जयाच्या रथा एकची चक्र पाहीं।
नसे भूमी आकाश आधार काहीं।
असे सारथी पांगुळा ज्या रथासी।
नमस्कार त्या सूर्यनारायणासी।।1।।
हे प्रभाकरा मी सूर्यफूल नाही जे की पराकोटीच्या भक्तीने आपले गोजीरवाणे मुख तुझ्याकडे करून तुझे दर्शन घेते.
हे कमलिनीनाथा मी कोमल कमलिनीदेखील नाही जी की तू उगवताक्षणी पाकळ्यारूपी बाहू फैलावून सस्मितवदनाने तुझे स्वागत करते.
हे हिरण्यगर्भा मी इवलीशी पणती नाही जी तुझ्याकडुनच तेजाचा अंश घेऊन जगाला तेजाचा संदेश देते.
हे दिनकरा किंवा मी कोणी ऋषीमुनीदेखील नाही की तुला मी अर्घ्य देऊ शकेन.
हे तेजोनिधये फार काय माझे आणि तुझे विपरीत भक्तीचे नातेसुद्धा नाही जे तुझे अंधःकाराबरोबर आहे. ज्याचे अस्तित्व केवळ तुझ्या आगमनाने मिटून, विरून जाते.
मी तर केवळ एक क्षुद्र मानव आहे.
पण मला एवढे माहीत आहे की मी रोज पहाटेतुझ्या आगमनाची अत्यंत आतुरतेने वाट पहाते.
क्षितीजावरील केशरी , लसलसते,कोवळे सूर्यबिंब माझ्या मनात अनामिक उल्हासाची लहर जागवते.
सर्वांगसुंदरा, तुझ्या तेजस्वी दर्शनाने माझ्या कणाकणात चैतन्याचा तेजोमय वर्षाव होतो.
हे भास्करा, तुझ्यामुळे माझ्या रोमरोमात निरामय उत्साह सळसळतो.
मी रोज नव्याने, तितक्याच नवलाईने तुझी वाट पहाते.
असे म्हणतात की तुझ्यापासून काही लपत नाही. तू सर्व सत्कर्मांचा अधिष्ठाता आहेस, तू सर्वसाक्षी आहेस.
हे सकलेश्वरा, भास्करा माझे मन जाणून घे, माझा प्रणाम स्वीकार कर.
वाचन संख्या
4200
प्रतिक्रिया
22
मिसळपाव
प्रतिक्रिया
पहील्या ४ पद्य ओळी या
छान लिहिले आहेस. कराग्रे वसते
खुपच छान. मनापासुन लिहिलं आहे
श्लोक
In reply to खुपच छान. मनापासुन लिहिलं आहे by वडिल
सुनील, तुमचं बरोबर आहे.
In reply to श्लोक by सुनील
छान
वाह शुचिताई, आम्ही लहानपणी
या श्लोकाची दुसरी ओळ...
In reply to वाह शुचिताई, आम्ही लहानपणी by मनिम्याऊ
मस्तच ! वाल्मिकी रामायणातील
आम्ही तर फक्त सुर्यनारायण हा
मस्त लिहिले आहे... विशेष
शुचि तै बर्याच दिवसांनी छान
सुंदर श्लोक अमोल केळकर
छान आहे.
सुंदर प्रार्थना
माझा हा लेख मी कुठेही सेव्ह
कधी काळी ऐकलेले आठवले...
In reply to माझा हा लेख मी कुठेही सेव्ह by शुचि
आज ३७ डिग्रीज असणार आहे इथे.
+१
In reply to आज ३७ डिग्रीज असणार आहे इथे. by स्पंदना
ऐला म्हंजे तुम्ही आर्यांच्या
In reply to +१ by परिकथेतील राजकुमार
तो टोटल दिवस आणि टोटल
In reply to ऐला म्हंजे तुम्ही आर्यांच्या by बॅटमॅन
अतिशय