२४ जानेवारीला बायको माहेरी गेली आणि गेलं १ वर्ष झोपी गेलेला माझ्यातला भटक्या जागा झाला. २६ जानेवारीची सुट्टी कुठे सत्कारणी लावावी हा प्रश्न नव्हताच, उत्तर तयार होतं - वीर धरण.
मागच्या वर्षी सकाळमधे "बार हेडेड गूज"ची बातमी वाचून एकदा वीर धरणाची वारी झाली होती. पण तेव्हा फक्त पाच-सहाच बदकं दिसली होती. तेव्हाच ठरवलं होतं, परत यायचं...
पहाटे ५ ला निघायचं ठरवून ८ वाजता निघालो. एकटाच. पाठीला सॅक, सॅकमधे पाण्याची बाटली आणि कॅमेरा (कॅनन SX 110). हडपसर ते सासवड अंतर जेमतेम ३०-४० मिनीटांत कापलं.
वाटेत बरेच पक्षी दिसत होते. बर्याच वेळा कॅमेर्याचं झूम कमी असल्यानं जवळून फोटो काढायला गेलो कि पक्षी उडून जायचे आणि माझा पोपट व्हायचा ! तरीही काही पक्षी मी टिपलेच -
काळ्या डोक्याची चिमणी - ही हवेत कसरत करत किडे पकडत होती.
एका जागी ५-६ मोठे दगड होते, आणि त्यावर बसला होता हा ससाणा. लांबून सहसा ओळखूही येणार नाही...
वीर धरणाजवळ भेटला वेडा राघू. बेट्याचं डोकं एका जागी स्थिर राहील तर शपथ. एक बरा फोटो यायला ४-५ मिनीटं गेली.
माझं हे नेहेमी असं होतं, मी निघतो एका कामासाठी आणि कुठेतरी दुसरीकडेच भरकटतो...यावरुन आठवते ती आमची फसलेली रायगडची ट्रीप...
आम्ही ४ मित्र २ शिवथरघळ आणि रायगड अशी १ दिवसाची ट्रीप ठरवली होती. सकाळी लवकर निघून संध्याकाळी परत्...पण जाताना इतक्या ठिकाणी थांबलो कि शिवथरघळला पोचायला ४ वाजले. तिथून घाईत निघालो आणि रायगडाकडे. ५-५:३० ला रायगडाच्या पायथ्यापाशी पोचल्यावर विचार केला, आपण वर जाणार कधी, गड पाहणार कधी (आणि किती). म्हणून हरीहरेश्वरला रात्री मुक्काम करुन दुसर्या दिवशी रायगड बघायचं ठरवलं. दुसर्या दिवशी हरीहरेश्वरहून लवकर निघालो, ते वाटेत श्रीवर्धनची पाटी दिसली. अंतर जेमतेम १४-१५ किमी असावं. झालं गाड्या तिकडं वळल्या. श्रीवर्धनहून निघून महाट फाट्यापर्यंत पोचायला १ वाजला. म्हटलं, महाडमधे जेवून मग रायगडावर जावं. जेवण होईपर्यंत ३ वाजले. रायगडाकडे निघालो आणि मित्राच्या बाईकने दगा दिला. पंक्चर काढेपर्यंत आणखी १.३० तास गेला, आणि दुसर्या दिवशीही रायगडाच्या पायथ्याशी आम्ही ५ वाजताच होतो !
फारच विषयांतर झालं...असो...
मी निघालो होतो बार हेडेड गूज बघायला आणि ३ तास झाले तरी धरणावर पोचलो नव्हतो...वेड्या राघूला मागे सोडून धरणाच्या कडेच्या रस्त्यावरुन निघालो.
सुरुवातीला दिसला एक करकोचा
आणि समाधी लावून बसलेले "ओपन बिल्ड स्टॉर्क".
तिथून पुढे निघालो बार हेडेड गूज शोधायला. थोडंच पुढे गेलो तो काठावर बरेच ठिपके दिसले. रस्ता ते धरण अंतर जवळ जवळ २०० - २५० फूट असल्याने गाडी कडेला लावून धरणाकडे जाणं भाग होतं. निम्मं अंतर कापल्यावर जे समोर बघितलं ते अविश्वसनीय होतं. धरणाच्या काठावर जवळजवळ ७०-८० बार हेडेड गूज गवतात चरत होती. हळूच सॅक खाली ठेवली आणि रांगत हळूहळू बदकांच्या जवळ गेलो. ५०-६० फूटांवरुन मनसोक्त फोटो काढले -
मी फोटो काढतंच होतो, तेवढ्यात एक बाई म्हशीला घेऊन आली आणि तिला नेमकी बदकांच्या जवळ नेऊन बांधली...सगळी बदकं उडून लांबवर जाऊन बसली...
मग जे समोर दिसले ते टिपले -
करकोचा, पाणकावळा आणि ब्राम्हणी बदकं
व्हाईट आयबीस
ब्लॅक आयबीस
तेवढ्यात समोर बदकं पाण्यात उतरताना दिसली, अर्थात तो काठ बराच दूर होता. पुन्हा माघारी वळालो. बाईक काढली आणि ज्या काठावर बदकं होती तिथं रस्त्याच्या कडेला उभी केली. पुन्हा बदकांच्या जवळ जायचं म्हणजे रांगणं आलं. लपायला काही जागाच नव्हती. एक झाड दिसलं तिथं टेकून बसलो आणि जमेल तेवढे फोटो काढले.
२ वाजता पोटात कावळे ओरडायला लागले तसा तिथून निघालो...वाटेत घाटात ससाण्याने दर्शन दिले -
या अर्ध्या दिवसाच्या भटकंतीने मन अगदी ताजेतवाने झाले. आता बघू बायको पुन्हा कधी माहेरी जाते आणि भटक्या जागा होतो ते...

या अर्ध्या दिवसाच्या भटकंतीने मन अगदी ताजेतवाने झाले. आता बघू बायको पुन्हा कधी माहेरी जाते आणि भटक्या जागा होतो ते...| लेखनविषय: | |
|---|---|
| लेखनप्रकार |
वाचने
7184
प्रतिक्रिया
29
मिसळपाव
प्रतिक्रिया
फोटो मस्तच. खासकरून राघू,
मस्त फोटो
छान.
छान फोटू आले आहेत. पाणी एवढे
बरेच दिसले, पण कॅमेर्यात
In reply to छान फोटू आले आहेत. पाणी एवढे by दादा बापट
सगळे फोटू छानच. वर्णनही
जबरी!!
जबरी...तुमची कॉमेंट !
In reply to जबरी!! by सहज
फास्टर फेणे, या पुढे भटकायला
मस्त फोटो....जबरा..... त्या
वा!
मस्त
मस्त
सगळे फोटो अतिशय
सुरेख फोटो.
मस्त फोटो!!!
व्वा...
खरंय...एका मित्राला घेऊन
In reply to व्वा... by चिगो
झक्कास......... दिवस
सुंदर फोटू मालक. तुमचा
अभ्यास वगैरे काही नाही,
In reply to सुंदर फोटू मालक. तुमचा by परिकथेतील राजकुमार
सुंदर फोटो अमोल केळकर
अप्रतिम
फाफेसाहेब.वर्णन आणि फोटो
धन्यवाद मंडळी !
सुरेख
सुरेख फोटो. मन प्रसन्न
सुंदर फोटो. मला ससाण्याचा
सगळ्यांनाच झाडाचा फोटो का