इजिप्त आणि असहकार
सध्या इजिप्तमध्ये घडत असलेल्या घटनांची जी काही माहिती आपल्यापर्यंत पोचत आहे त्यानुसार इजिप्तच्या जनतेने अभूतपूर्व एकजुटीने उठाव करून अध्यक्ष मुबारक यांना पायउतार होण्यास भाग पाडले आहे. मुबारक यांनी उपाध्यक्षांकडे सत्ता सोपविण्याचा निर्णय जाहीर केला आहे.
सदर घटनाक्रमात इजिप्तच्या लष्कराची भूमिका महत्त्वाची ठरली. निदर्शने करणार्या लोकांवर शस्त्र चालवण्यास सैन्याने नकार दिला. त्यामुळे मुबारक यांना पर्यायच उरला नाही.
या निमित्ताने (अहिंसक) असहकाराच्या तत्त्वाचे प्रात्यक्षिकच तेथे दिसून आले.
एखादे जुलमी सरकार अन्यायाने देशाच्या जनतेवर राज्य करते. हे जुलमी राज्यकर्ते संख्येने नेहमी कमी असतात. परंतु शासनयंत्रणा हे त्यांचे बळ असते. आणि शासन यंत्रणेचे रेल्वे, पोस्ट, दूरसंचार कर्मचारी हे त्या देशाचेच नागरिक असतात. तसेच दमनयंत्रणा चालवणारे पोलीस, सैन्य हेही त्या देशातलेच नागरिक असतात. नागरिक स्वतःच्याच बांधवांविरुद्ध शस्त्रे उगारतात आणि जुलूम करण्यात राज्यकर्त्यांना सहकार्य करतात.
असे सहकार्य करण्याचे जर नागरिकांनी नाकारले तर जुलमी राज्यकर्त्यांना क्षणभरही राज्य करता येणार नाही असा विचार गांधींनी सांगितला. [तो बहुधा टिळकांनाही अभिप्रेत होता पण त्यांनी एक्स्प्लिसिटली सांगितला नाही].
(A hundred thousand Englishmen can't control three hundred million Indians if the Indians refuse to co-operate)
जर रेल्वे, बस चालवणार्यांनी ती चालवली नाही, पोस्ट दूरसंचार बँका यांतील कर्मचार्यांनी सरकारशी असहकार पुकारला तर राज्य यंत्रणा चालणे अशक्य होईल. त्यातूनही जर दमन यंत्रणेनेही सहकार्य करण्याचे नाकारले तर सरकारची पुरती नाकेबंदी होईल.
दमनयंत्रणा जितकी असहकारात उतरेल तितकी यशाची खात्री वाढेल. परंतु ती जरी उतरली नाही तरीही सरकारी कारभार चालणे अशक्य होईल.
त्यासाठी सरकार + दमन यंत्रणा चालवणार्या कर्मचार्यांना असहकारास उद्युक्त करणे यासाठी चळवळ करण्याची कल्पना होती.
या सगळ्या कल्पनेत हिंसेला तसा काही थारा नाही. अगदी दमन यंत्रणेलासुद्धा सरकारविरुद्ध हिंसा करण्याची गरज नाही. सध्याच्या इजिप्तमधील घटनांत सुद्धा सैन्याने मुबारक यांच्यावर बंदुका रोखल्याची माहिती पुढे आलेली नाही. त्यांनी फक्त "जनतेच्या मागण्या न्याय्य आहेत" असे म्हणून कारवाईस नकार दिला आहे.
सुरुवातीच्या काळात गांधींनी देशातल्या लोकांना सरकारी नोकर्या सोडा, सरकारी सन्मान, पदव्या परत करा वगैरे आवाहन केले. सिव्हिल डिसोबिडिअन्स असे नाव त्याला दिले होते.
भारताला स्वातंत्र्य देण्याचे ब्रिटिशांनी ठरवले त्यात नौदलातल्या सैनिकांनी केलेला उठाव हेही एक महत्त्वाचे कारण होते. हा त्यांनी सरकारशी पुकारलेला असहकारच होता.
जयप्रकाश नारायण यांनीही असेच असहकाराचे आवाहन केले होते (असे सांगितले जाते).
असहकाराचा पहिला डेमो १० मे १८५७ रोजी मंगल पांडेने (आणि त्याच्यावर शस्त्र चालवण्यास नकार देणार्या सैनिकांनी) दिला. परंतु त्यावेळी होळकर आणि इतर संस्थानिकांनी इंग्रजांशी सहकार्य केले म्हणून तो अयशस्वी झाला.
प्रतिक्रिया
वरील लेख सध्याच्या परिस्थिती
सिव्हिल डिसोबिडिअन्स
धन्यवाद. मला हे नाव आठवत
बर मग?
गांधीवाद
चांगला आढावा...
लेख
जनतेची ताकत !!
शंकास्पद
>>हा उठाव नक्की जनतेचाच होता
अच्छा
गुंडो पंत आपल्या मताशी मी
' मुबारक हो ' !
बळच कुठलातरी बादरायण संबंध
>>स्वतःच्या वैयक्तिक भांडणात
गांधींचे वैयक्तीक भांडण ??
हे सत्तांतर कदाचित् "कुदेता"ही असू शकेल.....
कै च्या कै ! मला पहा अन फुलं
हॅ हॅ हॅ. असो.
आगे-आगे देखिये होता है क्या!
अजून बराच पल्ला गाठायचाय !
धागा आवडला
इडा-पिडा टळो.....
असेच म्हणतो.
हे कसे वाट्चाल करतात ते पहाणे
बिना असहकार नहीं
लेख आवडला
इजिप्त/ट्युनीशियासह मध्यपूर्वेतील इतर राष्ट्रांत लोकशाही येईल?
बहरीन अणि इराण
काही दिवसांपूर्वी १४
गांधी
गांधी