जेपर्डी ह्या प्रश्नोत्तराच्या (खरे तर उत्तर-प्रश्नाच्या) कार्यक्रमात कालपासून एक आगळा-वेगळा प्रयोग सुरू झाला आहे. एरवी ह्या कार्यक्रमात तीन स्पर्धक व्यक्ती भाग घेतात. परंतु, १४, १५ आणि १६ फेब्रुवारी रोजी होणार्या कार्यक्रमांत दोन व्यक्तींसमवेत IBM ने बनवेली WATSON नावाची संगणक प्रणाली भाग घेणार आहे.
जगातील विविध विषयांवरील अब्जावधी बाईट्सचा विदा ह्यात भरलेला आहे. प्रश्न समोर येताच त्याचे पृथःकरण करून, विदा धुंडाळून उत्तर काढण्याचे काम ही प्रणाली करील.
कालच्या अपूर्ण राहिलेल्या कर्यक्रमाच्या अखेरीस, ही प्रणाली आणि एक स्पर्धक ५००० डॉलरची रक्कम मिळवून आघाडीवर होते. तर दुसरा स्पर्धक किंचित मागे होता. १६ तारखेला अंतीम विजेता ठरवला जाईल.
ह्यापूर्वी संगणक प्रणालीकडून बुद्धिबळ खेळण्याचे प्रयत्न झाले होते. परंतु, हा प्रकार मला अधिक आव्हानात्मक वाटला. कार॑ण ह्यात मानवी भाषेत विचारलेल्या प्रश्नाचे पृथःकरण करून मग उत्तर काढले जाते.
मानवाने केवळ देव आणि दानवच नव्हे तर, यंत्रेदेखिल बनवली आहेत. म्हणून ह्यात क्वचित यंत्राने मानवावर मात केल्याचे दिसले तरी ही यंत्रे शेवटी मानवी बुद्धीचाच अविष्कार आहेत, हे विसरता येणार नाही!
वाचने
3040
प्रतिक्रिया
6
मिसळपाव
प्रतिक्रिया
उत्सुकता
कालच ह्याबद्दल लिहावे असे
होय, आम्हीही पाहतोय हा
वॉटसन
मला तर मी आणि माझा पीसी एकत्र
दुसरा दिवस