आत्मविश्वास
प्रसंग आहे एका शनिवारी मी लंडनहून गावी परतत होतो तेव्हाचा. लंडनहून घरी परतताना मी नेहेमी रात्री १०:१४ ची ट्रेन पकडायचा प्रयत्न करतो, कारण या गाडीला अजिबात गर्दी नसते. तुरळक प्याशिंजर लोक आपले इथंतिथं सांडलेले असतात. आणि मोजून चार ष्टापात गाडी आमच्या ठेसनात पोहोचतेदेखील. अशी अजिबात गर्दी नसलेली गाडी पकडली की मलासुद्धा फोनाफोनी करायला आणि मोकळ्या आवाजात गप्पा हाणायला बरं पडतं!
त्या दिवशीसुद्धा माझा डबा ऑलमोस्ट मोकळाच होता, अगदीच बोटावर मोजण्याइतकी डोकी होती, दाराजवळची एक मोक्याची जागा पकडून मी बसून घेतलं, सगळं कसं मस्त जमून आलं होतं. मी लगेच फोन काढून हिरव्या देशातल्या एका मित्राला कॉललो आणि गफ्फा सुरु केल्या! अगदी गाडी सुटायच्या वेळी एक मुलगी शेजारी येऊन बसली.
आश्चर्य! कारण गोर्या ललना आपल्या शेजारी फक्त 'इतरत्र जागेचा अभाव' या एकाच कारणास्तव बसतात. वर यांचा आविर्भाव तर असा की जणू शेजारी बसून यांनी मला एकदम पवित्रच करुन टाकलाय आणि या शेजारी बसल्या नसत्या तर मी ट्रेनमधून थेट नरकातच गेलो असतो वगैरे वगैरे! आणि ही पोरगी सगळा डबा रिकामा असताना शेजारी येऊन बसली, आणि अगदी दहा वर्षांची ओळख असल्यासारखं हसली. असला ब्येक्कार धक्का बसला राव! त्या धक्क्यातच मी मित्राला सांगितलं की घरी जाऊन कॉलतो परत आणि फोन कटवला. माझा फोन बंद झाल्याचं पाहून शेजारणीच्या गप्पा चालू! मन में आश्चर्यका एक और फटाका फुट्या! मी तर पडायचाच बाकी राहीलो होतो. कारण याआधी अशी कधी वेळच आली नव्हती, आणि या ताई तर सुंदर, गोर्यापान, सोनेरी केस, निळे डोळे वगैरे होत्या. आता हा नेम कसा काय चुकला याचा विचार करत मी त्या इंग्रजी हल्ल्याला माझ्या पुणेरी इंग्रजीतून जमेल तसं तोंड देऊ लागलो.
त्यानंतर पुढला पाऊण तास त्या ललनेने गावभरच्या गप्पा मारल्या. तिचं नाव 'लिझ' (बहुधा एलिझाबेथ असावं)! पेशाने एक पर्फ्युमिस्ट असलेली लिझ लंडनमधल्या एका फ्येमस पेर्फ्युम फॅक्टरीत काम करीत होती. मग गप्पा सहाजिकच अत्तर, वास वगैरे गोष्टींवर गेल्या. तिच्या कामाच्या बाबतीत ती जाम एक्सपर्ट आहे हे पुरेपूर जाणवत होतं. माझी पण उगाच बॅटींग करुन झाली होतीच, आणि पाठ केलेल्या इंग्रजी शब्दांचा साठा संपत आला होता, तेव्हढ्यात तिचं स्टेशन आलं! जायला उठली, दारापर्यंत गेली, आणि वळून हाक मारून म्हणाली, "मला जरा उतरायला मदत करतोस का?" मी अवाक! म्हणजे शेजारी बसून गप्पा वगैरे ठीक आहे, पण उतरायला मदत वगैरे जरा अतीच होतं! असल्या अनपेक्षीत सलगीच्या धक्क्यातून मी जागा होईपर्यंत तिने पर्समधून एक वॉकींग-स्टिक काढली आणि म्हणाली, "मला दिसत नाही ना, आणि प्लॅटफॉर्म आणि ट्रेनमधल्या गॅपची मला थोडी भितीच वाटते." आणि तिला प्लॅटफॉर्मवर उतरवल्यावर गप्पा मारल्याबद्दल ठांकू म्हणून गेली!
त्यानंतर मी अक्षरश: सुन्न बसून होतो. कुणीतरी सणसणीत कानाखाली वाजवल्यावर कसं सगळं भण्ण होतं ना, तसं वाटत होतं. इतका वेळ मी ज्या मुलीशी गप्पा मारल्या -गप्पा कसल्या, पाऊण तासाची टाईमपास बॅटींग केली- तिला अजिबात दिसत नव्हतं हे कळल्यावर डोकं भणाणून गेलं माझं! तिच्या वागण्या-बोलण्यातून असं एकदाही जाणवलं नाही की तिला दृष्टीदोष आहे. सगळं इतकं सहजपणे चाललं होतं, ती चक्क माझ्याकडे पाहून बोलत वगैरे होती.
मग मला एक एक संदर्भ जाणवायला लागले, की तिच्या बोलण्यातून एकदाही काही पाहिल्याचा, रंगांचा उल्लेख आला नव्हता. सुरुवातीला माझी भाषा मराठी आहे वगैरे गप्पा झाल्यावर तिने पर्फ्युमबद्दल बोलायला सुरु केलं होतं. अर्थातच, 'वास' हे तिचं क्षेत्र होतं आनि ती त्याबद्दल भरभरुन बोलत होती! ती पर्फ्युमिस्ट आहे म्हटल्यावर मी सहाजिकच तिला 'पर्फ्युम' नावाच्या एका इंग्रजी चित्रपटाबद्दल विचारलं होतं तेव्हा तिने "मला चित्रपट पहायला आवडत नाहीत" असं उत्तर देऊन विषय संपवला होता. बोलताबोलता ती बर्याच वेळा माझ्या मागे काचेत शून्यात पाहिल्यासारखं बोलायची. या सगळ्याकडे मी खूप सहज दुर्लक्ष केलं होतं हेही आठवलं.
दृष्टीदोषासारखा प्रॉब्लेम असलेली लिझ मला अगदी सहपणे भेटली आणि सहजपणे एक ठसा ऊमटवून गेली. ती मला भेटणं हा संपूर्ण योगायोगाचा भाग होता. म्हणजे तिला मी भेटलो नसतो, दुसरा कोणीही भेटला/ली असता/ती तरी तिला काहीही फरक नव्हताच. असं शेवटच्या क्षणी आपल्या गप्पेकर्याला एकदम शॉक देणं तिच्या नकळत ती करतच होती, आणि करत राहीलसुद्धा; पण माझ्या डोक्यात हा प्रसंग इतका फिट्ट बसलाय, की ही लिझ विसरणं केवळ अशक्य!
कुठेही दृष्टीदोषाचा उल्लेखही नाही, की त्यामुळे प्रॉब्लेम होतोय वगैरे तक्रार नाही. रोजच्यारोज घरून लंडनला जा-ये करताना तिचं कुठेही अडत असेल असं नाही! स्वत:च्या सुंदर दिसण्याचा अभिमान नाही की दिसत नसल्याची खंत नाही! असलं आरस्पानी सौंदर्य, देहबोलीतली विलक्षण सहजता आणि तुफान आत्मविश्वास असलेली ही मुलगी त्या दिवशी जाणिवा हलवून गेली हे मात्र नक्की!
(अन्यत्र पूर्वप्रकाशित)
याद्या
8501
प्रतिक्रिया
55
मिसळपाव
जबराट अनुभव, याला म्हणंतात
छान अनुभव......
In reply to जबराट अनुभव, याला म्हणंतात by ५० फक्त
ए क णं ब र !@@ बाकी तिला
In reply to छान अनुभव...... by मनराव
तुमचे पुणेरी / भारतीय उच्चार
In reply to जबराट अनुभव, याला म्हणंतात by ५० फक्त
मेव्या आणि हर्षद,
In reply to तुमचे पुणेरी / भारतीय उच्चार by मेघवेडा
खल्लास रे असुरा. असा धक्का
+१
In reply to खल्लास रे असुरा. असा धक्का by llपुण्याचे पेशवेll
+२
In reply to खल्लास रे असुरा. असा धक्का by llपुण्याचे पेशवेll
+३
In reply to खल्लास रे असुरा. असा धक्का by llपुण्याचे पेशवेll
अमेझिंग!!
+ १ असेच म्हणते
In reply to अमेझिंग!! by दैत्य
अगदी छान अनुभव...आहे त्या
खरंच असं राहणं प्रत्येकालाच
+१
वाह!
सहजकाका, खूप प्रयत्न करुन
In reply to वाह! by सहज
मस्त लिहलाय अनुभव कोणी हे
हं!!!! मला हे माहीती
In reply to मस्त लिहलाय अनुभव कोणी हे by जोशी 'ले'
अतिशय सुरेख लिहिलं आहेस!
यावरून आठवलं...
अतिअवांतरः चॅप्लिनचा 'सिटी लाइट्स' पाहिला होतात काय?
सुन्न करणारा अनुभव असे म्हनता
सुंदर लेख आणि अनुभव कुणीतरी
वेगळा
सुंदर
खरंय अदिती, ह्या प्रसंगानंतर
In reply to सुंदर by ३_१४ विक्षिप्त अदिती
सणसणीत ! अवांतर: माझाही एक
अनुभव कथन मस्त झाले आहे
@ निनाद
In reply to अनुभव कथन मस्त झाले आहे by निनाद मुक्काम …
परा शेठ मला दिलेल्या सल्यावर
In reply to @ निनाद by परिकथेतील राजकुमार
प्र का टा आ
In reply to अनुभव कथन मस्त झाले आहे by निनाद मुक्काम …
कुणीतरी सणसणीत कानाखाली
>>>>कुठलाही मिठ, मसाला न
In reply to कुणीतरी सणसणीत कानाखाली by परिकथेतील राजकुमार
+२
In reply to >>>>कुठलाही मिठ, मसाला न by मितान
अनुभव आवडला
मध्यंतरी एका अंधांच्या
वा...
In reply to मध्यंतरी एका अंधांच्या by प्रकाश घाटपांडे
खुप छान
वा !
धक्का....!!
अवांतर
In reply to धक्का....!! by इन्द्र्राज पवार
* हा सांडपाणी वाहून नेणारा ड्रेनेज/स्यूएजचा भुयारी पाइप तर नसावा? पण टेम्सखालून?????? उद्या समजा तो फुटला किंवा त्याला भेगा पडल्या, आणि त्यातून पाणी (वगैरे वगैरे) झिरपू लागले, तर काय होईल? लंडनचा पिण्याच्या पाण्याचा पुरवठा कोठून येत असावा? लंडनच्या कुप्रसिद्ध काळ्या प्लेगानंतर पिवळ्या काविळीच्या साथीस असा पाइप कारणीभूत होईल ना!
टेम्स....!!
In reply to अवांतर by पंगा
हा हा हा!
In reply to अवांतर by पंगा
वा!
सुरेख अनुभव कथन. असे अनुभव
हॅट्स ऑफ्!
वाचता वाचता एकदम धक्का
शारिरीक व्यंगाची पर्वा न करता
असुरेश्वरा!
अनुभव कथन आवडले...मलाही धक्का
उत्तम अनुभवकथन !
भारी लेख... आवडला... अजून
मनावर चढलेली सगळी लोलुपतेची
मस्त
समृध्द..
छान !