✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

प्रांतांच्या गोष्टी - ६ - दि लाइफ अ‍ॅण्ड टाइम्स ऑफ सुन्द्री कुंभार

आ
आळश्यांचा राजा यांनी
Sun, 02/13/2011 - 23:04  ·  लेख
लेख

Book traversal links for प्रांतांच्या गोष्टी - ६ - दि लाइफ अ‍ॅण्ड टाइम्स ऑफ सुन्द्री कुंभार

  • ‹ प्रांतांच्या गोष्टी -५ नोकरशाहीतील बंधुता!
  • Up
  • प्रांतांच्या गोष्टी ७ - ‘संवेदनशील’ प्रशासन! ›
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
9719 वाचन

💬 प्रतिसाद (24)

प्रतिक्रिया

नोंदी

श्रावण मोडक
Mon, 02/14/2011 - 00:23 नवीन
शिलाई मशीन वगैरे वाचून नोंदी आठवल्या. मग सुन्द्री दिसली तेव्हा पिंजारी आठवून गेली... पुढे आठवणीच आठवणी. हे लेखन अपुरे आहे. सुन्द्रीचं काय झालं हे कळलं. ते करणाऱ्यांचं आणि तिच्यावर तशी वेळ येऊ देणाऱ्यांचंही काय झालं? तेही कळवा. त्यांचं काही तरी झालं पाहिजे ना?
  • Log in or register to post comments

पिंजारीच्या नोंदी आणि आठवणीच

आळश्यांचा राजा
Mon, 02/14/2011 - 21:54 नवीन
पिंजारीच्या नोंदी आणि आठवणीच आठवणींच्या गोंधळातून काहीतरी आमच्या वाट्याला येऊ द्यात!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रावण मोडक

२४ तासात

सहज
Mon, 02/14/2011 - 06:53 नवीन
ज्या दिवशी मलिक गेला लगेच सुन्द्रीपण गेलेली दिसते. नक्षलवाद्यांचे न्यायदान जितके तत्पर तितके शासनाचे असते तर.. असो. चालायचेच.
  • Log in or register to post comments

तत्पर न्यायदान

आळश्यांचा राजा
Mon, 02/14/2011 - 21:53 नवीन
नक्षलवाद्यांचे न्यायदान जितके तत्पर तितके शासनाचे असते तर..
नाहीये तेच बरं आहे सहजराव! एन्काउंटरमध्ये आपला पण नंबर लागला असता कधीतरी!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सहज

न्यायदान

सहज
Mon, 02/14/2011 - 22:00 नवीन
न्यायदान मधे तुम्हालाही फक्त एन्काउंटरच दिसले? असो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आळश्यांचा राजा

'असो' नको

आळश्यांचा राजा
Mon, 02/14/2011 - 22:12 नवीन
'असो' नको. सविस्तर बोला. नक्षल्यांनी केले त्याला तुम्ही न्यायदान हाच शब्द वापरलात. त्या अर्थाने न्यायदान म्हणजे एन्काउंटर शिवाय काय?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सहज

पाच वर्षाच्या मुलाचा गळा

सहज
Mon, 02/14/2011 - 22:23 नवीन
कापला याला कोणी खरेखुरे न्यायदान म्हणेल का? तसा अर्थ लावायचा का? मला हे म्हणायचे होते की ज्या वेगाने नक्षल त्यांना 'योग्य 'वाटते ती कृती करतात. जर कल्याणकारी शासनाने चांगल्या कामाचा, न्याय्य कामाचा वेग ठेवला तर अशी परिस्थिती यायची नाही. इतकेच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आळश्यांचा राजा

समजले

आळश्यांचा राजा
Mon, 02/14/2011 - 22:37 नवीन
तुम्ही न्यायदान कशाला म्हणताय हे समजले आहे. ('असो' ऐवजी आता जे म्हणालात ते ऐकायचे होते. म्हणून उसकवले. ;-))
जर कल्याणकारी शासनाने चांगल्या कामाचा, न्याय्य कामाचा वेग ठेवला तर अशी परिस्थिती यायची नाही. इतकेच.
कल्याणकारी शासनाने चांगल्या , न्याय्य कामाचा वेग ठेवला पाहिजे इतपर्यंत पूर्ण सहमती. त्यापुढे अधोरेखीत भागाशी पूर्ण असहमती. या परिस्थितीचा आणि चांगल्या, न्याय्य कामाचा/ कामाच्या वेगाचा असलाच तर फारच सुपरफिशियल संबंध आहे. नक्षल्यांना चांगल्या आणि न्याय्य कामाशी काहीही देणेघेणे नाही. असलेच देणेघेणे, तर अशी कामे होऊ नयेत हाच त्यांचा प्रयत्न असतो. चांगली आणि न्याय्य कामे झाली तर त्यांचे दुकान बंद होणार नाही का? त्यामुळे अशी परिस्थिती ही येणारच येणार. कल्याणकारी कामे केली तरी, आणि नाही केली तरी. (कल्याणकारी कामे करु नयेत असे मी म्हणत नाही.) (केवळ) विकास नाही, म्हणून नक्षलवाद आहे ही धारणा मला मान्य नाही. नक्षलवाद आहे कारण नक्षलवाद आहे. (विकास असला तरीही नक्षलवाद असू शकतो.)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सहज

लेख उत्तम - पुरेसा नाही

धनंजय
Tue, 02/15/2011 - 04:30 नवीन
नक्षलवाद आहे कारण नक्षलवाद आहे. (विकास असला तरीही नक्षलवाद असू शकतो.)
हे अनुभवाचे बोल आहेत, म्हणून निश्चित विचारार्ह आहेत. पण ही कारणमीमांसा पुरेशी नाही. नक्षलवाद हा पश्चिम बंगाल राज्याच्या नेपाल-सीमाभागात सुरू झाला, आणि एका थेट (पण सर्वव्यापी नाही, अशा) पट्ट्यात बिहार-झारखंड ... छत्तिसगढ, ... रायलसीमा... असा पसरला आहे. विकीपेडियावरील नकाशा असा : Image removed. काही म्हटले तरी हा प्रसार व्हायला थोडा तरी वेळ लागला. (२०-३० वर्षांचा कालावधी). "जिथे आहे तिथे नक्षलवाद आहे - धोरणांशी संबंधित नाही" हे खरे असले, तरी "यापुढे तो कुठल्या भागात पसरायची शक्यता आहे?" हा प्रश्न मनात उद्भवतोच. ज्या ठिकाणी आज नक्षलवादाचा उद्रेक फार नाही, त्या ठिकाणी भविष्यात उद्रेक होऊ नये, याबद्दल काही धोरणे आखता येतील काय? हा प्रश्न सुद्धा मनात आला पाहिजे. (हा प्रश्न त्या मधल्या २०-३० वर्षांदरम्यानच्या काळच्या केंद्रसरकारच्या, बिहार-ओरिसा-मप्र-आंध्रच्या प्रशासकांच्या लक्षात यायला हवा होता, असे वाटते ना? मग आज विदर्भ-मराठवाडा-चंबळखोरे-नर्मदाखोरे येथील प्रशासकांच्या मनातही आलाच पाहिजे. या सर्व ठिकाणी या क्षणी फारसा नक्षलवाद नाही, त्यामुळे "नक्षलांना कैद करून दीर्घ मुदतीचा कारावास द्या" हे तत्त्व लागूच नाही. तरी कुठलीशी कारणमीमांसा हवी आहे. थोडक्यात १. "नक्षल असतात म्हणून नक्षल असतात" या तत्त्वावरून आपल्याला असे भाकित करता येईल काय - "जितके मुळात नक्षली प्रवृत्तीचे लोक होते, ते आतापावेतोवर झाले आहेत. नक्षलवाद पसरण्याची भीती नाही. फक्त रंगीत पट्ट्यात काबू करण्यावरच लक्ष केंद्रित केले पाहिजे." २अ. शिवाय दूरस्थ असे कुठले स्वप्न आहे - "या पट्ट्यात नक्षली असणार म्हणजे असणार, धोरणे काही का असेना, किती का कैदेत घालेना, नव्या बालका-युवकांपैकी या प्रवृत्तीचे कोणी असेलच" असे असेल, तर या पट्ट्यात कधी सैल नियंत्रणाची लोकशाही (म्हणजे आजकाल पुणे जिल्ह्यात किंवा गोव्यात आहे तितपत - परिपूर्ण नाही, तरी तशी बरी) कधी येण्याची शक्यता/आशा मनातून काढूनच टाकावी काय? २ब. भारत शासनाने या पट्ट्यात विशेष-घट्ट नियंत्रणाची वेगळी राज्यव्यवस्था दीर्घकाळासाठी (तात्पुरती अशी व्यवस्था आहे, असावीही) वसवावी अशा प्रकारे या पट्ट्याबाहेर राहाणार्‍यांनी प्रयत्न करावे का? - - - अरे! हे सांगायचे राहायला नको. :-) लेख-कथाप्रसंग थरारक आणि वाचनीय आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आळश्यांचा राजा

ग्रे शेड्स

आळश्यांचा राजा
Tue, 02/15/2011 - 09:15 नवीन
हे अनुभवाचे बोल आहेत, म्हणून निश्चित विचारार्ह आहेत. पण ही कारणमीमांसा पुरेशी नाही.
कारणमीमांसा पुरेशी नाही हे बरोबर आहे. अनुभवाचे बोल आहेत म्हणून विचारार्ह असले, तरीही माझ्या मतांमागे अनुभवापेक्षा एकंदर निरीक्षण जास्त आहे. अनुभव (पक्षी - थोडा अधिक जवळचा संपर्क, एवढेच) नसेल तरीही थोड्या विचारांती काही गोष्टी लक्षात येतात. दि कलर ऑफ ट्रुथ इज ग्रे. कुठलीही एकच कारणमीमांसा आजिबात पुरेशी नाही. इथे मी काही खरडले होते - त्यावेळी मनात आले तसे. त्यातही काही भर घालायची आवश्यकता आहेच. तुम्ही उपस्थित केलेल्या मुद्द्यांना सविस्तर प्रतिसाद देण्याची आवश्यकता आहे. देतो. थोडी सवड द्या. (श्रामो इज कॉर्डियली इन्व्हायटेड!) ---- अरे! हे सांगायचे राहायला नको. :-)
लेख-कथाप्रसंग थरारक आणि वाचनीय आहे
आय अ‍ॅम ऑनर्ड! :-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धनंजय

प्रवृत्ती?

आळश्यांचा राजा
Wed, 02/16/2011 - 17:32 नवीन
१. "नक्षल असतात म्हणून नक्षल असतात" या तत्त्वावरून आपल्याला असे भाकित करता येईल काय - "जितके मुळात नक्षली प्रवृत्तीचे लोक होते, ते आतापावेतोवर झाले आहेत. नक्षलवाद पसरण्याची भीती नाही. फक्त रंगीत पट्ट्यात काबू करण्यावरच लक्ष केंद्रित केले पाहिजे."
मी नक्षलवाद असतो कारण नक्षलवाद असतो असं म्हणत आहे. एकट्या दुकट्या नक्षल्याला वेगळा काढत नाही. नक्षली हा नक्षलवादाच्या, आणि नक्षली संघटनेच्या संदर्भाशिवाय नक्षली नसतो. त्यामुळे नक्षली प्रवृत्ती हा शब्दप्रयोग अनुचित वाटतो. जो काही नक्षलवाद पसरलेला आहे, तो नक्षली प्रवृत्तीचे लोक आहेत म्हणून पसरलेला नाही. या हिंसक पॉलिटिकल फिलॉसॉफीला स्पेस मिळत गेलीय, म्हणून नक्षलवाद पसरत गेलाय. जिथे जिथे अशी स्पेस मिळेल, तिथे तिथे हा प्रकार पसरु शकतो. विकास असला तरीही. कारण विकास असला तरीही सगळेच विकासाचे लाभार्थी किंवा समाधानी नसतात. डिसग्रण्टल्ड लोक, अज्ञ लोक, हा कच्चा माल जिथे असेल, तिथे हे लोण पसरायला नक्कीच वाव आहे. त्यामुळे यात सामील होणारे हे 'नक्षली प्रवृत्तीचे' असतील असे म्हणण्यापेक्षा 'व्हिक्टिम' असतील असं म्हणणं जास्त योग्य ठरेल.
२अ. शिवाय दूरस्थ असे कुठले स्वप्न आहे - "या पट्ट्यात नक्षली असणार म्हणजे असणार, धोरणे काही का असेना, किती का कैदेत घालेना, नव्या बालका-युवकांपैकी या प्रवृत्तीचे कोणी असेलच" असे असेल, तर या पट्ट्यात कधी सैल नियंत्रणाची लोकशाही (म्हणजे आजकाल पुणे जिल्ह्यात किंवा गोव्यात आहे तितपत - परिपूर्ण नाही, तरी तशी बरी) कधी येण्याची शक्यता/आशा मनातून काढूनच टाकावी काय?
नाही. अशी आशा ठेवायला हवी. एकाच वेळी नक्षलवादाला मिळणारी स्पेस कमी केली पाहिजे, आणि त्याच वेळी त्यांच्या सशस्त्र गुन्हेगारीचे (लढ्याचे नाही) दमन केले पाहिजे. प्रवृत्तीचा मुद्दा वर बोललो आहे.
२ब. भारत शासनाने या पट्ट्यात विशेष-घट्ट नियंत्रणाची वेगळी राज्यव्यवस्था दीर्घकाळासाठी (तात्पुरती अशी व्यवस्था आहे, असावीही) वसवावी अशा प्रकारे या पट्ट्याबाहेर राहाणार्‍यांनी प्रयत्न करावे का?
कोणती वेगळी व्यवस्था आहे? तीच व्यवस्था सगळीकडे आहे. नक्षली भागात प्रशासकीय कार्यालये असतात. निवडणुका होतात. सगळं होतं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धनंजय

सहमत आणि...

श्रावण मोडक
Wed, 02/16/2011 - 20:34 नवीन
मी नक्षलवाद असतो कारण नक्षलवाद असतो असं... ... ... त्यामुळे यात सामील होणारे हे 'नक्षली प्रवृत्तीचे' असतील असे म्हणण्यापेक्षा 'व्हिक्टिम' असतील असं म्हणणं जास्त योग्य ठरेल.
सहमत. शंभर टक्के सहमत.
एकाच वेळी नक्षलवादाला मिळणारी स्पेस कमी केली पाहिजे, आणि त्याच वेळी त्यांच्या सशस्त्र गुन्हेगारीचे (लढ्याचे नाही) दमन केले पाहिजे. प्रवृत्तीचा मुद्दा वर बोललो आहे.
तुम्ही ज्याला गुन्हेगारी म्हणता त्याला मी युद्ध असे म्हणतो. त्यांनी पुकारलेले ते युद्ध आहे. यातील 'त्यांनी' या शब्दाची संदर्भचौकट वरच्या तुमच्या म्हणण्यातील 'व्हिक्टिम' सोडून उरलेल्यांना - म्हणजेच मुखंड, जे हिंसेचे तत्त्वज्ञान करतात - लागू होते. त्यांचा बीमोड केला पाहिजे. दुमत नाही. कसा करावयाचा? युद्धासारखाच. पण युद्ध फक्त सशस्त्र होत नसते. सशस्त्र सामना करण्याबरोबरच इतर बऱ्याच गोष्टी तिथं लावाव्या लागतात. इतर गोष्टींमध्ये, तुमच्या म्हणण्यातील नक्षलवादाला मिळणारी स्पेस कमी केली पाहिजे या मुद्द्याचा समावेश होतो. त्यासंदर्भात तुम्ही 'रेड सनच्या निमित्ताने' या लेखात लिहिलेल्या काही गोष्टी महत्त्वाच्या. ते ध्यानी घेऊन तिथूनच ती स्पेस कमी केली पाहिजे. त्यासाठी त्या आघाडीवर सरकारने, सर्वदूर समाजाने चार पावलं अधिक चाललं पाहिजे. यातून त्या मुखंडांना एकाकी पाडण्याची प्रक्रिया सुरू होईल. त्याच जोडीने अशा विषमताग्रस्त, विकासवंचित भागांमध्ये अहिंसेच्या आधारावर चालणाऱ्या चळवळींना, संघर्षांना न्याय पटकन मिळावा यासाठी बाहेरच्या समाजाने जोर लावला पाहिजे. एरवी, आपल्यातलाच एक मोठा समुदाय संपवण्याचे 'कार्य' आपल्या हातून व्हायचे. मला या मुद्यांवर जे लिहायचे होते ते बहुदा एवढेच. धनंजयची पुढची प्रतिक्रिया वाचण्यास उत्सुक आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आळश्यांचा राजा

अरे?

गुंडोपंत
Mon, 02/14/2011 - 09:39 नवीन
अरे? अजून लिहा ना राजे? फार थोडक्यात लिहिता बरं का तुम्ही. चटका लावून गेला हा भाग. अजून लिखाण वाचायला आवडेल.
  • Log in or register to post comments

:-(

३_१४ विक्षिप्त अदिती
Mon, 02/14/2011 - 10:12 नवीन
अजून लिहा ... त्रास होतो वाचून, पण तरी लिहा.
  • Log in or register to post comments

पहील्या काही भागांपेक्षा

निखिल देशपांडे
Mon, 02/14/2011 - 10:42 नवीन
पहील्या काही भागांपेक्षा आताचे भाग.. आटोपते घेतल्यासारखे वाटतात. लिहा ना अजुन..
  • Log in or register to post comments

लिहा

विसुनाना
Mon, 02/14/2011 - 13:51 नवीन
वाचत आहे.
  • Log in or register to post comments

वाईट वाटले हा भाग वाचून.

स्वाती२
Mon, 02/14/2011 - 16:55 नवीन
वाईट वाटले हा भाग वाचून.
  • Log in or register to post comments

थँक्स!

आळश्यांचा राजा
Mon, 02/14/2011 - 21:58 नवीन
स्वाती२, विसुनाना, निखिल, अदिती, गुंडोपंत - थँक्स! यात अजून लिहिण्यासारखं वाटलं नाही खरंतर. सुन्द्री प्रातिनिधिक वाटली. म्हणून सांगावसं वाटलं. म्हणून तिचा 'टाइम्स'.
  • Log in or register to post comments

(विषय दिलेला नाही)

शिल्पा ब
Tue, 02/15/2011 - 01:16 नवीन
:(
  • Log in or register to post comments

अजून लिहा.. वाचते आहे.

प्राजु
Tue, 02/15/2011 - 03:01 नवीन
अजून लिहा.. वाचते आहे.
  • Log in or register to post comments

या कथा हकीकती आहेत.

विनायक बेलापुरे
Tue, 02/15/2011 - 03:55 नवीन
कित्येक नक्षली न्यायाच्या कथा तर झोप उडवणार्या आहेत. पण वाईट वाटले वाचून.:(
  • Log in or register to post comments

विचार करायला लावणारा सुरेख लेख

सुधीर काळे
Tue, 02/15/2011 - 09:26 नवीन
सुरेख लेख. नेहमीप्रमाणे विचार करायला लावणारा. पण विचार करून-करून कांहीं सुचत नाहीं. उलट डोकं गरगरायला लागतं. मागे एकदा श्री. श्रावण मोडक यांच्या याच विषयावरील लेखाच्या प्रतिसादात मी जे लिहिले होते ते या लेखातील "नक्षलवाद आहे कारण नक्षलवाद आहे" हे वाचून आठवले. खुद्द चीनमध्येही साम्यवाद हरला व आर्थिकदृष्ट्या स्वातंत्र्य पण राजकीयदृष्ट्या हुकूमशाही हे चित्र आज दिसत आहे. मला वाटते कीं इथेसुद्धा २५-३० वर्षात साम्यवाद येईल व आणखी २५-३० वर्षांत त्याचा पराजय होईल! चीन साम्यवादी ५० -५५ वर्षेंच राहिला, पण आजच्या सहज माहिती पसरू शकणार्‍या जगात तो इतकाही टिकणार नाहीं. पण हे मला पहायला मिळणार नाहीं! लिहीत रहा. तुमचे लेखन मला वाचायला आवडते.
  • Log in or register to post comments

सुरेख लेख

चेतन
Tue, 02/15/2011 - 10:52 नवीन
सुरेख लेख, नक्षल समस्या खरच काळजी करण्यासारखी आहे आणि सध्यातरी त्यावर ठोस असा काही उअपाय दिसत नाही आहे. खर तरं prevention is better than cure हे तत्व येथेही लागु होतं असो लेख वाचताना आधी वाचलेले हे दुवे (दुवा १, दुवा २) आठवले चेतन
  • Log in or register to post comments

दुवे वाचण्यालायक आहेत. थँक्स!

आळश्यांचा राजा
Wed, 02/16/2011 - 17:19 नवीन
दुवे वाचण्यालायक आहेत. थँक्स!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चेतन

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा