Skip to main content

मिपावर फायनान्सची तोंडओळख ही लेखमाला असावी का?

लेखक क्लिंटन
Published on शनीवार, 12/02/2011

वाचन संख्या 1389
प्रतिक्रिया 25

प्रतिक्रिया

नमस्कार मंडळी, फायनान्स या विषयावर मराठीतून काहीतरी लिहावे असा विचार बऱ्याच दिवसांपासून माझ्या मनात घोळत आहे.त्यासाठी मी या नव्या ब्लॉगची सुरवातही केली आहे.या ब्लॉगवर फायनान्स हा विषय शक्य तितक्या सोप्या मराठीत समजावून सांगायचा माझा प्रयत्न असेल.तसेच मुख्यत्वे मराठी भाषेचा वापर करायचा प्रयत्न असला तरी काही इंग्रजी संज्ञांचे भाषांतर करून नवे मराठी शब्द बनविण्याच्या फंदात न पडता अशा संज्ञा जशाच्या तशा इंग्रजीतच वापरल्या जातील.मला जो विषय अतोनात आवडला त्याची निदान वरवरची ओळख तो विषय नवा असलेल्यांना करून द्यावी असा माझा विचार आहे. त्यासाठी मी लेख लिहायला सुरवातही केली आहे.आतापर्यंत सहा लेख लिहून पूर्ण आहेत आणि असे बरेच (नक्की किती हे या क्षणी सांगता येणार नाही.पण वीसपेक्षा नक्कीच जास्त) लेख वेळ मिळेल त्याप्रमाणे लिहायचा मानस आहे.यात फायनान्सच्या विविध संकल्पनांची माहिती करून देणे आणि शेवटी फायनान्समधील विविध करियरच्या संधी आणि त्यासाठी कोणत्या प्रकारची शैक्षणिक पार्श्वभूमी गरजेची आहे आणि या करियरच्या विविध नोकऱ्यांसाठी नक्की कोणत्या प्रकारची स्कील लागतात यावर भाष्य करून लेखमाला संपवायचा मानस आहे.या विषयाची काहीही माहिती नसलेल्या वाचकाच्या दृष्टीने त्या त्या लेखाचा विषय समजायला किती सोपा/अवघड आहे याप्रमाणे प्रत्येक लेखाच्या सुरवातीला (सोपा/मध्यम/अवघड) ही काठिण्यपातळीही लिहायचा विचार आहे. मिपाकरांना ही लेखमाला वाचायला आवडेल का?तसे असल्यास माझ्या ब्लॉगवरील सगळे लेख मी मिपावरही लिहू शकेन.त्या दृष्टीने चाचपणी करण्य़ासाठी हा कौल घेत आहे.सगळी लेखमाला साधारण दहा दिवसात सुरू होऊन ती पूर्ण होण्यास काही महिनेही लागू शकतील.तसेच वाचकांच्या प्रतिक्रिया/सूचना लक्षात घेऊन लेखात पाहिजे ते बदलही करता येतील.तसेच अकाऊंटिंग या भागासाठी सी.ए आणि त्या क्षेत्रातील वाचकांनी मार्गदर्शन केल्यास ते चांगले होईल. तसेच कोणते शेअर चांगले/वाईट, कोणती गुंतवणुकीची स्कीम चांगली/वाईट याविषयी मला स्वत:ला माहिती नसल्यामुळे अर्थातच त्याविषयी काही लिहिता येणार नाही.तर फायनान्सची तत्वे या लेखमालेत लिहायचा मानस आहे. मध्यंतरी मिपावर लेखांची चोरी झाल्याचे वाचले.त्यामुळे लिहिताना थोडे हातचे राखूनच लिहिणार आहे. तेव्हा अशी लेखमाला मिपावरही असावी का?या कौलात अजून एक आठवडा म्हणजे १९ फेब्रुवारीपर्यंत आपले मत नोंदवता येईल. याविषयी आपले मत/सूचना आणि इतर टिप्पणी जाणून घ्यायला आवडेल.

In reply to by क्लिंटन

फायनान्स या विषयावर मराठीतून काहीतरी लिहावे असा विचार बऱ्याच दिवसांपासून माझ्या मनात घोळत आहे.त्यासाठी मी या नव्या ब्लॉगची सुरवातही केली आहे.या ब्लॉगवर फायनान्स हा विषय शक्य तितक्या सोप्या मराठीत समजावून सांगायचा माझा प्रयत्न असेल.
जरुर जरुर, स्वागतच आहे.

In reply to by नरेशकुमार

ए भई .... नुसते कौल घेत बसु नकोस. ल्ह्यायला लाग लौकर. बाय द वे..... कोण्या काळी कधी १४ फेब्रुवारीला मुहूर्त साधून कौल घेतला होतास का ;)

In reply to by विजुभाऊ

वरचा एक प्रतिसाद वाचून मी उगाचच नाही ला मत दिले. पण क्लिंटन लिहिणार असतील तर ते नक्कीच अभ्यासपूर्ण असणार. तेंव्हा येऊ द्या लवकर क्लिंटनसाहेब. त्यामुळे मिपाच्या 'प्रगल्भता' इंडेक्समधे वाढच होईल.

In reply to by क्लिंटन

फायनान्स, मार्केटिंग आणि इकॉनॉमिक्सचे धडे घेतल्यावर माझ्या दृष्टिकोनात, विचारात इ. झालेला सकारात्मक बदल पाहता मी तर म्हणेन या तिन्ही गोष्टींना वेगळं ट्रीट करण्यापेक्षा तिन्हीचा सुयोग्य संगम केल्यास उत्तम. मराठीत चांगली लेखमाला व्हावी ही एक उत्तम कल्पना, शुभेच्छा.

In reply to by क्लिंटन

अन हो तो लेख टाकण्याआधी संपादकांना त्या लेखाचे Attributes 'Read Only' करावेत म्हणून विनंती ही करावी. निलकांत , अश्या सुंदर लेखांची मिपावरुन चोरी होऊ नये म्हणून काही तांत्रिक सुविधा (लेखाचे Attributes 'Read Only' ) देता येतील का ??

'हो' ला मत दिले आहे. एरव्हीच्या निरर्थक कौलांच्या सवयीमुळे हा 'अर्थ'पूर्ण कौल वाचून चुकल्या-चुकल्यासारखं होतंय ;)

बराच विचार करुनही एखादा/दी 'नाही' ला का म्हणून मत देईल ते सुचले नाही !

In reply to by शाहरुख

'नाही' म्हणायला, 'नाही' अशी काही मते (आजमितीस आणि या घडीस मोजून ४) नोंदवली गेल्याचे दिसत आहे, परंतु ती बहुधा 'आहे पर्याय तर का वापरला जाऊ नये' या कारणास्तव नोंदवली गेली असल्याखेरीज त्याकरिता दुसरे कोणतेही कारण बहुत विचाराअंती निदान मला तरी दिसून येत नाही. अर्थातच, 'हो' या पर्यायास मत दिले आहे.

In reply to by पंगा

'उगाचच' हे एक कारण असू शकतं. क्लिंटन, लिही रे नक्कीच, लिही.

या विषयातलं मला खरंच काही कळत नाही. तेव्हा अशी लेखमाला आली तर मला अडाणीला काही ज्ञानकण मिळतील. अवांतर : या कौलाला 'नाही' असं उत्तर कुणी का देईल हा मलाही प्रश्न आहे..

In reply to by मस्त कलंदर

: या कौलाला 'नाही' असं उत्तर कुणी का देईल हा मलाही प्रश्न आहे..
अगदी असाच प्रश्न मलाही पडला. बहुधा लोकशाहीच्या ठाम समर्थकांचे ते काम असावे :) अवांतरः आता क्लिंटन ह्यांची ही लेखमाला इथे आली तर हे संस्थ़ळ प्रभल्ग.. प्रगल्ग,.... (मला शब्दही धड येत नाही हा!)...का काय ते, होणार का?

In reply to by प्रदीप

अवांतरः आता क्लिंटन ह्यांची ही लेखमाला इथे आली तर हे संस्थ़ळ प्रभल्ग.. प्रगल्ग,.... (मला शब्दही धड येत नाही हा!)...का काय ते, होणार का?
कोणाला गरज पडलीय? (म्हणजे असल्या सर्टिफिकिटांची हो! आणि कोणाकडून सर्टिफिकिटे?) अवांतरः मुळात एखाद्याला सर्टिफिकीट (म्हणजे चांगले सर्टिफिकीट हो!) दिले जाणे हा त्या सर्टिफिकीट दिल्या गेलेल्या व्यक्तीचा/संस्थेचा बहुमान नसून सर्टिफिकीट देणार्‍याचा स्वतःला दिलेला बहुमान असतो. जसे, उदाहरणादाखल, एखादे विद्यापीठ जेव्हा, पुन्हा उदाहरणादाखल, आइनस्टाइनसारख्या एखाद्या प्रतिभावंतास ऑनररी डॉक्टरेट वगैरे देऊ करते, तेव्हा तो आइनस्टाइनचा गौरव नसतो. (आइनस्टाइनला त्या गौरवाची गरजही नसते.) तर ती पदवी देऊ करणारे विद्यापीठ 'आइनस्टाइनसारख्या प्रतिभावंताला आमच्याकडून पदवी मिळाली' म्हणून स्वतःचा गौरव करवून घेत असते. नोबेल पारितोषिक हासुद्धा त्या पारितोषिकविजेत्याचा गौरव नसून पारितोषिकाचा असतो. म्हणूनच वाटेल त्याला ते मिळू लागले की त्याची किंमत उरत नाही. अर्थात, मिसळपावाला कोणी असे एखादे सर्टिफिकिट, पदवी किंवा पारितोषिक देऊ केले आहे असा दावा नाही. पण तरीही, भूमिका सांगितली, एवढेच. अतिअतिअवांतर: फारा वर्षांपूर्वी बाळासाहेब ठाकर्‍यांनी पु.लं.बद्दल "झक मारली आणि यांना पारितोषिक दिले" अशा काहीशा स्वरूपाचे उद्गार काढले असल्याबद्दल पुसटसे आठवते. हे उद्गारही या प्रकाशात पाहणे उद्बोधक ठरावे.

In reply to by गणपा

गणपाशी सहमत. मागे आमच्या एका खडुस मित्राने इथेच त्याच्या अर्थशास्त्रातील पी एच डी चे लेख आंग्ल भाषेत टाकले तोते त्याची आठवण झाली.

कंपनीचे बॅलन्स शीट, प्रॉफिट लॉस स्टॅटमेंट अ‍ॅनलाईझ करणे (मूलभूत विश्लेषण) पण समजावून देउ शकलात तर दुधात साखरच.

कधी सुरु करताय?

नमस्कार मंडळी, सर्वांच्या प्रोत्साहनाबद्दल धन्यवाद. जवळपास सगळेच "हो" येतील असे वाटले होते.तेव्हा या कौलाचे प्रयोजन म्हणजे मी लेखमाला लिहायला लवकरच सुरवात करणार आहे हे जाहिर करणे हेच होते. :) साधारणपणे आठवड्यात लेखमाला सुरू करायचा बेत होता पण पहिला भाग (खरं म्हणजे शून्यावा भाग) आजच अपलोड करत आहे. Nile यांनी इकॉनॉमिक्स आणि मार्केटिंग यांचाही एकत्र समावेश केला तर चांगले होईल असे म्हटले आहे.त्याविषयी शंका घेण्यासारखे काहीच नाही.पण माझे स्वत:चे मार्केटिंगचे ज्ञान त्यामानाने तोकडेच आहे.तो विषय मला फारसा आवडत नसल्यामुळे मी त्या विषयाशी संबंधित एकही elective दुसऱ्या वर्षात घेतलेला नव्हता.तेव्हा मी फायनान्सवरच लक्ष केंद्रित करणार आहे.अशा स्वरूपाचे कोणा मिपाकराने मार्केटिंग आणि धोरण (Strategy) वर लिहिले तर फारच उत्तम. वल्ली यांनी म्हटले की कंपन्यांची फायनान्शियल स्टेटमेन्ट कशी अभ्यासायची याविषयी लिहिले तर चांगले होईल. "Fundamental Analysis" हा तसा खूप मोठा विषय आहे.त्या एका विषयावर मोठी पुस्तकेही उपलब्ध आहेत.तरीही त्या विषयाची धावती ओळख, विशेषत: Ratio Analysis ची ओळख नक्कीच करून देणार आहे. या प्रतिसादकर्त्यांबरोबरच रामदास, सहज,अवलिया, नितिन थत्ते,स्वाती२, विकास,परा,गणपा,मस्त कलंदर, शाहरूख, पंगा, अदिती, नंदन,नरेशकुमार, विजूभाऊ आणि तिरसिंगराव माणुसघाणे यांच्या प्रोत्साहनाबद्दलही धन्यवाद.बहुदा आतापर्यंत प्रतिसाद देणाऱ्या सर्व मिपाकरांची नावे इथे लिहिली आहेतच.तरीही नजरचुकीने एखादे नाव राहिले असल्यास त्याबद्दल दिलगिरी.त्याचप्रमाणे या कौलात प्रतिसाद न लिहिता मत देणाऱ्या इतर मिपाकरांचेही आभार. लेखमालेशी संबंधित चर्चेत सहभाग घेऊन आपले मत, अभिप्राय जरूर नोंदवा ही विनंती. एखादी गोष्ट आवडली/आवडली नाही किंवा समजली/अवघड वाटली या सगळ्या गोष्टी आणि काही त्रुटी असल्या तर त्याही जरूर लिहाव्यात ही विनंती.म्हणजे पुढील लेखांमध्ये त्याप्रमाणे बदल करता येतील.