Skip to main content

एकच प्याला आज रिता झाला- भाग २

लेखक मनराव
Published on शुक्रवार, 11/02/2011
एकच प्याला आज रिता झाला-भाग १ धडपडत ठेचकाळत थोडा मोठा झालो स्पर्धेच्या युगात लढाई लढुन आलो यशापयशाची गोळा-बेरीज करुन आलो एकच प्याला आज रिता झाला॥८॥ कॉलेजमधे कट्ट्यावर असायचो चारचौघात शिट्या मारणे,छेड काढणे व्हायचेच ओघात त्याच नादात पडलो एकदोघींच्या प्रेमात एकच प्याला आज रिता झाला॥९॥ भाईगिरीची चुणुक दाखवायचो उत्साहात पोरींवर इंप्रेशन मारायचो दिमाखात एखादी खायचो ही कानशिलात एकच प्याला आज रिता झाला॥१०॥ आयुष्यात एका वळणावर थांबलो वाटले इथपर्यंत विनाकारण रांगलो अरे माझ्या अस्तित्वासाठी झुंजलो एकच प्याला आज रिता झाला॥११॥ आता स्पर्धा संपली प्रगतीपुस्तकाची चढाओढ सुरु झाली अस्तित्वाची किंमत कळली तेव्हा आयुष्याची एकच प्याला आज रिता झाला॥१२॥ खुप झगडुन मनासारखं काम सुरु झालं मग माझं बस्तान निट बसु लागलं आई-वडिलांच्या संस्कारांच आज चिज झालं एकच प्याला आज रिता झाला॥१३॥ क्रमश:
लेखनविषय:

वाचन संख्या 1688
प्रतिक्रिया 4

प्रतिक्रिया

त्याच नादात पडलो एकदोघींच्या प्रेमात एकीच्या कि दोघांच्या ? भाईगिरीची चुणुक दाखवायचो उत्साहात पोरींवर इंप्रेशन मारायचो दिमाखात एखादी खायचो ही कानशिलात खर सांगा एखादी कि जास्ती ? शेवटच कडव एकदम मस्त !

In reply to by कच्ची कैरी

>>>एकीच्या कि दोघांच्या ? दोघांच्या..... :o, अरे क.कै. एक ६-७ वर्षा पुर्वी असा काही प्रकार सर्वसामान्य न्हवता...... :P >>खर सांगा एखादी कि जास्ती ? एखादीच खाल्ली.....जास्तीच्या भेट म्हणून दिल्या..... :D

एकच प्याला आज रिता झाला॥१३॥ पण बाटली अजून अर्धी भरलेली आहे... तोवर काळजी करु नका... :)