे अत्याचार करत आहे आणि म्हणून ते कसे बिथरलेत आणि त्यामुळे आता (काश्मीरला स्वातंत्र्य देण्यावाचून) कसा पर्याय नाही. :( नंतर तेथे बसलेल्या एका व्यक्तीने जेंव्हा त्यावर आक्षेप घेत स्वतःच्या नात्यातील दाखला देत कसे अतिरेक्यांनी मारले हे सांगितले, तेंव्हा मात्र दुर्लक्ष आणि कुत्सित हास्याने त्या व्यक्तीस स्पष्ट न बोलता पण "रॅडीकल" ठरवून मोकळे...

मुंबईच्या दुर्दैवी २६/११ प्रसंगामध्ये (आपल्यासाठी) प्राण देणारे करकरे, साळस्कर, आणि कामटे साहेबांविषयी अनेक विद्वानांनी असे मत मांडले होते की त्यांनी अनाठायी शौर्य दाखवले. टॅक्ट नव्हती. हिरो बनायची हौस. नेतृत्त्वानेच प्राण गमावले तर कसे चालेल? लाख मेले तरी चालतील पण लाखांचा पोशिंदा जित्ता पाहिजे यावर विश्वास ठेवणारे शिवाजी महाराज देखील प्रसंगी स्वतःचा जीव धोक्यात घालून काही मोहीमा लीड करत असत (उदा. लाल महाल, बाजी घोरपडे प्रकरण, अफझल खान प्रकरण, इ.) हे लक्षात घेणे आवश्यक आहे. करकरे मॅडम आणि कामटे मॅडम यांनी या 'विद्वान' मतांचे आपापल्या अभ्यासू पुस्तकांमधून याचे मुद्देसूद खंडण केलेले आहे. ते वाचायची तसदी हे असली मतं मांडणारे घेतीलच असं नाही. आजच ओडिया माध्यमात एक कॉमेंट वाचण्यात आली - या कलेक्टरला आपल्या जिल्ह्याची काहीही माहिती नसावी, नाहीतर हा असा सिक्युरिटी न घेता "वॉर झोन" मध्ये गेलाच नसता. आता सरकारला याने किती मोठ्या संकटात टाकले आहे. वाईट वाटते. एवढेच सध्यापुरते. का वाईट वाटते याविषयी सविस्तर वरील काही प्रतिसादांमध्ये आलेले आहेच. संताप येत नाही. सध्या काळजी जास्त आहे. संतापाविषयी पुन्हा. विनील आणि पवित्र परत आल्यानंतर मग. एकत्रित सवडीने टंकून टाकतो. तोपर्यंत विनील आणि पवित्र यांना काही त्रास न होता सुखरुप परत यावेत ही कामना करण्याशिवाय काय हातात आहे? पीयूसील वाल्यांसारखा नतद्रष्टपणा तरी किमान न करणे हे नक्कीच हातात आहे. प्रसंग नीट समजून घ्यायचा प्रयत्न करावा. टिप्पण्या करण्याअगोदर एवढे भान राखले तरी खूप आहे. प्रश्न भावनांचा नाही. (आपल्या सर्वांच्याच) अस्तित्त्वाचा आहे. हे कुठेतरी दूर ओरीसात घडतंय, आपल्या अंगाला लागणार नाही असं समजू नये. ओरीसा तून जाणार्‍या आणि आपल्या महाराष्ट्राला जोडणार्‍या रेल्वे ऑलरेडी धोक्याच्या टप्प्यात आलेल्या आहेत. याही पलीकडे बर्‍याच लिंक्स आहेतच आहेत.

In reply to by आळश्यांचा राजा

प्रसंग नीट समजून घ्यायचा प्रयत्न करावा. टिप्पण्या करण्याअगोदर एवढे भान राखले तरी खूप आहे. प्रश्न भावनांचा नाही. (आपल्या सर्वांच्याच) अस्तित्त्वाचा आहे. हे कुठेतरी दूर ओरीसात घडतंय, आपल्या अंगाला लागणार नाही असं समजू नये. ओरीसा तून जाणार्‍या आणि आपल्या महाराष्ट्राला जोडणार्‍या रेल्वे ऑलरेडी धोक्याच्या टप्प्यात आलेल्या आहेत. याही पलीकडे बर्‍याच लिंक्स आहेतच आहेत.
अर्थात. सहमत. पण... एकूणच समाज स्वतःला सरकारपासून वेगळा मानतो की काय असा प्रश्न अनेकदा उभा राहतो. विनील आणि माझीच्याच संदर्भात नव्हे फक्त. इतरही. विनील जे काम करतोय त्यातून माओवाद्यांना मिळणारा पाठिंबा कमी होणार होता. माओवाद्यांचा प्रसार होण्यामागची जी कारणे मांडली जातात (विकासाचा अभाव, विषमता, डेफिसीट ऑफ गव्हर्नन्स वगैरे) तीच कारणे संपण्यासाठीची स्थिती (हीही एक प्रकारची कॉंक्रीट सिच्युएशनच, अर्थात उलट्या कारणांसाठीची) विनीलच्या कामातून, तो घालून देत असलेल्या कार्यपद्धतीतून निर्माण होत होती. एकीकडे विनीलसारखी मंडळी काम करतात, त्याचवेळी दुसरीकडे अशाच काही भागांमध्ये अशाच स्वरूपाचे प्रश्न सोडवण्यासाठीचे अहिंसक संघर्षही सुरू असतात. विनीलचे काम आणि/किंवा हे अहिंसक संघर्ष यांना समाजातून किती साथ मिळते? विनीलच्या कामाचे प्रतिमान (आवश्यक त्या बदलांसह) इतरत्रही सरकारने राबवावे यासाठी किंवा त्या अंहिंसक चळवळींचे प्रश्न सरकारने त्वरेने हाती घेऊन सोडवावेत यासाठी समाज काही दबाव आणतो का? बहुदा अत्यल्प प्रमाणात. माओवादासारखा प्रश्न सोडवणे ही एकट्या सरकारचीच जबाबदारी आहे, असे बहुदा स्वतःला सरकारपासून वेगळे ठेवत समाज म्हणत असावा. हे थोडं जनरलायझेशन होत असावं. पण परिस्थिती समग्रपणे पाहिली तर असेच चित्र डोळ्यांसमोर येते. आता हे सारं समाजानं समजून घ्यायचं असेल तर हे काम समाजापर्यंत पोचलंही पाहिजे. तेही किती प्रमाणात घडतं? तिथं माध्यमंही कमी पडतात. त्याबाबतचा मुद्दा वर बिपिनने लिहिला आहेच.

In reply to by श्रावण मोडक

एकूणच समाज स्वतःला सरकारपासून वेगळा मानतो की काय असा प्रश्न अनेकदा उभा राहतो. आठवते त्याप्रमाणे: कधीकाळी पंजाबात (मला वाटते ऑपरेशन ब्ल्यू स्टारच्या आधी) ८-१० निरपराध लोकांना मारले म्हणून विरोधी पक्षांनी भारतबंदची हाक दिली आणि जनतेने त्याला मनापासून साथ दिली. अर्थात असल्या बंदचे शस्त्र आता बोथट झाले आहे आणि तसे ते बोथट झाले हेच बरे आहे. जो पर्यंत आपण आपल्या लोकप्रतिनिधींना जाब विचारत नाही तो पर्यंत असेच चालू रहाणार. तो विचारायचा म्हणल्यास तुम्हा-आम्हाला (त्यात मी देखील आलो), त्याचा काहीच उपयोग होत नाही असे वाटत लांबच रहाणे पसंत करणे योग्य वाटणार... मग त्यांचे फावते. बर्‍याचदा प्रश्न विचारणे, गार्‍हाणे मांडणे देखील लांब जाउंदेत आपण मतदानाचा देखील उपहास करतो.... विनीलच्या कामाचे प्रतिमान (आवश्यक त्या बदलांसह) इतरत्रही सरकारने राबवावे यासाठी किंवा त्या अंहिंसक चळवळींचे प्रश्न सरकारने त्वरेने हाती घेऊन सोडवावेत यासाठी समाज काही दबाव आणतो का? इथे एक गंमत आहे. सरकारने विनीलला काही स्पेशल अधिकार दिले आहेत का? मला नाही वाटत. जी काही ध्येयधोरणे आहेत ती होतीच, फक्त विनीलसारख्या, "बाबू"ने त्याचा मनापासून वापर केला, इतर करत नाहीत. म्हणजे यात सरकार, पक्षी: राज्यकर्ते/राजकारणी हे प्रत्यक्ष दोषी ठरत नाहीत. त्यांच्या कुजकट राजकारणाने सगळी वाट लागली त्यामुळे त्यांना अर्थातच दोष देता येईल. पण तो वेगळा मुद्दा आहे. कधी काळी येथे (बॉस्टनमध्ये) एका केंद्रिय मंत्र्याशी एका विद्यापिठात गाठ पडली होती. त्याने आम जनतेसाठीचे अनेक कार्यक्रम सांगितले. म्हणलं मग ते दिसत का नाही. त्याची तक्रार अशी होती की केंद्राने कार्यक्रम घोषीत केले आणि पैसे उपलब्ध करून दिले तरी राज्यसरकारांनी जर ते वापरले नाहीत, त्या मोहिमांमधे सहभाग घेतला नाही तर केंद्र बळजबरी करू शकत नाही. मला वाटते कुठल्याही पक्षाचे/युतीचे सरकार केंद्रात असले तरी बर्‍याचदा हाच मुद्दा असतो. ज्यांना असे कार्यक्रम माहीत असतात आणि ते वापरायची इच्छा असते ते तसे करतात. सध्याची उदाहरणेच बघायची तर गुजरात आणि बिहार मधे विरोधी राजवटी असून देखील त्यांनी केंद्राकडून योग्य मदत घेतली... आता राहता राहीला प्रश्न समाजाचा: त्याचे उत्तर या प्रतिसादाच्या सुरवातीस आले आहेच. त्यात अधिक भर म्हणजे जे सामाजीक चळवळी करतात त्यांनी देखील सत्तेसाठी हपापलेले जसे एकमेकांची विरोधी (आणि स्वार्थी) मते दुर्लक्षित करत "common minimum program" आमलात आणतात तसेच कुठल्याही राजकारणासाठी नाही तर त्यापासून दूरच राहून समाजसेवी संस्थांनी जिथे एकमेकांना समान तळमळ आहे अशा सामाजीक प्रश्नांसाठी "common minimum program" राबवावा असे वाटते. माझ्या दृष्टीने - "भारताची एकता, समाजातील ऐक्यामधे वाढ आणि कुठल्याही हिंसेला विरोध, आणि कुठल्याही हिंसेचे समर्थन न करण्याचे एकमेकांना वचन" इतकेच डोक्यात ठेवावे. बाकी, "कोणी निधर्मी असतील, कोणी धार्मिक - ते त्यांच्या त्यांच्या घरी." हे अवघड आहे, अशक्य नाही. आणिबाणीच्या काळात असे झाले होते. त्यात नंतर केवळ एकमेकांवर दोषारोप करण्यातच वेळ घालवला गेला. त्यातून शिकून तोच प्रकार पुढे कसा रेटता येईल या संदर्भात विचार केला गेला नाही. तो येथे करता येईल असे वाटते. असो.

In reply to by विकास

इथे एक गंमत आहे. सरकारने विनीलला काही स्पेशल अधिकार दिले आहेत का? मला नाही वाटत. जी काही ध्येयधोरणे आहेत ती होतीच, फक्त विनीलसारख्या, "बाबू"ने त्याचा मनापासून वापर केला, इतर करत नाहीत. म्हणजे यात सरकार, पक्षी: राज्यकर्ते/राजकारणी हे प्रत्यक्ष दोषी ठरत नाहीत. त्यांच्या कुजकट राजकारणाने सगळी वाट लागली त्यामुळे त्यांना अर्थातच दोष देता येईल. पण तो वेगळा मुद्दा आहे.
थोडे मतांतर. विनीलला सरकारने काही विशेष अधिकार दिले नाहीत. दिले जातही नसतात, हे मान्य. पण चाकोरीबाहेर जात असे काही अधिकारी सृजनशीलतेने काही गोष्टी करतात. व्यवस्थेच्या आतच राहून, व्यवस्थेचं सडलेपण दूर करत. व्यवस्था अशी झाली आहे की, या गोष्टी झाल्या की त्या ठळकपणे समोर येतातच. विनील ते करत होता. गव्हर्नन्सचा डेफिसीट भरून काढण्यासाठी ही मंडळी निम्म्याहून अधिक रस्ता चालण्याची तयारी ठेवतात. चालतातही (अगदी शब्दशःही). त्यातूनच जनसंपर्कसारख्या मोहीमा आकाराला येतात. त्या औपचारिक रहात नाहीत. त्या मोहीमांचे हेतू स्पष्ट असतात आणि हे अधिकारी अशा हेतूंसाठी हेतूपूर्वकच काम करतात. त्याचे प्रतिमान इतकेच मला म्हणायचे आहे. आरा यांनी दिलेले इतर दुवे पाहिले. एकूण, विनीलचे (आणि माझीचेही) अपहरण ही एक संधी आहे. माओवाद आणि एकूणच हिंसक चळवळींना विरोध करणाऱ्यांची किती ताकद अशा गोष्टींच्या मागे येते त्यावर बरेच काही अवलंबून राहील. अन्यथा, विनीलचे अपहरण ही आणखी एक घडून गेलेली घटना ठरेल.

In reply to by श्रावण मोडक

"...पण चाकोरीबाहेर जात असे काही अधिकारी सृजनशीलतेने काही गोष्टी करतात. व्यवस्थेच्या आतच राहून, व्यवस्थेचं सडलेपण दूर करत...." ~ हे छान सांगितले तुम्ही श्रा.मो. -- इथे थोडे विषयांतर जरी होत असले तरी श्री. विनिल कृष्णा (तसेच श्री.अजित जोशी) यांच्यासारखे कल्पक युवक प्रशासनच्या चौकटीत राहूनदेखील जितकी समाजोपयोगी कामे करीत असतात त्याबद्दल सरकारी चौकटही त्यांचे ऋणी राहिलच. इथे उदाहरण देत आहे ते कोल्हापूरचे जिल्हाधिकारी श्री.लक्ष्मीकांत देशमुख यानी अत्यंत प्रभावीपणे राबविलेल्या 'सेव्ह द बेबी' अभियानाचे. गेल्या दशकात कोल्हापूर जिल्ह्यात वाढलेल्या 'गर्भलिंग तपासणी केन्द्रा' (जरी शासनाने नंतर अशा लिंग तपासणीवर कायद्याने बंदी आणली असली तरी छुपे प्रकार घडत होतेच) मुळे जिल्ह्यात मुलींचे प्रमाण १०००:८३२ असे धक्कादायक झाले होते. 'सायलेन्ट ऑब्झर्व्हर प्रोग्राम' अंतर्गत श्री.देशमुख यानी जिल्ह्यातील सर्व सोनोग्राफी सेन्टर्स 'कलेक्टर ऑफिस ऑनलाईन झोन' मध्ये सक्तीने रजिस्टर करवून घेतली...आणि जिल्ह्यातील सर्व २३२ अल्ट्रासाऊंड स्कॅनिंग मशिनरी सेन्ट्रल कॉम्प्युटरला जोडली गेली. त्यामुळे जिल्ह्यात कुठेही सोनोग्राफीसाठी स्त्री आणली गेली की तिची माहिती त्याच क्षणाला कलेक्टर ऑफिसच्या रेकॉर्डला येऊ लागली. प्रत्येक सोनोग्राफ इथल्या तज्ज्ञ डॉक्टरांच्या टीमकडून तपासल्यानंतर ज्या गावातून तो डेटा येई त्या संबंधित महिलेवर 'गर्भलिंग' तपासणीसंदर्भात कोणतीही 'गैर' कारवाई तिथल्या डॉक्टराकडून तसेच त्या महिलेल्या सासुरवाडीकडून होणार नाही याची शासकीय पातळीवर खबरदारी घेतली जाऊ लागली. श्री.लक्ष्मीकांत देशमुखांच्या या योजनेचे प्रभावी फळ त्याच वर्षी समोर आले आणि सन २००८ मध्ये असलेला मुलांचा ८३२ चा आकडा २००९ मध्ये ८९०...म्हणजे जवळपास १०००-९०० असा झाला. एक कल्पक जिल्हाधिकारी आपल्या अधिकाराच्या कक्षेत राहूनदेखील (प्रसंगी चाकोरीबाहेर जाऊन) अशी सृजनशील कार्य करतो त्यावेळी त्याच्या पाठीशी समाजातील सर्वच घटक उभे राहतात. श्री.विनिल याना मिळत असलेल्या पाठिंब्याची हीच जातकुळी आहे. इन्द्रा

In reply to by श्रावण मोडक

एकूणच हिंसक चळवळींना विरोध करणाऱ्यांची किती ताकद अशा गोष्टींच्या मागे येते त्यावर बरेच काही अवलंबून राहील. श्रामो, तुमचा आशावाद बघीतला. मीसुद्धा आशावादीच आहे. परन्तु तुम्ही आधी उल्लेख केलेल्या NGOs, तथाकतीत मानवतावादी इत्यादी ठरावीक ठिकाणीच आवाज उठवतात. (मी यादी द्यायची गरज नाही.) आता ३ दिवस होउन गेले. अजून कोणत्याही NGOs, तथाकतीत मानवतावादी इत्यादींनी या प्रकारात आवाज उठवला नाही. ज्या कोणी निवेदने छापुन आणली त्यांनी ढोलकी वाजवली आहेत. एकीकडे माओवाद्यांना/नक्शलवाद्यांना ओलीसांना सोडुन द्यायचे आवाहन करायचे (त्या प्रकाराबद्दल निषेध नाही केलेला), दुसरीकडे सरकारला त्यांच्या विरूध्दची कारवाई थांबवायचे आवाहन करायचे. त्यामुळे मलातरी असे वाटते की तुमचा आशावाद या प्रकरणात फोल ठरणार.

In reply to by चिंतामणी

मानवतावादी संस्था-संघटना आणि एनजीओज क्षणभर बाजूला ठेवूया (कारण, त्या का उभ्या रहात नाहीत, असा माझाच मूळ प्रश्न आहे). त्यांच्यात समाविष्ट नसणारा मोठा समुदाय बाहेर असतो. तोही इथं पुढं आला पाहिजे आणि फक्त ओरिसातील नव्हे तर ओरिसाच्या बाहेरही. ओरिसात तो उभा राहतोय. अगदी काल-परवा आदिवासींच्याच मोठ्या समुहाने विनीलच्या सुटकेसाठी प्रयत्न सुरू केले हे कळताच माओवाद्यांनी त्याला पुन्हा एका खेड्यातून दुसरीकडे हलवले, असे एक वृत्त आजच वाचले. त्या आदिवासींपलीकडे "विनील आमचा हिरो" असे म्हणत किती जण उभे राहतील, असा माझा मुद्दा आहे.

In reply to by विकास

म्हणूनच माझा नेत्यांकडे पत्रे लिहिण्यावर विश्वास आहे. पण दु:खाची गोष्ट अशी कीं खासदारांना 'sansad.gov' या 'आयडी'ला पाठविलेली प्रत्येक ई-मेल बाउन्स होऊन परत येते. हा फक्त खासदारांनी आपापसात 'मेला-मेली' करण्यासाठीचा आयडी असावा! मग कुठे लिहायचे हे कळत नाहीं. फक्त पंतप्रधान आणि राष्ट्रपतींना पाठविलेले निरोप कमीत कमी बाउन्स होत नाहींत. दहातल्या एकाद्या निरोपाचे उत्तर पंतप्रधानांच्या कार्यालयातून येते. प्रतिभाताईंचा ई-मेल आयडी 'one-ended bag' च वाटते. पण मी लिहीत असतो. कुणाला जास्त माहिती असेल तर द्यावी ही विनंती!

In reply to by श्रावण मोडक

एकूणच समाज स्वतःला सरकारपासून वेगळा मानतो की काय असा प्रश्न अनेकदा उभा राहतो. विनील आणि माझीच्याच संदर्भात नव्हे फक्त. इतरही.
एकीकडे विनीलसारखी मंडळी काम करतात, त्याचवेळी दुसरीकडे अशाच काही भागांमध्ये अशाच स्वरूपाचे प्रश्न सोडवण्यासाठीचे अहिंसक संघर्षही सुरू असतात. विनीलचे काम आणि/किंवा हे अहिंसक संघर्ष यांना समाजातून किती साथ मिळते?
याचं कारण मला वाटतं मिसप्लेस्ड प्रायॊरिटीज. सर्वांच्याच.

In reply to by आळश्यांचा राजा

राजासाहेब, मी कामटेबाईंचे पुस्तक वाचले आहे, पण करकरेबाईंनी पुस्तक लिहिले आहे याची कल्पनाच नव्हती. मी एक दिवस पुण्यात आहे. लगेच कळले तर आणेन येता-येता!

http://www.youtube.com/watch?v=_11_ufkDP4o इथे मलकनगिरीतील आदिवासी विनीलच्या बाजूने कसे उभे आहेत ते बघायला मिळेल. हा त्याच कट ऑफ भागातला व्हिडो आहे. याला म्हणतात नक्षल "वादा" विरुद्धचा लढा. एक आदिवासी मध्यम वयीन बाई विनीलचा उल्लेख "माझा बाप" असा करतेय. माझ्या बापाला घेतल्याशिवाय मी जाणार नाही म्हणतेय. मी त्याच्याशिवाय कशी जगू म्हणतेय.

In reply to by आळश्यांचा राजा

वरील पोस्ट बद्दल आणि http://www.misalpav.com/node/16880साठी सुद्धा. एव्हढे सगळे लिहून/दाखवून झाले तरी विचारवंताच्या (?) मतात फरक पडणार नाही हे येथील चर्चेवरून स्पष्ट दिसत आहे. विचारवंताच्या (?) मतात फरक पडो ना पडो, आदीवासीलोकांचा सत्याग्रह आणि भावना बघून झाल्यावर "ते डिस्ट्रीक्ट कलेक्टर आहेत", "त्याना गांभीर्य नाही" इत्यादी शेरेबाजीचा विसर पडला.

विनीलचे बॅचमेट आणि मलकनगिरी जवळच्याच कोरापुट जिल्ह्याचे कलेक्टर राजेश पाटील यांचे मन्तव्य इथे आहे. http://onlinenews1.lokmat.com/php/detailednews.php?id=NashikEdition-6-4…

असेच काही वेडे लोकं फिरत असतात आजूबाजूला, एक आहेत मनोज स्वेन. जालावर फिरताना विनील कृष्णा यांची, नक्षलवाद्यांनी पळवून नेण्याच्या काही दिवस आधीचीच आणखी एक गोष्ट सापडली. आणि नक्षलवाद्यांसाठी ही एक कविता.

आत्ताच आलेल्या बातमीनुसार विनील आणि पवित्र यांची सुटका झाली आहे.

अरे वा! सुरेख बातमी! सर्वांचे अभिनंदन. त्यांची सुटका ही जमेची बाजू झाली. पण ती बिनशर्त झाली कीं कांहीं देवाण-घेवाण झाली आणि असल्यास ती काय आणि किती हे लवकरच बाहेर येईलच. एकंदरीत सज्जनांची दुनिया आहे असे दिसले.....अशा घटनांमुळे या सर्व प्रामणिक अधिकार्‍यांना नवा जोम येईल व या नव्या nucleation मुळे अशा अधिकार्‍यांच्या संख्येत वाढ होईल यात शंका नाहीं. ही एका नव्या क्रांतीची सुरुवात आहे, नाहीं का? जय हो!

In reply to by सुधीर काळे

त्यांची सुटका ही जमेची बाजू झाली. पण ती बिनशर्त झाली कीं कांहीं देवाण-घेवाण झाली? अधीकृतरीत्या सांगण्यात आले की १४ पैकी ६ मागण्या मान्य करण्यात आल्या आहेत. अनधीकृत काय काय होउ शकते हे मी तुम्हाला सांगायची जरूरी नाही. सकाळच्या बातमीत तर सगळ्या मागण्या मान्य केल्याचे म्हणले आहे. माओवाद्यांच्या सर्व मागण्या मान्य भुवनेश्‍वर - ओरिसातील मलकांगिरीचे अपहृत जिल्हाधिकारी आर. व्ही. कृष्णा आणि कनिष्ठ अभियंता पवित्र मांझी यांच्या सुटकेसाठी माओवाद्यांनी ठेवलेल्या सर्व 14 मागण्या दोन टप्प्यांत पूर्ण करण्याचे राज्य सरकारने मान्य केले आहे. तसेच कारागृहात असलेल्या श्रीरामल्लू श्रीनिवासल्लू यांच्यासह बारा माओवाद्यांची आज सुटका करण्यात आली आहे. दरम्यान, अपहृत जिल्हाधिकारी व अभियंता यांची माओवाद्यांच्या तावडीतून येत्या 48 तासांत सुटका होण्याची शक्‍यता आहे. http://www.esakal.com/esakal/20110223/5576126469976454026.htm

सुटका झाली हे उत्तम. आता पुढे? सगळे जिल्हाधिकारी पोलिसफाट्यात फिरणार, रिमोट भागांमधे जाणार नाहीत?

In reply to by आळश्यांचा राजा

हा विषय इथे संपू नये. आता सुटला आहात तर हे नविन आदेशाप्रमाणे काम करा, म्हणत पुन्हा अधिकार्‍यांनी व जनतेला फक्त ऑफीसमधे अथवा परवानगी घेउन अधिकृत ठिकाणीच भेटायचे असे आदेश काढले नाही म्हणजे मिळवले. दोघांच्या सुटकेचा आनंद आहे. तरीही हा विषय इथे संपू नये. वृत्तपत्रांनी हा प्रश्न, अधिकार्‍यांचा आदिवासी जिल्हातील जनसंपर्क, प्रवास. अपहरण, वाटाघाटी याचे धोरण तसेच यावेळी नेमके काय काय घडले हे सत्य समोर आणावे. सर्व प्रशासन जर अधिकारी विनिल प्रमाणे वागले व पोलीस मिलीटरी यांच्या सहाय्याने नक्षलवाद्यांचा बिमोड केला तर उत्तम. किमान पाच वर्षात हा बीमोड व्हावा. अर्थात सर्व नियोजनबद्द व ठोस फलीत निश्चीत करुनच ही देशव्यापी कारवाई व्हावी. प्रशासनाला या कार्यात शुभेच्छा.

काल मला इमेल मधून ही लिंक आली. http://www.mimarathi.net/node/5330 त्यात श्रामो म्हणतात ओरिसातील मलकनगिरीचे जिल्हाधिकारी आर. विनील कृष्णा यांचे, त्यांच्यासमवेत असणारे अभियंता पवित्र माझी यांच्यासह, माओवाद्यांनी अपहरण केले. विनील यांचे मलकनगिरीतील काम असे आहे, की त्यांच्या सुटकेसाठी माओवाद्यांचा प्रभाव असूनही आदिवासीच रस्त्यावर आले आहेत. फक्त आदिवासीच नव्हे, तर सर्वदूर समाजही. नेमकं काय घडतं आहे तिथं? सुरक्षा न घेता विनील जंगलात गेले, हा आता मुद्दा होऊ पाहतोय. खरंच त्यांचं चुकलं? ओरिसातच आयएएस अधिकारी असणारे सचिन जाधव यांनी विनिलला उद्देशून लिहिलेलं हे खुलं पत्र. त्यांच्या परवानगीनेच येथे प्रसिद्ध करतो आहे. (सविस्तर लेख श्रामोंनीच येथे ठेवावा ही विनंती) हा लेख म्हणा वा पत्र माहिती मला इमेल मधुन मिळाली म्हणून हा निषेध. आता पुर्ण पत्र येथे ठेवा.

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

नजर चूक झाली. काल दिवसभर रेषेवर (Online) नव्हतो. आणि ईमेल आधी वाचल्याने मला वाटले की येथे तो ठेवला नाही. माफी असावी. संपादक मंडळाला विनंती की तो प्रतीसाद काढून टाकावा.

विनीलची अद्याप सुटका झालेली नाही. त्याची प्रकृती ठीक आहे हीच काय ती दिलासादायक बातमी. माझे विचारचक्रही खुंटले आहे.

In reply to by श्रावण मोडक

+१

विनील कृष्णा यांची सुटका झाली.

विनील कृष्णा यांची सुटका झाली.

चांगली बातमी! सारं काही ठीक?