मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

माता ही घाबरी ---

विदेश · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
काव्यरस
[चाल: राधा ही बावरी -] गर्दीत वाहने-लांब रांग पाहता , नजर भिरभिरते ऐकून हॉर्न,विसरून भान,ही वाट काढण्या बघते त्या अतिक्रमणांच्या विळख्यामधुनी- हाक ईश्वरा देई माता ही घाबरी पोरीची माता ही घाबरी ! इवल्या इवल्या पायांची त्रेधातिरपिट उडताना थेंब थेंब वाहनातुनी पिचकारीचे पडताना तो गणवेषाचा रंग पाहता पोर घाबरुन जाई तो उशीर होता गेट शाळेचे बंद ! मारतील बाई ? आज इथे तर उद्या तिथे - दूर निधन ते अपघाती पोरीसोबत जाताना उगा पावले अडखळती ते ऊन म्हणा पाऊस म्हणा , पालिकेस जाग न येई ते खड्डा खणणे रस्त्यामधुनी , बंद कधी ना होई !

वाचने 3240 वाचनखूण प्रतिक्रिया 9

गोगोल 08/02/2011 - 05:29
अजून एक विडंबन सुचतयं .. राधा ही पादरी शौचलया समोर लांब रांग पाहता , पोट ठुसठुसते ऐकून हॉर्न, विसरून भान, ही वाट काढण्या बघते त्या गर्दीच्या विळख्यामधुनी- हाक आतल्या देई राधा ही पादरी जोश्यांची, राधा ही पादरी !

In reply to by गोगोल

टारझन 08/02/2011 - 17:08
मनातले विडंबण :) =)) पादणे जगात कोणालाही चुकलेले नाही. आणि जो ह्या वैश्विक सत्याला नकार देतो /ते , तो ढळढळीत खोटं बोलतो. तेंव्हा "राधा जोषी = युनिव्हर्सल व्हेरियेबल " असे डिस्क्लेमर टाकावे असे सुचवतो. विडंबणातले दुसते कडवे जशे च्या तशे (थोडेशे शब्द बदलुन ) इथे कंटिण्यु केल्यास चालु शकेल.
इवल्या इवल्या पायांची त्रेधातिरपिट उडताना थेंब थेंब वाहनातुनी पिचकारीचे पडताना तो गणवेषाचा रंग पाहता पोर घाबरुन जाई तो उशीर होता गेट शाळेचे बंद ! मारतील बाई ?
- (कवितक गुर्जी ) रमोल