Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by डॉ.श्रीराम दिवटे on Tue, 02/08/2011 - 16:08
अजाणत्या वयात मी एका मुलीच्या प्रेमजालात फसलो. तिला हव्या त्या ऑडिओ कॅसेट आणून देणं, तिच्यासाठी लेडीज रूमाल, बिंदाया, टिकल्या, मेकअप बॉक्स खरेदी करण्यातच मी परमानंद अनुभवला. परंतु जेव्हा ती मी दिलेली फेअरनेस क्रिम लावून दुसऱ्याच महाभागाला भेटायला गेली तेव्हाच तिचा माझा संबंध (जो कधी नव्हताच) संपला. * किशोरवयात आलो होतो तेव्हाची गोष्ट. मी शिक्षक कॉलनीमध्ये राहायचो. सुट्टीच्या दिवशी दुपारी अख्ख्या कॉलनीत शांतता असायची. शेजारी राजश्री मॅडम एकट्याच राहत होत्या. त्या कधी कधी बोलवायच्या. त्यांना मराठी कादंबरी वाचावयाचा भरी शौक. एखादी कादंबरी माझ्या हाती देऊन वाच म्हणायच्या. माझ्यासाठी त्यांनी अगोदरच पान दुमडलेलं असायचं. ते वाचतांना अंगभर शिरशिरी येई. ठराविक पॅरेग्राफ वाचत असतांना त्या जवळ येत. अगदी चिकटून बसत, त्यांचे डोळे वेगळेच भासत. त्या माझ्या पँटवरून हात फिरवू लागल्या की मला कसंसच होई आणि मी विनाविलंब धूम ठोकीत असे. त्यांचे ते अधाशी स्पर्श, डोळ्यांतील आसक्तीयुक्त भाव घाबरवून टाकीत. काही दिवस मी त्यांना टाळायचो. पुन्हा एखाद्या सुट्टीच्या दिवशी असाच प्रसंग घडे. एकदा तर त्यांनी मला गच्च पकडून ठेवलं, मी ओरडू लागलो. एक फटका मारून त्यांनी मला हाकलून दिलं. त्यानंतर मी कधीच त्यांच्याकडे गेलो नाही. * त्यानंतरची काही वर्षे मी खूपच तटस्थपणे काढली. त्यानंतर जरा मोकळेपणा आल्याने मला अनेक मैत्रिणी लाभल्या. बिंदू नावाच्या मैत्रिणीला मी रोज गुलाबाचे फूल(विकत आणून) द्यायचो. त्याची तिला काडीचिही किंमत वाटत नसे. ती म्हणायची, 'एंदान पुआ कोडतु?' म्हणजे नुसती फुलंच काय देतोस? याअर्थी. तिने मला मल्याळी बोली शिकवली खरी पण त्याबदल्यात मराठी शिकायचं नाव काढलं नाही. मलाच तिच्याशी तोडकं मोडकं मल्याळी बोलावं लागे. मग एखाद्या शब्दाच्या अलग उच्चारामुळे भलताच अर्थ निघायचा. त्यावेळी ती पोटभरून हसत रहायची, मी मात्र कसनुसं तोंड करायचो! माझ्या बाईकवर मागे बसून मस्तपैकी रायडीँग करायला ती एका पायावर तयार असे. मग ती म्हणेल त्या हॉटेलात तिला खाऊ घालावं लागे. आम्ही पवना डॅम, लोणावळा वगैरे फिरलो... माझ्या खिशाला चाट बसली पण बिचारीनं मला गुंजभरही हात लावू दिला नाही! अखेर खिसाच फाटल्याचं ध्यानात आल्यावर (तिच्याही अन् माझ्याही!) आमचंही फाटलंच.. * माझ्या कॉलेजमधल्या मैत्रिणी मला गोड गोड बोलून कामाला लावायच्या. त्यांना प्रॅक्टीकल जर्नल मध्ये आकृत्या काढून देणं तर नित्याची बाब होती. नवा पिक्चर लागला की अॅडव्हान्स बुकिंगचं काम माझ्याकडेच येई. मग मध्यंतराच्या वेळात वडापाव-चहा आणून देणं अशी सेल्फ सर्व्हिस ओघाने करावीच लागे. इतर मित्र माझ्यावर जळायचे, मला गोपीकांचा कान्हा म्हणून चिडवायचे. ज्याचं जळतं त्यालाच कळतं, त्या गोपिका माझ्याभोवती फक्त फेर धरायच्या, दांडिया खेळायला त्यांचे त्यांचे कन्हैये मौजूद होते, हे त्या मित्रांना काय ठावूक? एकप्रकारे कपडे सांभाळायचं कामच माझ्याकडे आलं होतं. मैत्रिणीँच्या गराड्यात आख्खी कॉलेजलाईफ गेली परंतु त्यातील एकही पोट्टी माझी वाईफ बनायला तयार नव्हती. माझ्या स्त्रीदाक्षिण्याचा त्यांनी स्वतःच्या स्वार्थासाठी फायदाच करून घेतला. इतकेच नाही तर त्यांच्यासाठी वरसंशोधनाच्या कामी माझे नाव त्यांच्या पिताश्रीँना सांगून मलाच नवरे शोधायला पिटाळलं! हे म्हणजे भलतंच अन् भयंकरही. माझ्यालेखी त्यांचं असं वागणं म्हणजे जखमेवर मिरचीचा ठेचा थापण्याचं काम असल्याने मी त्यांच्यापासून फटकून जगू लागलो. ही सल आजमितीला जेव्हा मी त्यांना सांगतो, तेव्हा त्या सगळ्याजणी म्हणतात, 'त्याचवेळी का नाही बोललास? मी लगेच तुला वरमाला घातली असती!' पुलाखालून पाणी वाहून गेल्यावर पूर पहायला जाण्यात काय अर्थय? * माझ्या नावडत्या राणीला मी (मनात नसतांनाही) अंगभर सोनं केलं, तेव्हा आवडतीला सवतीमत्सराचा किडा चावला. 'तिला इतकं देतोस, मग मला का नाही?' असं ती प्रत्येक भेटवस्तू स्विकारतांना म्हणतेच. नावडतीच्या दिमतीला नोकर चाकर, स्वैपाक-धुणंभांड्याला बाई. काहीही कमी नसतांना तिनं माझ्यावरचं प्रेम कमी का करावं? हे न उलगडलेलं कोडं. म्हणून कदाचित ती नावडती ठरली. तिच्याउलट आवडतीनं भरभरून (शारीर) प्रेम केलं, दिलंही. नो डाऊट, पण माझं 'क्षेम' मात्र कधी पुसलं नाही. का बरे? हाही एक अनुत्तरीत प्रश्न. नावडतीच्या अपरोक्ष, लपवून, चुकवून मी कितीतरी अमूल्य वस्तू आवडतीला नेऊन दिल्या. परंतु त्याबदल्यात तिच्याकडून ना तेल मिळालं ना तूप! आजही माझं धुपाटणंच बनलं आहे. ब्रँडेड रिस्टवॉच, डायमंड रिंग, मोठ्या रिसॉर्टमध्ये तिच्या बड्डेचं सेलिब्रेशन इ. इ. खर्चिक गोष्टी आमलांत आणूनही तिचा हात उताणा तो उताणाच! * मग आता मला प्रश्न पडतो की, इतक्या स्त्रियांनी माझा गैरफायदाच घेतला नाही तर दुसरे काय? ("भिन्नावतरण" मधून..)
  • Log in or register to post comments
  • 149252 views

प्रतिक्रिया

Submitted by विनायक प्रभू on Tue, 02/08/2011 - 16:17

Permalink

गैर

ह्यात गैर काय?
  • Log in or register to post comments

Submitted by Nile on गुरुवार, 02/10/2011 - 02:11

In reply to गैर by विनायक प्रभू

Permalink

मास्तरांशी सहमत

किशोरवयात आलो होतो तेव्हाची गोष्ट. मी शिक्षक कॉलनीमध्ये राहायचो. सुट्टीच्या दिवशी दुपारी अख्ख्या कॉलनीत शांतता असायची. शेजारी राजश्री मॅडम एकट्याच राहत होत्या. त्या कधी कधी बोलवायच्या. त्यांना मराठी कादंबरी वाचावयाचा भरी शौक. एखादी कादंबरी माझ्या हाती देऊन वाच म्हणायच्या. माझ्यासाठी त्यांनी अगोदरच पान दुमडलेलं असायचं. ते वाचतांना अंगभर शिरशिरी येई. ठराविक पॅरेग्राफ वाचत असतांना त्या जवळ येत. अगदी चिकटून बसत, त्यांचे डोळे वेगळेच भासत. त्या माझ्या पँटवरून हात फिरवू लागल्या की मला कसंसच होई आणि मी विनाविलंब धूम ठोकीत असे. त्यांचे ते अधाशी स्पर्श, डोळ्यांतील आसक्तीयुक्त भाव घाबरवून टाकीत. काही दिवस मी त्यांना टाळायचो. पुन्हा एखाद्या सुट्टीच्या दिवशी असाच प्रसंग घडे. एकदा तर त्यांनी मला गच्च पकडून ठेवलं, मी ओरडू लागलो. एक फटका मारून त्यांनी मला हाकलून दिलं. त्यानंतर मी कधीच त्यांच्याकडे गेलो नाही.
बाकी कथा अनेक ठिकाणी त्रोटक वाटली. प्रसंग अधिक खुलवुन सांगितले असतेत तर जास्त मजा आली असती. असो, पुढील वेळेस शुभेच्छा.
  • Log in or register to post comments

Submitted by टारझन on Tue, 02/08/2011 - 16:17

Permalink

राजश्री मॅडम तर तुम्हाला सगळं

राजश्री मॅडम तर तुम्हाला सगळं देत होत्या , तुम्हीच घेतलं नाही .. तरी त्यांनी तुमचा गैरफायदा कसा घेतला ? बाकी पपलु पोरांना पोरी टोपी लावतातंच .. स्वार्थी जग .. स्वतः किती वापरलं जायचं हे ज्याने त्याने ठरवायचं असतं :) तुम्ही (न भेटलेल्या) गाजराच्या अपेक्षेणे धावत होतात . बाकी लेख छाण विणोदी आहे ... काही काही प्रसंग अजुन खुलवता आले असते तर मज्जा आली असती . क्रमश: कुठे दिसत नाही ते :) - (कॉलेज जिवणापर्यंत कोण्त्याच पोरीला साधं फुकाचं चॉकलेट पण खाऊ न घातलेला ) प्रा.डॉ. भामटे
  • Log in or register to post comments

Submitted by परिकथेतील राजकुमार on Tue, 02/08/2011 - 16:32

In reply to राजश्री मॅडम तर तुम्हाला सगळं by टारझन

Permalink

तुम्ही (न भेटलेल्या)

तुम्ही (न भेटलेल्या) गाजराच्या अपेक्षेणे धावत होतात .
हेच बोल्तो ! तुमच्या डोळ्यातली वासना लगेच दिसत असेल हो ;) म्हणुन आपले काम झाले की तुमचा बाजार उठवत असतील. बाकी गेल्या २/३ महिन्यात इतर कोणाच्या लेखनावर साधी एकोळी प्रतिक्रीया न देता फक्त स्वतःचेच लेखन मिपावर आदळुन तुम्हीपण मिपाचा गैरफायदा घेतच आहात की :)
  • Log in or register to post comments

Submitted by पर्नल नेने मराठे on Tue, 02/08/2011 - 16:44

In reply to तुम्ही (न भेटलेल्या) by परिकथेतील राजकुमार

Permalink

परा मेल्या किती लक्श्य ह्या

परा मेल्या किती लक्श्य ह्या दागदरावर ;) अवांतर : पराच एव्ढे लक्श म्हणजे हा डु आयडी तर नाहि ना? :)
  • Log in or register to post comments

Submitted by llपुण्याचे पेशवेll on Wed, 02/09/2011 - 10:21

In reply to परा मेल्या किती लक्श्य ह्या by पर्नल नेने मराठे

Permalink

पराला डुआयडी म्हटल्याबद्दल

पराला डुआयडी म्हटल्याबद्दल चुचुचा निषेढ.
  • Log in or register to post comments

Submitted by धनंजय on गुरुवार, 02/10/2011 - 00:35

In reply to तुम्ही (न भेटलेल्या) by परिकथेतील राजकुमार

Permalink

पुंगीच्या?

तुम्ही (न भेटलेल्या) गाजराच्या पुंगीच्या अपेक्षेणे धावत होतात .
गाजराची पुंगी, वाजली तर वाजली, नाहीतर मोडून खाल्ली!
  • Log in or register to post comments

Submitted by टारझन on गुरुवार, 02/10/2011 - 01:01

In reply to पुंगीच्या? by धनंजय

Permalink

:ऑ ?

ही पुंगी तुमची आहे , माझी नाही ... माझ्या प्रतिसादात पुंगी नाही हो ;)
  • Log in or register to post comments

Submitted by धनंजय on गुरुवार, 02/10/2011 - 01:20

In reply to :ऑ ? by टारझन

Permalink

मीच घुसडली +१

मीच घुसडली. वशीकरणासाठी पुंगी वाजवता येईल.
  • Log in or register to post comments

Submitted by टारझन on गुरुवार, 02/10/2011 - 01:26

In reply to मीच घुसडली +१ by धनंजय

Permalink

खुलाश्याबद्दल धन्यवाद धनंजय .

खुलाश्याबद्दल धन्यवाद धनंजय . कारण माझी पुंगी तर माझ्या कडे आहे ,... मग नक्की वाजली कोणाची ? म्हणुन संभ्रमात होतो :)
  • Log in or register to post comments

Submitted by धनंजय on गुरुवार, 02/10/2011 - 01:34

In reply to खुलाश्याबद्दल धन्यवाद धनंजय . by टारझन

Permalink

डॉ. दिवटे यांच्या मित्राची

डॉ. दिवटे यांच्या अनुभवी मित्राची पुंगी कधी वाजली कधी वाजली नाही. राजश्री मॅडमची वाजली नाही.
  • Log in or register to post comments

Submitted by एकुलता एक डॉन on Sat, 04/12/2014 - 21:55

In reply to डॉ. दिवटे यांच्या मित्राची by धनंजय

Permalink

मॅडमची वाजली नाही. कशा वरुन?

मॅडमची वाजली नाही. कशा वरुन?
  • Log in or register to post comments

Submitted by कानडाऊ योगेशु on Tue, 02/08/2011 - 17:31

In reply to राजश्री मॅडम तर तुम्हाला सगळं by टारझन

Permalink

+१ टारूशी सहमत. राजश्री मॅडम

+१ टारूशी सहमत. राजश्री मॅडम जी गोष्ट तुम्हाला देणार होत्या त्याच्या कल्पनेनेच तुम्हाला घाम फुटला आणि त्याच गोष्टीसाठी तुम्ही इतर स्त्रियांच्या आजुबाजुला गोंडा घोळु लागला.रा.मॅ प्रकरणातुनच धडा घेतला असता तर तुमची तुमच्याचा कडुन इतकी फसवणुक तरी झाली नसती हो!
  • Log in or register to post comments

Submitted by पर्नल नेने मराठे on Tue, 02/08/2011 - 16:19

Permalink

*त्यांना प्रॅक्टीकल जर्नल

*त्यांना प्रॅक्टीकल जर्नल मध्ये आकृत्या काढून देणं तर नित्याची बाब होती हि कामे मी पण करुन घेत असे..खोट कशाला बोलु ;)
  • Log in or register to post comments

Submitted by किचेन on Fri, 11/11/2011 - 15:12

In reply to *त्यांना प्रॅक्टीकल जर्नल by पर्नल नेने मराठे

Permalink

आयला आमच्या कॉलेज मध्ये पोर

आयला आमच्या कॉलेज मध्ये पोर नव्हती त्यामुळे स्वतःची जर्नल स्वतःच तयार करावी लागत. :(
  • Log in or register to post comments
Profile picture for user धन्या

Submitted by धन्या on Fri, 11/11/2011 - 20:27

In reply to आयला आमच्या कॉलेज मध्ये पोर by किचेन

Permalink

किचेन काकू आहेत. काका नाहीत

किचेन काकू आहेत. काका नाहीत हे कळलं. :)
  • Log in or register to post comments

Submitted by मृत्युन्जय on Sat, 11/12/2011 - 13:36

In reply to किचेन काकू आहेत. काका नाहीत by धन्या

Permalink

नक्की का?

नक्की का?
  • Log in or register to post comments

Submitted by किचेन on Sun, 11/13/2011 - 15:40

In reply to किचेन काकू आहेत. काका नाहीत by धन्या

Permalink

ताई म्हणलात तरी चालेल. चालेल

ताई म्हणलात तरी चालेल. चालेल पेक्षा आनंदाने उद्या मारेल,नृत्य करेल,गाणीही म्हणेन( आवाज राणी मुखर्जीची आठवण करून देतो म्हणून काय झाल.? हर्षवायू देखील होईल!)
  • Log in or register to post comments

Submitted by जोशी 'ले' on Tue, 02/08/2011 - 16:26

Permalink

स्त्री काय पुरुष काय दोघेहि

स्त्री काय पुरुष काय दोघेहि सारखेच ...संधि न मिळाल्या मुळे सभ्य तर समाजात बरेच असतिल
  • Log in or register to post comments

Submitted by प्रकाश घाटपांडे on Tue, 02/08/2011 - 19:20

In reply to स्त्री काय पुरुष काय दोघेहि by जोशी 'ले'

Permalink

हेच म्हणतो

अगदी सहमत आहे
  • Log in or register to post comments

Submitted by माझीही शॅम्पेन on Tue, 02/08/2011 - 16:27

Permalink

हे काच्या कै ! स्त्रियानि

हे काच्या कै ! स्त्रियानि तुमचा नेहमी फायदा करून घेतला ही चुक त्यांची की तुमची ? कुठलाही बलवान वर्ग कमजोर वर्गाच शोषण करू शकतो किवा गैरफायदा घेऊ शकतो त्यात लिंगभेद कसा काय आला बुवा ? सविस्तर प्रतिक्रिया नंतर देतो
  • Log in or register to post comments

Submitted by स्वैर परी on Tue, 02/08/2011 - 16:30

Permalink

ह. ह. पु. वा

त्या गोपिका माझ्याभोवती फक्त फेर धरायच्या, दांडिया खेळायला त्यांचे त्यांचे कन्हैये मौजूद होते
त्यांचं असं वागणं म्हणजे जखमेवर मिरचीचा ठेचा थापण्याचं काम असल्याने
ह. ह. पु. वा! उत्तम लेख! बाकी जर्नल च म्हणाल तर, आमच्या इथे परिस्थिती वेगळी होती. आम्ही मुली सरसकट आमच्या वर्गातल्या मुलांना मदत करायचो! सो, मुली अगदीच काही गैरफायदा नाही घेत बरं का! ;) :)
  • Log in or register to post comments

Submitted by मुलूखावेगळी on Tue, 02/08/2011 - 16:36

Permalink

काय हो तुम्ही राजश्री आनि

काय हो तुम्ही राजश्री आनि बिन्दु दोघीन्च्याही नावाने ओरडताय तुम्हाला नक्की काय हवे होते मग? आनि
गोपीकांचा कान्हा
ही पदवी मिळाली ते काय कमी आहे ती मिळायला पन नशीब लागते. काहीना तर ती तेवढं पण मिळत नाही बसतात मग हात चोळत नाहीतर त्या मुलीच्या नावाने शंख करत
  • Log in or register to post comments

Submitted by टारझन on Tue, 02/08/2011 - 16:52

In reply to काय हो तुम्ही राजश्री आनि by मुलूखावेगळी

Permalink

बसतात मग हात चोळत नाहीतर त्या

बसतात मग हात चोळत नाहीतर त्या मुलीच्या नावाने शंख करत
तुला बरं माहिती मुलं हात चोळत बसतात म्हणुन ? ह्यावरुन चुचु सारखीच शंका येते ,,, हा डु आय डी तर नाही ना ?
  • Log in or register to post comments

Submitted by मुलूखावेगळी on Tue, 02/08/2011 - 17:00

In reply to बसतात मग हात चोळत नाहीतर त्या by टारझन

Permalink

शंकासुर आहात तुम्ही . पन

शंकासुर आहात तुम्ही . :) पन शंका चुचुला आहे का तुला?
  • Log in or register to post comments

Submitted by मनराव on Tue, 02/08/2011 - 16:38

Permalink

कैच्या कै....... यात तुमचा

कैच्या कै....... यात तुमचा फायदा कहिच नाही झाला म्हणुन गैरफायदा काय...... ??
  • Log in or register to post comments

Submitted by नगरीनिरंजन on Tue, 02/08/2011 - 16:49

Permalink

स्वतः ताकाला जाऊन भांडं

स्वतः ताकाला जाऊन भांडं लपवायचं आणि दुसर्‍याने लोणी खाऊन ताक संपवल्यावर बोंब मारायची तशातला प्रकार दिसतोय हा.
  • Log in or register to post comments

Submitted by तिमा on Tue, 02/08/2011 - 17:15

Permalink

हा लेख

हा लेख आहे की कथा ? बाकी ह्यातल्या मतांशी पूर्णपणे असहमत. एकदा अनुभव आल्यावर पुन्हा तिथे जाणे ह्यातच काय ते आलं.
  • Log in or register to post comments

Submitted by एकुलता एक डॉन on गुरुवार, 04/10/2014 - 20:28

In reply to हा लेख by तिमा

Permalink

एकदा अनुभव आल्यावर पुन्हा

एकदा अनुभव आल्यावर पुन्हा तिथे जाणे ह्यातच काय ते आलं.???????????????????????????
  • Log in or register to post comments
Profile picture for user आत्मशून्य

Submitted by आत्मशून्य on Tue, 02/08/2011 - 17:19

Permalink

डॉ.श्रीराम दिवटे अरेरे.............

कोणाची लाभो न लाभो आमची सहानूभुती आहे तुम्हाला. पण असे नीराश होवु नका पुन्हा जोमाने प्रयत्न करा, यश तुमच्या हातात. एक ना एक दीवस शीकारी आपोआप शीकर बनेल... असा धीर सोडु नका. जब है समाधान तो फीर क्यो हों परेशान हा मंत्र ध्यानात ठेवा, आयुश्य आहे चढ ऊतार हे येणारच. असे गडग्डून जाऊ नका. तसेच एकंदर प्रतीक्रीयांचा रोख वाचून तूम्हाला ऊपरती झालीच असेल की थोडे नालायक आणी हरा*खो*र बनले म्हणजे असले लेख लीहाय्ची वेळ येत नाही ते ? पूढील लेखनास मनापासून शूभेच्छा... असेच लेखन बहरुदे
  • Log in or register to post comments

Submitted by वपाडाव on Tue, 02/08/2011 - 17:34

Permalink

घर मे नै ज्वारी और अम्मा पुरिया पकारी

मी विनाविलंब धूम ठोकीत असे
मी एक डायलॉग ऐकला होता... "घर मे नै ज्वारी और अम्मा पुरिया पकारी" जेव्हा तुमची इच्छा नाही मग कशाला तिकडे जायचं हो !!!!
माझ्या कॉलेजमधल्या मैत्रिणी मला गोड गोड बोलून कामाला लावायच्या.
यालाच नानांच्या भाषेत "गोबोगामा" असे म्हणतात !!!
पण माझं 'क्षेम' मात्र कधी पुसलं नाही. का बरे?
तिला जे हवे होते ते तिला मिळायचाच ना... मग ते द्रव्य असो का प्रेम... तुम्ही मग काशी का करना त्यासाठी? आणी तुम्ही आवडतीचा गैर फायदा घेतला नही हे कशावरून ?
  • Log in or register to post comments

Submitted by स्वाती२ on Tue, 02/08/2011 - 18:01

Permalink

एक राजश्री मॅडमचा प्रसंग

एक राजश्री मॅडमचा प्रसंग वगळता मला नाही वाटत तुमचा गैरफायदा घेतला गेला. तेव्हाही पहिल्यांदा असे काही घडल्यावर पुन्हा तिथे जाण्याचा चॉइस तुमचा होता. घडलेली गोष्ट खरे तर कुणा विश्वासातल्या व्यक्तीला सांगायला हवी होती. खरेदी करण्यातच मी परमानंद अनुभवला. गैरफायदा कुठे आला? माझ्या खिशाला चाट बसली पण बिचारीनं मला गुंजभरही हात लावू दिला नाही तुम्ही गल्ली चुकला डॉक. पैसे मोजून या गोष्टी मिळवायची गल्ली वेगळी... मैत्रिणीँच्या गराड्यात आख्खी कॉलेजलाईफ गेली परंतु त्यातील एकही पोट्टी माझी वाईफ बनायला तयार नव्हती. पसंद अपनी अपनी! आवडती आणि नावडती दोन्ही कडे तुम्हीच स्वतःहून जाताय , खर्च करताय मग तक्रार कसली ?
  • Log in or register to post comments

Submitted by प्राजु on Wed, 02/09/2011 - 07:15

In reply to एक राजश्री मॅडमचा प्रसंग by स्वाती२

Permalink

उत्तम प्रतिसाद स्वाती.

उत्तम प्रतिसाद स्वाती. :)
  • Log in or register to post comments

Submitted by सूर्यपुत्र on Tue, 02/08/2011 - 18:20

Permalink

अगदी सहमत हो.....

माझ्या स्त्रीदाक्षिण्याचा त्यांनी स्वतःच्या स्वार्थासाठी फायदाच करून घेतला. आणि आपला फक्त फायदा करून घेतायेत असे लक्षात आल्यानंतर बाजूला झाल्यानंतर "हूंऽऽऽ.. फारच शिष्ट आहे, मेला" असा शेरा मारायला मोकळ्या...... :( -सूर्यपुत्र.
  • Log in or register to post comments

Submitted by धमाल मुलगा on Tue, 02/08/2011 - 18:37

Permalink

either...or!

अशी मेख आहे. बाकी काही नाही. :)
  • Log in or register to post comments

Submitted by नरेशकुमार on Tue, 02/08/2011 - 19:36

Permalink

खुसखुशीत.

खुसखुशीत.
  • Log in or register to post comments

Submitted by अप्पा जोगळेकर on Tue, 02/08/2011 - 20:18

Permalink

कुठे राहतात या राजश्री मॅडम

कुठे राहतात या राजश्री मॅडम ते सांगाल का ?
  • Log in or register to post comments

Submitted by प्यारे१ on Wed, 02/09/2011 - 10:04

In reply to कुठे राहतात या राजश्री मॅडम by अप्पा जोगळेकर

Permalink

गल्ली चुकले अप्पा तुम्ही.

अप्पा, मिसळपाव आहे हो हे. शारिरीक वय १८ पाहिजे असे काही नाहीये इथे....!
  • Log in or register to post comments

Submitted by वेताळ on Tue, 02/08/2011 - 20:21

Permalink

असु दे आप्पा

आता त्या चावट पुस्तके वाचत नसतील.
  • Log in or register to post comments

Submitted by रेवती on Tue, 02/08/2011 - 20:25

Permalink

लेखन पटले नाही.मैत्रिणी

लेखन पटले नाही. मैत्रिणी म्हणता तर फक्त चांगली मैत्री करा की! असल्या अपेक्षा ठेवल्या कि मुलींना बरोबर काय ते समजते. काहीजणी लगेच लांब जातात तर काहीजणी धडा शिकवतात. राजश्री बाईंकडे न जाणे हा पर्याय उपलब्ध होताच्.......तो लगेच अनुसरणे कदाचित तुमच्या वयामुळे जमले नसेल पण नंतर तिथून पळून आलात. त्यावेळी तुम्हीही असल्या गोष्टींसाठी तयार नव्हता असाच अर्थ होतो. काही गोष्टींच्या अपेक्षेनं तुम्ही मुलींशी मैत्री करू पहात होता तो स्वार्थ नव्हता काय? अपेक्षा पूर्ण झाली नाही म्हणून त्यावर लेख लिहून कांगावा करत असल्यासारखे वाटते.
  • Log in or register to post comments

Submitted by शिल्पा ब on Wed, 02/09/2011 - 05:14

Permalink

लेख आणि प्रतिक्रिया दोन्ही

लेख आणि प्रतिक्रिया दोन्ही रोचक...
  • Log in or register to post comments

Submitted by गोगोल on Wed, 02/09/2011 - 05:25

Permalink

भन्नाट लेख

केवळ वेगवेगळे जिवनाभुनव म्हणून या लेखकडे पहिले आणि फार आवडला. माझ्या मते डॉक काही खरीखुरी तक्रार करत नाहीयेत. ही एक जस्ट लाडीक आणि डॉक ना हविहवीशी वाटणारी गैरसोय असावी.
  • Log in or register to post comments

Submitted by जे.पी.मॉर्गन on Fri, 11/11/2011 - 18:07

In reply to भन्नाट लेख by गोगोल

Permalink

+१

>>केवळ वेगवेगळे जिवनाभुनव म्हणून या लेखकडे पहिले आणि फार आवडला.<< +१ - पटेश ! लेखाकडेच नाही तर प्रतिक्रियांकडेदेखील ह्या नजरेने पाहिले आणि काही वेळ खूप करमणूक झाली. लेख आवडला ! जे पी
  • Log in or register to post comments

Submitted by जे.पी.मॉर्गन on Fri, 11/11/2011 - 18:07

In reply to भन्नाट लेख by गोगोल

Permalink

+१

>>केवळ वेगवेगळे जिवनाभुनव म्हणून या लेखकडे पहिले आणि फार आवडला.<< +१ - पटेश ! लेखाकडेच नाही तर प्रतिक्रियांकडेदेखील ह्या नजरेने पाहिले आणि काही वेळ खूप करमणूक झाली. लेख आवडला ! जे पी
  • Log in or register to post comments

Submitted by डॉ.श्रीराम दिवटे on Wed, 02/09/2011 - 05:58

Permalink

मित्रांनो हा माझा वैयक्तिक

मित्रांनो हा माझा वैयक्तिक अनुभव नाहीये. एका मित्राची मुलाखत घेतली होती. तिचा सारांश आहे. भिन्नावतरण हे मीमराठी वर टाकलेले ई-बुक त्याचाच परिपाक आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by गोगोल on Wed, 02/09/2011 - 08:26

In reply to मित्रांनो हा माझा वैयक्तिक by डॉ.श्रीराम दिवटे

Permalink

दिवटे सुद्धा गैरफायदा घेतातच

:)
  • Log in or register to post comments

Submitted by llपुण्याचे पेशवेll on Wed, 02/09/2011 - 08:39

Permalink

सदर लेखातलं पात्रं हे केवळ

सदर लेखातलं पात्रं हे केवळ भिडणं, कटवणं, फिरवणं,चंद्र दाखवणं, सोडून देणं या कॅटेगरीतलं वाटतं आहे. (या सर्व क्रियापदांच श्रेय श्री सूहास) त्यामुळे सदर पात्रं स्वतःचा फायदा करून घेण्याइतकं तयार नव्हतं हे खरं वाटतं आहे. बाकी प्रेम बीम खरोखर असतं तर प्रेमळ सक्ती वगैरे करता येते असं जाणकार सांगतात.
  • Log in or register to post comments

Submitted by शिल्पा ब on Wed, 02/09/2011 - 09:06

In reply to सदर लेखातलं पात्रं हे केवळ by llपुण्याचे पेशवेll

Permalink

प्रेमळ सक्ती म्हणजे काय?

प्रेमळ सक्ती म्हणजे काय?
  • Log in or register to post comments

Submitted by llपुण्याचे पेशवेll on Wed, 02/09/2011 - 10:19

In reply to प्रेमळ सक्ती म्हणजे काय? by शिल्पा ब

Permalink

खूप प्रयत्न करूनही शुचितैंची

खूप प्रयत्न करूनही शुचितैंची कविता सापडली नाही. आहे मिपावरच कुठेतरी.
  • Log in or register to post comments

Submitted by टारझन on Wed, 02/09/2011 - 11:03

In reply to खूप प्रयत्न करूनही शुचितैंची by llपुण्याचे पेशवेll

Permalink

कवितेच्या वेळी स्वसंपादन होतं

कवितेच्या वेळी स्वसंपादन होतं का ? असेल तर मग उडली असेल कवीता :) -(प्रेमळ) || पुण्याचे हायवे ||
  • Log in or register to post comments

Pagination

  • पान 1
  • पान 2
  • पान 3
  • Next page Next ›
  • Last page Last »

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com