'धोबी घाट' - पाहण्याचा वेगळा नजरिया
शाय (मोनिका डोग्रा) ही पारशी परदेशस्थित सुखवस्तू इन्व्हेस्टमेंट बँकर कदाचित काही व्यक्तिगत कारणांमुळे काही दिवस मुंबईत आली आहे. वेळ जाण्यासाठी तिनं मुंबईची छायाचित्रं काढण्याची एक असाईनमेंट घेतली आहे.
अरुण (आमिर खान) हा चित्रकार आहे. त्याच्या प्रदर्शनाच्या उद्घाटनाला शाय आणि त्याची भेट होते. दारूच्या नशेत ते एकमेकांजवळ येतात आणि एक रात्र एकत्र घालवतात. पण दुसऱ्या दिवशी ‘मला रिलेशनशिप नको आहे,’ असं अरुण सांगतो आणि ती काहीशी फुणफुणत निघून जाते. नंतर अरुण आपलं घर बदलून चक्क मोहंमद अली रोडवरच्या एका जुन्या घरात रहायला जातो. आता ही दोघं कधीच भेटणार नाहीत असं वाटतं. पण या दोघांमध्ये एक गमतीशीर दुवा असतो. तो म्हणजे त्यांचा धोबी मुन्ना (प्रतीक बब्बर).
बिहारमधून आलेला स्थलांतरित मुन्ना आपला भाऊ आणि त्याच्या कुटुंबाबरोबर रहात सुखवस्तू लोकांचे कपडे धूत आपली गुजराण करत असतो. कधीतरी आपल्याला सिनेमात चान्स मिळेल हेच त्याचं एक स्वप्न असतं. मुन्नाच्या मदतीनं शाय अरुणचा नवा पत्ता हुडकून काढते. पण त्याला प्रत्यक्ष न भेटता चक्क चोरून त्याचे फोटो काढू लागते. पाहण्याच्या आणि पाहिलं जाण्याच्या वेगवेगळ्या अनपेक्षित क्रिया इथून सुरू होतात.
मुन्ना शायला मुंबईतली वेगवेगळी माणसं दाखवतो आणि तिच्या फोटो-प्रकल्पाला मदत करू लागतो. शिवाय तिच्याकडून आपला पोर्टफ़ोलिओसुद्धा काढून घेतो. म्हणजे शाय पाहणारी, दाखवणारा तो आणि पहिला जाणाराही तो. पण ते इथंच थांबत नाही. हळूहळू तो तिच्यात इतका गुंततो की तिच्याकडे पाहणाऱ्या लिफ्टमनला तो दरडावतो. म्हणजे शाय इतरांकडून पाहिली जाणं त्याला आता नकोसं होतं.
दुसरीकडे शाय अरुणला त्याच्या नकळत पाहते आहे आणि त्याच्यात गुंतते आहे. पण अरुण काहीतरी वेगळं पाहण्यात गुंतला आहे. कुणीतरी पूर्वी केलेलं व्हिडिओ चित्रीकरण त्याच्या नव्या घरात त्याला सापडतं. नवीन लग्न होऊन मुंबईत आलेल्या एका साध्याशा मुलीनं (कृती मल्होत्रा) आपल्या उत्तर प्रदेशातल्या माहेरी राहणाऱ्या भावाला लिहिलेली ती व्हिडिओपत्रं असतात. किंवा म्हटलं तर ती तिची डायरी असते.
तिच्याविषयीचे तपशील अरुणला आणि आपल्याला हळूहळू कळू लागतात. आता या पाहण्याच्या वेगवेगळ्या मितीही लक्षात येऊ लागतात. त्यात अंतर्भूत असणारा एक वर्गसंघर्ष जाणवू लागतो. त्या बरोबरच जाती, धर्म, वर्ग अशा गोष्टींना भेदून त्या पलीकडे जाण्याच्या, या अफाट आणि बहुविध जनसमूहाला पोटात घेणाऱ्या मुंबापुरीतच असणाऱ्या अशा काही शक्यतादेखील दिसू लागतात. पाहणारी शाय आणि पाहिला जाणारा मुन्ना यांच्यात इतकं अंतर असूनही ते एकमेकांच्या जवळ येऊ शकतील का? आणि आले तरी त्याला भविष्य काय? व्हिडिओ चित्रण करणारी (म्हणजे पाहिली जाणारी) साधी, निरागस, गोड मुलगी आणि तिचं आयुष्य पाहणारा, पण तुसडा, एकलकोंडा, माणूसघाणा अरुण तिच्यामुळे बदलेल का आणि कसा? अशा सगळ्या प्रश्नांची उत्तरं शेवटी एका सनातन प्रश्नापुढे येऊन ठाकतात. ह्या अफाट दुनियेला चालतं ठेवण्यासाठी माणसांना एकमेकांविषयी विश्वास, प्रेम, अनुकंपा वाटायला लागणं अतोनात गरजेचं असतं. अशा अजस्र शहरात त्या गोष्टी मिळतात का? की सतत घरं बदलणारी, या शहरानं आपल्या प्राक्तनात लिहिलं असेल त्यानुसार भिरभिरणारी ही माणसं त्या गोष्टी मिळण्याच्या शक्यता स्वत:हून पुसून टाकत असतात? की मख्ख चेहेऱ्यानं समोर येईल ते पाहणारी पण कशावर काहीच प्रतिक्रिया न देणारी अरुणची म्हातारी शेजारीणच मुंबापुरीची पूर्वीपासूनची आणि खरी प्रतिनिधी आहे?
अशा प्रश्नांची उत्तरं सरळसोट नसतात. कारण हे प्रश्नच गहन आहेत. त्यांविषयीच्या काही शक्यता आपल्या जीवनदृष्टीनुसार दाखवून चित्रपट संपतो. वरवर पाहता किंचीतशीच गोष्ट सांगणारा म्हणून काहींना तो कंटाळवाणा वाटेल. पण त्यातली वातावरणनिर्मिती जर जाणवली तर तो आवडू शकेल. गर्दीत हरवून जाणारी, ओळखताही न येणारी, पण आपापल्या मार्गांची निवड अखेर ज्यांना एकेकट्यानंच करावी लागते अशी ही माणसं आणि समुद्राच्या लाटांनी क्षणार्धात पुसले जाणारे त्यांचे इरादे आणि त्यांची अस्तित्वं काहींना ओळखीची वाटतील. कारण म्हटलं तर ते सर्व आपल्यातच आहे. ‘लाईफ इन अ मेट्रो’सारख्या चित्रपटात अधिक ढोबळपणानं मांडल्या गेलेल्या आणि त्यामुळे काहीशा सनसनीखेज झालेल्या खास नागरी जाणिवा इथे अधिक शांत, तरल बनून येतात. सहज येऊन जाणारी महंमद अली रोड आणि धोबी घाटापासून एलिफंटा केव्ह्जपर्यंतची मुंबापुरीतली परिचित स्थळं उगीच न येता विशिष्ट जीवनदृष्टीतून आलेली आहेत हे जाणवतं. चित्रपटातले पाहणारे जसे पाहण्याच्या कृतीतून स्वत:ला समृद्ध करू पाहत असतात तद्वत चित्रपट पाहणाऱ्यालाही अंतर्मुख आणि समृद्ध करण्याच्या शक्यता त्यामुळे त्यात अधिक आहेत. एकंदरीत ढोबळ, उपदेशात्मक, संदेशपर चित्रपटांची रूढ चाकोरी हेतुपुरस्सर टाळणारा आणि तरीही सकस, सघन असा एक अनुभव देऊ पाहणारा असा हा चित्रपट आहे.‘लाईफ इन अ मेट्रो’सारख्या चित्रपटात अधिक ढोबळपणानं मांडल्या गेलेल्या आणि त्यामुळे काहीशा सनसनीखेज झालेल्या खास नागरी जाणिवा इथे अधिक शांत, तरल बनून येतात.
एकंदरीत ढोबळ, उपदेशात्मक, संदेशपर चित्रपटांची रूढ चाकोरी हेतुपुरस्सर टाळणारा आणि तरीही सकस, सघन असा एक अनुभव देऊ पाहणारा असा हा चित्रपट आहे.दोन्ही वाक्यांशी सहमत. चित्रपट आवडला होताच. पाहाणं आणि पाहिलं जाणं हे कुठेतरी समजलं होतं पण इतक्या स्पष्ट्पणे नीटसं उमगलं नव्हतं. त्या आधुनिकोत्तर संवेदना समजण्यास मदत केल्याबद्दल धन्यवाद. एक वेगळा प्रयोग म्हणून आणि हिंदी सिनेमात क्वचित असणारी सटल्टी असलेला म्हणूनही चित्रपट मनापासून आवडला. या पाहण्याबद्दल आणि पाहिलं जाण्याबद्दल एक उदाहरण आठवलं: यास्मीनच्या डायरीत ती मुंबईबद्दल जास्त आणि तिच्या वैवाहिक आयुष्याबद्दल कमी बोलते. तरी तिच्याकडच्या क्लिप्समधून हळूहळू तिचं बदलत जाणारं रूप, कमी होत जाणारं नवर्याचं अस्तित्व हे न बोलता बरंच काही सांगतं. तरीही ते हादरवणारं सत्य मात्र शेवटच्या क्षणी आमिरला कळण्याआधी एकच क्षण आधी समजतं हे ही विशेष. यातली जवळजवळ सगळीच कॅरेक्टर्स छान आहेत. तरी विशेष उल्लेखनीय असं मला आवडलेलं आणखी एक पात्र म्हणजे लताबाईचं. मिनिटभराचीच भूमिका पण तिचं निर्व्याज हसणं, सहज वावर आणि अकृत्रिम अभिनय, सगळं अगदी मस्तच!!!!
In reply to अरे व्वा... by मस्त कलंदर
In reply to समजण्यास मदत केल्याबद्दल धन्यवाद by महेश-मया
In reply to परीक्षंण छान by आत्मशून्य
In reply to अगम्य by सन्जोप राव
In reply to अगम्य by सन्जोप राव
In reply to अगम्य by सन्जोप राव
In reply to __/\__ by अर्धवटराव
In reply to अगम्य by सन्जोप राव
In reply to अगम्य by सन्जोप राव
In reply to अगम्य by सन्जोप राव
In reply to अगम्य by सन्जोप राव
In reply to सूर्याची पिल्ले....!! by इन्द्र्राज पवार
In reply to अगम्य by सन्जोप राव
In reply to सहमत by Pain
In reply to अगम्य by सन्जोप राव
पाहणं’ किंवा ‘पाहिलं जाणं’ या क्रियेशी एकाच संदर्भात खूप वेगवेगळे अर्थ जोडले जाऊ शकतातनेहमीप्रमाणेच सुरेख लेखन. मी चित्रपट पाहिलेला नाही पण वेगळ्या दृष्टीकोनातून केलेलं परीक्षण आवडलं.
In reply to नेहमीप्रमाणेच सुरेख लेखन by शहराजाद
नेहमीप्रमाणेच सुरेख लेखन. मी चित्रपट पाहिलेला नाही पण वेगळ्या दृष्टीकोनातून केलेलं परीक्षण आवडलं.+१, हेच म्हणतो. परिक्षण छान वाटले. :) रावसाहेबांचा प्रतिसादही उत्तम, अगदी अचुक मर्मभेद करणारी थेअरीही पटणारी आहे. मस्त धागा :) - ( तुर्तास "उडान" न आवडल्याने जनक्षोभास सामोरा जाणारा ) छोटा डॉन
In reply to परीक्षन छान अनि आवडले आता by मुलूखावेगळी
In reply to प्रतिसाद by चिंतातुर जंतू
In reply to प्रतिसाद by मुक्तसुनीत
मला हा चित्रपट खूपच आनंद देणारा वाटला होता.मलाही ... पण ते नक्की का हे अजूनही नीट समजलं आहे असं म्हणता येणार नाही.
चिंतातुर जंतु यांनी दिलेले परीक्षण हे त्याला न्याय देणारे वाटले.मूळ परीक्षण, जंतू, ज्ञानेश आणि मुसु यांच्या प्रतिसादांमुळे हा चित्रपट का आवडला याचा विचार करायला मदत होते आहे. आमिर खानचे केस थोडे पांढरे दाखवले आहेत, हा बदल सुखावह. अनेक क्लोजप्समधे चित्रात इंग्लिश वाक्यांप्रमाणे ओठ हलत होते आणि कानावर हिंदी येत होतं, हे खटकलं. जाता जाता: मुन्नाच्या भावाचा चेहेरा थोडासा अमजद खानसारखा वाटला.
In reply to दोन तास निव्वळ करमणूकीची by ३_१४ विक्षिप्त अदिती
In reply to प्रतिसाद by चिंतातुर जंतू
In reply to प्रतिसाद by चिंतातुर जंतू
In reply to आम्ही पौगुंदा वस्थेत प्रवेश by निनाद मुक्काम …
In reply to आणखी थोडे by सन्जोप राव
In reply to आणखी थोडे by सन्जोप राव
प्रत्येक गोष्टीत प्रतिके बघायची असे ठरवले तर शर्टावर उडालेल्या चिखलाच्या शिंतोड्यांत कुणाला पिकासोचे पेंटिंग दिसेल.मी चित्रपटाविषयी आस्वादक लिखाण करताना उपरोल्लेखित स्वरूपाच्या गोष्टी लिहिणे टाळतो. कारण साध्या सोप्या शब्दांत आणि लोकांना कळेल अशा रीतीने चित्रपटाविषयी लिहिणे शक्य असते असे मी मानतो. माझा अनुभवही तसे सांगतो. 'धोबीघाट'बद्दल लिहितानासुद्धा माझ्या मते मी हे पाळलेले आहे. इतकेच नव्हे, तर चित्रपटाविषयीची माझी विशेषणेसुद्धा 'प्रचंड आवडलेला' वगैरे नाहीत, तर 'हृद्य', 'शांत', 'तरल', 'अंतर्मुख आणि समृद्ध करण्याच्या शक्यता' किंवा 'अनुकंपा वाटावी अशी पात्रं' अशा शैलीतली आहेत. भारतीय चित्रपटाच्या इतिहासात ज्याविषयी सुवर्णाक्षरांनी लिहिले जावे असा हा चित्रपट असल्याचा कोणताही दावा माझ्या लिखाणात मी केलेला नाही. सबब, पुन्हापुन्हा या धाग्यात असे मुद्दे उपस्थित करणे अस्थानी वाटले आहे एवढे इथे नोंदतो. याहून अधिक तपशीलात अशा मुद्द्यांना प्रतिसाद देणे अनावश्यक वाटले हेही नोंदतो.
अरे व्वा...