Skip to main content

डोक्यात तिडीक आणणारे मिपाकर - भाग ६

लेखक अवलिया यांनी शुक्रवार, 18/02/2011 18:58 या दिवशी प्रकाशित केले.
एक रिकामी जागा बघून मी टेकतो न टेकतो तर दाण दाण दाण असा पावलांचा आवाज करीत प्रोफेसरसाहेब वर्गात शिरले. त्यांच्याहि हातात असलेलं ते जाडजूड पुस्तक त्यांनी धाडकन त्यांच्या पुढ्यातल्या टेबलावर आदळलं. सगळ्या वर्गाकडे बॅटसमन जशी फिल्डींग बघून घेतो तशी नजर फिरवली. आणि अतिशय घनगंभीर आवाजात बोलायला सुरवात केली, "धिस इज ऑरगॅनिक केमिस्ट्री ९०१ क्लास!! फॉर दोज ऑफ यू हू डिड नॉट नो दॅट, धिस इज द राईट टाईम टू गेट अप ऍन्ड गेट लॉस्ट!!" कुणीच उठलं नाही. बहुदा सगळ्यांना आपण कुठे आलोय हे माहिती असावं!! "गूड!! माय नेम इज जॉर्ज कॉल्डवेल!! आय हॅव बीन टीचिंग धिस क्लास फोर द लास्ट टेन इयर्स! यू विल कॉल मी जॉर्ज!! इफ आय हियर यू कॉलिंग मी एनिथिंग एल्स, प्रोफेसर ऑर समथिंग एल्स, आय विल बीट द क्रॅप आउट ऑफ यू!!!" आयला, हा तर फुल धतिंग प्रोफेसर दिसतोय, माझ्या मनांत आलं! "पण तुम्ही आम्हांला काय हाक मारणार?" एक अमेरिकन विद्यार्थिनी चिवचिवली. तिच्याकडे अत्यंत तुच्छतेने बघितल्यासारखं करीत जॉर्ज म्हणाले, "दॅट इज टोटली अनइंपॉर्टंट फॉर मी. मी तुम्हाला कदाचित तुमच्या प्रथम नांवाने हाक मारीन, किंवा त्यावेळेस माझा मूड जसा असेल त्याप्रमाणे एखादं टोपणनांवही ठेवीन!! पण एक नीट ध्यानात ठेव, जसजसा हा कोर्स पुढे जात राहील तसतसं मी तुम्हाला काय हाक मारली यापेक्षा मी जर तुमचं नांवच घेतलं नाही तर तुम्हाला जास्त आनंद होईल."
अधिक वाचा - http://misalpav.com/node/2698 ***
"शिट! नाउ वुई आर गोईंग टू गेट वेट!!!", अलीशिया "व्हाय? वुइ आर इन द कार" "नॉट हियर डमी! हाऊ आर गोईंग टू वॉक फ्रॉम द पार्किंग लॉट टू द बिल्डिंग?" "यू हॅव ऍन अम्ब्रेला इन युवर डिकी" "व्हॉऽऽऽऽट?", करकच्चून आवाज करत कार थांबली, "व्हॉट द हेल आर यु टॉकिंग अबाऊट?" "आय सॉ ऍन अम्ब्रेला इन युवर डिकी" "फर्स्ट ऑफ ऑल, आय डोन्ट हॅव अ डिकी." अलीशिया रागाने लालबुंद होऊन ओरडली, "ऍन्ड सेकंडली, हाऊ कॅन वन हाईड ऍन अम्ब्रेला इन अ डिकी?" ती का चिडली तेच मला समजेना... "आय सॉ द अम्ब्रेला व्हेन यू पुट अवर बॅग्ज इन द डिकी अर्लियर", मी. "अवर बॅग्ज इन द....! ओ, यु मीन द ट्रंक?" "येस!" "व्हाय डू यू कॉल इट अ डिकी? ऍन्ड देन व्हॉट डू यू कॉल दॅट?" तिने गाडीच्या पुढे बोट करून विचारलं... "अ बॉनेट!" "अ बॉनेट?" "येस, एव्हरी कार हॅज अ बॉनेट ऍन्ड अ डिकी!!", मी. अलीशिया एकदम खोखो हसत सुटली. तिच्या गडगडाटी हसण्याने कारची केबिन भरून गेली. बराच वेळ गेला तरी तिचं हसणं काही थांबेना. माझ्याकडे बघत हसू असह्य झाल्यामुळे ती खोकत खोकत हसत होती. काही वेळाने डोळ्यातून वहाणारं पाणी पुसत ती म्हणाली, "हियर इन अमेरिका, द फ्रंट ऑफ द कार इज कॉल्ड द हूड ऍन्ड द स्टोरेज स्पेस इन द बॅक इज कॉल्ड द ट्रंक!!!" "आय सी!!" "हियर वुई कॉल दॅट अ डिकी", माझ्या दोन्ही मांड्यांच्या मध्ये निर्भयपणे बोट दाखवून निर्देश करत ती म्हणाली, "ऍन्ड धिस वी कॉल अ व्हजायना", तसाच स्वतःकडे निर्देश करत ती म्हणाली....
अधिक वाचा - http://misalpav.com/node/5308 *** मंडळी वरती जे दोन परिच्छेद दिले आहेत ते सदर लेखकाची क्षमता दाखवुन देण्यास पुरेसे असले तरी तो केवळ एवढेच लिहु शकतो असे नाही. त्याचे अधिक लेखन http://misalpav.com/newtracker/401 इथे वाचता येईल. बरोबर आहे मंडळी, हा लेखक आहे पिवळा डांबिस :) खरं तर परिच्छेद देतांना मी काही तरी टिपण्णी करत असतो. पण या लेखकाच्या लेखांवर काही भाष्य करण्याची माझी लायकी नाही. अनेक सुंदर सुंदर लेख, विडंबने आणि मजेशीर प्रतिसाद देणारा, नर्म विनोदाची झालर देत हसरे करणारा पिवळा डांबिस आमचा या आठवड्याचा "डोक्यात तिडीक आणणारा मिपाकर" आहे. कारण सरळ आहे हल्ली बरेच दिवसांत त्याने लेख लिहिला नाही. हरकत नाही. आमच्या पेक्षा वयाने मोठे असलेल्या पिवळा डांबिस यांचा लेखासाठी एकेरी उल्लेख केला असला तरी आम्हाला ते आदरणीय आहेत त्यामुळे त्यांचा सत्कार आम्ही पुणेरी पगडी, धोतर जोडी आणि एक बंद गिफ्ट पॅक देऊन करत आहोत. जाणकारांना त्या पॅक मधे काय असेल ते समजले असेलच. ;) त्यांना हात जोडून विनंती की ह्या भेटीचा स्विकार करावा आणि लवकरच एक फक्कडसा लेख लिहावा ! पुणेरी पगडी धोतर जोडी गिफ्ट पॅक दुकानांचे पत्ते पुणेरी पगडी - http://puneripundit.com/wp-content/themes/hemant/images/pagadi2.png धोतर जोडी - http://www.stylesindia.com/images/DHM03_b.jpg गिफ्ट पॅक - http://www.php2k.com/blog/200TutorialPhotoshopChristmasGiftPackLog_8945… क्रमशः (पुढील मिपाकर पूढल्या आठवड्यात - ज्यांना सत्कार नको असेल त्यांनी खरड व्यनीतुन सुचना देणे म्हणजे यादीतुन नाव कटाप करता येईल. यादी लै मोठी आहे)
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 5883
प्रतिक्रिया 18

प्रतिक्रिया

In reply to by बिपिन कार्यकर्ते

हेच म्हणतो. एक यादी - रामदास, बिका, स्वाती दिनेश, धमाल मुलगा, परा...

In reply to by श्रावण मोडक

काकानु उपास कधी सोडताय?

In reply to by गणपा

लै दिस झाल काका...लिवा आता झक्कास काहीतरी

In reply to by निखिल देशपांडे

(सहमत)बेसनलाडू

In reply to by बेसनलाडू

+५. अगदीच सहमत. (हिरवा पांडीस)

या यादीत सुलेशबाबूंचं नाव कधी येते आहे त्याची वाटच पाहत होते.. सुलेशबाबू, लेखणीवरचे टोपण काढा, कळफलकावरची धूळ झटका.. येऊ दे आता काहीतरी फर्मास.. स्वाती

>> ज्यांना सत्कार नको असेल त्यांनी खरड व्यनीतुन सुचना देणे म्हणजे यादीतुन नाव कटाप करता येईल. यादी लै मोठी आहे >> स्वतः चा सत्कार हवा असल्यास काय करावे ते कळवावे

In reply to by शुचि

स्वतः चा सत्कार हवा असल्यास काय करावे ते कळवावे
अवांतर: बंगाली भाषेत 'सत्कार' या शब्दाचा अर्थ 'अंत्यविधी' असा होतो.

In reply to by पंगा

अवांतर: बंगाली भाषेत 'सत्कार' या शब्दाचा अर्थ 'अंत्यविधी' असा होतो. कानडीत "कल्याण" याचा अर्थ लग्न

धन्यवाद अवलियाजी! चांगला उपक्रम. पिडांचे काही जुने लेख या निमित्ताने वाचता आले. मजा आली. त्यांनी पुन्हा लिहीते व्हावे ही सदिच्छा!

पिडांकाकाला पुणेरी पगडी द्यायची का ठाणेरी शाल द्यायची हे अगोदर ठर्वा. तो साला दोन्ही गावात पाय ठेवून वावरत असतो

हल्ली तुम्ही प्रतिक्रिया द्यायला पण मिपावर येत नाय काय?